लिंक्डइन म्हणजे काय? LinkedIn Meaning in Marathi

लिंक्डइन म्हणजे काय संपूर्ण माहिती मराठीमध्ये

आजच्या काळात सर्वच लोक इंटरनेटचा वापर करत असतात. तसेच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. सोशल मीडिया मध्ये बरेच लोक खूप वेळ वाया घालवतात. सोशल मीडियावर नवनवीन मित्र जोडतात आणि आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. तसेच मित्रांशी गप्पा मारतात, या सर्वांमध्ये बराच वेळ वाया जातो. 

मी असे म्हणत नाही कि सोशल मीडिया चा वापर करू नका, सोशल मीडिया हे एक प्रकारे चांगले सुद्धा आहे. जर आपण सोशल मीडिया चा योग्य वापर केला तर आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. सोशल मीडिया वर जर आपण वेळ वाया घालवत असू तर आपल्यासाठी योग्य होणार नाही. पण जर सोशल मीडिया चा वापर योग्य प्रकारे केला तर तुम्ही यामधून संपूर्ण जगाशी जुडू शकता. 

तर चला लिंक्डइन म्हणजे काय? पाहूया.

सोशल मीडिया नेटवर्क मध्ये आपण देश विदेशातील चालू घडामोडी, बातम्या तसेच जगातील नवनवीन तंत्रज्ञान याविषयी लवकर माहिती होईल. त्याप्रकारे आपण सोशल मीडिया मधून आपण नोकरी सुद्धा शोधू शकतो. 

अशा प्रकारचे विविध बाबी तुम्हाला सोशल मीडिया मधून कळत असतात. तसेच आज मी तुम्हाला अशाच एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बद्दल थोडक्यात सांगणार आहे. तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे LinkedIn याबद्दल माहिती सांगणार आहे. या लेखामध्ये आपण Linkedin Meaning in Marathi व Linkedin ची काही वैशिष्ट्ये या बद्दल  पाहणार आहोत. 

लिंक्डइन म्हणजे काय | What is Linkedin in Marathi

LinkedIn म्हणजे काय तर आहे तर हा एक प्रोफेशनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे व यामध्ये तुम्हाला केवळ बिसिनेस च्या संबंधित माहिती पाहायला मिळेल. LinkedIn मध्ये आपल्याला व्यसायासंबधित व्यावसायिक लोक त्यांचे अनुभव, कौशल्ये आणि शैक्षणिक इत्यादी माहिती शेयर करतात. तसेच यामध्ये व्यवसाय किंवा उद्योग बद्दल चर्चा केली जाते.

लिंक्डइन मध्ये जवळ जवळ सर्वच व्यावसायिक एकत्र येऊन एकमेकांशी संपर्क साधत असतात, यामध्ये जर एकाद्या व्यावसायिकाला काम करण्यासाठी काही लोकांची गरज असेल तर लगेच त्या जॉब्स संदर्भात लिंक्डइन मध्ये पोस्ट तयार करतात आणि ज्या व्यक्तीला कामाची किंवा नोकरीची आवश्यकता असते तो व्यक्ती हि पोस्ट पाहून जॉब साठी Apply सुद्धा करू शकतात

लिंक्डइन हे फेसबुक, ट्विटर, या प्रमाणेच प्रोफेशनल सोशल मीडिया नेटवर्क आहे. तसेच लिंक्डइन चा वापर केल्यामुळे आपल्याला विविध व्यवसायाबद्दल माहिती मिळते, तसेच मोठं मोठ्या कंपन्या बद्दलची माहिती मिळते. तसेच यामध्ये आपल्याला जगातील कोणत्याही व्यवसायाबद्दल तसेच जगातील कोणत्याही व्यावसायिक व्यक्ती बद्दल जाणून घेता येते

अशा प्रकारे या लिंक्डइन मध्ये सहज पणे जॉब्स उपलब्ध होत असतात. म्हणूनच लिंक्डइन या सोशल प्लैटफॉर्म ला व्यावसायिक नेटवर्क असे सुद्धा म्हटले जाते. 

जर तुम्ही सुद्धा एखादा व्यवसाय करत असाल तर, तुम्ही नक्कीच Linkedin हा व्यावसायिक प्लैटफॉर्म चा वापर केला पाहिजे. त्याचा तुमच्या व्यवसायासाठी नवीन तंत्रज्ञान आणि नवनवीन कल्पना शोधण्यास मदत होईल. तसेच Linkedin या मधून तुम्ही नोकरी सुद्धा शोधू शकता.

आणखी वाचा – डिजिटल मार्केटिंग शिकूया मराठी मध्ये 

अशाप्रकारे तुम्हाला Linkedin म्हणजे काय याबद्दल माहिती मिळालीच असेल, तर चला आता मी तुम्हाला Linkedin या सोशल मीडिया वर खाते तयार कसे करायचे Linkedin बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये जाणून घेऊया. 


Linkedin वर खाते तयार कसे करायचे |

लिंक्डइन हा मीडिया आपल्याला दोन प्रकारे वापरता येतो, एक म्हणजे लिंक्डइन च्या मुख्य वेबसाईट वर आणि दुसरे म्हणजे अँप च्या स्वरूपात लिंक्डइन वापरू शकतो. तसेच जर तुमच्या जवळ मोबाईल असेल तर तुम्ही Play Store वर जाऊन लिंक्डइन हे अँप्लिकेशन डाउनलोड सुद्धा करू शकता. How to Create a LinkedIn Profile or Account Step by-Step Guide in Marathi

तसेच आमच्या मराठी स्पिरिट LinkedIn कंपनी पेज ला भेट द्या आणि फोल्लो करा, जेणे करून तुम्हाला आमच्या नवनवीन पोस्ट बद्दल माहिती मिळेल

लिंक्डइन मध्ये अकाउंट तयार करण्यासाठी पुढील स्टेप्स फोल्लो करा. 

१. Linkedin वर खाते तयार करण्यासाठी Linkedin चे Aplication डाउनलोड करून घ्या.

२. Linkedin चालू केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर उजव्या बाजूला असलेल्या Join Now या वर क्लिक करा. 

३. नंतर तुम्हाला तुमचे नाव आणि आडनाव प्रविष्ट करावे, नंतर तुम्हाला ई-मेल ऍड्रेस मागितला जाईल, तर तो दिलेल्या चोकटीमध्ये प्रविष्ट करून तुम्हाला Linkedin अकाउंट जो पासवर्ड द्यायचा आहे तो टाईप करावा. 

वरील सर्व माहिती भरल्यावर तुम्ही Agree & Continuous या बटनावर क्लिक करावे. 

आता तुमचे Linkedin खाते तयार झाले आहे, आता तुम्ही तुमचे Linkedin Profile तयार करू शकता. यासाठी तुम्हाला खालील मुद्दे लक्षात घ्यावे. 

१. तुम्ही Students आहात कि Job करत आहेत हे निश्चित करून घ्यावे. 

२. जर तुम्ही Job करत असाल तर तुम्ही कोणत्या कंपनी मध्ये जॉब करता म्हणजेच कंपनी चे नाव टाईप करावे. 

३. Student असाल तर तुम्हाला तुमच्या University तसेच तुम्ही कोणती डिग्री घेत आहेत हे सर्व माहिती भरून घ्यावी. 

तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, तसेच तुम्हाला कोणत्या स्किल्स येतात याबाबत सुद्धा माहिती भरायला हवी. अशा प्रकारची सर्व माहिती भरून झाल्यावर तुमचे लिंक्डइन प्रोफाइल तयार झालेले असेल. 


Linkedin ची काही वैशिष्ट्ये

१. Linkedin id चा वापर करून तुम्ही नोकरी शोधू शकता, तुम्ही Linkedin Profile तयार करताना त्यामध्ये तुमचे शिक्षण आणि कामाचा अनुभव टाकावा. यानुसार तुम्हाला नोकरी शोधताना कंपन्यांशी संपर्क साधता यावा. 

२. Linkedin या सोशल मीडिया प्लैटफॉर्म मध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय सुद्धा वाढवू शकता. तसेच तुम्हाला कंपनी मध्ये काही कर्मचारी लागल्यास तुम्ही Linkedin चा वापर करून मिळवू शकता. 

३. Linkedin या व्यावसायिक प्लैटफॉर्म वर तुम्ही तुमच्या व्यवसायाची किंवा वेबसाईट ची जाहिरात सुद्धा करू शकता. याच्याच मदतीने तुमचा व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. 

अशा प्रकारे तुम्ही LinkedIn Apps मधून व्यवसाय वाढवू शकता, तसेच नोकरी सुद्धा मिळवू शकता. Linkedin हा खूप उपयोगी असलेला सोशल मीडिया प्लैटफॉर्म आहे. 


FAQ :- नेहमी विचारले जाणारे प्रश्न

लिंक्डइन चा मराठी अर्थ काय आहे? Linkedin Meaning in Marathi

लिंक्डइन ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या माध्यमातून जगातील सर्व व्यावसायिक एकत्रित येत असतात. या प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला व्यसायासंबधित व्यावसायिक लोक त्यांचे अनुभव, कौशल्ये आणि शैक्षणिक इत्यादी माहिती शेयर करतात. तसेच यामध्ये व्यवसाय किंवा उद्योग बद्दल चर्चा केली जाते

लिंक्डइनचा मुख्य हेतू काय आहे?

लिंक्डइन हा एक व्यावसायिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. ज्याचा मुख्य हेतू जगातील सर्व व्यावसायिकांना एकत्रित आणून अधिक उत्पादनक्षम आणि यशस्वी बनविणे हा असतो. 


निष्कर्ष – LinkedIn काय आहे?

अशा प्रकारे या लेखामध्ये तुम्हाला लिंक्डइन म्हणजे काय? विद्यार्थ्यांसाठी लिंक्डइन प्रोफाइल कसे बनवायचे  आणि लिंक्डइन चा उपयोग कशा प्रकारे करता येतो याबद्दल मराठीमध्ये चांगल्या प्रकारे माहिती मिळाली असेल.

तुम्ही सुद्धा एक व्यावसायिक असाल तर नक्कीच तुम्ही लिंक्डइन चा वापर करायला हवा. Linkedin चा वापर केल्या मुळे आपल्या व्यवसायाची वृद्धी सुद्धा करू शकतो. 

जर तुम्ही अशा प्रकारची इंटरेस्टिंग माहिती शोधात असाल आणि तुम्हाला नवनवीन टेकनॉलॉजि विषयी जाणून घ्यायचे असेल तर आमच्या वेबसाईट ला व्हिसिट करा. 

या लेखा बद्दल तुम्हाला काही अडचणी असतील किंवा तुमच्या काही सूचना असतील तर नक्कीच कळवा. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. 

Leave a Reply