ऑनलाईन पैसे कसे कमवायचे । How to Earn Money Online in Marathi

इंटरनेटवर ऑनलाइन पैसे कसे कमावण्याचे मार्ग

नमस्कार मित्रांनो, मराठी स्पिरिट वेबसाईट मध्ये तुमचे स्वागत आहे !!!!

प्रत्येकाला आयुष्य सुखी जावं हि माफक अपेक्षा असते. आणि ते मना सारखं जावं म्हणून पैसे हे दुय्यम सहाय्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत सामोरे जाण्यासाठी उत्पनाचे साधन हे एका पेक्षा नक्कीच जास्त असावे. कारण Covid मुळे कधी कंपनी बंद पडेल किंवा कंपनी मधून काढतील याचा कोणीच विचार केला नसेल. 

परिस्थिती कोणतीही असो तिला दोन हात करता आले आणि आपला परिवार सुरक्षित असला कि चिंता दूर होते. त्यामुळेच Work आणि Life Balance सांभाळता येतो. 

ह्या अटीतटीच्या काळात ऑनलाईन किंवा Work From Home जास्तच चर्चेत आहे. मग परिवाराची सुरक्षा सोबत स्वतःची हि सुरक्षा करण्यासाठी काही ऑनलाईन कामाची सूची बघूया. आपल्या आवडी नुसार काम करायचं आहे, ना कोणी बॉस ना कोणी नोकर.  जे काही कराल ते फक्त आणि फक्त तुमच्या करता असणार आहे. 

निदान आपल्या परिवाराच्या सुरक्षते साठी नक्की काय असत ऑनलाईन आणि इंटरनेट मधून ऑनलाईन पैसे कसे पैसे कमवू शकतो बघूया (How to Earn Money online in Marathi) आणि याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. 

अनुक्रमणिका show

ऑनलाईन पैसे कसे कमवायचे | Make Money Online in Marathi

आजच्या आमच्या मराठी स्पिरिट च्या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल १० सोपे मार्ग सांगणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही या मधील एखादा मार्ग निवडून पैसे कमवायला सुरुवात करू शकाल.

ब्लॉगिंग मधून पैसे कमवा | Earn Money from Blogging in Marathi

आपले विचार व ज्ञान जगासमोर मांडण्याची ब्लॉगिंग हे प्रभावी माध्यम आहे आपल्याला ज्या विषयाची आवड आहे तो विषय घेऊन आपण ब्लॉग लिहून तो जगासमोर मांडू शकता. 

सध्याच्या काळामध्ये ब्लॉगिंग हा खूप पैसे कमवण्याचं खूप मोठे माध्यम आहे. मराठीत ब्लॉगिंग मध्ये तुम्ही घरी काम करून इंटरनेट च्या साहाय्याने पैसे कमवू शकता. पण स्वतः चा ब्लॉग सुरु करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. 

Earn Money from Blogging in Marathi

ब्लॉगिंग सुरु करताना तुम्हाला ब्लॉग म्हणजे काय? डिजिटल मार्केटिंग, एस.ई.ओ आणि सोशल मीडिया या सर्व बाबींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. या गोष्टींमुळे तुमचा ब्लॉग यशस्वी होऊ शकतो. 

ज्या टॉपिक बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती आहे अश्या टॉपिक वर ब्लॉगिंग सुरु करणे खूप फायद्याचे ठरणार. आणि तुमच्या टॉपिक च्या संबंधित माहिती तुम्ही तुमच्या ब्लॉग वर पब्लिश करू शकता. त्यानंतर तुम्ही ब्लॉगिंग मध्ये Advertisement Network आणि इतर काही माध्यमाच्या साहाय्याने पैसे कमवायला सुरुवात करू शकता. 

युट्युब मधून पैसे कमवा | Online Earning in Marathi from YouTube

आजच्या युगामध्ये असे कोणीही नसेल कि त्याला युट्युब बद्दल माहिती नसेल. दररोज जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती व्हिडीओ च्या स्वरूपात मिळवण्यासाठी युट्युब हा जगातील सर्वात मोठा व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे. 

तसेच गुगल नंतर युट्युब हे जगातील दुसऱ्या नंबर चे सर्च इंजिन आहे. युट्युब या प्लैटफॉर्म वर काही माहिती सर्च केली असता आपल्याला ती माहिती सहज उपलब्ध होते. तसेच YouTube वर आपल्याला शैक्षणिक, तांत्रिक, विज्ञान आणि इतर बरेच विषया संदर्भात विडिओ उपलब्ध आहेत.

आम्ही आमच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये युट्युब चॅनल कसे सुरु करायचे या बद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे ती तुम्ही नक्की वाचायला हवी 

Online Earning in Marathi from YouTube

तसेच YouTube वर कोणतीही व्यक्ती चॅनेल तयार करू शकते. YouTube वर चॅनेल तयार करण्यासाठी फक्त एक G-mail अकाऊंट ची आवश्यकता असते. तसेच युट्युब चॅनेल वर व्हिडीओ अपलोड करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही.

जर आपण युट्युब चॅनेल वर अपलोड केलेले व्हिडीओ लोकांना आवडत असतील आणि आपल्या व्हिडीओ ला मोठ्या प्रमाणात View येत असतील तर आपण YouTube Channel च्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात अर्निंग करू शकतो. तसेच युट्युब चॅनेल च्या साहाय्याने आपण आपल्याजवळ असलेले ज्ञान पूर्ण जगातील लोकां सोबत शेयर करू शकतो. 

फ्रीलांसर बनून पैसे मिळवा | Get Freelancer Job in Marathi

Freelancing च्या माध्यमातून आपण ऑनलाईन इनकम पैसे कमवू शकतो. यामध्ये आपण इंटरनेटचा वापर करून घरी बसून काम करू शकतो. Freelancing मध्ये एखाद्या व्यक्ती कडून किंवा कंपनीकडून काम घेतले जाते.

कार्य काही वेळेत पूर्ण करून त्या व्यक्तीला परत पाठवले जाते किंवा Freelancing मध्ये काम करणाऱ्या लोकांकडून ते काम पूर्ण करून परत त्या कंपनीला किंवा व्यक्तीला पाठवले जाते. अशा प्रकारे ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला ती व्यक्ती किंवा कंपनी पैसे देत असते. 

ऑनलाइन एफिलिएट मार्केटिंग | Earn from Affiliate Marketing

आपल्याला जर घरी बसून ऑनलाईन पैसे मिळवायचे असतील तर अफिलिएट मार्केटिंग हा उत्तम पर्याय आहे. अफिलिएट मार्केटिंग करून खूप लोक मोठ्या प्रमाणावर पैसे कमवता येतात. 

एखाद्या प्रॉडक्ट्स् ची विक्री आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉग च्या माध्यमातून करणे आणि त्यासाठी काही कमिशन मिळवणे म्हणजे अफिलिएट मार्केटिंग होय. 

Affiliate मार्केटिंग मध्ये वेबसाईट किंवा ब्लॉग च्या माध्यमातून एखाद्या कंपनीच्या वस्तूंची किंवा सेवांची विक्री केल्या जाते. मोठ्या प्रमाणात Visitors असलेल्या वेबसाईट ला किंवा ब्लॉग ला अफिलिएट मार्केटिंग चा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. 

आम्ही आमच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय आणि कसे सुरु करायचे या बद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे ती तुम्ही नक्की वाचायला हवी 

तसेच Affiliate Marketing मधून पैसे कमवणे हे पूर्णपणे आपल्यावर च अवलंबून असते. जसे कि आपण आपल्या एफिलिएट प्रोग्राम मध्ये किती लोकांना प्रॉडक्ट घेण्यासाठी आकर्षित करतो. तसेच आपल्या अफिलिएट प्रोग्रॅम च्या लिंक वरून जेवढ्या जास्त लोकांनी प्रॉडक्ट खरेदी केले तेवढेच जास्त कमिशन म्हणजेच पैसे आपण कमवू शकतो.

जाहिराती पाहून पैसे मिळवा | PTC Site (Paid to Click)

PTC म्हणजेच Paid to Click साईट होय. अश्या प्रकारच्या वेबसाईट मध्ये पैसे कमवण्याचे मुख्य माध्यम आहे जाहिरात. आपल्याला या वेबसाईट मध्ये पैसे कमवण्यासाठी विविध प्रकारच्या जाहिराती पाहाव्या लागतात. 

तसेच आपल्याला एखादे टास्क पूर्ण करण्यासाठी दिले जाते ते टास्क पूर्ण केल्यानंतर आपल्याला काही पैसे मिळतात. याच्या साहाय्याने खूप जास्त तर नाही पण काही प्रमाणात पैसे कमवू शकता. 

PTC साईट मध्ये आपण जे पैसे कमवितो त्याला आपण Paypal, Payza आणि Paytm या Payment Gateway च्या माध्यमातून Withdraw करू शकतो. 

मोबाईल अँप्स मधून पैसे कमवणे | Make Money form Mobile Apps in Marathi

तुम्हाला माहीतच असेल की आपण मोबाईल अँप्स मधून सुद्धा पैसे कमवू शकतो. या मध्ये काही पैशाची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नसते. केवळ मोबाइल मध्ये अँप्स डाउनलोड करावे, या अँप्स मध्ये आपल्याला गेम खेळून किंवा काही टास्क पूर्ण केल्यानंतर पैसे मिळतात. 

Play store किंवा App store वर असे भरपूर अँप आहेत जे त्यांनी दिलेली टास्क पूर्ण केल्यावर तुम्हाला काही रुपयांपर्यंत पैसे देतात. 

Make Money form Mobile Apps in Marathi

त्याचप्रमाणे जर तुम्हाला कोडींग चे नॉलेज असेल तर तुम्ही विविध प्रकारचे अँप्स डेव्हलोप करून पैसे कमवू शकता.  

कन्टेन्ट रायटर बनून पैसे मिळवा | Content Writing Job in Marathi

आजच्या डिजिटल मार्केटिंग च्या युगात ऑनलाईन पैसे कमावण्याचा हा खूप सोपा मार्ग आहे. कन्टेन्ट ला एखाद्या उद्देशाने म्हणजे एखादा प्रॉडक्ट्स् प्रमोट करणे किंवा एखाद्या वस्तूंची जाहिरात करण्यासाठीच्या व्यावसायिक उद्देशाने कन्टेन्ट ग्राहकांच्या किंवा उपयोग कर्त्यांच्या समोर मांडले जाते. तसेच ब्लॉग च्या स्वरूपात, लेख लिहून हि सामग्री ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सादर केल्या जाते. 

या कन्टेन्ट किंवा सामग्री चा आपण विविध प्रकारे उपयोग करू शकतो. जसे कि, वर्तमानपत्र, विविध वेबसाईट, ब्लॉग, सोशल मीडिया, टेलिविजन अशा प्रकारच्या विविध प्लॅटफॉर्मवर हि सामग्री पोस्ट केल्या जाते. तसेच या सामग्रीचा वापर ग्राहकांना माहिती देण्यासाठी व आकर्षित करण्यासाठी केला जातो. 

तसेच बऱ्याच वेबसाइट्स, ब्लॉग आणि सोशल मिडिया मध्ये कन्टेन्ट तयार करण्याच्या खूप संधी उपलब्ध असतात किंवा तुम्ही स्वतः चे कन्टेन्ट तयार करून त्या कन्टेन्ट ला सोशल मीडिया ब्लॉग च्या स्वरूपात मांडून पैसे कमवू शकता. 

जर तुम्हाला उत्कृष्ट कन्टेन्ट लिहायचे असेल तर आमच्या कन्टेन्ट मार्केटिंग म्हणजे काय? संपूर्ण माहिती हि ब्लॉग पोस्ट वाचा. 

ऑनलाईन सर्वेक्षण | Earn Cash from Online Survey in Marathi

ऑनलाईन सर्वेक्षण हा एक सोपा आणि सहज पैसे कमवायचा मार्ग आहे, या मध्ये आपल्याला विविध कंपन्यांचे ऑनलाईन सर्वेक्षण जसे की काही कंपन्या त्यांच्या प्रॉडक्ट आणि सर्विसेस बद्दल प्रश्न विचारतात, व आपल्याला त्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्यावी लागतात. आणि त्या प्रॉडक्ट बद्दल योग्य Review करून माहिती द्यायची असते.  

तसेच ऑनलाईन सर्वेक्षण मध्ये कंपन्या त्यांचा Feedback घेण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारतात. आणि अशा प्रश्नाच्या माध्यमातून ह्या कंपन्या त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल योग्य माहिती घेत असतात. तसेच ऑनलाईन सर्वेक्षण करणाऱ्या काही Froud वेबसाईट सुध्दा आहेत, म्हणून योग्य वेबसाईट निवडून आपण ऑनलाईन पैसे कमवू शकतो.

कोर्सेस  विका आणि पैसे कमवा | Earn Money from Course Selling in Marathi

आजच्या इंटरनेट च्या युगामध्ये तुम्हाला खूप साऱ्या वेबसाईट मिळून जातील ज्यामध्ये तुम्ही तुमचे स्वतः चे ऑनलाईन कोर्स बनवून त्याना इंटरनेट च्या साहाय्याने ऑनलाईन विकू शकता. आणि त्यामधून खूप मोठ्या प्रमाणात Earning करू शकता. 

Earn Money from Online Course Selling marathi

जसे की, Udemy coursera online studies आणि इतर बऱ्याच कोर्से सेल्लिंग वेबसाईट आहेत त्यामधून तुम्ही विविध प्रकारचे कोर्सेस विकू शकता आणि  विकत पण घेऊ शकता. व या वेबसाईट मध्ये तुम्हाला जर कोणी या वेबसाईट वरून कोर्से विकत घेतला तर त्या साईट थोड्या प्रमाणात कमिशन घेऊन बाकी रक्कम तुम्हाला देतात. 

सोशल मीडिया मध्ये पैसे मिळवा | Online Social Media Marketing 

आपण आपल्या जीवनामध्ये सोशल मीडिया नेटवर्किंग साईट चा मोठ्या प्रमाणात वापर करतो,  सोशल मीडिया मध्ये  Facebook, Instagram, Twitter, LinkedIn, Whatsapp, Youtube इत्यादी वेबसाईट चा समावेश होतो. 

पण तुम्हाला माहिती आहे की या सोशल मिडियाच्या साहाय्याने आपण मार्केटिंग करून आपल्या प्रॉडक्ट्स् आणि सर्विसेस ला सेल करू शकतो व त्यामधन पैसे सुद्धा कमवू शकतो. 


FAQ :- नेहमी विचारले जाणारे प्रश्न

ऑनलाइन पैसे कमविण्याचे मार्ग कोणते?

ऑनलाईन पैसे कमविण्यासाठी आम्ही टॉप ५ मार्ग सांगितले आहेत या मार्गाचा वापर करून तुम्ही ऑनलाईन पैसे कमवू शकता. 
ब्लॉगिंग | Blogging 
युट्युब | YouTube
सोशल मीडिया मार्केटिंग | Social Media Marketing 
अफिलिएट मार्केटिंग | Affiliate Marketing 
कन्टेन्ट रायटिंग | Content Writing 

घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवा

अशा प्रकारे वरील सर्व मार्गाचा अवलंब करून आपल्याला इंटरनेटवर ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल 10 सोपे मार्ग पाहिले आहेत. तसेच या व्यतिरिक्त सुद्धा अजून खूप सारे मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही इंटरनेट च्या साहायाने घरबसल्या पैसे कमाऊ शकता. तर चला आता तुम्ही या मधून पैसे कमवण्यासाठी एखादा मार्ग निवडायला हवा. 

तुम्ही एखादी नोकरी करून महिन्याचा जो पगार मिळवता, त्यापेक्षाही जास्त पैसा तुम्ही घरी बसून, ऑनलाईन काम करून कमवू शकता. 

मित्रानो आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेयर करा. आणि या व्यतिरिक्त आणखी काही इंटरनेट द्वारे ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग असतील तर नक्की कमेंट करून सांगा. 

धन्यवाद !!

Leave a Reply

This Post Has 6 Comments

  1. komal

    खुपचं छान माहीती दिली आहे. धन्यवाद …

  2. sonal

    धन्यवाद

  3. online business ideas

    ऑनलाइन पैसे कमवण्यासाठी patience आणि सतत कार्य करण्याची आवश्यकता असते.

  4. sunil k

    khup chan mahiti ahe sir > शेअर मार्केट म्हणजे काय.