सोशल मीडिया म्हणजे काय? आणि Social Media Marketing चे फायदे

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? Social Media Marketing in Marathi

आपल्या सर्वांना सोशल मीडिया बद्दल चांगली माहिती आहेच. आपण दररोज  सोशल मीडिया वापरतो पण आपल्याला Social Media Marketing बद्दल जास्त माहिती नाही. 

तर आज या पोस्ट मध्ये सोशल मीडिया म्हणजे काय? व सोशल मीडिया मार्केटिंग काय आहे? Social Media Marketing in Marathi आणि सोशल मीडिया चे कोणकोणते फायदे आहेत याबद्दल या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. 

आजच्या काळात Social Media चा वापर मोठ्या प्रमाणात केल्या जातो. म्हणून एखाद्या Product ची विक्री करण्यासाठी सोशल मीडिया मार्केटिंग सर्वात उत्तम प्लैटफॉर्म आहे.

आपण आपल्या जीवनामध्ये Social Media नेटवर्किंग साईट चा मोठ्या प्रमाणात वापर करतो, पण आपल्याला माहिती आहे की या सोशल मिडियाच्या साहाय्याने आपण विपणन करून आपल्या प्रॉडक्ट्स् आणि सर्विसेस ला सेल करू शकतो व त्यामधन पैसे सुद्धा कमवू शकतो. 

अनुक्रमणिका show

सोशल मीडिया म्हणजे काय आहे? Social Media Meaning In Marathi

‘सोशल मीडिया’ म्हणजे नक्की काय तर ते एकमेकांसोबक संवाद (Communication) साधण्याचे सोपे माध्यम आहे. सोशल मीडिया हा एक लोकप्रिय प्लैटफॉर्म आहे ज्या मध्ये आपण आपल्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत जोडल्या जातो. तसेच सोशल मीडिया माध्यमाचा वापर करून आपल्या मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत नवनवीन इन्फॉर्मेशन शेअर आणि रिसीव्ह करू शकतो.

आणखी वाचा – लिंक्डइन म्हणजे काय ? व LinkedIn प्रोफाइल कसे बनवायचे

आजच्या काळात सोशल मीडिया जवळजवळ सर्वच लोक वापरतात. या मार्फत मध्ये आपण आपले फोटो, विडिओ तसेच आपले टॅलेंट, विचार संपूर्ण जगासमोर मांडू शकतो. 

खालील काही लोकप्रिय सोशल मीडिया ची उदाहरणे दिली आहेत. 

 1. फेसबुक
 2. यूट्यूब
 3. ट्विटर
 4. इन्स्टाग्राम
 5. लिंक्डइन

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? What is Social Media Marketing in Marathi  

सोशल मीडिया मार्केटिंग हा एक डिजिटल मार्केटिंग चाच एक भाग आहे. याला SMM सुध्या म्हटले जाते. सोप्या भाषेत म्हणायचे झाल्यास एखाद्या ब्रँड ला किंवा प्रॉडक्ट्स् ला प्रमोट करण्यासाठी सोशल साईट वर जे काही धोरण लागू केले जाते त्यास सोशल मीडिया मार्केटिंग असे म्हणतात.

या मार्केटिंग मध्ये आपण आपल्या कन्टेन्ट ला विविध प्रकारे प्रमोट करू शकतो. जसे कि Text, images, Videos, Infographic  इत्यादी च्या साहाय्याने आपण आपल्या कन्टेन्ट ला प्रमोट करू शकतो. 

आमचा दुसऱ्या पोस्ट मध्ये डिजिटल मार्केटिंग बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे, तर आमच्या या पोस्ट ला व्हिझिट करा


Social Media मार्केटिंग चे फायदे | SMM Benefits in Marathi

सध्या 2022 मध्ये सर्वात जास्त लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर ऍक्टिव्ह आहेत. या मीडिया मधून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या Audience सोबत जोडल्या जातो. तसेच आपल्या व्यवसाया ची प्रगती करण्यासाठी सोशल मीडिया हे एक महत्वाचे साधन मानले जाते. 

सोशल मीडिया मार्केटिंग चे फायदे

खालील प्रमाणे Social Media च्या काही फायद्यांच्या बाबतीत सांगितले आहे.

 • Reach

सोशल मीडिया च्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचा ब्रँड पोहचू शकता. तसेच याच्या साहाय्याने तुमच्या ब्रँड ला जास्तीत जास्त Reach येऊ शकते.  

 • Increase Brand Awareness

जर तुमचे ब्रँड, प्रॉडक्ट्स् किंवा सर्विसेस नवीनच असेल तर Social Media एक प्रभावी माध्यम आहे, याचा वापर करून तुम्ही तुमच्या ब्रँड ची कमीत कमी वेळे मध्ये जागरुकता करू शकता. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या ब्रॅण्ड विषयी माहिती प्रदान करू शकता.

 • Traffic Generation

सोशल मीडिया मधून आपण मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक मिळवू शकतो. तसेच आपल्या ब्रँड ला विविध सोशल मीडिया किंवा विविध ग्रुप मध्ये शेअर करून ट्रॅफिक मिळवू शकतो. तसेच आपण Paid Promotion करून सुद्धा आपल्या वेबसाईट वर मोठया प्रमाणात ट्रॅफिक आणू शकतो. सोशल मीडिया मधून आपण कमीत कमी वेळेमध्ये जास्त प्रमाणात Traffic जनरेट करू शकतो. 

 • Conversions

सोशल मीडिया मध्ये मोठ्या प्रमाणात प्रेक्षक ऍक्टिव्ह असल्याने तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी खूप मदत होते. हे एक प्रभावी माध्यम आहे त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट्स् किंवा सर्विसेस ची लीड जनरेट करू शकता.


Social Media Marketing Tips in Marathi | सोशल मीडिया मार्केटिंग टिप्स

1) आपले ध्येय निश्चित करा | Define Your Goal

सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे आपले ध्येय निश्चित करणे होय. आपले सोशल मीडिया साठी मजबुत ध्येय ठरवलेले नसल्यास आपण वेळोवेळी तयार केलेली योजना विकसित करू शकणार नाही. जर आपले ध्येय निश्चित केलेले असल्यास ध्येय साध्य करण्यासाठी योग्य योजना तयार करून ध्येय साध्य करू शकतो.

2) प्रेक्षकांबद्दल संशोधन करणे | Target Your Audience

आपण Social Media मार्केटिंग करत असाल तर प्रथम आपले ध्येय निश्चित करणे आणि दुसरे म्हणजे आपल्या लक्षीत प्रेक्षकांबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे. यामध्ये आपल्याला प्रेक्षकांना काय पाहिजे किंवा त्यांच्या आवडी निवडी विषयी जाणून घ्यायला हवे. आपल्या प्रेक्षकांबद्दल जाणून घेतले तर आपण आपल्या प्रेक्षकांना कोणत्या गोष्टींची अवश्यकता आहे त्या बद्दल जाणून घेणे गरजेचे असते.

प्रेक्षकांना ज्या गोष्टीत जास्त रस आहे त्या विषयावर जास्त भर देऊन त्या विषयी सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट टाकणे. तसेच त्यांनी केलेल्या कंमेंट वर रिप्लाय देने आणि त्यांचा आपल्या बद्दलचा अभिप्राय गोळा करणे, महत्वाचे असते. यामुळे आपण आपल्या Website वर Audience जोडून ठेऊ शकतो.अशा प्रकारे आपण सोशल मिडीया मार्केटिंग करण्यासाठी आपल्या प्रेक्षकांबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.

तुम्हाला ब्लॉगिंग म्हणजे काय व स्वतः चा ब्लॉग कसा सुरु करायचा असेल तर मराठी ब्लॉग यावर क्लिक करा.

3) स्पर्धकाविषयी संशोधन | Research Your Competitors

Social Media Marketing मध्ये आपल्या स्पर्धकावर लक्ष ठेवणे अत्यंत महत्वाचे असते. आपला स्पर्धक त्याचा व्यवसाय वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टीचे पालन करतो. तसेच त्याने व्यवसायासाठी वापरलेल्या काही योजनांवर आपण लक्ष ठेवले, तर आपण त्याने वापरलेल्या योजना पेक्षा आणखी चांगली योजना तयार करून अमलात आणू शकतो. अशा प्रकारे आपल्या स्पर्धकाविषयी संशोधन करावे.

4) स्पर्धा चालवा | Competition

आपल्याला यशस्वीपणे सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धा चालवावी लागते. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे म्हणून मोठया प्रमाणात स्पर्धा चालूच असतात. आपल्याला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या Audience च्या मताप्रमाणे किंवा त्यांना ज्या गोष्टी त रस आहे त्या विषयी प्रतिसाद दिला पाहिजे. तसेच प्रेक्षकांना काही नवीन शिकायची अपेक्षा असते म्हणून आपण त्यांच्या विषयी संशोधन करून त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे तशाच प्रकारच्या पोस्ट अपलोड कराव्या.

5) सोशल मीडिया कन्टेन्ट | Great Social Content

सोशल मीडिया कन्टेन्ट तयार करताना ते विचारपूर्वक तयार करायला हवे. आपले कन्टेन्ट हे इतरांनी तयार केलेल्या कन्टेन्ट पेक्षा वेगळे असायला हवे. Social Media Content in Marathi तयार करताना ते कन्टेन्ट नवीन आणि उत्कृष्ट असणे महत्वाचे आहे. जर कन्टेन्ट हे स्पर्धकाच्या कन्टेन्ट पेक्षा युनिक असेल तर नक्किच ते आपल्या प्रेक्षकांना आवडेल, आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल.

>>हे पण वाचा :- कन्टेन्ट मार्केटिंग म्हणजे काय? आणि कन्टेन्ट मार्केटिंग बद्दल संपूर्ण माहिती.

6) व्हिडीओ सामग्रीचा वापर करा | Attractive Video Content

सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये व्हीडीओ सामग्री किती शक्तीशाली बनली आहे, कदाचित याची आपल्याला कल्पनाही नसेल. म्हणून सोशल मीडिया मध्ये आपण मोठ्या प्रमाणात व्हिडीओ सामग्रीचा वापर करायला हवा. जर आपण व्हिडीओ सामग्रीचा वापर करत असाल तर तुम्हाला भविष्यात यांचा खूप फायदा होतो. या व्हिडीओ सामग्री च्या माध्यमातुन आपण आपल्या प्रेक्षकांसोबत संपर्क साधू शकतो. तसेच आपण Facebook आणि Instagram या सोशल मीडियाचा वापर करून Live Video द्वारे आपल्या प्रेक्षकांसोबत थेट संपर्क साधू शकतो.

7) पोस्ट ऑप्टिमाइझ करा | Post Optimisation

सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये आपण टाकलेली पोस्ट वारंवार ऑप्टिमाइझ करावी.  म्हणजेच नवनवीन आणि Unique Content पोस्ट करायला हवे, त्यामुळे आपल्या प्रेक्षकांचे रिटेन्शन वाढेल. सोशल मीडिया विपणनासाठी उच्च गुणवत्तेची सामग्री प्रकाशित करणे आणि यशस्वी रणनिती तयार करण्यासाठी आपली सामग्री वेळोवेळी ऑप्टिमाइझ करणे महत्वाचे आहे.


FAQ :- नेहमी विचारले जाणारे प्रश्न

सोप्या शब्दात सोशल मीडिया म्हणजे काय?

सोशल मीडिया एकमेकांसोबक संवाद साधण्याचे सोपे माध्यम आहे, यामध्ये वर्चुअल नेटवर्क च्या साहाय्याने लोकांच्या कल्पना, विचार आणि माहिती सामायिक केल्या जातात आणि शेअर केल्या जातात. तसेच आजच्या युगात सोशल मीडिया हा एक लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे.
For Ex:- Facebook, Instagram, Twitter, LinkedIn, Whatsapp, Youtube, Etc

सोशल मीडिया चे प्रकार कोणते?

Social networking sites – Facebook, LinkedIn.
Bookmarking sites – Pinterest, Flipboard, Diggs
Social news – Digg
Media sharing – Pinterest, YouTube, Vimeo
Microblogging – Twitter, Facebook
Social review sites – TripAdvisor, Yelp, FourSquare


निष्कर्ष :- सोशल मीडिया बद्दल पूर्ण माहिती

या लेखामध्ये आपण मराठी मध्ये सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय (Social Media Marketing In Marathi) आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती जाणून घेतली. आम्ही आशा करतो कि तुम्हाला हि माहिती चांगल्या तर्हेने कळली असेल.

या ब्लॉग बद्दल तुमच्या काही सूचना असतील तर नक्कीच सांगा, जेणेकरून आम्ही या ब्लॉग ला भविष्यामधे आणखी उपयुक्त करू शकू, तसेच तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कंमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. 

🙏धन्यवाद ! 🙏

Leave a Reply

This Post Has 3 Comments

 1. Bhagwan Shankar Chavan

  खूप सहज आणि सोप्या भाषेत आपण ही माहिती दिली आहे आणि खूप फायदेशीर पण आहे आपले धन्यवाद