नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेख मध्ये डिजिटल मार्केटिंग काय आहे (What is Digital Marketing in Marathi) ते कशा प्रकारे कार्य करते ? आणि त्याचे कोणकोणते प्रकार आहेत, या विषयी मराठीतून जाणून घेणार आहोत.
बऱ्याच लोकांना डिजिटल मार्केटिंग मराठी बद्दल माहिती नाही, त्यांच्यासाठी आज या लेखामध्ये डिजिटल विपणन प्रणाली विषयी विस्तृतपणे जाणून घेणार आहोत.
डिजिटल मार्केटिंग बद्दल खूप लेख हे इंग्लिश मधून आहेत, पण मराठी माणसाला जर जाणून घ्यायचे असल्यास त्याला इंग्लिश लेख पाहावे लागतील. परंतु आज आम्ही मराठी माणसांसाठी इंटरनेट मार्केटिंगची सर्व माहिती मराठीतून (Step by Step Digital Marketing Meaning in Marathi) घेऊन आलो आहे.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? Digital Marketing in Marathi
डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय आहे, तर आपल्या सेवेची इंटरनेट साधनांच्या माध्यमातून केली जाणारी मार्केटिंग होय. डिजिटल मार्केटिंग हे नवनवीन ग्राहकापर्यंत पोहचविण्याचे सर्वात सोपे माध्यम आहे.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेटच्या साहाय्याने मार्केटिंग करणे होय. डिजिटल मार्केटिंग मध्ये एखाद्या वस्तूची किंवा सेवांची मार्केटिंग डिजिटल तंत्राचा वापर करून केल्या जाते.
आजच्या काळा मध्ये इंटरनेट चा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणून च Digital Media च्या मार्फत खूप मोठ्या प्रमाणात वस्तूची किंवा सेवांची ऑनलाईन खरेदी विक्री केली जाते.
अशा प्रॉडक्ट्स किंवा सर्विसेस ला ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी मार्केटिंग ची गरज असते. म्हणून इंटरनेटच्या माध्यमातून विक्री करण्यासाठी कंपन्या डिजिटल मार्केटिंग वर जास्त भर देतात. मोबाईल, लॅपटॉप, संगणक, इंटरनेट इत्यादी साधनांचा वापर करून आपण घरी बसल्या मार्केटिंग करू शकतो.
कारण की प्रत्येक व्यक्ती हा इंटरनेटला मोठ्या प्रमाणात वापर करतो, म्हणूनच प्रत्येक जण स्वतःचा ब्लॉग सुरु करून, त्या ब्लॉग च्या साहाय्याने प्रमोशन करून नवीन ग्राहक जोडू शकतो
पारंपारिक मार्केटिंग पेक्षा डिजिटल मार्केटिंग खूप लोकप्रिय झाली आहे. आणि डिजिटल विपणन प्रणाली खुप लोक पसंद करतात.

आजच्या काळात कित्येक लोक लॅपटॉप च्या मदतीने डिजिटल मार्केटिंग करून लाखो रुपये कमवितात. तुम्हाला सुद्धा पैसे कमवायचे असतील तर इंटरनेट मार्केटिंग करून कमवू शकता.
डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला कंपनीमध्ये जाण्याची किंवा कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही घरी बसून एका लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर च्या साहाय्याने मार्केटिंग करू शकता. परंतु तुम्हाला डिजिटल मार्केटिंग फायदे बद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे, आणि हा लेख तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे.
Social Media, Email Marketing, Affiliate Marketing, PPC Marketing, Apps Marketing, या सर्व प्रकारे केल्या जाणाऱ्या मार्केटिंगला डिजिटल मार्केटिंग म्हणतात.
डिजिटल मार्केटिंग च्या काही व्याख्या पुढील प्रमाणे केल्या आहेत. (Digital Marketing Definition In Marathi)
1) “इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून केली जाणारी मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय.”
2) “एखाद्या (product) वस्तूला किंवा सेवेला इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून Promote करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय.”
For Example: आपल्या मोबाइलवर येणाऱ्या Ads (जाहिराती) किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या जाहिराती ह्या डिजिटल मार्केटिंग चाच भाग आहे.
डिजिटल मार्केटिंग चे प्रकार ( Types of Digital Marketing)
डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing Meaning in Marathi Language) करण्यासाठी सर्वात महत्वाचे साधन म्हणजे इंटरनेट. इंटरनेट चा वापर करून डिजिटल मार्केटिंग मोठ्या प्रमाणात केली जाते. या मार्केटिंगचे काही प्रकार पुढील प्रमाणे पाहू शकतो.
1) सर्च इंजिन ऑप्टिमायझेंशन (SEO)
डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी SEO हा सर्वात महत्वाचा घटक मानला जातो. (SEO) Search Engine Optimization म्हणजे विशिष्ट प्रकारचे तंत्र वापरून आपल्या वेबसाईट ला सर्च इंजिन मध्ये उच्च रँकिंग (High Ranking) मिळवण्याची प्रक्रिया होय.
सर्च इंजिन ऑप्टिमायझेंशन (SEO) हि एक प्रक्रिया आहे ज्याच्या साहाय्याने आपली वेबसाईट सर्च इंजिन मध्ये ऑप्टिमाइझ केल्या जाते. आपल्या वेबसाईट ला उच्च रँक मिळवणे आणि वेबसाईट मधील ट्रॅफिक वाढवणे हे SEO चे मुख्य उद्दीष्टे असते.
(SEO) चे महत्वाचे दोन घटक आहेत.
- On Page SEO ऑन पेज एस. इ. ओ.
- Off Page SEO ऑफ पेज एस. इ. ओ.
जर सर्च इंजिनवर आपली वेबसाईट रँक असेल तर आपल्या वेबसाईट ची रहदारी वाढणार व आपल्याला नवीन ग्राहक मिळणार.
2) सोशल मीडिया मार्केटिंग (SMM)
सोशल मीडिया मध्ये Facebook, Instagram, Linkedin, Twitter इत्यादी सोशल मीडिया वेबसाईट चा समावेश होतो. या सोशल मिडियाच्या माध्यमातून एखादी व्यक्ती हजारो लोकांसमोर आपले मत विचार अगदी काही कालावधीत मांडू शकते.
सोशल मीडिया हा डिजिटल मार्केटिंगचा एक महत्वाचा भाग बनला आहे. सोशल मीडिया म्हणजे काय व याच्या साहाय्याने आपण आपले प्रॉडक्ट्स् ला प्रमोट करू शकतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या प्रॉडक्ट्स् विषयी ग्राहकां चे मत सुद्धा जाणून घेऊ शकतो.
सोशल मीडिया हे जाहिराती चे प्रभावी माध्यम आहे. यामध्ये मार्केटिंग करण्याचे महत्वाचे साधन म्हणजे Ads जाहिरात होय. ह्या जाहिराती पैसे देऊन तयार केल्या जातात. Facebook, Instagram वर मोठ्या प्रमाणावर जाहिराती दिसतात. तसेच आपण सोशल मीडिया मध्ये Paid Promotion करून मार्केटिंग करू शकतो. तसेच आपली Service लोकांपर्यंत पोहचवू शकतो.
3) E-Mail मार्केटिंग
ई-मेल मार्केटिंग मध्ये लोकांना ई-मेल पाठवले जातात. या मेल मध्ये कंपनी आपल्या सर्विसेस बद्दल माहिती प्रदान करीत असते. किंवा काही कंपन्या ई-मेल पाठवून लोकांना त्यांच्या प्रॉडक्ट्स् विषयी माहिती प्रदान करतात यालाच ई-मेल मार्केटिंग म्हटले जाते. तसेच आपल्या ग्राहकांना नवीन सवलती आणि Offers ची माहिती देण्यासाठी ई-मेल मार्केटिंग एक सोपे माध्यम आहे.
4) Youtube चॅनल
युट्यूब चॅनेल च्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केल्या जाते. या मध्ये विडिओ च्या साहाय्याने मार्केटिंग केल्या जाते. ज्या वस्तूची मार्केटिंग करायची असेल त्या वस्तुचे विडिओ तयार करून युट्यूब वर किंवा इतर सोशल मीडिया साईटवर Upload केल्या जातात.
>> हे पण वाचा – युट्युब मधून पैसे कसे कमवायचे

युट्यूब हा सर्वात लोकप्रिय असलेला व्हिडीओ मार्केटिंग प्लैटफॉर्म आहे. युट्यूब वर मोठ्या प्रमाणात Audience उपलब्ध आहे, या माध्यमातून आपन व्हिडीओ खूप लोकांपर्यंत पोहचवू शकतो. तसेच यावर Advertisement च्या माध्यमातून सुध्दा मार्केटिंग केल्या जाते. युट्यूब वर आपण मार्केटिंग संदर्भात ग्राहकांच्या प्रतिक्रिया सुद्धा मिळवू शकतो.
पुढील लिंक ला क्लिक करून मराठीस्पिरीट युट्युब चॅनल ला फोल्लोव करू शकता.
5) Affiliate मार्केटिंग
Affiliate मार्केटिंग हा डिजिटल मार्केटिंग चा महत्वाचा घटक आहे, Affiliate मार्केटिंग च्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात प्रॉडक्ट्स् ची किंवा सर्विसेस ची मार्केटिंग करू शकतो. बऱ्याच शा अशा वेबसाईट आहेत ज्या मोठ्या प्रमाणात Affiliate Marketing ची सर्विसेस Provide करतात.
Affiliate Marketing प्रोग्रॅम जॉईन करण्यासाठी आपल्याला त्या वेबसाईट वर अकाऊंट तयार करावे लागते. वेबसाईट वर अकाऊंट तयार केल्यानंतर आपल्याला ज्या प्रॉडक्ट्स् ची मार्केटिंग करायची असते त्या प्रॉडक्ट्स् ची लिंक मिळते. त्या लिंक वरून जर एखाद्या ग्राहकाने तो प्रोडक्ट खरेदी केला तर आपल्याला काही प्रमाणात कमीशन मिळते.
खालील काही कंपन्या अफिलीयट मार्केटिंग सर्विसेस प्रदान करतात.
- अमॅझॉन
- फ्लिपकार्ट
- कमिशन जंक्शन
अशा प्रकारे यासारख्या मोठ्या कंपन्या Affiliate मार्केटिंगचा वापर करून त्यांच्या प्रोडक्ट ची मार्केटिंग करतात.
6) PPC मार्केटिंग
PPC म्हणजे Pay Per Click होय. Pay Per Click हा एक सर्च इंजिन मार्केटिंग SEM चा प्रकार आहे. यामध्ये आपण गूगल Adwords च्या माध्यमातून आपल्या प्रॉडक्ट्स् ची किंवा सर्विसेस ची जाहिरात केल्या जाते. Pay Per Click च्या माध्यमातून आपण लगेच आपल्या नवनवीन ऑफर्सची माहिती ग्राहकांपर्यंत पोहच वू शकतो. PPC मध्ये जेवढे ग्राहक आपल्या जाहिरातीवर क्लिक करतील त्यानुसार आपला जाहिरात खर्च होईल.


खालील उदाहरणात सर्व जाहिराती या PPC प्रकारच्या जाहिराती आहेत. अशा प्रकारे जाहिराती च्या माध्यमातून PPC मार्केटिंग केली जाते.
7) Mobile मार्केटिंग
आजच्या इंटरनेटच्या काळात स्मार्ट फोन वापर कर्त्यांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. म्हणून या स्मार्ट फोन च्या च्या माध्यमातून मार्केटिंग केल्या जात आहे. मोबाइल मार्केटिंग मध्ये लोकांना SMS किंवा Whatsapp Messages पाठविले जातात. या Messages मध्ये विविध कंपन्या त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल किंवा प्रॉडक्ट्स् बद्दल माहिती प्रदान करतात. मोबाइल चा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे म्हणूनच मोबाइल मार्केटिंग खूप महत्वाची आहे.

8) Apps मार्केटिंग
ज्याप्रमाणे मोबाईल च्या साहायाने मार्केटिंग केल्या जाते अगदी त्याच प्रकारे विविध प्रकारच्या अँप्स च्या माध्यमातून देखील मार्केटिंग केल्या जात असते. हि मार्केटिंग करण्यासाठी सर्वात आधी अँप्स डेव्हलोप करावे लागेल आणि नंतर या अँप्स ला विविध लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला कि या अँप्स मध्ये मार्केटिंग साठी वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनाच्या जाहिराती तसेच बँनर, फ्लेक्स आणि Adds यांचा समावेश केला जातो यालाच आपण अँप्स मार्केटिंग म्हणू शकतो.
अँप्स मार्केटिंग हा आजच्या युगातील डिजिटल मार्केटिंग करण्याचा सर्वात उत्तम मार्ग समजला जातो. कारण आजकाल सर्वांजवळ स्मार्ट फोन्स आहेत आणि या फोन्स मध्ये लोक विविध प्रकारची अँप्स डाउनलोड करतात. या अँप्स मध्ये शॉपिंग अँप्स, गेमिंग अँप्स आणि इतरही खूप प्रकारचे अँप्स मोबाईल मध्ये डाउनलोड केले जातात.
FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
एखाद्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ला डिजिटल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून प्रमोट करणे म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय. तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून केली जाणारी मार्केटिंग म्हणजे डिजिटल मार्केटिंग होय.
टॉप डिजिटल मार्केटिंग स्किल्स कोणते?
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन । Search Engine Optimization
सोशल मीडिया मार्केटिंग । Social Media Marketing
सामग्री निर्मिती । Content Creation
स्पर्धक विश्लेषण । Competitor Analysis
व्हिडिओ विपणन । Video Marketing
डिजिटल मार्केटिंग मधून पैसे कसे कमवायचे?
डिजिटल मार्केटिंग मधून पैसे कमविण्यासाठी पुढील काही मार्ग खूप महत्वाचे आहेत.
कन्टेन्ट मार्केटिंग । Content Marketing
ब्लॉगिंग । Blogging
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन । SEO
वेब डिझायनिंग । Website Designing
सोशल मीडिया विपणन । Social Media Marketing
अफिलिएट विपणन Affiliate Marketing
मोबाईल मार्केटिंग । Mobile Marketing
ई-मेल विपणन । Email Marketing
निष्कर्ष : डिजिटल मार्केटिंग Information in Marathi
आम्ही आशा करतो की तुम्हाला डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? ( What is Digital Online Marketing Marathi) आणि डिजिटल मार्केटींग कसे करावे हे चांगल्या तर्हेने समजलेच असेल. तसेच विवीध प्रकारची माहिती सुद्धा तुम्हाला मिळाली असेल.
परंतु जर तुम्हाला काही समजलं नसेल तर कृपया आम्हाला खालील असलेल्या कंमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा.
तसेच या ब्लॉग ला आणखी उपयुक्त करण्यासाठी तुमच्या काही सूचना असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. म्हणजेच आम्ही भविष्यात या ब्लॉगला आपण दिलेल्या सूचनांनुसार अद्ययावत करू शकेल.
🙏🙏धन्यवाद ! 🙏🙏
khup chan mahiti
🙏धन्यवाद!🙏
It will be better If I can download or take print out of this useful artical
🙏धन्यवाद!🙏
Very nice and important information. great
🙏धन्यवाद!🙏