इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे | How to Earn Money From Instagram in Marathi

इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे

ऑनलाईन इंटरनेट पैसे कमवण्याचे मार्ग आहेत जसे कि युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम, ब्लॉगिंग, आणि फ्रीलान्सिंग या मधून तुम्ही मोठ्या प्रमाणात आणि पैसे कमवू शकता. 

तसेच मागील लेखामध्ये आपण युट्युब मधून पैसे कमविणे याबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहेच तर आजच्या या लेखामध्ये आपण इंस्टाग्राम म्हणजे काय आणि इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे याबद्दल विस्तृत माहिती पाहूया. 

तर चला जाणून घेऊया इंस्टाग्राम म्हणजे नक्की काय? How to Earn Money From Instagram in Marathi

इंस्टाग्राम म्हणजे काय? | What is Instagram in Marathi

Instagram हि एक सोशल मीडिया नेटवर्किंग साईट आहे. या सोशल नेटवर्क ला केविण सिस्ट्रोम आणि माईक क्रेगर यांनी 2010 साली तयार केले. आणि नंतर २०१२ मध्ये इंस्टाग्राम च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे फेसबुक ने याला विकत घेतले.

तेव्हापासून इंस्टाग्राम हे एक विनामूल्य Android Mobile App म्हणून लाँच करण्यात आले. तसेच आज इंस्टाग्राम हे सर्वात जास्त ऍक्टिव्ह युझर असणारे आणि लोकप्रिय सोशल साईट्स आहे.  

सुरुवातीला इंस्टाग्राम मध्ये जास्त फीचर्स नव्हते पण आजच्या इंस्टाग्राम मध्ये मोठ्या प्रमाणात आणि नवनवीन फीचर्स उपलब्ध झालेले आहेत. तसेच इंस्टाग्राम फोटो आणि विडिओ शेयरिंग प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये आपण खाजगी किंवा सार्वजनिक रीतीने फोटो व्हिडीओ अपलोड करू शकतो. 

त्याचप्रमाणे या मध्ये अपलोड केलेल्या फोटो किंवा व्हिडीओ ला मोठ्या प्रमाणात Reach मिळण्यासाठी हॅशटॅग चा वापर केला जातो. 

तसेच इंस्टाग्राम मध्ये फोटो किंवा व्हिडीओ सामायिक करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला इंस्टाग्राम पेज तयार करायचे असते आणि आपले इंस्टाग्राम पेज बनविल्या नंतर आपल्याला फोटो व्हिडीओ सामायिक करता येतात. त्याचप्रमाणे आता इंस्टाग्राम मध्ये शॉर्ट व्हिडीओ (Instagram Reel Video) बनविण्याचे नवीन फिचर सुद्धा उपलब्ध झालेले आहे त्यालाच इंस्टाग्राम रिल्स असे म्हणतात. 


Instagram वरून पैसे कमवायचे असतील तर पुढील गोष्टी लक्षात घ्याव्या.

1) Find Your Niche

जर तुम्हाला इंस्टाग्राम मधून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला इंस्टाग्राम पेज तयार करण्याच्या आधी कोणता टॉपिक आवडतो हे जाणून घ्यावे लागेल. तसेच टॉपिक निवडताना तुम्हाला त्या टॉपिक बद्दल माहिती असणे खूप गरजेचे असते. कारण तुमच्या इंस्टाग्राम पेज च्या माध्यमातून तुम्हाला या विशिष्ट टॉपिक बद्दल माहिती द्यावी लागेल. 

काही पुढीलप्रमाणे काही टॉपिक दिलेले आहेत यापैकी टॉपिक निवडून तुम्ही इंस्टाग्राम पेज तयार करू शकता. 

  • फॅशन
  • फिटनेस
  • मनोरंजन
  • संगीत
  • फूड
  • फोटोग्राफी
  • प्रवास
  • टेक्निकल 
  • बिजनेस

2) Increased Your Followers

Instagram मधून पैसे कमावण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले Followers. आपल्या Instagram खात्यावरील Followers वाढवण्यासाठी आपण पेज वर दररोज फोटो किंवा विडिओ अपलोड करायला हवे. जर तुमच्या पोस्ट लोकांना आवडत असतील तर तुम्ही लवकर Followers वाढवू शकता. तसेच आपल्या इंस्टाग्राम पेज वर जेवढे जास्त फोल्लोवर्स असतील तेवढेच जास्त पैसे आपल्याला मिळतील. 

3) Engagement 

आपण टाकलेल्या पोस्ट ची Engagement किती आहे आणि किती लोकांपर्यंत आपली पोस्ट पोहचते हे महत्वाचे असते. जर आपल्या पेज वर मोठ्या प्रमाणात फोल्लोवर्स असतील तर आपण अपलोड केलेली पोस्ट खूप लोकांपर्यंत पोहचेल. जर आपली पोस्ट जास्त प्रमाणात Engage होत असेल तर इंस्टाग्राम पेज वर आपल्याला एखाद्या Product ला प्रमोट करण्यासाठी Offers येतात, जर आपण या प्रोडक्टला प्रमोट केले तर आपल्याला पैसे सुद्धा मिळतात. 

अशा प्रकारे वरील गोष्टी लक्षात घ्याव्या. तर चला बघूया Instagram वरून पैसे कमाविण्याचे काही मार्ग.


इंस्टाग्राम मधून पैसे कमवण्याचे सोपे मार्ग | Way to Make Money From Instagram in Marathi

इंस्टाग्राम मधून पैसे कमवण्यासाठी तुमच्या इंस्टाग्राम पेज वर मोठ्या प्रमाणात User म्हणजेच फोल्लोवर्स असणे खूप आवश्यक असते. तर चला आता आपण इंस्टाग्राम मधून पैसे कमवण्याचे टॉप मार्ग याबद्दल माहिती जाणून घेऊया. 

1) एफिलिएट मार्केटिंग

एखाद्या प्रॉडक्ट्स् ला प्रमोट करणे आणि त्या प्रॉडक्ट विक्री करणे आणि त्यासाठी काही कमिशन मिळवणे म्हणजे अफिलिएट मार्केटिंग होय. 

Affiliate Marketing हा पैसे कमवण्याचा सर्वात सोपा मार्ग मानल्या जातो, यामध्ये आपल्याला विविध एफिलिएट प्रोग्रॅम जॉईन करावे लागतात. जसे की Flipkart, Amazon, ShareAsale, Commission Junction, Clickbank इत्यादी.  

एफिलिएट कमिशन साठी आपल्या इन्स्ट्राग्राम प्रोफाइल मध्ये त्या प्रॉडक्ट एफिलिएट लिंक टाकावी लागेल आणि त्या एफिलिएट लिंक वरून प्रॉडक्ट्स ची विक्री झाली, तेव्हा त्या प्रॉडक्ट्स् च्या किमतीवर आपल्याला काही प्रमाणात कमिशन मिळते. अश्या प्रकारे आपण इंस्टाग्राम पेज च्या माध्यमातून प्रॉडक्ट ची मार्केटिंग करून कमिशन मिळवू शकतो. 

2) प्रॉडक्ट ची विक्री | Sell Your Product

जर तुम्हाला इंस्टाग्राम च्या माध्यमातून काही प्रॉडक्ट्स सेल करायचे असतील तर तुम्ही त्या प्रॉडक्ट बद्दल माहिती आणि त्या प्रॉडक्ट चे फोटोस किंवा व्हिडीओ इंस्टाग्राम पेज वर अपलोड करायला हवे. जर एखाद्या युझर ला प्रॉडक्ट खरेदी करायचा असेल तर तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाइल मध्ये तुमच्या प्रॉडक्ट ची लिंक किंवा वेबसाईट लिंक टाकावी. जेणेकरून ग्राहक त्या प्रॉडक्ट किंवा सर्विसेस ची खरेदी करू शकेल. 

3) इंस्टाग्राम पेज विक्री करणे | Sell Instagram Page 

असे किती तरी लोक आहेत, ते इंस्टाग्राम पेज बनवतात आणि त्या पेज वर खूप मोठ्या प्रमाणात फोल्लो वर्स आणून त्या पेज ची विक्री करतात आणि  एकाच वेळेस लाखो रुपये कमवू शकता. इंस्टाग्राम Followers वर विक्रीची किंमत अवलंबून असते. जर तुमच्या इंस्टाग्राम खात्यावर जास्त प्रमाणात Followers आहेत तर तुमचे खाते लाखो रुपयांमध्ये विकले जाऊ शकते.

4) स्पॉन्सरशिप | Get Sponsorship

जेव्हा आपल्या इंस्टाग्राम पेज वर मोठ्या संख्येने फोल्लोवर्स असतात तेव्हा आपल्याला मोठं मोठ्या कंपनी कडून स्पॉन्सरशिप मिळत असते. स्पॉन्सरशिप च्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात अर्निंग करू शकतो. तसेच स्पॉन्सरशिप मधून मिळणारे पैसे हे आपल्या फोल्लोवर्स आणि ऍक्टिव्ह युझर वर अवलंबून असते. 

5) दुसरे इन्स्टा पेज प्रमोट करणे | Promote Other Instagram Account

इंस्टाग्राम वर दररोज कित्येक नवीन पेज तयार होत असतात त्यांना सुद्धा त्यांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात फोल्लोवर्स पाहिजे असतात. त्यासाठी हे लोक आपले इंस्टाग्राम खाते एखाद्या जास्त फोल्लोवर्स असलेल्या पेज कडून प्रमोट करतात त्यासाठी हे लोक मोठ्या प्रमाणात पैसे देतात. अश्याच प्रकारे आपल्या पेज वर मोठ्या प्रमाणात फोल्लोवर्स असतील तर आपण इतर इंस्टाग्राम पेज ला आपल्या पेज च्या साहाय्याने प्रमोट करून पैसे कमवू शकतो. 

हे पण वाचा – युट्युब मधून पैसे कसे कमवायचे


FAQ :- नेहमी विचारले जाणारे प्रश्न

इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमविता येतील? 

Easy Ways to Earn Money from Instagram in Marathi
पेड प्रमोशन | Paid Promotion
स्पॉन्सरशिप | Sponsorship
अफिलिएट मार्केटिंग | Affiliate Marketing
प्रॉडक्ट ची विक्री | Product Selling
इंस्टाग्राम अकाउंट किंवा पेज ची विक्री | Sell Instagram Page or Account 
दुसरे इंस्टाग्राम अकाउंट पेज प्रमोट करणे | Promote Other Instagram Account

इंस्टाग्राम कडून पैसे कधी मिळतात?

जर आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर मोठ्या प्रमाणात फोल्लोवर्स असतील तर आपल्याला विविध प्रकारचे पेड प्रमोशन, ब्रँड, स्पॉन्सरशिप तसेच विविध प्रकारचे प्रॉडक्ट प्रमोट करण्यासाठी ऑफर्स येतील जर आपण या ऑफर्स स्वीकारून आपल्या अकाउंट वर प्रमोशन केले तर आपल्याला या कंपन्या प्रमोशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे देत असतात.
अशा प्रकारे आपल्याला इंस्टाग्राम पैसे देत नाही तर एखाद्या कंपनी किंवा व्यक्ती कडून पैसे मिळत असतात. 

निष्कर्ष 

या लेखामध्ये आपण इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे आणि इंस्टाग्राम मधून पैसे कमवण्यासाठी (How to Make Money on Instagram in Marathi) कोणते मार्ग उपयुक्त आहेत याबद्दल संपूर्ण आणि विस्तृत माहिती जाणून घेतली. 

आम्ही आशा करतो कि तुम्हाला या पोस्ट मधून काही उपयोगी माहिती मिळाली असेल तर हि ब्लॉग पोस्ट विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर शेअर करा. 

तसेच आमच्या या पोस्ट बद्दल काही समस्या किंवा काही प्रश्न असतील तर नक्कीच कंमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर कंमेंट करा. 

🙏🙏धन्यवाद ! 🙏🙏

Leave a Reply