IPO म्हणजे काय? | What is IPO Meaning in Marathi

IPO म्हणजे काय

आपल्याला आपले पैसे गुंतवायाचे असतील तर आयपीओ (IPO) हा पर्याय आपण नक्कीच ऐकलेला असेल. अनेकांनी यामध्ये गुंतवणूक देखील केलेली असेल पण मात्र काही लोकांना आयपीओ या विषयाबद्दल काहीही माहिती नसेल. म्हणून आजच्या लेखामध्ये आपण IPO म्हणजे काय?आणि याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

आपल्यापैकी अनेकांना आयपीओ मध्ये गुंतवणूक तर करायची आहे मात्र आपल्याला ipo मध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया काय असते? याविषयी काहीही माहिती नसते. त्यामुळे आपण नवीन एखादा चांगला आयपीओ आला तरी देखील त्यात गुंतवणूक करू शकत नाही. 

आपल्या मनात अनेक प्रश्न येतात जसे की नक्की हे आयपीओ मध्ये शेअर्स दिले कसे जातात (Allotment Process), आयपीओ मध्ये गुंतवणूक कशी करतात, बुक बिल्डिंग आणि फिक्सड प्राइझ इश्यू काय आहे, आयपीओ मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर आणि अंडररायटर यांच्या भूमिका काय असतात, या सर्व प्रश्नांची उत्तरे आयपीओ काय आहे (What is IPO in Marathi) या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेऊया. 

IPO म्हणजे काय? | What is IPO Meaning in Marathi

IPO म्हणजे Initial Public Offering होय. शेअर मार्केट मध्ये जेव्हा एखाद्या कंपनीला आपले शेअर्स आणायचे असतात तेव्हा त्यांना बॉंबे स्टॉक एक्सचेंज (BSE) किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर सरळ लिस्ट न होता त्यांना IPO आणावा लागतो. यामध्ये खाजगी कंपनी त्यांचे काही शेअर्स सार्वजनिक जनतेसाठी ऑफर करते आणि फंड गोळा करते. 

जेव्हा एखाद्या खाजगी कंपनीला निधी गोळा करायचा असतो तेव्हा त्यांना ती कंपनी सार्वजनिक करून स्टॉक मार्केट मध्ये एन्ट्री घ्यावी लागते, आणि जेव्हा कंपनी पहिल्यांदा आपले शेअर्स सार्वजनिक जनतेला ऑफर करते तेव्हा त्याला आयपीओ म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग असे म्हटल्या जाते. 


आयपीओ लॉन्च करण्यासाठी फंडिंग स्टेजेस | IPO Funding Details

यासाठी आपल्याला सर्वकाही सुरुवातीपासून जाणून घ्यावे लागणार आहे. शेअर मार्केट च्या भाषेमध्ये यालाच फंडिंग स्टेजेस म्हणून ओळखले जाते.

आयपीओ चा अर्थ आणि प्रकार
  • पहिल्या स्टेज मध्ये जेव्हा एखादी कंपनी सुरू होत असते तेव्हा त्या कंपनीमध्ये इच्छूक गुंतवणूकदार आणि मित्र परिवार यांच्या गुंतवणूक असतात. 
  • दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेज मध्ये स्टॉक मार्केट मध्ये लिस्टिंग न होता काही इतर गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात. या फंडिंग स्टेज मध्ये खूप टेक्निकल गोष्टी असतात.
  • चौथी आणि शेवटची स्टेज ही IPO म्हणजेच इनिशियल पब्लिक ऑफरिंग असते.

IPO मध्ये National Stock Exchange (NSE) किंवा Bombay Stock Exchange (BSE) वर कंपनी लिस्ट होते. मग त्या आयपीओ मध्ये गुंतवणूकदार म्हणजेच Investors हे गुंतवणूक करत असतात. यामध्ये इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर देखील असतात. 


IPO ची गरज का असते? | IPO Information in Marathi

एखाद्या कंपनीला जर पैसे उभे करायचे असतील तर त्यांना Equity Fund मिळविण्याचा आयपीओ हा एक सर्वात चांगला पर्याय असतो. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की फंड उभे करण्याचे दुसरे कोणते पर्याय असतात? दुसरा एक महत्वाचा पर्याय असतो तो म्हणजे Debt Fund होय.

कंपनीने सर्वात आधी काही गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन एक Private Equity Fund उभा केलेला असतो. मात्र आता कंपनी अशा स्टेज ला आलेली असते जिथे त्या कंपनीला जितके पैसे गरजेचे असतात तेवढे पैसे ते Private Investors देऊ शकत नाहीत. 

म्हणूनच जेव्हा एखादी कंपनी IPO लाँच करते तेव्हा त्यांच्यासाठी अनेक गुंतवणूकदारांचे पर्याय खुले असतात, यामध्ये सुरुवातीला गुंतवणूकदार आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर देखील Fundraise करण्यासाठी मिळतात. 

अनेक म्युच्युअल फंड आणि पेन्शन फंड मध्ये मोठे फंड गुंतविलेले असतात आणि आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याची जास्त संधी असते. त्यामुळे त्या कंपनीला जास्तीत जास्त फंड मिळण्यासाठी देखील मदत होत असते.


आयपीओ चे प्रकार | IPO Types in Marathi

आयपीओ चे त्याच्या किमती वरून दोन मुख्य प्रकार पडतात ते खालील प्रमाणे आहेत.

IPO बद्दल संपूर्ण माहिती
  1. Fixed Price Issue– फिक्सड प्राइझ इश्यू मध्ये कंपनी स्वतः शेअरची एक किंमत ठरवते आणि त्याच किंमतीला शेअर्स हे विकले जातात. लोकांचा प्रतिसाद आला नाही तर काही काळ जाऊन कंपनी ही किंमत आणखी कमी करते. मात्र हा पर्याय सध्या जास्त करून वापरला जात नाही.
  1. Book Building Issue– यामध्ये कंपनी कडून एक किंमत असलेली रेंज ठरवली जाते. मार्केट मधून त्यांना काय प्रतिसाद येतो हे ते बघतात आणि त्यानंतर ते एक प्राइझ बँड ठरवतात. मग इव्हेस्टर ने जितकी bidding केली असेल तितके लॉट त्यांना कंपनीने त्या प्राइझ बँड मध्ये ठरविलेल्या किमतीला खरेदी करावे लागतात.

जर IPO ची किंमत सर्वात कमी असेल तर त्याला Floor Price म्हणतात आणि सर्वात जास्त किंमत असेल तर त्याला Cap Price असे म्हटले जाते. यामध्ये फक्त 20% तफावत असायला हवी. 

  • आता हे लॉट्स विकले जातात म्हणजेच डिस्ट्रिब्युट केले जातात. यामध्ये सर्व इन्व्हेस्टर्सला हे लॉट्स डिस्ट्रिब्युट केले जातात. 
  • ऍप्लिकेशन मागविल्यानंतर ते कदाचित जितके शेअर्स आहेत त्याहून जास्त येतात त्यामुळे मग पुढची प्रोसेस येते ती म्हणजे शेअर्स अलॉटमेंट होय. एक टक्केवारी नॉर्मली ठरलेली असते त्यानुसार शेअर्स अलोट केले जातात.
  • त्यानंतर त्या कंपनीला जिथे हवे तिथे म्हणजे NSE किंवा BSE वर लिस्ट केले जाते.

>> हे पण वाचा : Bank म्हणजे काय संपूर्ण माहिती

एखादा आयपीओ हा 3 ते 5 दिवसांसाठी ओपन ठेवला जातो. यात तुम्हाला ऍप्लिकेशन करायचे असते सध्या ही सर्व प्रक्रिया अगदी सोयीस्कर झालेली आहे.


IPO लॉन्च करण्याचे मुख्य कारण

एखाद्या कंपनीला आपले कार्य वाढवायचे असेल तर त्यासाठी निधी गोळा करण्यासाठी ते आयपीओ लॉन्च करतात.

एखाद्या कंपनीने जर आधी Debt म्हणजे कर्ज घेतलेले असेल तर त्यांना ते कर्ज फेडण्यासाठी निधी गोळा करतात. 

काही जुने गुंतवणूकदार कंपनीत बाहेर पडू इच्छित असतील तर मग त्यासाठी कंपनी आयपीओ लॉन्च करते. कंपनीला मग मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार भेटत असतात. त्यामुळे जुने प्रायव्हेट इक्विटी मधील गुंतवणूकदार कंपनीतून गुंतवणूक काढून घेऊ शकतात.


आयपीओ आणण्याची प्रक्रिया | IPO Process in Marathi

  • एखाद्या कंपनीला जर आयपीओ सुरू करायचा असेल तर त्यासाठी ते एका मर्चंट बँकेला किंवा इन्व्हेस्टमेंट बँकेला हाताशी धरतात. या इन्व्हेस्टमेंट बँक मोठ्या बँकांच्या हॅन्ड बँक असतात. यामध्ये अनेक गोष्टी बघून मग कंपनी आणि ती बँक जोडले जातात.
  • आता पुढे बँक काही कमिटमेंट करत असतात. यालाच Underwriting म्हटले जाते. याशिवाय Best Efforts Commitment सारख्या अनेक गोष्टी असतात. काही ठिकाणी Syndicate Underwriting देखील केले जाते.
  • कंपनी विषयी जवळपास सर्व काही माहिती एका Prospectus मध्ये लिहिलेली असते त्याला Red Herring Prospectus असे म्हणतात. एखादा गुंतवणूकदार गुंतवणूक करत असताना त्या कंपनीचे सर्व काही मागील व्यवहार बघत असतो आणि ते सर्व याच डॉक्युमेंट मध्ये असते. हे बनविण्याचे काम देखील इन्व्हेस्टर बँक करतात.
  • SEBI शिवाय BSE, NSE चे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन पूर्ण करण्याचे काम इन्व्हेस्टमेंट बँक पूर्ण करते.
  • आता वेळ येते किंमत ठरवायची, कंपनीला एक व्हॅल्यू दिली जाते. या व्हॅल्यू पैकी काही रक्कम म्हणजेच 15 ते 30% रक्कम ही शेअर्स मध्ये देण्याचे ठरविले जाते आणि बाकी उरलेली रक्कम ही प्रमोटर्स आणि जुन्या गुंतवणूकदारांकडे असते. 
  • जितकी व्हॅल्यू पब्लिक साठी शेअर्स द्वारे रिलीज केलेली असते तिला इश्यू साईझ म्हणतात आणि त्यातून एका स्टॉक ची जी किंमत असते तिला इश्यू प्राइझ म्हटले जाते.
  • कंपनी स्वतःहून एक कमीत कमी शेअर्स ची लॉट साईझ ठरवते आणि त्यामुळे गुंतवणूकदाराला तेवढे शेअर्स असलेला एक लॉट घ्यावा लागतो. एखादा व्यक्ती त्यातून निवडून 1 किंवा 2 शेअर्स खरेदी करू शकत नाही.

IPO चे फायदे | Benefits of IPO In Marathi

आयपीओ मध्ये गुंतवणूक करत असाल तर त्याचे फायदे तुम्हाला माहिती असायला हवेत. याशिवाय पुढे येणारे तोटे देखील आधीच जाणून घेऊ शकतो.

  • आयपीओ हे कंपनीकडून त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी शक्यतो लॉन्च केलेले असतात आणि त्यांची अलॉटमेंट ही कमी लोकांना झाली असल्याने तुम्हाला जर एखादा लॉट मिळाला तर तुमचा फायदा होणार हे नक्की असते.
  • गुंतवणूकदार म्हणून 3 ते 4 दिवसात 70% हुन अधिक नफा मिळविण्याची आयपीओ ही सुवर्ण संधी असते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

  1. IPO चा फुल्ल फॉर्म काय आहे?

इनिशियल पब्लिक ऑफरिंग (Initial Public Offering)

  1. IPO नक्की काय आहे?

जेव्हा खाजगी कंपनी पहिल्यांदा त्यांचे शेअर्स सार्वजनिक जनतेला ऑफर करते तेव्हा या प्रारंभिक प्रक्रियेला इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) किंवा सार्वजनिक प्रस्ताव असे देखील म्हटले जाते. 


निष्कर्ष | IPO बद्दल संपूर्ण माहिती

जर तुम्ही सुद्धा IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नक्कीच IPO म्हणजे काय? What is IPO Meaning in Marathi आणि मराठी मध्ये आयपीओ बद्दल संपूर्ण माहिती हा लेख खूप उपयुक्त ठरणार आहे. 

या लेखाच्या माध्यमातून आम्ही आयपीओ विषयी सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामध्ये IPO आणण्याची प्रक्रिया, IPO ची गरज आणि IPO लाँच करण्याचे मुख्य कारण तसेच IPO चे फायदे व IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात याबद्दल सविस्तर माहिती (IPO Meaning in Marathi) दिलेली आहे. 

आम्हाला अपेक्षा आहे कि हि ब्लॉग पोस्ट तुम्हाला आवडली असेलच तसेच या पोस्ट च्या संदर्भात तुमच्या काही सूचना असतील तर नक्की कळवा. आणि शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद !

Leave a Reply

This Post Has 2 Comments

  1. मराठीमध्ये अश्या प्रकारची माहिती फार कमी website देतात त्यापैकी मराठी स्पिरिट ही एक website आहे. खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.