अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? Affiliate Marketing Meaning in Marathi

affiliate marketing meaning in marathi

आवडीच्या क्षेत्रात काम करावं हे प्रत्येकाचं स्वप्न आणि इच्छा असते, म्हणजेच डिजिटल मार्केटिंग च्या क्षेत्रात असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात असो. मग Affiliate Marketing हि त्यातलीच एक नामी संधी आहे आणि महत्वाचं म्हणजे आपल्या वेळेनुसार काम करायचं आहे. तुम्हीच तुमचे बॉस असता, ना वेळेचं बंधन ना कोणाला रिपोर्टिंग करणे. यावरून आपण अफिलिएट मार्केटिंग कडे आपली एक Income Source म्हणून हि बघू शकतो ना. आवडीच्या कामासाठी वेळ नक्की मिळतो मग काय असते Affiliate Marketing आणि कश्या तर्हेने करायचं काम जाणून घेऊया खालील प्रमाणे.…

तर चला, अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? (Affiliate Marketing Meaning in Marathi) हे पाहूया. 

अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?| Affiliate Marketing in Marathi

Affiliate Marketing मध्ये वेबसाईट किंवा ब्लॉग च्या माध्यमातून एखाद्या कंपनीच्या वस्तूंची किंवा सेवांची विक्री केल्या जाते. मोठ्या प्रमाणात व्हिसिटर्स असलेल्या वेबसाईट ला किंवा ब्लॉग ला अफिलिएट मार्केटिंग चा मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतात. 

एखाद्या प्रॉडक्ट्स् किंवा सर्विसेस ला प्रमोट करून त्याची विक्री आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉग च्या माध्यमातून करणे आणि त्यासाठी काही प्रमाणात कमिशन मिळवणे म्हणजे अफिलिएट मार्केटिंग होय. 

तसेच आजच्या काळात आपल्याला कोणतीही वस्तू खरेदी करायची असल्यास Online आणि Offline अशा दोन प्रकारे खरेदी करता येते. परंतु Online वस्तू खरेदी केल्यास त्या वस्तू वर नवनवीन ऑफर्स आणि सूट मिळत असते आणि वस्तूंच्या किमतीसुद्धा कमी असतात. ज्या कंपन्यांनी Online पद्धतीने आपला व्यवसाय वाढवायचा असतो, अशा कंपन्या Affiliate Program चालवतात. 

जेव्हा पण तुम्ही ब्लॉग सुरु करता आणि त्या ब्लॉग मध्ये प्रॉडक्ट्स् ची विक्री करण्यासाठी प्रथम त्यांना Affiliate Program जॉईन करावा लागतो. नंतर त्या वेबसाईट ला किंवा ब्लॉगला अफिलिएट प्रोग्रॅम मधून एक लिंक देण्यात येते. त्या लिंक ला ब्लॉग मध्ये समाविष्ट केल्या जाते.

या एफिलिएट लिंक वरून आपल्या ब्लॉग मध्ये येणाऱ्या व्हिसिटर्स ने ते प्रॉडक्ट्स् खरेदी केल्यास त्या प्रॉडक्ट्स् च्या किमतीवर आपल्याला काही प्रमाणात कमिशन मिळते, हि कमिशन प्रॉडक्ट नुसार वेगवेगळी असते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या वेबसाईट मध्ये असलेल्या अफिलिएट लिंक वर क्लिक करते तेव्हा त्या कंपनीची वेबसाईट ओपन होते, आणि त्या मधून प्रॉडक्ट्स् खरेदी करता येतो. 

एफिलिएट मार्केटिंग इन मराठी (What is Affiliate Marketing in Marathi) मध्ये प्रॉडक्ट्स् ची विक्री केल्यास आपल्याला कमिशन मिळते. हि कमिशन त्या प्रॉडक्ट च्या किमतीवर अवलंबून असते. म्हणजेच वस्तूची किंमत कमी असेल तर कमी प्रमाणात कमिशन मिळते. आणि वस्तूंची किंमत जास्त असेल तर मोठ्या प्रमाणात कमिशन प्राप्त होते. 

अशा प्रकारे आपण सुद्धा एफिलिएट प्रोग्राम जॉईन करून कमिशन मिळवू शकता. 


Affiliate Marketing च्या संदर्भात काही महत्वपूर्ण संज्ञा 

जर तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग करायची असेल तर तुम्हाला Affiliate Marketing बद्दल विस्तृत ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणूनच तुम्हाला या एफिलिएट मार्केटिंग बद्दल पूर्ण माहिती देण्यासाठी काही महत्वपूर्ण संज्ञा पुढीलप्रमाणे आहेत.

अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय संपूर्ण मार्गदर्शन

१. Affiliate Programअफिलिएट प्रोग्राम

Affiliate Program म्हणजे वेबसाईट किंवा ब्लॉग च्या साहाय्याने एखाद्या प्रॉडक्ट ला प्रमोट करणे होय. यामध्ये आपल्याला Affiliate Marketing करण्यासाठी Affiliate Program Join करावा लागतो. यामधून आपल्याला वेबसाईट किंवा ब्लॉग मधून प्रॉडक्ट्स् ला प्रमोट करून त्या प्रॉडक्ट्स् च्या विक्रीवर कमिशन प्राप्त होत असते. 

२. Affiliate IDअफिलिएट आयडी

अफिलिएट प्रोग्रॅम मध्ये साइन उप केल्यानंतर आपला एक Id तयार केल्या जातो, या Id ला Affiliate Id असे म्हटले जाते. या Id च्या साहाय्याने आपल्याला अफिलिएट प्रोग्रॅम मध्ये सेल्स बद्दलची संपूर्ण माहिती ट्रॅक करण्यास मदत होते.  

३. Affiliate Linkअफिलिएट दुवा

अफिलिएट प्रोग्रॅम मध्ये प्रॉडक्ट्स् ला प्रमोट करण्यासाठी विविध प्रकारच्या Affiliate Link प्रदान केल्या जातात. जेव्हा व्हिसिटर्स अफिलिएट लिंक वर क्लिक करतो तेव्हा त्या प्रॉडक्ट च्या मुख्य वेबसाईटवर जाऊन पोहोचतो. आणि त्या व्हिसिटर्स ने त्या प्रॉडक्ट्स् ची खरेदी केली तर त्या ब्लॉग प्रमोटरला कमिशन प्राप्त होते. 

४. Commission कमिशन

जर आपण आपल्या वेबसाईट च्या किंवा ब्लॉग च्या माध्यमातून Affiliate Marketing केली तर त्या मधून आपण मोठ्या प्रमाणात कमिशन मिळवू शकतो. यामध्ये आपल्याला ब्लॉग किंवा वेबसाईट च्या माध्यमातून वस्तूला प्रमोट करावे लागते आणि जर एखाद्या Visitors ने Affiliate Link वरून वस्तूंची खरेदी केल्यास आपल्याला त्या वस्तूच्या विक्रीवर काही प्रमाणात Commission मिळते. 

५. Link Clockingलिंक क्लॉकिंग 

अफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी अफिलिएट प्रोग्रॅम ज्या लिंक प्रोव्हाइड करतात त्या खूप लांबलचक असतात, याच लिंक ला लहान व आकर्षक बनवण्यासाठी URL शॉर्टर चा वापर केला जातो याला Link Clocking म्हटल्या जाते.

६. Affiliate Managerएफिलिएट व्यवस्थापक

जर Affiliate Program चालवताना आपल्याला काही अडचण आली तर या Program मध्ये Affiliate Manager च्या मदतीने आपण काही समस्या असल्यास त्या सोडवू शकतो. हे मॅनेजर अफिलिएट मार्केटर ला काही टिप्स आणि त्यांना हवी ती मदत करतात, काही अफिलिएट प्रोग्राम मध्येच एफिलिएट मॅनेजर ची सुविधा उपलब्ध असते. 

७. Payment Mode 

आपल्याला म्हणजेच अफिलिएट मार्केटर ला या मार्केटिंग मधून ज्या प्रकारे पेयमेंट कमिशन मिळते त्याला Payment Mode म्हणतात. वेगवेगळे अफिलिएट प्रोग्रॅम वेगवेगळ्या प्रकारे पेयमेंट मोड ऑफर करतात. जसे कि, Cheque, Wire transfer आणि Paypal इत्यादी. 

८. Payment Threshold

अफिलिएट मार्केटिंग मध्ये तेव्हाच कमिशन मिळते जेव्हा अफिलिएट मार्केटर आपण काही प्रॉडक्ट्स् ची विक्री करतो, म्हणजेच वस्तूची विक्री केल्यानंतर काही प्रमाणात आपल्याला कमिशन प्राप्त होते. अफिलिएट प्रोग्राम नुसार Payment Threshold ची Amount वेगवेगळी असते. 

आणखी वाचा – SEO म्हणजे काय व कश्या प्रकारे करू शकतो

टॉप एफिलिएट प्रोग्राम जे तुम्ही प्रमोट करू शकता

  • Amazon Associates
  • Web Hosting Affiliate
  • ClickBank
  • CJ Affiliate
  • Flipkart Affiliate
  • Email Marketing Affiliate

Affiliate Marketing कसे काम करते?  

एखाद्या कंपनीला त्यांच्या प्रॉडक्ट्स् ची मार्केटिंग किंवा प्रमोट करायचे असतील तर ती कंपनी विविध प्रकारचे अफिलिएट प्रोग्रॅम ऑफर करते, आणि जेव्हा एखादा ब्लॉग किंवा वेबसाईट ओनर त्या प्रोग्रॅम ला जॉईन करतो, तेव्हा त्या ब्लॉग वर प्रॉडक्ट्स् ला प्रमोट करण्यासाठी विविध प्रकारचे बॅनर, जाहिराती आणि त्या प्रॉडक्ट्स् च्या संबंधित एक अफिलिएट लिंक तयार केली जाते. 

आता या ब्लॉग किंवा सोशल मीडिया च्या माध्यमातून येणारे व्हिसिटर्स जेव्हा या बॅनर, अफिलिएट लिंक वर क्लिक करतील तेव्हा त्या प्रॉडक्ट्स् च्या मुख्य वेबसाईट वर पोहचतील, आणि या प्रॉडक्ट्स् ची खरेदी करतील तेव्हा ती कंपनी त्या ब्लॉग किंवा सोशल मीडिया प्रमोटरला कमिशन प्रदान करते. 

अशाप्रकारे आपल्याला अफिलिएट प्रोग्रॅम मधून मोठ्या प्रमाणात पैसे कमावता येतात. 


FAQ :- नेहमी विचारले जाणारे प्रश्न  

Affiliate Marketing म्हणजे काय हे तुम्हाला कळलेच असेल तर आता आपण अफिलिएट मार्केटिंग च्या संदर्भात सतत काही प्रश्न विचारल्या जात असतात. असे काही प्रश्न पाहणार आहोत.  

अफिलिएट मार्केटिंग साठी ब्लॉग किंवा वेबसाईट असणे आवश्यक आहे का?

Affiliate Marketing साठी ब्लॉग किंवा वेबसाईट असणेच गरजेचं नाही, जर आपल्याजवळ ब्लॉग किंवा वेबसाईट असेल तर आपल्याला व्हिसिटर्स आणण्याची गरज पडत नाही. आणि जर आपल्याजवळ ब्लॉग किंवा वेबसाईट नसेल तरीही आपण एफिलिएट मार्केटिंग करू शकतो. 

सर्वच कंपन्या किंवा संस्था अफिलिएट प्रोग्राम ऑफर करतात का?

हे सांगणे खूप कठीण आहे, पण तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून शोधू शकता कि कोणत्या कंपन्या किंवा संस्था अफिलिएट प्रोग्राम ऑफर करतात. तसेच ज्या कंपनीला किंवा संस्थेला आपला व्यवसाय ऑनलाईन वाढवायचा असतो. अशा कंपन्या किंवा संस्था एफिलिएट प्रोग्राम ऑफर करतात. 

अफिलिएट मार्केटिंग मधून आपण किती पैसे कमवू शकतो?

अफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कमवणे हे पूर्णपणे आपल्यावर च अवलंबून असते. जसे कि आपण आपल्या अफिलिएट प्रोग्राम मध्ये किती लोकांना आकर्षित करतो. तसेच आपल्या अफिलिएट प्रोग्रॅम मधून जेवढ्या जास्त लोकांनी खरेदी केली तेवढेच जास्त कमिशन म्हणजेच पैसे आपण कमवू शकतो.


निष्कर्ष

इंटरनेट वर पैसे कमवायचे खूप काही मार्ग आहेत, काही मार्ग सोपे तर काही कठीण आहेत. याच्या च संबंधित आज आपण Affiliate Marketing काय आहे? (Affiliate Marketing in Marathi) कसे करायचे आणि यासंबंधित काही महत्वाच्या संज्ञा आणि तसेच एफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल जाणून घेतले आहे. 

मी आशा करतो कि या लेखा मधून तुम्हाला मराठीमध्ये एफिलिएट मार्केटिंग बद्दल संपूर्ण मार्गदर्शन चांगल्या प्रकारे समजली असेल, जर तुम्हाला आमच्या या ब्लॉग पोस्ट बद्दल काही समस्या किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि तुम्हाला पोस्ट आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. 

🙏🙏धन्यवाद ! 🙏🙏

Leave a Reply

This Post Has 5 Comments

  1. राहुल

    खूप छान ब्लॉग बनवला आहे!
    मराठी भाषेत या विषयांबद्दल कमी माहिती आहे, त्यामुळे मराठी लोकांना ही माहिती मिळवणे कठीण जाते.
    आपला प्रयत्न खूप चांगला आहे, असेच चालू ठेवा आणि आपल्या मराठी ला समृद्ध बनवा.☺️

    1. Marathi Spirit

      आपली अमूल्य प्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद !! 🙏

  2. Mohini Shinde

    Khup chan sir

  3. Kumar

    खूपच छान माहिती महितीसाठी आभार मानतो wish you all the best.
    मि पन माज्या वेबसाइट वरती है सगळा लिहत असतो तुमच्या वाचकाना नक्की आवडेल माझी वेबसाइट

    http://www.digidialouge.com