सर्च इंजिन म्हणजे काय? | Search Engine in Marathi

सर्च इंजिन म्हणजे काय

नमस्कार मित्रानो, आज आपण सर्वाना माहिती असलेल्या टॉपिक बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. हा टॉपिक आहे सर्च इंजिन. सर्च इंजिन म्हणजे काय? हा प्रश्न काहींना विचारला तर ते गूगल च नाव घेतील. पण गुगल व्यतिरिक्त हि खूप सारे सर्च इंजिन आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर नक्की हि पोस्ट वाचा तुम्हाला गुगल व्यतिरिक्त आणखी किती आणि कोणते सर्च इंजिन आहेत त्याबद्दल माहिती मिळेल.  👉👉 

सर्च इंजिन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. म्हणजेच आपल्याला कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असली तर आपण लगेच सर्च इंजिन  मध्ये त्या माहिती बद्दल सर्च करतो आणि सर्च इंजिन द्वारे आपल्याला खूप सारे परिणाम दाखवले जातात. त्यातील आपल्याला जो आवडेल तो सिलेक्ट करून आपण माहिती मिळवू शकता. What is Search Engine in Marathi

या डिजिटल जगामध्ये अशी एकही व्यक्ती नसेल कि त्यांनी सर्च इंजिन चा वापर केला नसेल. सर्च इंजिन चा वापर हा सर्वच क्षेत्रामध्ये केला जातो. म्हणूनच सर्च इंजिन ला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. तर आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग असलेल्या सर्च इंजिन बद्दल थोडक्यात मराठी मधून माहिती जाणून घेऊया.

सर्च इंजिन म्हणजे काय? | Search Engine in Marathi

सर्च इंजिन ला आपण एक वेब बेस टूल्स (Web Based Tools) किंवा Software Program असे सुद्धा म्हणू शकतो याचा उपयोग जगातील कोणतीही माहिती किंवा प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी करू शकतो. सर्च इंजिन हे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अफाट माहीतीच्या भंडारामधुन वापरकर्त्याला हवी असलेली अचुक माहीती शोधुन काढते आणि वापरकर्त्यासमोर सादर करत असते.

जेव्हा वापरकर्ता सर्च इंजिन वर एखादी माहिती सर्च करतो किंवा एखादा प्रश्न विचारतो तेव्हा त्या माहितीला किंवा प्रश्नाला किवर्ड असे संबोधले जाते. जेव्हा पण मराठी किवर्ड टाईप करून इंटरनेटवर त्याच्याविषयी माहीती सर्च करतो तेव्हा त्या प्रश्नाचे योग्य उत्तर सर्च इंजिन शोधुन काढते आणि वापरकर्त्याला त्या प्रश्नाच्या संबंधित हवी असलेली सर्व माहिती एका यादीच्या स्वरूपात सर्च इंजिन रिजल्ट पेजवर (SERP) युजरला दाखवते. 🧐🧐


जगातील टॉप सर्च इंजिन | Top Search Engine in Marathi

सर्च इंजिन बद्दल संपूर्ण माहिती

Google

Google हे जगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय सर्च इंजिन आहे. या मध्ये तुम्ही कोणत्याहि गोष्टींची योग्य आणि अचूक माहिती शोधू शकता. गूगल या सर्च इंजिन ची स्थापना 7 सप्टेंबर 1998 मध्ये लॅरी पेज व सर्गेई ब्रिन यांनी केली. जे आता जगातील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन म्हणून ओळखले जाते.  

Bing

गूगल नंतर सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन हे बिंग आहे, Bing या सर्च इंजिन सुरुवात 3 June 2009 मध्ये मायक्रोसॉफ्ट चे सीईओ स्टीव्ह बाल्मर यांनी केली. मायक्रोसॉफ्ट ने गूगल या सर्च इंजिन ला टक्कर देण्यासाठी बिंग हे सर्च इंजिन तयार केले आहे. 

Yahoo!

याहू या सर्च इंजिन ची सुरुवात 1994 मध्ये जेरी यांग आणि डेव्हिस फिलो यांनी केली. हे सर्च इंजिन तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे त्याचबरोबर याहू हे सर्वात लोकप्रिय ई-मेल प्रदात्यापैकी एक आहे. तसेच याहू हे सर्च इंजिन युनायटेड स्टेट्स मध्ये फायरफॉक्स या ब्राऊझर साठी डिफॉल्ट सर्च इंजिन आहे. जसे आपल्या अँड्रॉइड मोबाईल साठी गूगल हे सर्च इंजिन डिफॉल्ट आहे. 

Baidu

Baidu हे सर्च इंजिन चीन मधील सर्वात लोकप्रिय असलेले सर्च इंजिन आहे, याची स्थापना 1 Jan 2000 चीन मध्ये झाली. Baidu हे सर्च इंजिन जगभरात उपलब्ध आहे परंतु चिनी भाषेतच उपलब्ध आहे. 

या व्यतिरिक्त इतरही खूप सारे सर्च इंजिन आहेत.


Top Search Market Share Worldwide in 2022

जगातील लोकप्रिय सर्च इंजिन

सर्च इंजिन कसे कार्य करते? | How to Search Engine Works

जेव्हा आपल्याला एखाद्या विषयाबद्दल माहिती हवी असते तेव्हा आपण इंटरनेट वरील सर्च इंजिन वर जाऊन सर्च बॉक्स मध्ये त्या माहिती संबंधित एखादा शब्द किंवा वाक्य टाईप करतो तेव्हा त्या शब्दाला किंवा वाक्याला किवर्ड असे संबोधल्या जाते. आणि या किवर्ड च्या संबंधित असलेली योग्य आणि अचूक माहिती सर्च रिझल्ट च्या स्वरूपात प्रदर्शित केली जाते.

सर्च इंजिन काय आहे?

तसेच सर्च मध्ये किवर्ड सर्च करण्यापासून ते वापरकर्त्याला माहिती प्रदान करे पर्यंत सर्व कार्य केल्या जातात, मुख्यतः सर्च इंजिन मध्ये वेब क्राँलिंग, इंडेक्सिंग आणि रँकिंग या तीन टप्प्यात कार्य केले जाते. याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया.


Crawling

जेव्हा युझर एखाद्या किवर्ड बद्दल माहीती सर्च करत असतो तेव्हा सर्च इंजिन सर्वप्रथम त्या किवर्ड  बद्दल माहीती कोणत्या वेबसाईट मध्ये आहे हे शोधते. आणि हि शोध प्रक्रिया वेब रोबोटच्या साहाय्याने केली जात असते. ज्यांना क्राँलर तसेच स्पायडर असे देखील म्हटले जाते.

हे वेब क्राँलर, रोबॉट ब्लाँग वेबसाइटला लिंक च्या साहाय्याने जोडण्याचे काम करतात तसेच विविध साईट्स वरील माहिती स्कँन करण्याचे, माहीती गोळा करण्याचे काम देखील कात असतात.

क्राँलर हे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या सर्व वेबसाईट वरील डेटा म्हणजेच आर्टिकल मधील टायटल, किवर्ड, ईमेज यांना स्कँन करून हे जाणून घेते की इंटरनेटवर उपलब्ध असलेले कुठल्या वेबसाइटवरचे आर्टिकल कोणत्या टाँपिकवर आहे.

Indexing 

इंडेक्सिंग या प्रक्रियेमध्ये क्राँलरने स्कॅन केलेली किंवा शोधलेली संपूर्ण माहीती एका डेटाबेस मध्ये संग्रहित केल्या जाते आणि या डेटाबेस मधील हि सर्च माहिती तपशीलवार पणे वापरकर्त्याला दिली जाते. 

Ranking

Indexing Process मध्ये जी काही माहिती, वेब पेजेस डेटाबेस मध्ये स्टोअर केलेले असतात त्या सर्व कलेक्ट केलेल्या माहितीला वेब पेजेस ला इथे क्रमवारीने लावण्यात येते. हा क्रम लावताना वेबसाइट वरील कंटेटची काँलिटी चेक केली जाते.

ज्या वेबसाइटचा SEO म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन योग्य प्रकारे केला असेल आणि त्यात माहीती देखील सविस्तर आणि युनिक दिलेली असेल अशा वेबसाईटला सर्च इंजिन वापरकर्त्यांना टाँप ला दाखवत असते. आणि बाकीच्या वेबसाइट एका खाली एक अशा क्रमामध्ये दाखवल्या जातात.


FAQ | नेहमी विचारले जाणारे प्रश्न

जगातील लोकप्रिय सर्च इंजिन कोणते आहेत?

लोकप्रियतेच्या आधारावर सर्वोत्तम शोध इंजिन पुढील प्रमाणे आहेत. 

  1. Google
  2. Bing
  3. Yahoo!
  4. Baidu
  5. Yandex
  6. DuckDuckGo

अंतिम निष्कर्ष | Search Engine Information in Marathi

अशा प्रकारे सर्च इंजिन म्हणजे काय? (Search Engine Meaning in Marathi) जगातील टॉप सर्च इंजिन कोणते आहेत याबद्दल संपूर्ण माहिती बघितलीच आहे. तरीही तुम्हाला या ब्लॉग पोस्ट बद्दल आणखी माहिती हवी असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कंमेंट करा.

त्याचप्रमाणे सर्च इंजिन याबद्दल तुम्हाला माहिती मिळालीच पण तुमच्या मित्रांना सुद्धा हि माहिती मिळावी म्हणून या पोस्ट ला तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. आणि कंमेंट करायला विसरू नका. 

धन्यवाद !!! 

Leave a Reply