UPI म्हणजे काय? | UPI Meaning in Marathi

UPI म्हणजे काय

आजच्या या डिजिटल आधुनिक जगामध्ये तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे, त्यामुळेच आपण कुठे बाहेर फिरायला गेलो तर नुसता मोबाईल खिशात घेऊन जातो, तसेच आपण सोबत कॅश म्हणजेच पैसे न घेता घराच्या बाहेर पडतो. याचे कारण म्हणजे UPI होय. UPI हि एक ऑनलाइन पेमेंट ची सुविधा आहे यामुळे आपण बिंदास्त कुठेही पैसे जवळ न बाळगता फिरू शकतो.  

अगदी खेड्यापाड्यांमध्ये ते हिमालयातील छोट्या छोट्या वस्त्यांमध्ये देखील Online Payment Service उपलब्ध असते. ऑनलाइन पेमेंट असणे ही आज काळाची गरजच बनलेली आहे अगदी ऑनलाइन शॉपिंग, रिचार्ज, लाईट बिल भरणे, टीव्ही रिचार्ज, करणे या सर्व गोष्टी आता मोबाईल मधील एका क्लिकवर शक्य होत आहेत. 

त्याचप्रमाणे आपल्या सर्वाना या UPI या ऑनलाईन पैसे हस्तांतरण बँकिंग सुविधेबद्दल माहिती असेलच तरी सुद्धा याबद्दल अधिक महत्वाची आणि विस्तृत माहिती आमच्या ब्लॉग पोस्ट मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी तुम्ही सर्वानी ब्लॉग पूर्ण वाचायला हवा. 

यूपीआय म्हणजे काय? | What is UPI in Marathi

यूपीआय चे संक्षिप्त रूप युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (Unified Payments Interface) असे आहे. यूपीआय  ही सुविधा मुख्यत्वे करून आयएमपीएस (IMPS) या तंत्रज्ञानावर आधारित सुविधा आहे, या माध्यमातून दोन व्यक्तींमधील व्यवहार म्हणजेच एका बँक खात्यातील पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करणे खूप सोयीचे झाले आहे. 

UPI हा एक प्रकारचा अक्षरांचा संच असतो, आपल्याला हवा असेल तसा UPI ID आपण तयार करू शकतो, तसेच या UPI ID चा वापर आपण पैसे ट्रान्सफर करण्यासाठी करतो. 

सध्या अनेक पेमेंट ॲप उपलब्ध आहेत जसे की गुगल पे, फोन पे, भीम युपीआय, ऍमेझॉन पे, पेटीएम इत्यादी.. या पेयमेंट्स ॲप पैकी कोणतेही ॲप डाउनलोड करून त्यामध्ये यूपीआय आयडी तयार करून तुम्ही पैसे हस्तांतरण संबंधित सर्व व्यवहार करू शकता. 

UPI चा वापर कसा केला जातो? | Uses of UPI

  1. यूपीआय मार्फत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी स्मार्टफोन आणि त्यामध्ये इंटरनेट असणे अत्यंत आवश्यक आहे, त्याचप्रमाणे यूपीआय मार्फत पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी वर्चुअल पेमेंट ऍड्रेस म्हणजेच UPI ID असायलाच हवा. वर्चुअल पेमेंट ऍड्रेस चा अर्थ म्हणजेच तुमचा आर्थिक पत्ता असतो.
  1. यूपीआय आयडी तयार केल्यानंतर त्याची बँक खात्याशी व मोबाईल नंबरशी जुळणी म्हणजेच लिंक करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे या मध्ये ATM कार्ड (ऑटोमेटेड टेलर मशीन) विषयी सर्व माहिती भरून घ्यावी.  

अश्या प्रकारची वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या UPI App चा सहज रित्या वापरू शकता.


यूपीआय ची वैशिष्ट्य | Features of UPI in Marathi

  1. UPI द्वारे पैशांची देवाणघेवाण करण्याची ही पद्धत NEFT (National Electronic Funds Transfer) या सुविधेपेक्षा अधिकच सुलभ आणि वापरण्यास सोपी आहे. यूपीआय मध्ये पैसे हस्तांतरित करण्यासाठी IMPS (Immediate Payment Service) या पद्धतीचा अवलंब केला जातो.
  1. जर आपल्याला बँकेचे काम किंवा पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर सोमवार ते शुक्रवार या दिवसात आपले काम पूर्ण करून घ्यायला हवेत. कारण शनिवार आणि रविवार या दोन दिवशी बँक बंद असतात त्यामुळे आपण पैसे ट्रान्सफर करण्याचे किंवा इतर व्यवहार करू शकत नाही. 
  1. पण या Unified Payments Interface ऑनलाइन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून आपण कधीही व केव्हाही आणि कोणत्याही ठिकाणावरून पैशाचे सर्व व्यवहार करू शकतो. 
  1. तसेच UPI ॲपमध्ये वापरला जाणारा वर्चुअल पेमेंट ऍड्रेस हा तुमच्या बँकेद्वारेच ऑपरेट अर्थातच चालवला जातो. म्हणजेच त्यामध्ये काही फ्रॉड व्हायची संभावना नाही. 
  1. पण अनेक जण असे म्हणतात की ऑनलाईन पेमेंट करायचे असेल तर इंटरनेट हे हवेच, पण जर आपण कुठल्याही दुर्गम भागात असू व तेथे इंटरनेटची काहीच सुविधा नसेल तर तुम्ही *99# हा क्रमांक डायल करून यूपीआय या सेवांचा उपभोग घेऊ शकता .
  1. यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बँक ते बँक पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते त्याचप्रमाणे अनेक कित्येक सुविधा मिळतात जेणेकरून आपल्या जवळ इंटरनेट सेवा नसली तरी सुद्धा आपण या मोबाइल बँकिंग चा वापर करू शकतो. 

आणखी माहिती वाचा – IFSC कोड कशाला म्हणतात? संपूर्ण माहिती


UPI चे फायदे | Benefits in UPI in Marathi

  • यूपीआय च्या साहाय्याने इलेक्ट्रिसिटी बिल्स, मोबाईल रिचार्ज आणि इतरही महत्वाचे पेयमेन्ट अगदी काही सेकंदातच करू शकता. 
  • पूर्वी अचानक पैशाची गरज पडली की लोकांना इकडे तिकडे पैसे मागावी लागत असे कारण बँका या नऊ ते पाच मध्येच कार्य करत असत पण सध्या ऑनलाईन पेमेंट सुविधा चालू झाल्यामुळे तुम्ही 24 तासांमध्ये कधीही अगदी रात्री अपरात्री ही व्यवहार करू शकता.
  • आर्थिक व्यवहार करावयाचे झाल्यास कोणतेही जास्तीचे पैसे तुमच्याकडून आकारले जात नाही अगदी एक रुपयापासून ते लाखांपर्यंतची रक्कम देखील तुम्ही मोबाईल द्वारे ट्रान्सफर करू शकता.
  • यूपीआय वापरणे हे खूप सुरक्षित आहे कारण यामध्ये पेमेंट करत असताना दोन पासवर्ड वापरले जातात एक ॲप ओपन करत असताना व दुसरे पैसे पाठवत असताना. 
  • तसेच बँकेतील बॅलन्स चेक करायचा असेल तर या UPI अँप मध्ये बॅलन्स तपासू शकता.
  • तुम्ही एकाच ॲप मध्ये वेगवेगळे बँक अकाउंट देखील लिंक करू शकता म्हणजे जरी एखाद्या बँकेचे सर्व्हर पेमेंट साठी कार्यरत नसेल तर तुम्ही दुसऱ्या बँकेचे अकाउंट लिंक करून पेमेंट करू शकता. 

आणखी माहिती वाचा – बँकेबद्दल संपूर्ण आणि सविस्तर मराठी माहिती


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ 

1. UPI ची सुरुवात केव्हा झाली?

UPI या सुविधेला कॅशलेस पेमेंट सुविधा असे म्हणून देखील ओळखले जाते. सर्वप्रथम हि सुविधा 11 एप्रिल 2015 रोजी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) व भारतीय रिझर्व बँक (RBI) या दोन वित्तीय संस्थांनी या यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेस चा विकास केला आहे. 

2. UPI चा फुल्ल फॉर्म काय आहे?

यूपीआय चे संक्षिप्त रूप युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. UPI Full Form is Unified Payments Interface. 

3. UPI App मध्ये QR Code काय आहे?

UPI App मध्ये QR Code म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड (Quick Response Code). याचा अर्थच असा होतो कि तात्काळ प्रतिसाद कोड म्हणजेच जेव्हा कोणी व्यक्ती आपला QR Code स्कॅन करेल तेव्हा तात्काळ आपल्या बँक खात्यात ते पैसे जमा होतील. यासाठी UPI ID किंवा मोबाईल नंबर त्या व्यक्तीजवळ असणे गरजेचे नसते. 
QR Code तुम्ही दुकानाच्या किंवा बिजनेस च्या ठिकाणी प्रिंट करून लावू शकता, जेणेकरून UPI द्वारे अनेक व्यक्ती QR Code  स्कॅन करून पैसे सहजरीत्या पाठवू शकतील.  


निष्कर्ष | UPI Information in Marathi

तर मंडळी या लेखांमध्ये आपण UPI म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा या विषयी सर्व माहिती बघितली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला हे यूपीआय ट्रान्सक्शन करायचे असतील तर सर्वात महत्त्वाचे असते ते स्मार्टफोन आणि इंटरनेट. स्मार्टफोन हा आजकाल सर्वत्र सर्व लोकांकडे असतो त्यामुळे आजकाल चलनी नोटांपेक्षा UPI च्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार करणे हे सोपे झाले आहे आणि अधिक प्रमाणात वापरले जाते.

तसेच तुम्हाला सदर लेख कसा वाटला याबद्दल नक्की कळवा आणि हि ब्लॉग पोस्ट शेअर करायला विसरू नका. 

धन्यवाद !

Leave a Reply