Cibil Score म्हणजे काय? | Cibil Score Meaning in Marathi

Cibil Score म्हणजे काय

Cibil Score चा फुल्ल फॉर्म काय आहे?

Cibil Score चा फुल्ल फॉर्म “Credit Information Bureau India Limited” असा होतो. तसेच सिबिल स्कोर ला मराठी मध्ये क्रेडिट स्कोर असे देखील म्हटले जाते.

Cibil Score म्हणजे काय? | Cibil Score Meaning in Marathi

Cibil Score हा तीन अंकाचा एक क्रमांक असतो. हा क्रमांक साधारणतः ३०० ते ९०० च्या दरम्यान राहत असतो. सिबिल हे दुसरे काही नसुन आपली क्रेडिट हिस्ट्री असते. ज्या व्यक्तीला कर्ज काढायचे आहे अशा प्रत्येक व्यक्तीला सिबिल स्कोर म्हणजे काय, हे माहीत असणे आवश्यक आहे.

दैनंदिन जीवनात आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या कर्जाची गरज भासत असते, मग ते घर बांधण्यासाठी, घर विकत घेण्यासाठी, कार घेण्यासाठी तसेच एखादा उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी विविध प्रकारच्या कर्जाची गरज भासते.

वरील पैकी कुठल्याही प्रकारचे कर्जासाठी अप्लाय करताना सर्वात आधी बॅकेकडुन आपला सिबिल स्कोर म्हणजेच क्रेडिट स्कोर तपासला जातो. नंतरच कर्ज द्यायचे कि नाही हे बँकेकडून ठरविले जाते.

TransUnion Credit Scores 

सिबिल स्कोर तयार केलेल्या संस्थेचे कंपनीचे नाव ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेड असे आहे. हया कंपनीला RBI ने देखील मान्यता दिली आहे.

ही कंपनी प्रत्येक नोकरी तसेच व्यवसाय करत असलेल्या व्यक्तींची आर्थिक माहीती ठेवत असते.

त्या व्यक्तीवर याआधी किती कर्ज आहे? त्याने आतापर्यंत किती कर्ज घेतलेले आहे? तो व्यक्ती कर्जाचे हप्ते वेळेवर फेडतो किंवा नाही इत्यादी फायनान्शिअल माहीती ही कंपनी ठेवत असते. वरील सर्व माहितीच्या आधारे सर्व व्यक्तींचा एक सिबिल स्कोर काढला जातो.

भारतातील सर्व बँका कर्जासाठी अर्ज केलेल्या व्यक्तींची माहीती या ट्रान्स सिबिल कंपनी कडे देतात, आणि या खातेदाराची माहिती जसे कि, किती बॅकेत खाते आहे, त्यापैकी किती बॅकेत कर्ज घेतलेले आहे इत्यादी माहीती मिळविली जाते. 

सिबिल स्कोर बद्दल महत्वाची माहिती | Important Information About Cibil Score

  • सिबिल स्कोर हा ३०० ते ९०० दरम्यान असतो, आपला सिबिल स्कोअर ९०० जवळ असल्यास चांगले मानले जाते. कारण याने आपणास कुठल्याही बॅकेकडुन सहजरीत्या कर्ज उपलब्ध होऊ शकते. ज्या व्यक्तींचा सिबिल ७५० पेक्षा अधिक आहे त्यांना कमी व्याजदरात लवकरात लवकर कर्ज प्राप्त होत असते.
  • ज्यांचे सिबिल स्कोर कमी आहे अशा व्यक्तींना कर्ज मंजूर करण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागतो. अणि समजा कर्ज मंजूर झाले तरी जास्त व्याजदर आकारले जाते. साधारणतः ज्यांचे सिबिल स्कोर कमी आहे त्यांचे कर्ज बॅकेकडुन नामंजूर करण्यात येत असते. म्हणुन आपण आपला सिबिल स्कोर किमान ७५० पेक्षा जास्त ठेवणे आवश्यक आहे.
  • सिबिल स्कोर हा मागील सहा महिन्यांच्या आर्थिक माहितीच्या क्रेडिट हिस्ट्रीच्या आधारावर काढला जातो. सिबिल स्कोर काढत असताना पेमेंट हिस्ट्रीस ३० टक्के प्राधान्य दिले जाते. दुसरी बाब म्हणजे क्रेडिट कार्ड द्वारे घेतलेले पैसे त्याचे हप्ते वेळेवर फेडले आहे किंवा नाही हे देखील यात बघितले जाते. जर आपण क्रेडिट कार्डचा हप्ता वेळेवर भरला नसेल तर आपले सिबिल स्कोर कमी होत असतो.
  • क्रेडिट कार्ड द्वारे काढलेले पैसे ह्यावर एक क्रेडिट लिमिट दिले जाते ह्यापैकी दिलेल्या क्रेडिट लिमिट पैकी आपण किती कर्ज वापरतो यावर देखील आपला सिबिल स्कोर ठरत असतो, मिळालेल्या क्रेडिट लिमिट पैकी जेवढा कमी क्रेडिट आपण वापरतो तेवढा आपला सिबिल स्कोर वाढतो.
  • सिबिल स्कोर काढत असताना क्रेडिट टाईपला २५ टक्के प्राधान्य दिले जाते. याचसोबत असुरक्षित लोन घेतल्याने देखील आपला सिबिल स्कोर कमी होत असतो. पण आपण घेतलेले सुरक्षित कर्ज असुरक्षित कर्जापेक्षा अधिक असेल तर आपला सिबिल स्कोर वाढत असतो.
  • तसेच सिबिल स्कोर हा आपण कुठल्याही आॅनलाईन वेबसाईट तसेच अॅपच्या साहाय्याने विनामुल्य चेक करू शकतो. याचसोबत फोन पे, गूगल पे आणि पेटीएम या सारख्या पेमेंट गेटवे अॅपवर देखील आपण आपला सिबिल स्कोर तपासु शकता.

अश्या प्रकारे आपण क्रेडिट स्कोर बद्दल संपूर्ण माहिती (Credit Score in Marathi) बघितली आहेच तसेच तुमचे आणखी काही प्रश्न असलीस नक्की कळवा. 

Leave a Reply