ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय? Blog Meaning in Marathi

ब्लॉग म्हणजे काय व महत्वाच्या ब्लॉगिंग टिप्स

मित्रानो डिजिटल मार्केटिंग च्या जगात तुम्ही ब्लॉग, ब्लॉगिंग आणि ब्लॉगर बद्दल खुप ऐकले असेल.  तसेच इंटरनेट वर पैसे कमवण्याचे खूप मार्ग आहेत पण त्यातील ब्लॉगिंग हा मार्ग खूप जुना आणि खात्रीशीर आहे. 

म्हणून आम्ही या पोस्ट ब्लॉगिंग बद्दल संपूर्ण माहिती देणार अहो व तुमच्यासाठी आमची हि पोस्ट खूप उपयोगी ठरणार आहे. 

या लेखा मध्ये तुम्हांला ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय? (Blog Meaning in Marathi) ब्लॉगिंग कश्याला म्हणतात आणि एक उत्तम ब्लॉग तयार करण्यासाठी काही ट्रेंडिंग टॉपिक बद्दल माहिती दिलेली आहे.

कारण बरेच नवीन ब्लॉगर ब्लॉग चा विषय निवडताना अनेक चुका करतात, आणि ह्या चुकांमुळे ब्लॉग ला जास्त लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यांच्यासाठी आज आपण ब्लॉग काही लोकप्रिय टॉपिक लिस्ट खाली दिलेली आहे, म्हणून मराठी ब्लॉग आणि ब्लॉगिंग टिप्स विषयी संपूर्ण माहिती घेणे महत्वाचे आहे.

 तर चला पाहूया, 

ब्लॉग म्हणजे काय – What is Blog in Marathi

Blog म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी लोकं त्यांचे ज्ञान सामायिक करण्यासाठी, मते मांडण्यासाठी आणि इतरही महत्वाची माहिती साठवून ठेवण्यासाठी डायरी म्हणजेच दैनंदिनी चा वापर करत होते. हीच दैनंदिनी आता डिजिटल स्वरूपात म्हणजेच इंटरनेट च्या माध्यमात रूपांतरित झाली आहे यालाच ब्लॉग असे म्हणतात.

या ब्लॉग च्या साहाय्याने विविध लोकांनी त्यांचे मते, विचार तसेच महान आणि लोकप्रिय लोकांबद्दल माहिती, विविध पर्यटनस्थळांची माहिती तसेच बातम्या, चित्रे, ध्वनी आणि ध्वनिचित्रफिती इत्यादी प्रकारची सर्वच माहिती इंटरनेट वर ब्लॉग च्या माध्यमातून शेअर केली जात आहे.

blog in marathi

पूर्वीच्या काळी लेखकाला त्यांचे विचार, एखाद्या वस्तूची माहिती तसेच विविध प्रकारची माहिती ग्राहकापर्यंत पोहचवण्यासाठी एखादे पुस्तक, मासिक किंवा वर्तमानपत्राचा वापर केला जात असे. 

ब्लॉग च्या माध्यमातून स्वतः जवळ असलेले ज्ञान किंवा अनुभव जगा बरोबर शेयर करता येतात. तसेच कोणत्याही प्रकारची माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी इंटरनेट चा वापर केला जातो, आणि ज्या माध्यमातून हि माहिती वाचकांपर्यंत पोहोचते त्यालाच ब्लॉग असे म्हणू शकतो. 

Best Domain and Hosting to Start Your Blog

डोमेन

स्पेशल ऑफर

NameCheap Logo 1 scaled ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय? Blog Meaning in Marathi

होस्टिंग

स्पेशल ऑफर

hostinger ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय? Blog Meaning in Marathi
bluehost ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय? Blog Meaning in Marathi

ब्लॉगिंग म्हणजे काय – What is Blogging in Marathi

Blogging म्हणजे नक्की काय तर ब्लॉग तयार करण्यापासून ते इंटरनेट वर पब्लिश करे पर्यंत ज्या काही प्रक्रिया केल्या जातात, त्याच सर्व प्रक्रियेला ब्लॉगिंग असे म्हटल्या जाते. 

blogging in marathi

ब्लॉगर त्याच्या ब्लॉग मध्ये जी काही कार्य करतो म्हणजेच युनिक ब्लॉग पोस्ट तयार करणे, पोस्ट ऑप्टिमाइझ करणे, ब्लॉगची थिम्स डिझाईन सिलेक्ट करणे, ब्लॉग पोस्ट पब्लिश करणे आणि एसईओ संदर्भात सर्व क्रिया करणे इत्यादी सर्व कार्याचा मराठी ब्लॉगिंग समावेश मध्ये होतो.  


ब्लॉगर म्हणजे काय? What is Blogger in Marathi

साधारणतः ब्लॉगर म्हणजे अशी व्यक्ती जी विविध प्रकारचे लेख लिहून त्या लेखाला ब्लॉग च्या स्वरूपात इंटरनेट वर प्रकाशित करते आणि त्या ब्लॉग ला नियंत्रित करते अश्या व्यक्ती ला ब्लॉगर असे म्हटल्या जाते.

तसेच ब्लॉगर त्याच्या ब्लॉग मध्ये नवनवीन माहिती तसेच त्याच्या जवळ असलेले ज्ञान व त्याचा अनुभव नियमितपणे वाचकांसोबत शेयर करीत असतो.  


ब्लॉग लेखन म्हणजे काय? Blog Writing in Marathi

एखाद्या व्यक्तीला लिहण्याची खूप आवड असेल तर ती व्यक्ती विविध विषयाबद्दल छान माहिती लिहून ब्लॉग लेखन करू शकते, आणि ब्लॉग मधून पैसे सुद्धा कमवू शकते. ब्लॉग लेखन करण्यासाठी सर्वात प्रथम ब्लॉगर ला ब्लॉग विषय सिलेक्ट करावा लागतो आणि त्या विषयावर लेख लिहावा लागतो.

इंटरनेट च्या साहाय्याने विविध विषयांबद्दलची मौल्यवान आणि उपयुक्त माहिती लोकांसोबत किंवा संपूर्ण जगासमोर अगदी कमी कालावधीत मांडणे म्हणजेच ब्लॉग लेखन होय. 

तसेच ब्लॉग च्या माध्यमातून दररोज खूप मोठ्या प्रमाणात उपयुक्त आणि महत्वाच्या माहितीचे देवाणघेवाण होत असते. ब्लॉग मध्ये आपल्याला खूप उपयुक्त माहिती मिळत असते. 


टॉप 4 ब्लॉग चे प्रकार | Marathi Blog Type

आता आपण ब्लॉग चे प्रकार किती व कोणकोणते आहेत हे अभ्यासू.  

1. व्यक्तिगत ब्लॉग | Personal Blog

व्यक्तिगत ब्लॉग म्हणजेच एक प्रकारची ऑनलाईन डायरी ज्यामध्ये एक व्यक्ती त्याचे विचार, मते आणि त्याचा अनुभव तसेच त्याच्या आवडीनिवडी अशा विविध प्रकारची माहिती ब्लॉग सामायिक करत असतात.

 व्यक्तिगत ब्लॉग तयार करणाऱ्याचा मुख्य हेतू लोकांना चांगल्या प्रकारची माहिती देणं तसेच त्यांना विविध गोष्टींचे ज्ञान प्रदान करणे हा असतो.

2. व्यावसायिक ब्लॉग | Professional Blog

कोणतीही कंपनी त्याचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ला प्रमोट करण्यासाठी किंवा ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी ब्लॉग तयार करत असतात. ज्याच्या साहाय्याने प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस लोकांपर्यंत लवकर पोहचते व त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ लागते. 

आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ला ऑनलाईन प्रमोट करण्यासाठी किंवा इंटरनेट च्या माध्यमातून सेल करण्यासाठी ब्लॉग पोस्ट तयार केल्या जातात त्यालाच व्यवसाय ब्लॉग ( Professional Blog) असे म्हणतात.  

3. अफिलिएट ब्लॉग | Affiliate Blogs

अफिलिएट ब्लॉग या प्रकारच्या ब्लॉग मध्ये एखाद्या कंपनीच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस बद्दल माहिती लिहिली जाते तसेच ब्लॉग च्या कन्टेन्ट मध्ये त्या प्रॉडक्ट बद्दल ब्लॉगर त्यांचा सल्ला आणि विविध प्रकारचे रिव्हिए दिले जातात. 

प्रॉडक्ट बद्दल सर्व माहिती दिल्यानंतर त्या प्रॉडक्ट ची एफिलिएट लिंक दिली जाते. आणि या लिंक वरून एखाद्या व्यक्तीने प्रॉडक्ट खरेदी केला तर त्याची कमिशन ब्लॉगर ला मिळते. 

अशा प्रकारे ब्लॉगर अफिलिएट ब्लॉग च्या माध्यमातून पैसे म्हणजे च कमिशन मिळवीत असतात.  

4. विषयावर ब्लॉग | Niche Blog

Niche Blog या ब्लॉग मध्ये विविध विषया पैकी एका विषयावर ब्लॉग तयार केला जातो. यामध्ये जो विषय म्हणजेच टॉपिक सिलेक्ट केलेला असतो केवळ त्याच टॉपिक बद्दल माहिती दिली जाते. 

जसे एखाद्या ब्लॉगर ने आरोग्य Health हा ब्लॉग टॉपिक निवडला तर केवळ त्याच टॉपिक वर माहिती दिली जाईल. 

अशा प्रकारे वरील सर्व ब्लॉग चे प्रकार या पैकी कोणत्याही विषयावर ब्लॉग तयार करून तुम्ही त्या ब्लॉग मधून पैसे कमवू शकता.


काही लोकप्रिय ब्लॉग टॉपिक – Most Popular Blog Topic in Marathi 

या आधुनिक जगात स्वतःचा ब्लॉग सुरु करण्यासाठी हजारो प्रकारचे ब्लॉग विषय आहेत ज्या वर तुम्ही ब्लॉग लिहू शकता. परंतु लोकांना कश्या प्रकारचा ब्लॉग बनवायचा आणि त्याचा विषय कोणता निवडायचा हे कळतच नाही.

आम्ही पुढील प्रमाणे काही लोकप्रिय ब्लॉग चे विषय देत आहोत. या मधील तुम्ही तुमचा आवडीचा विषय निवडून त्या विषयावर ब्लॉग बनवू शकता आणि त्या ब्लॉग च्या साहाय्याने पैसे कमावू शकता.

  • फॅशन
  • फिटनेस
  • मनोरंजन
  • संगीत
  • फूड
  • फोटोग्राफी
  • सौंदर्य
  • प्रवास
  • समाचार
  • लाइफ स्टाइल
  • राजनीति
  • टेक्निकल 
  • गेमिंग
  • फिल्म
  • फायनान्स
  • बिजनेस

पण या व्यतिरिक्त सुद्धा ब्लॉगिंग चे खूप टॉपिक आहेत ते निवडून तुम्ही ब्लॉग सुरु करू शकता.

FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

ब्लॉग लेखन काय असते?

इंटरनेट च्या साहाय्याने विविध विषयांबद्दलची मौल्यवान आणि उपयुक्त माहिती लोकांसोबत किंवा संपूर्ण जगासमोर अगदी कमी कालावधीत मांडणे म्हणजेच ब्लॉग लेखन होय.

ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कोणकोणते आहेत?

ब्लॉग सुरु करण्यासाठी खूप सारे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म किंवा सोर्सेस उपलब्ध आहेत.
वर्डप्रेस | WordPress
ब्लॉगर | Blogger
विक्स | Wix 
या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म चा वापर करून आपण ब्लॉग सुरु करू शकतो. 


ब्लॉग आणि ब्लॉगिंग बद्दल पूर्ण माहिती

आम्हाला आशा आहे कि हि पोस्ट ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय? (What is Blog and Blogging Meaning in Marathi) व एक उत्तम ब्लॉग तयार करण्यासाठी काही लोकप्रिय मराठी ब्लॉग चे विषय दिले आहेत. 

आमचा नेहमी प्रयत्न राहील कि तुम्हाला ब्लॉगिंग बद्दल पूर्ण माहिती मिळावी व  प्रोफेशनल ब्लॉग बनवण्यासाठी महत्वाचे ब्लॉग टॉपिक तुमच्यासाठी मदतगार होतील.

तसेच हा लेख तुम्हाला कसा वाटला या बद्दल नक्कीच कळवा आणि या लेखाबद्दल काही प्रश्न असतील तर कंमेंट करून विचारू शकता.

🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏

Leave a Reply

This Post Has 23 Comments

  1. Vijaya

    खूप छान माहिती दिली आहे

  2. अनिल महादेव मोरे

    सुंदर आणि उपयुक्त माहिती सहज आणि सोप्या भाषेत दिल्याबद्दल धन्यवाद…..

    1. Mr. Satilal Kashinath Pawar

      Superb !! Excellent Information !! Short but very sweet !! Very Fruitful/useful & advantageous !! Thanks a lot !! – S.K.Pawar

    2. Rahul Mande

      छान लेख आहे.

  3. Adarsh Kasbe

    khuup chan mahiti ahe me ashyach yeka marathi wesite chy shodhat hoto ki ji digital marketing baddal marathitun mahiti lokan parynt pohochvel

  4. Sandip

    Marathi ब्लॉगिंग म्हणजे सागर होय बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष द्यावे लागते.

  5. Roshan Bhadane

    Easy to understand about the bolg process.. Thank you👍

  6. Tanhaji

    Excellent article on blogging.
    Write article on blockchain

    1. Marathi Spirit

      Definitely we will write article on.
      🙏धन्यवाद!🙏

  7. Santosh kamble

    Sir mala blog cha course karaycha aahe

    1. Marathi Spirit

      Youtube ला खूप सारे कोर्सेस आहेत, त्यामधून फ्री ब्लॉगिंग शिकू शकता.

      1. Vikas magar

        अत्यंत सुंदर माहिती

  8. रामनाथ महाडीक

    खुप छान माहिती दिली धन्यवाद. 🙏🙏

  9. Harshada

    ब्लॉगींग बद्दल खरच खुप छान, उपयुक्त माहिती योग्य शब्दांमध्ये आणि योग्य मांडणीमध्ये दिली आहे.
    धन्यवाद🙏