SEO म्हणजे काय? | SEO Meaning In Marathi

SEO-म्हणजे-काय

जेव्हा आपल्याला एखाद्या माहितीची आवश्यकता भासते तेव्हा आपण लगेच Google करतो, आणि आपल्याला ज्या माहितीची गरज आहे ती मिळवितो.

पण आपल्याला माहिती असलेले आणि जगातील सर्वात जास्त लोकप्रिय असलेले सर्च इंजिन म्हणजे Google. पण याच सर्च इंजिन प्रमाणे इतरही बरेच शोध इंजिन आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती पुढील ब्लॉग मध्ये बघूया.

या पोस्ट मध्ये आपण केवळ SEO म्हणजेच Search Engine Optimization म्हणजे काय याबद्दल संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन पाहणार आहोत.

हे पण वाचा – डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय ? (What is SEO in Marathi?)

SEO म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. SEO म्हणजे विशिष्ट प्रकारचे तंत्र वापरून आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगला सर्च इंजिनमध्ये रँक करण्याची प्रक्रिया होय. SEO चा उपयोग करून आपण आपल्या वेबसाईट ला सर्च इंजिन मध्ये रँक करू शकतो. तसेच आपल्या साईट चा एसईओ चांगल्या प्रकारे केला तर मोठ्या प्रमाणात Organic Ranking मिळवू शकतो .

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन चे महत्वाचे घटक 

  1. ऑन पेज एस.ई.ओ. (On Page)
  2. ऑफ पेज एस.ई.ओ. (Off Page)
  3. टेकनिकल एस.ई.ओ.  (Technical SEO)
( एस. ई. ओ ) SEO म्हणजे काय ?

#1. ऑन पेज एसईओ म्हणजे काय? (On Page SEO in Marathi)

On Page SEO म्हणजे “ऑन साईट ऑप्टिमायझेशन” होय. तसेच आपल्या वेबसाईट वर किंवा वेब पेजेस वर रँकिंग मिळवण्यासाठी ज्या काही Activities चित्रित किंवा प्रदर्शित केल्या जातात त्याला ऑन-साईट” (On Site) एसइओ  म्हणूनही ओळखले जाते. 

पुढीलप्रमाणे काही ऑन-साइट” एस.इ.ओ चे महत्वाचे घटक आहेत. (On Page Factor in Marathi)

1) शिर्षक टॅग (Title Tag)  

SEO Title in Marathi

शिर्षक टॅग हा On Page SEO चा महत्वाचा घटक आहे. म्हणून शिर्षक आकर्षित करणारे असावे, माझ्या मतानुसार शीर्षक टॅग मध्ये मुख्य किवर्ड चा वापर करावा. शीर्षक टॅग आकर्षक असावे, जेणेकरून ते वाचकांना आकर्षित करू शकेल. यामुळे आपला CTR (Click Through Rate) देखील Increase होईल.

2) मेटा वर्णन (Meta Description

Meta Description हे साधे व सोप्या शब्दांमध्ये असायला हवे, वाचकांनी मेटा वर्णन (Meta Description) वाचल्यानंतर त्यांना आपल्या लेखामध्ये काय लिहिले आहे याची कल्पना आली पाहिजे, आणि वाचक आपला ब्लॉग  वाचण्यासाठी उत्सुक झाला पाहिजे.

SEO Meta Description Marathi

मेटा डिस्क्रिपशन मध्ये योग्य लॉन्ग टेल किवर्ड चा वापर करावा. मेटा वर्णन हे १५० कॅरॅक्टर पर्यन्त असायला हवे, तसेच आपल्या वाचकांना लवकर व स्पष्टपणे समजायला हवे.

3) URL ऑप्टिमाइजेशन (URL Optimization)

URL Optimization Marathi

URLला Permalink सुद्धा म्हटलं जात, जेव्हा तुम्ही नवीन ब्लॉग पोस्ट पब्लिश करता त्यामध्ये URL हा SEO चा महत्वाचा on site factor आहे. आपल्या पोस्ट चे URL बनवता तेव्हा त्यामध्ये आपल्या पोस्ट चा main किवर्ड असायला हवा.तसेच URL वेब पत्ता हा title टॅग च्या वर दिलेला असतो आणि हा जास्त लांबलचक नसावा. 

4) मथळा टॅग (Headline Tag)

SEO Heading Tag In Marathi

Headline Tag म्हणजे H1 टॅग होय. आपल्या लेखाचे जे मुख्य Headline असते त्यालाच H1 टॅग दिला जातो, या Title टॅग मध्ये मुख्य कीवर्ड चा वापर करावा. या टॅग च्या नंतर जे sub headline टॅग असतात त्यांना H2 हा टॅग दिला जातो. तसेच आपण हेडिंग्स मध्ये H1 पासून H6 पर्यंत हेडिंग टॅग्सचा वापर करू शकतो. हेडिंग्स टॅग हा SEO रँकिंग साठी खूप महत्त्वाचा मानला जातो. 

5) प्रतिमा ऑप्टिमाइजेशन  (Image Optimization)

Website किंवा वेब पेजेस ला आकर्षित बनवण्यासाठी आपल्याला त्या मध्ये आकर्षक इमेजेस वापरणे आवश्यक आहे. जर आपल्या वेबसाईट मध्ये फक्त माहिती असून चालत नाही तर त्यात आकर्षिक इमेजेस असतील तर वाचक आपल्या ब्लॉग वर जास्त वेळ घालवू शकतो. 

6) अंतर्गत दुवा (Internal Link)

Internal लिंकिंग मध्ये एका Website वरील विविध अंतर्गत पेजेस वर जाण्यासाठी लिंक वापरली जाते. आपण Website वर Internal Linking जोडणे महत्वाचे आहे तसेच या मुळे आपल्या ब्लॉग पोस्ट ची रँकिंग वाढण्यास मदत होते. आपण आपले संबंधित पेजेस इंटरनल लिंकिंग मुळे एकमेकांशी जोडले जातात. त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना Easily एका पेज वरून दुसऱ्या पेज वर जाता येते. 

7) बाह्य दुवा (External Link)

External Link म्हणजे आपल्या Website वरून दुसऱ्या वेबसाईट वर जाण्यासाठी वापरण्यात येणारी लिंक होय. एक्सटर्नल लिंकिंग मध्ये एका वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटवर जाण्यासाठी लिंक वापरली जाते त्याला External link म्हणतात.

8) नवीन सामग्री वापरा | Unique Content

ब्लॉग लिहत असताना यामधील कन्टेन्ट अतिशय महत्वाचा आहे. आपल्या ब्लॉग मधील कन्टेन्ट समजायला सोपा असावा, जास्त किचकट कन्टेन्ट ब्लॉग मध्ये लिहू नये. आपण जेवढा विस्तृत ब्लॉग लिहणार तेवढाच जास्त वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळणार आहे.

हे पण वाचा – Content Marketing बद्दल माहिती?


#2. ऑफ पेज एसईओ म्हणजे काय ? (Off Page SEO in Marathi)

Off-Page म्हणजे आपल्या Blog चे प्रोमोशन करणे होय , जसे कि लोकप्रिय वेबसाइट किंवा ब्लॉग जाऊन आपल्या वेबसाइट ची लिंक सबमिट करणे यालाच आपण ऑफ पेज एसइओ म्हणतो.

सर्च इंजिन वर काही परिणाम Search केले असता आपल्याला काही SEO रिझल्ट दिसतात, या रिझल्ट मध्ये आपली वेबसाईट रँकिंग येण्यासाठी ज्या काही बाहेरील प्रक्रिया केल्या जातात त्या प्रक्रियेचा Off Page SEO समावेश होतो.

Off Page SEO मुळे सर्च Search Crawler आपल्या वेबसाईट ला लवकर Crawl करू शकेल. तसेच आपल्या वेबसाइट वरील रँकिंग घटकाचा संदर्भ देते, त्यामुळे सर्च रिझल्ट मध्ये वेबसाईट ची गुणवत्ता सुधारन्यास मदत करते व आपल्या वेबसाईटवर रहदारी वाढवते.

बॅकलिंक (Backink) म्हणजे काय ?

ऑफ पेज एस.इ.ओ मध्ये दुसऱ्या वेबसाइट्स वर आपल्या साईट्स ची लिंक टाकल्या जाते, त्यामध्ये दोन प्रकारचे बॅकलिंक असतात.

  • Do-Follow बॅकलिंक 
  • No-Follow बॅकलिंक 

बॅकलिंक हा एक महत्वाचा भाग आहे, जामुळे आपला ब्लॉग Google मध्ये स्ट्रॉंग बनतो व त्यामुळे आपल्या वेबसाइट्स ची अथॉरिटी वाढायला मदत होते

1) लिंक बिल्डिंग (Link Building)

Link Building हा ऑफ पेज एसइओ साठी सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. यामध्ये वेबसाईट साठी बाह्य वेबसाइट वर लिंक तयार केले जातात. बाह्य लिंक जोडणे महत्त्वाचे असते कारण या लिंकच्या साहाय्याने आपल्या वेबसाईटवर रहदारी येते, व आपल्या वेबसाईट ची Authority तयार होते. म्हणून High Quality लिंक योग्य प्रकारे घ्यायला हवे त्यामुळे आपल्या वेबसाईट ची पेज श्रेणी अधिक चांगल्या प्रकारे सुधारण्यास मदत होईल.

  • Social Networking Sites.
  • Guest Posting
  • Web 2.0 Site Listing
  • Local Search Engine and Business Listing
  • Answer Questions Submission
  • Article Submission
  • PPT / PDF Submission
  • Video Marketing
  • Search Engine Submission
  • Directory Submission
  • Photo Sharing

2) सामाजिक विपणन प्रणाली (Social Media Marketing)

Off Page SEO ऑफ पेज एस. इ. ओ. मध्ये आपल्या वेबसाईटची माहिती प्रसारित करण्यासाठी सामाजिक विपणन प्रणालीचा वापर केला जातो. यामध्ये आपली वेबसाइट  जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणात Social Media Marketing चा वापर केला जातो. 

Social मीडियावर विविध प्रकारच्या Content व माहिती पोस्ट करणे शेअर, प्रोमोशन करणे इत्यादी प्रकारे Social मीडियावर ग्राहकांना आकर्षित केले जाते.


#3. टेकनिकल एसईओ म्हणजे काय ? (Technical SEO In Marathi)

Technical SEO हा सर्च इंजिन ऑप्टिमिझशन चा महत्वाचा एक भाग आहे. टेकनिकल एसईओ म्हणजे आपल्या वेबसाइट चा User Experience असतो आणि त्या मदतीने आपण आपल्या वेबसाइटला अधिक चांगल्या प्रकारे Optimize करू शकतो. 

टेक्निकल SEO म्हणजे काय ?

या मध्ये Coding, Sitemap, Robot.txt, Site Architecture, Indexing आणि Crawling या सर्व गोष्टीचा समावेश होतो. या सर्वांचे चांगल्या प्रकारे ऑप्टिमिझशन करणे यालाच Technical SEO म्हणतात. 

  • Website Speed
  • Mobile Friendliness
  • Robots.txt Optimisation
  • URL Structure
  • XML SiteMap
  • AMP (Accelerated Mobile Pages)
  • HTTPS and SSL Certificate
  • Schema Markup

FAQ (Frequently Asked Questions)

  1. SEO मध्ये Backlink म्हणजे काय?

    जेव्हा वेबसाइटला बाह्य (किंवा अन्य) साईट वरून लिंक मिळते तेव्हा त्यास बॅकलिंक असे म्हणतात.

  2. SEO मध्ये Do follow बॅकलिंक काय आहे?

    Dofollow बॅकलिंक लाच लिंक जूस असे सुद्धा म्हटले जाते. या मध्ये एका वेबसाईट वरून दुसऱ्या वेबसाईट मध्ये लिंक ज्युस पास केला जातो, या लिंक च्या साहाय्याने सर्च इंजिनवर आपल्या वेबसाईट ची रँकिंग वाढू शकते.

  3. SEO मध्ये No Follow बॅकलिंक काय आहे?

    No Follow लिंक च्या मदतीने आपल्या वेबसाईटवर Traffic वाढते. पण या लिंक चा सर्च इंजिन च्या रँकिंग वर काहीही परिणाम होत नाही.

  4. SEO चा full form काय आहे?

    SEO चा संक्षिप्त रुप “Search Engine Optimization” असे होते.

  5. बेस्ट SEO टूल्स कोणकोणते आहेत?

    Google Search Console 
    Google Analytics
    Ahrefs  
    SEMrush  
    Answer The Public

  6. लोकल एसईओ म्हणजे काय? | What is Local SEO in Marathi

    Local SEO म्हणजेच आपल्या बिजनेस वेबसाईट ला एका स्पेसिफिक एरिया किंवा लोकेशन साठी टार्गेट करणे जसे कि Shop, Restaurant, or Agency, या सर्व बिजनेस वेब पेज लोकेशन ला लोकल एरिया मधील लोकांपर्यंत पोहचवता येईल.

  7. व्हाईट हॅट एसईओ म्हणजे काय? | What is White Hat SEO in Marathi

    Google Algorithm च्या सर्व नियम व अटींचे पालन करून मिळवलेली रँकिंग म्हणजे व्हाईट हॅट एसईओ होय.

  8. ब्लॅक हॅट एसईओ म्हणजे काय? | What is Black Hat SEO in Marathi

    Black Hat हे असे SEO तंत्र आहे जे Google Algorithm च्या नियम व अटींचे पालन न करता म्हणजेच काही अनैतिक क्रिया करून रँकिंग मिळवणे म्हणजे ब्लॅक हॅट एसईओ होय.


निष्कर्ष – 

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन बद्दल संपूर्ण माहिती बघितलीच आहे, तरी तुम्हाला या टॉपिक बद्दल किंवा आणखी कुठल्या टॉपिक बद्दल माहिती हवी असेल तर कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली या बद्दल तुमचा अभिप्राय कळवा. आणि त्याचप्रमाणे तुमच्या काही सूचना असतील तर नक्कीच कंमेंट करा.

🙏🙏धन्यवाद !🙏🙏

Leave a Reply

This Post Has 8 Comments

  1. Rahul

    खूप छान माहिती लिहली

  2. Rahul Gaikwad

    Dear Sir,
    Very Good Information

  3. Rajaram Bapu Mane

    Very very nice

  4. Rajaram Bapu Mane

    Very nice