नमस्कार मित्रांनो, आज आपण सामग्री विपणन बद्दल म्हणजेच Content Marketing या बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याच लोकांना कंटेंट मार्केटिंग बद्दल माहिती नाही, काही लोकांना माहिती आहे पण तीही थोड्याच प्रमाणात आहे.
म्हणूनच या लेखा मध्ये कन्टेन्ट मार्केटिंग म्हणजे काय व Content Marketing बद्दल संपूर्ण माहिती साठी पोस्ट पूर्ण वाचा. What is Content Marketing Meaning in Marathi and Benefits of Content Marketing
मराठीमध्ये सामग्री विपणन म्हणजे काय तर हा एक डिजिटल मार्केटिंग चाच भाग आहे. यामध्ये तुम्हाला कन्टेन्ट लिहावे लागते आणि त्या कन्टेन्ट ची मार्केटिंग करावी लागते. आजकाल खूप लोक कंटेंट मार्केटिंग च्या साहाय्याने खूप पैसे कमावत आहेत. त्याप्रकारे तुम्ही सुद्धा यामध्ये करियर करू शकता.
तर चला जाणून घेऊया Content Marketing नक्की काय आहे आणि Content Marketing Types मराठीमध्ये.
कन्टेन्ट मार्केटिंग म्हणजे काय? | What is Content Marketing in Marathi
Content Marketing म्हणजे वेगवेगळ्या टॉपिक वर नवनवीन मौल्यवान कंटेंट सामग्री तयार करणे होय. या मध्ये आपण विविध प्रकारे कन्टेन्ट तयार करू शकतो. जसे कि व्हिडीओ, इमेज, इंफोरग्राफिक, पॉडकास्ट आणि टेक्स्ट इत्यादी स्वरूपाचे कन्टेन्ट तयार केल्या जाते.
कन्टेन्ट च्या साहाय्याने आपल्याला काहीतरी शिकायला मिळते, तसेच विविध प्रकारची माहिती मिळत असते.
या कंटेंट किंवा सामग्री चा आपण विविध प्रकारे उपयोग करू शकतो. जसे कि, वर्तमानपत्र, विविध वेबसाईट, ब्लॉग, सोशल मीडिया, टेलिविजन अशा प्रकारच्या विविध प्लॅटफॉर्मवर हि सामग्री पोस्ट केल्या जाते. तसेच या सामग्रीचा वापर ग्राहकांना माहिती देण्यासाठी व आकर्षित करण्यासाठी केला जातो.
सामग्रीला एखाद्या उद्देशाने म्हणजे एखादा प्रॉडक्ट्स् प्रमोट करणे किंवा एखादी वस्तूंची जाहिरात करण्यासाठीच्या व्यावसायिक उद्देशाने सामग्री ग्राहकांच्या किंवा उपयोग कर्त्यांच्या समोर मांडले जाते. तसेच ब्लॉग च्या स्वरूपात, लेख लिहून हि सामग्री ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सादर केल्या जाते.
कन्टेन्ट मार्केटिंग हे एक असे मार्केटिंग तंत्र आहे ज्यामध्ये मौल्यवान सामग्री तयार केल्या जाते व त्या सामग्री ला शेअर सुद्धा केल्या जाते. जेणेकरून जास्तीत जास्त ग्राहक आपल्या कन्टेन्ट कडे आकर्षित होतील.
आपण जेव्हा पण सर्च इंजिन वर सर्च करतो व जे काही रिझल्ट येतात त्यामधील ज्या साईट्स मध्ये आपल्याला आवश्यक ती माहिती मिळते. लोकांना ज्या माहितीची आवश्यकता असते किंवा त्यांना जी माहिती आवडते तीच माहिती ग्राहकांना सहज उपलब्ध करून दिल्या जाते, यालाच कन्टेन्ट मार्केटिंग असे म्हटल्या जाते.
कन्टेन्ट मार्केटिंग चे काही उदाहरणे | Content Marketing Examples
आजच्या डिजिटल मार्केटिंग च्या युगात सर्वच लोकांचा जास्तीत जास्त वेळ हा इंटरनेट व सोशल मीडिया यावर खर्च होतो. म्हणूनच आपण चांगल्या प्रकारे कन्टेन्ट तयार करून सोशल मीडिया आणि इंटरनेट च्या साहाय्याने लोकांपर्यंत पोहचू शकतो.
अर्थातच विविध व्यावसायिकांना जास्तीत जास्त ऑडियन्स ला आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन जगात प्रामुख्याने कंटेंट मार्केटिंग चा वापर केल्या जातो.
कन्टेन्ट मार्केटिंग अर्थ मध्ये विविध माध्यम येतात त्या माध्यमांच्या सहाय्याने कंटेंट लिहू शकता.
वेबसाइट्स किंवा ब्लॉग
जेव्हा पण तुम्ही गुगल वर काही परिणाम सर्च करता, त्यावेळी सर्च इंजिन तुम्हाला ब्लॉग्स रिझल्ट दाखवते. त्या ब्लॉग किंवा संकेतस्थळे च्या माध्यमातून कंटेंट मार्केटिंग करून आपण प्रॉडक्ट्स् किंवा सर्विसेस ची सर्वात चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकतो. तसेच आकर्षक कन्टेन्ट लिहून आपण ग्राहकांना आकर्षित करू शकतो.
सोशल मिडिया
आजचा जगात सोशल मिडीया हा विनामूल्य प्लैटफॉर्म आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोक सोशल मीडियावर वेळ घालवतात.आपली माहिती प्रसारित लोकांपर्यंत कमी वेळात पोहचण्यासाठी सोशल मिडीया प्रभावी माध्यम आहे, यामुळे कंटेंट मार्केटिंग मध्ये सोशल मिडीया खूप महत्वाचे आहे.
व्हिडीओ कंटेंट
बऱ्याच लोकांना विविध विषयावरची माहिती वाचण्यापेक्षा त्या विषयी व्हिडीओ पाहणे जास्त सोयीस्कर वाटते, किंवा आवडते. तसेच व्हिडीओ सामग्री समजायला सोपी असते व काही विषयांच्या बाबतीत उपयुक्त असते. युट्युब च्या साहाय्याने आपल्याला व्हिडीओ कन्टेन्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे अगदी सोपे असते.
पॉडकास्ट
PODCAST सुद्धा एक प्लैटफॉर्म आहे, जिथे फक्त Audio सामायिक केले जातात. आणि एका तर्हेने हा रेडिओ आहे, ज्यावर आपण आपल्या आवाजात Audio Upload करू शकतो. आणि ज्यांना जेव्हा हवं तेव्हा ते ऐकू शकतात.
इंफोरग्राफिक
इन्फोग्राफिक हे प्रभावी माध्यम आहे ज्याच्या सहाय्याने आपण मोठमोठे प्रकारचे इंफोरग्राफिक तयार करून त्याच्या माध्यमातून आपल्या कंटेंट चे प्रमोशन करत असतो.
वेब पेज
वेब पेजेस किंवा लँडिंग पेज चा साहाय्याने सुद्धा कन्टेन्ट मार्केटिंग केल्या जाते. या मध्ये काही ठराविक लोकं पर्यन्त पोहचण्यासाठी किंवा त्यांना आकर्षित करण्यासाठी करतो कंटेंट मार्केटिंग उपयोग होतो.
कंटेंट मार्केटिंग चे फायदे | Benefits of Content Marketing in Marathi
- नवीन आणि मौल्यवान सामग्री तयार करून ब्लॉग मध्ये समाविष्ट करत असाल तर तुमच्या ब्लॉग ला चांगल्या बॅक लिंक मिळतील व वेबसाईट ची ऑथॉरिटी वाढण्यास मदत होईल.
- वेबसाईट मध्ये व्हिसिटर्स ला आणण्यासाठी SEO खूप महत्वाचा असतो, पण तुमची सामग्री व्यवस्थित नसेल तर तुम्हाला सर्च इंजिन मध्ये रँकिंग मिळू शकणार नाही. म्हणूनच कन्टेन्ट हे SEO मध्ये खूप महत्वाचे मानल्या जाते.
- प्रभावी सामग्री हा वेबसाईट वर रहदारी आणण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तसेच आपल्या ब्रँड चे रेप्युटेशन कन्टेन्ट च्या साहाय्याने वाढते.
- तसेच कन्टेन्ट उच्च दर्जाचे असेल तर ग्राहक आपल्या कडे लवकर आकर्षित होतील.
FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
कन्टेन्ट मार्केटिंग काय आहे?
आपल्या लक्षित ग्राहकांसाठी युनीक आणि आकर्षक सामग्री तयार करणे त्या सामग्रीला सोशल मीडिया, ब्लॉग,किंवा एखाद्या लेखाच्या माध्यमातून पब्लिश करणे आणि वितरित करणे म्हणजे कन्टेन्ट मार्केटिंग होय. तसेच कन्टेन्ट हे व्हिडीओ, इमेज, इंफोरग्राफिक, पॉडकास्ट आणि टेक्स्ट अश्या कोणत्याही प्रकारचे असू शकते.
कन्टेन्ट मार्केटिंग चा मुख्य हेतू काय असतो?
कन्टेन्ट मार्केटिंग करण्याचा मुख्य हेतू लक्षित प्रेक्षकांना आकर्षित करणे आणि आपल्या ग्राहकांना सातत्याने मौल्यवान माहिती वितरित करून आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस बद्दल ख्याती म्हणजेच विश्वास निर्माण करणे होय.
निष्कर्ष :
मित्रानो, आज आपण या ब्लॉग पोस्ट मध्ये वरील प्रमाणे कन्टेन्ट मार्केटिंग नक्की काय आहे? (What is Content Marketing in Marathi) कन्टेन्ट मार्केटिंग चे महत्वाची उदाहरणे आणि कन्टेन्ट मार्केटिंग चे फायदे याबाबत विस्तृत माहिती जाणून घेतली आहे.
आम्हाला आशा आहे कि तुम्हाला कन्टेन्ट मार्केटिंग बद्दल संपूर्ण माहिती चांगल्या पद्धतीने मिळालीच असेल. तुम्हाला आमच्या ब्लॉग पोस्ट मधील सामग्री आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. जेणेकरून एखाद्या व्यक्तीस कन्टेन्ट मार्केटिंग या फिल्ड मध्ये करियर बनवायचे असेल तर त्याला या पोस्ट मधून ज्ञान मिळू शकेल.