युट्युब मधून पैसे कसे कमवायचे | How to Make Money From Youtube in Marathi

how to earn money from youtube in marathi

युट्युब चॅनेल कसे तयार करतात याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मागील पोस्ट मध्ये मिळालेली आहेच तर आजच्या या पोस्ट मध्ये आपण युट्युब मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन पाहूया. 

(युट्युब आणि त्या मधून पैसे कमवण्याचे मार्ग | How to Earn Money from Youtube in Marathi)

आजच्या टेकनॉलॉजि च्या दुनियेत बरेच लोक आपल्या मोबाईल द्वारे पैसे कसे कमवता येतील किंवा इंटरनेट मधून ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग शोधात असतात त्यांच्यासाठीच आम्ही पैसे कमवण्याच्या सोप्या मार्गाबद्दल माहिती देणार आहोत. तसेच या मार्गाद्वारे पैसे कमविण्यासाठी यामध्ये काहीही गुंतवणूक करण्याची गरज पडत नाही. 

YouTube म्हणजे नक्की काय आहे?

युट्युब हा गुगल चा सर्वात मोठा आणि लोकप्रिय व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्म वर शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान, संगीत, चित्रपट, ब्लॉगिंग, फॅशन, गेमिंग, व्यवसाय इत्यादी टॉपिक वर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.

earn money on youtube by uploading videos marathi
Earn Money on YouTube by Uploading Videos in Marathi

युट्युब वर मोठ्या प्रमाणात कन्टेन्ट हे वैयक्तिक खातेधारकांनी च तयार केलेले आहे. त्याचप्रमाने व्यावसायिक संस्थांनी सुद्धा व्हिडीओ सामग्री तयार केली आहे. तसेच YouTube मधून पैसे कमावण्यासाठी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करावी लागत नाही. 

स्वतःचे युट्युब चॅनेल तयार करायचा विचार करत आहात तर तुम्ही आमच्या युट्युब चॅनेल कसे तयार करायचे या पोस्ट ला भेट द्या

युट्युब या प्लॅटफॉर्म वर मोठ्या प्रमाणात व्हिडीओ पाहिले जात आणि अपलोड सुद्धा केले जातात. त्याचप्रमाणे या व्हिडीओ ला विविध सोशल मीडिया साईट वर शेयर केले जाते. तसेच युट्युब च्या साहाय्याने आपण जगातील कोणताही व्हिडीओ पाहू शकतो. आता युट्युब मध्ये एक शॉर्ट विडिओ नावाचे नवीन फिचर आले आहे त्यामध्ये आपण शॉर्ट व्हिडीओ अपलोड करू शकतो आणि थोड्या प्रमाणात Views येऊ शकतात 


युट्युब मधून पैसे कसे कमवायचे | Earn Money From Youtube 

युट्युब या प्लॅटफॉर्म वर पैसे कमवण्यासाठी एक युट्युब चॅनेल तयार करावे लागते आणि त्या चॅनल वर व्हिडीओ अपलोड करावे लागतात. व्हिडीओ अपलोड करून आपली कमाई सुरु होत नाही त्यासाठी आपल्या युट्युब चॅनेल वर मोठ्या प्रमाणात Subscribers असायला हवेत आणि त्याचप्रमाणे आपल्या चॅनल वरील व्हिडीओ ला मोठ्या प्रमाणात Views असतील तरच आपण युट्युब मधून पैसे कमवण्यास सुरुवात करू शकतो. 

त्याचप्रमाणे आपल्या युट्युब चॅनल मध्ये अपलोड केलेल्या व्हिडीओ मधून पैसे कमावण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला युट्युब चॅनेल मॉनिटाईझ करावे लागेल. जर आपले युट्युब चॅनल मॉनिटाईझ झाले तर युट्युब ला आपल्या चॅनल च्या मार्फत पैसे कमवण्यास सुरुवात करतो त्यासाठी आपल्याला कॉपीराईट फ्री आणि ओरिजिनल व्हिडीओ अपलोड करणे गरजेचे असते.


युट्युब वरून पैसे कमवण्याचे मार्ग | Easy Way to Earn Money

युट्युब मधून पैसे कमवण्यासाठी बऱ्याच मार्गाचा अवलंब केला जातो त्या पैकी काही महत्वाचे मार्गाबद्दल आपण जाणून घेऊ. तसेच या मार्गाचा वापर करून मोठ्या प्रमाणात पैसे मिळवू शकतो.

how to make money on youtube in marathi
Earn Money YouTube in Marathi

गूगल अ‍ॅडसेन्स | Google AdSense

गुगल अ‍ॅडसेन्स ही गुगल द्वारे चालवल्या जाणारी जाहिरात कंपनी आहे. या Google AdSense च्या साहाय्याने आपल्या वेबसाईट, ब्लॉग किंवा युट्युब चॅनल वर जाहिराती प्रदान केल्या जातात. 

या जाहिराती च्या बदल्यात गुगल ऍडसेन्स आपल्याला पैसे देत असते. गुगल अ‍ॅडसेन्स च्या जाहिराती इमेजेस, व्हिडीओ, आणि बॅनर इत्यादी प्रकारच्या असतात. 

गुगल अ‍ॅडसेन्स हा युट्युब वरून पैसे कमवण्याचा मुख्य मार्ग आहे. गुगल अ‍ॅडसेन्स मध्ये आपल्याला एक अकाउंट तयार करावे लागेल यामध्ये विविध प्रकारची माहिती भरून झाल्यावर आपले युट्युब चॅनल ला गुगल अॅडसेन्स चे Approval मिळण्यासाठी एक Request द्यावी.

आपले युट्युब चॅनल मॉनिटाईझ झाले कि आपल्या चॅनल च्या व्हिडीओ मध्ये विविध प्रकारच्या जाहिराती सेट केल्या जातात. या जाहिरातीचे गुगल ऍडसेन्स आपल्याला पैसे देत असते.

तसेच Google AdSense हा मोठं मोठया युटूबर चा पैसे पैसे कमवण्याचा मुख्य स्रोत आहे. 


अफिलिएट मार्केटिंग | Affiliate Marketing

युट्युब मधून मोठ्या प्रमाणात कमाई करण्यासाठी अफिलिएट मार्केटिंग सुद्धा उत्तम पर्याय आहे. एफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला प्रथम एफिलिएट प्रोग्राम जॉईन करावा लागतो.

यानंतर आपण एखाद्या प्रॉडक्ट बद्दल व्हिडीओ तयार करून त्या प्रॉडक्ट चे विविध फिचर त्याचे फायदे अश्या विविध प्रकारची माहिती त्या व्हिडीओ मध्ये द्यावी. आणि युट्युब च्या डिस्क्रिपशन मध्ये तो प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी अफिलिएट लिंक ऍड करावी. 

जेणेकरून एखाद्या व्यक्तीला तो प्रॉडक्ट घ्यायचा असेल तर त्याला त्या प्रॉडक्ट च्या ऑफिसिअल साईट वर न जात आपल्या अफिलिएट लिंक वरून खरेदी करता येईल. यामध्ये आपल्याला त्या प्रॉडक्ट च्या विक्री वर कमिशन सुद्धा प्राप्त होते. अश्या प्रकारे आपण अफिलिएट मार्केटिंग करून मोठ्या प्रमाणात कमिशन मिळवू शकतो. 


Product Review

Product Review हा सुद्धा युट्युब मधून पैसे कमविण्याचा सोपा मार्ग आहे. यामध्ये एखादी कंपनी आपल्याला तिच्या विविध प्रकारच्या प्रॉडक्ट बद्दल माहिती देते आणि आपल्या युट्युब चॅनल वर त्या प्रॉडक्ट बद्दल Review करण्यास सांगते. 

या युट्युब व्हिडीओ मध्ये त्या कंपनीच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस बद्दल विविध प्रकारची माहिती द्यावी लागते. या Product Review च्या बदल्यात आपल्याला त्या कंपनीकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असतात. 


Sponsorship

स्पॉन्सरशिप म्हणजेच एखाद्या कंपनी ला आपल्या युट्युब व्हिडीओ मध्ये प्रमोट करणे होय. स्पोर्न्सरशिप मधून पैसे कमवण्यासाठी आपल्या व्हिडीओ ला मोठ्या प्रमाणात View असायला हवेत तसेच आपल्या युट्युब चॅनल वर मोठ्या प्रमाणात Subscriber असायला पाहिजेत. 

त्याचप्रमाणे आपल्या युट्युब चॅनल ची लोकप्रियता जसजशी वाढत जाईल तसतसे आपल्याला Sponsorship साठी Request येतील. तसेच आपण ज्या कंपनी ला Sponsor करतो ती कंपनी कडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असतात. 


Sell Your Own Products

जेव्हा पण तुमच्या युट्युब चॅनल वर मोठ्या प्रमाणात Subscriber आणि View येत असतात तेव्हा तुम्ही स्वतः चा प्रॉडक्ट तयार करा आणि युट्युब व्हिडीओ च्या साहाय्याने त्या प्रॉडक्ट ची विक्री करा. अश्या प्रकारे स्वतः चे प्रॉडक्ट विकून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. 


FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

युट्युब मधून पैसे कसे कमवायचे?

Top Ways to Earn Money Youtube in Marathi
गूगल अ‍ॅडसेन्स । Google AdSense
अफिलिएट मार्केटिंग । Affiliate Marketing
प्रॉडक्ट रिव्हिव । Product Review
स्पॉन्सरशिप । Sponsorship
प्रॉडक्ट ची विक्री । Sell Your Own Products
या सर्व मार्गाचा अवलंब करून तुम्ही युट्युब मधून मोठ्या प्रमाणात पैसे कमवता येतील.


घरबसल्या युट्युब मधून पैसे कमवा

अशा प्रकारे वरील सर्व मार्गाचा अवलंब करून आपण YouTube वरून पैसे कमवू शकता. तसेच या व्यतिरिक्त सुद्धा अजून खूप सारे मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही यूट्यूब चॅनेल्स च्या साहायाने घरबसल्या पैसे कमाऊ शकता.

तुम्ही एखादी नोकरी करून महिन्याचा जो पगार मिळवता, त्यापेक्षाही जास्त पैसा तुम्ही घरी बसून ऑनलाईन यूट्यूब चॅनेल्स वर काम करून कमवू शकता. खूप सारे Youtuber आहेत कि जे यूट्यूबवर काम करून दरमहा लाखो रुपये कमवतात. 

तसेच मित्रानो हा लेख कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हा लेख जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की Share करा.

Leave a Reply