इंडेक्स फंड म्हणजे काय? | Index Fund in Marathi

इंडेक्स फंड म्हणजे काय

जेव्हा आपण गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हा सर्वप्रथम आपणास हा प्रश्न पडत असतो की कुठल्या प्रकारे शेअर्स मार्केट मध्ये पैसे गुंतवावे आणि मोठ्या प्रमाणात रिटर्न कसे मिळविता येईल? अश्या बऱ्याच स्टॉक मार्केट बद्दल च्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला शेअर मार्केट बद्दल संपूर्ण या पोस्ट मधून मिळून जाईल. 

तसेच स्टॉक मार्केट मध्ये जोखीम चे प्रमाण खूप जास्त असते आणि तुम्हाला कमी जोखीम स्वीकारून पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्या साठी म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय आहे.

इंडेक्स फंड हा देखील म्युच्युअल फंड मधील एक असा एक फंड आहे ज्यात आपणास कमी जोखीम मध्ये गुंतवणूक करता येते आणि गुंतवणुकीसाठी देखील खुप कमी पैसे लागतात गुंतवणूक दारांना परतावा देखील चांगला प्राप्त होतो. म्हणूनच आज आपण या इंडेक्स फंड बद्दल संपूर्ण माहिती पाहूया.


इंडेक्स म्हणजे काय? | Index Meaning in Marathi

इंडेक्स म्हणजे “निर्देशांक” होय. आणि या स्टॉक एक्सचेंग चा अंदाज घेण्यासाठी म्हणजेच मार्केट ची स्थिती जाणून घेण्यासाठी इंडेक्स (निर्देशांक) हा खूप महत्वाचा असतो. जसे कि सेन्सेक्स, निफ्टि ५० आणि बँक निफ्टी इत्यादी..

आपल्या भारत देशात दोन महत्वाचे Stock Exchange आहेत या मध्ये “BSE । Bombay Stock Exchange” आणि “”NSE । National Stock Exchange” चा समावेश होतो. 

जसे कि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चा इंडेक्स हा सेन्सेक्स आहे ज्या द्वारे भारतातील टॉप ३० कंपन्यांच्या स्टॉक मध्ये वाढ किंवा घट झाली हे कळते. आणि त्याचप्रकारे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये निफ्टि ५० हा इंडेक्स आहे यामध्ये भारतातील टॉप ५० कंपन्यांच्या शेअर्स मध्ये वाढ किंवा घट झाली यावर मार्केट ची स्थिती समजते. 


इंडेक्स फंड म्हणजे काय? | Index Fund Meaning in Marathi

इंडेक्स फंड हा म्युच्युअल फंड प्रमाणेच फंड चा एक प्रकार आहे, ज्याप्रमाणे आपण म्युच्युअल फंड मध्ये कुठल्याही एका फंडमध्ये पैसे गुंतवत असतो मग त्या फंड मधील मॅनेजर आपले पैशांची वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतो. अणि मग त्या शेअर्समधुन जो काही नफा प्राप्त होत असतो तो आपल्यासोबत शेअर करत असतो.

>> म्युच्युअल फंड बद्दल संपूर्ण मार्गदर्शन 

अगदी त्याचप्रमाणे इंडेक्स फंड देखील कार्य करतात, पण या फंड मधील पैशाची गुंतवणूक हि कंपन्यांच्या स्टॉक मध्ये होत नसून केवळ “सेन्सेक्स किंवा निफ्टी” (Sensex & Nifty) मध्येच गुंतवणूक केली जाते. 

जर एखाद्या व्यक्तीला BSE इंडेक्स मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर त्या फंड ला बीएसई इंडेक्स म्हणजे सेन्सेक्स मधील टाॅप ३० कंपन्यांमध्ये त्या पैशांची गुंतवणूक केली जाईल. त्याचप्रमाणे BSE चा S&P 100 इंडेक्स फंड आहे, तर त्याचा पैसा सेंन्सेक्स मधील टाॅप १०० कंपन्यांमध्ये च गुंतविला जाईल. निफ्टीच्या बाबतीत देखील हीच याच प्रमाणे फंड गुंतविले जातात. 


इंडेक्स फंड इतर फंड पेक्षा वेगळे कसे आहेत? |  How is an Index Fund Different from Other Funds

जेव्हा आपण इतर फंडमध्ये पैसे गुंतवत असतो तेव्हा त्यातील फंड मॅनेजर कंपन्यांच्या स्टॉक वर नजर ठेवून असतात, आणि पोर्टफोलिओ मध्ये देखील वारंवार बदल करत असतात, फंड मॅनेजर एका कंपनी मधून पैसे काढुन दुसऱ्या कंपनी मध्ये पैशांची गुंतवणूक करत असतो. म्हणजे आपल्या गुंतवणूक केलेल्या पैशावर सक्रीयपणे लक्ष ठेवण्याचे काम फंड मॅनेजर करत असतो.

>> IPO म्हणजे काय? आणि IPO मध्ये गुंतवणूक कशी करायची संपूर्ण माहिती  

पण इंडेक्स फंड मध्ये आपणास असे करावे लागत नाही इथे आपण डोळे झाकून कुठल्याही एका फंडमध्ये पैशांची गुंतवणूक करू शकतो. हा निफ्टी आणि सेन्सेक्स चा फंड असल्याने यात कुठलाही बदल घडुन येत नाही, कारण निफ्टी आणि सेन्सेक्स मधील टाॅप कंपन्या ह्या एका ठाराविक कालावधी करीता निश्चित करण्यात आलेल्या असतात. हेच कारण आहे की यात गुंतवणूक करण्याला आपण Passive Investment किंवा Passive Fund देखील म्हणू शकतो. 


इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक का करावी? | Why Invest in Index Funds

इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना खुप कमी खर्च लागत असतो म्हणजेच या फंड चा “Expense Ratio” हा खूप कमी असतो. सेन्सेक्स आणि निफ्टी काळानुसार यात नेहमी वाढच होत आहे, जसे कि जुन २०१३ मध्ये सेन्सेक्स १९ हजारावर होता, पण आज तो ६२ हजारा च्या आसपास ट्रेंड करत असलेला आपणास दिसून येतो.

>> SIP म्हणजे काय? संपूर्ण माहिती वाचा

तज्ञांकडुन असे देखील म्हटले जाते की वेळेनुसार यात अधिक वाढ होत जाईल, ज्या व्यक्तींनी २०१३ मध्ये BSE इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक केली असेल आज त्यांना किती फायदा झाला असेल याचा अंदाज आपण यावरून लावू शकतो. याच कारणामुळे जास्तीत जास्त गुंतवणूकदार हे इंडेक्स फंड मध्ये पैशांची गुंतवणूक करण्याला अधिक प्राधान्य देतात.


इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक कशी करायची? | How to invest in index funds in Marathi

इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपणास कुठल्याही प्रकारचे डिमॅट अकाउंट ओपन करण्याची आवश्यकता नसते. यात गुंतवणूक करण्यासाठी आपणास कुठल्याही ब्रोकरला कमिशन देखील देण्याची गरज नसते.

इंडेक्स फंड मध्ये आपणास कुठल्याही इन्व्हेस्टमेंट अँप्स द्वारे गुंतवणूक करता येते, आपण इन्व्हेस्टमेंट अॅप चा वापर करून कुठल्याही एका इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करू शकतो तसेच यामध्ये रिटर्न कॅलक्युलेटर देखील दिलेले असते.

आपण एकाच वेळी लंपसंम अमाऊंट ची गुंतवणूक करू शकतो किंवा SIP (सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन) च्या माध्यमातुन देखील दरमहा थोडे थोडे करत यात पैशांची गुंतवणूक करू शकता.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

इंडेक्स फंड मधील गुंतवणूक कोठे केली जाते?

इंडेक्स फंड मधील पैशाची गुंतवणूक हि कंपन्यांच्या स्टॉक मध्ये होत नसून केवळ “सेन्सेक्स किंवा निफ्टी” (Sensex & Nifty) मध्येच गुंतवणूक केली जाते. 

भारतातील सर्वोत्तम इंडेक्स फंड कोणता आहे?

सर्वोत्तम इंडेक्स फंड ची निवड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुंतवणूक कोठे करायची आहे हे निश्चित करावे लागेल जसे कि, भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असल्यास, तुमच्या साठी निर्देशांक म्हणजेच इंडेक्स सेन्सेक्स किंवा निफ्टी 50 मध्ये गुंतवणूक करावी लागेल. 

इंडेक्स म्युच्युअल फंडाचे प्रकार कोणते आहेत?

1) सेन्सेक्स इंडेक्स फंड
या फंड मध्ये BSE Sensex ३० कंपन्या मध्ये गुंतवणूक केली जाते.  
2) निफ्टी इंडेक्स फंड
या प्रकारामध्ये NSE NIFTY 50 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते.
अश्याच प्रकारे इतरही खूप इंडेक्स फंड आहेत ज्या मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. 


निष्कर्ष | Index Fund Information in Marathi

आम्हाला आशा आहे कि वरील इंडेक्स फंड बद्दल सविस्तर मार्गदर्शन आणि माहिती तुम्हाला समजलीच असेल तरी तुमचे काही प्रश्न असतील तर कंमेंट मध्ये विचारा आणि हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली याबद्दल कंमेंट मध्ये कळवा. 

तसेच गुंतवणूक करणाऱ्या आणि गुंतवणुकीचा विचार करत असणाऱ्या तुमच्या इतर मित्रांना हि पोस्ट नक्की शेअर करा. 

धन्यवाद!!

Leave a Reply