डोमेन नेम म्हणजे काय? | Domain Name Meaning in Marathi

डोमेन नेम म्हणजे काय? व ते कसे कार्य करते

वेबसाईट तयार करण्यासाठी डोमेन नेम बरोबर च वेब होस्टिंग सुद्धा खूप महत्वपूर्ण असते, हे सर्वाना माहितच असेल. प्रत्येक वेबसाईट ला एक विशिष्ट प्रकारचे Domain Name असते जे Website ला विशिष्ट प्रकारची ओळख प्रदान करते. काही लोकांना डोमेन नाव काय आहे? आणि डोमेन चा व वेबसाईट चा काय संबंध आहे हे माहितीच नाही. 

या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत डोमेन नेम म्हणजे काय ? तसेच डोमेन नेम चे प्रकार इत्यादी माहिती जाणून घेणार आहोत. 

जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी ना ओळखण्यासाठी त्याला एक विशिष्ट प्रकारचे नाव दिलेले असते, त्या नावाच्या च मदतीने त्या सर्व गोष्टी ना ओळखले जाते. अशाप्रकारे वेबसाईट सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि या वेबसाईट ला ओळखण्यासाठी जे नाव दिले जाते त्यालाच डोमेन नाव असे म्हटले जाते. 

डोमेन नेम म्हणजे काय? What is Domain Name in Marathi

Domain Name चा अर्थ म्हणजे आपल्या वेबसाईटचा पत्ता होय. डोमेन नेम म्हणजे इंटरनेट वरील आपले नाव किवा वेबसाईट चा पत्ता होय . आपल्या साईट चे स्थान शोधण्यास आणि आपल्या वेबसाईट मध्ये प्रवेश करण्यास मदत करते. आपल्याला वेबसाईट साठी एक विशिष्ट प्रकारचे नाव घ्यावे लागते यालाच डोमेन नाव असे म्हणतात. 

domain name in marathi

डोमेन नाव हे काही विशिष्ट रक्कम देऊन खरेदी करावे लागते. डोमेन ही एक प्रकारची संपत्तीच असते तसेच Domain आपल्या Website ला विशिष्ट प्रकारची ओळख प्रदान करते.


डोमेन नेम चे प्रकार | Type of Domain Name

डोमेन नाव चे खूप प्रकार आहेत, परंतु आम्ही आज या लेखा मधून तुम्हाला सर्वात महत्वाच्या Domain Name च्या प्रकाराबद्दल माहिती देणार आहे. 

 1. शीर्ष स्तरीय डोमेन | Top Level Domain

TLD म्हणजे टॉप लेवल डोमेन होय. हे सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे डोमेन आहे. Google सारखे सर्च इंजिन याला सर्वात जास्त महत्व देतात. या प्रकारचे डोमेन हे SEO Friendly असतात, म्हणूनच काही सर्च इंजिन Top Level Domain ला खूप प्राधान्य देतात. या डोमेन चा वापर केल्याने वेबसाईट सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन वर Easily Rank होऊ शकते. 

काही मुख्य टॉप लेवल डोमेन ची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

 • .com  –  या डोमेन चा वापर Commercial वेबसाईट साठी केला जातो. 
 • .net  –  या डोमेन चा वापर Networking वेबसाईट मध्ये केला जातो.
 • .org  –  या डोमेन चा वापर Organization वेबसाईट मध्ये केला जातो.
 • .gov  – या डोमेन चा वापर Government वेबसाईट मध्ये केला जातो.
 • .edu  –  या डोमेन चा वापर Educational वेबसाईट मध्ये केला जातो.

जसे कि www.marathispirit.com, www.google.com, www.instagram.com, https://en.wikipedia.org, 

2. देश कोड उच्च स्तरीय डोमेन | Country Code Top Level Domain

CcTLD म्हणजे Country Code Top Level Domain यालाच “देश कोड उच्च स्तरीय डोमेन” म्हणतात. या डोमेन चा वापर एका विशिष्ट देशासाठी केला जातो. CcTLD प्रत्येक देशासाठी वेगवेगळे असते. आणि त्या देशामध्ये राहणारे लोकच या डोमेन चा वापर करू शकतात.

काही देशामध्ये वापरल्या जाणाऱ्या डोमेन ची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

 • .in  India मध्ये .इन या डोमेन चा वापर होतो.
 • .us  United States मध्ये .us या डोमेन चा वापर होतो.
 • .ca  Canada मध्ये .ca या डोमेन चा वापर होतो.

अशा प्रकारे वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डोमेन वापरले जाते.

आणखी वाचा – डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?


सब डोमेन म्हणजे काय? | What is Sub Domain in Marathi

मुख्य डोमेन आणि वेब होस्टिंग खरेदी केल्यानंतर सबडोमेन खरेदी करण्याची आवश्यकता नसते, कारण मुख्य डोमेन चाच एक भाग सबडोमेन आहे. 

सबडोमेन आपल्या आवश्यकतेनुसार तयार केले जाऊ शकते, कारण सबडोमेन तयार करण्यासाठी काहीही खर्च लागत नाही. 

उदाहरण, blog.marathispirit.com हे आपल्या वेबसाईटचे  Sub-Domain आहे. 

मी आशा करतो की तुम्हाला Sub-Domain Name काय आहे चांगल्या पद्धतीने समजलेच असेल.


Top Domain Name Provider in India

जर तुम्ही एक बेस्ट वेबसाईट सुरु करत असाल तर तुम्हाला वेबसाईट साठी उत्कृष्ट डोमेन आणि होस्टिंग घेणे खूप महत्वाचे असते. म्हणूनच खालील प्रमाणे आम्ही तुम्हाला बेस्ट डोमेन नेम प्रोव्हायडर कंपन्या दिलेल्या आहेत.

 1. Namecheap

Namecheap हि लोकप्रिय डोमेन नेम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे. जी कमी किमती मध्ये उच्च-स्तरीय डोमेन (Top Level Domain) प्रोव्हाइड करते. तसेच डोमेन नेम प्रमाणे विनामूल्य WHOISGuard सुरक्षा सुद्धा प्रदान करते. 

डोमेन

स्पेशल ऑफर

NameCheap Logo 1 scaled डोमेन नेम म्हणजे काय? | Domain Name Meaning in Marathi

2. Bluehost

Bluehost मध्ये वेब होस्टिंग च्या सोबतच डोमेन नेम सुद्धा प्रोव्हाइड केले जाते. जर आपण ब्लुहोस्ट वरून वेब होस्टिंग खरेदी केली तर आपल्याला १ वर्षासाठी डोमेन नेम फ्री मध्ये मिळते. तसेच आपल्या डोमेन चा रेजिस्ट्रेशन पिरियड संपल्या नंतर डोमेन renew करण्यासाठी ३० दिवसाचा वाढीव कालावधी सुद्धा मिळतो. तसेच डोमेन नाव च्या सोबतच फ्री मध्ये WHOISGuard protection सुद्धा प्रदान केले जाते. 

होस्टिंग

स्पेशल ऑफर

hostinger डोमेन नेम म्हणजे काय? | Domain Name Meaning in Marathi
bluehost डोमेन नेम म्हणजे काय? | Domain Name Meaning in Marathi

3. Godaddy

GoDaddy हि जगातील सर्वात लोकप्रिय आणि मोठी डोमेन नेम रजिस्ट्रार कंपनी आहे. GoDaddy चे डोमेन ब्लुहोस्ट च्या डोमेन प्रमाणे महाग आहेत पण दोन किंवा अधिक वर्षासाठी खरेदी करत असाल तर खूप कमी किमतीमध्ये मिळून जाते. त्याचप्रमाणे GoDaddy चे इंटरफेस वापरायला खूप सोपे आहे वापरकर्ता या इंटरफेस ला लवकर ऍक्सेस करू शकतो. 


डोमेन नेम कसे निवडायचे | Step to Select Domain Name

1) डोमेन निवडताना आपल्या वेब साईटच्या संबंधित निवडावेत. म्हणजेच डोमेन वाचल्यावर कळेल की आपली वेबसाईट कशा संदर्भात आहे. जसे की Technology संदर्भात वेबसाईट असेल तर डोमेन मध्ये Tech हा शब्द असावा, आणि जर Health संदर्भात असेल तर त्या डोमेन मध्ये Helth किंवा यांच्या संदर्भात काही शब्द असावा.

2) तसेच डोमेन नाव रजिस्टर करतांना जास्त लांबलचक निवडू नये. 

3) डोमेन नाव हे आकर्षक आणि Unique नवीन असावे, आणि लहान असावे जेणेकरून ते आठवण ठेवण्यास सोपे जाईल.

4) डोमेन निवडताना असे निवडावेत की जे वाचण्यास, समजण्यास, बोलण्यास, लिहिण्यास आणि आठवण ठेवण्यास सोपे असेल.

5) डोमेन घेताना संपूर्ण जगामध्ये ओळखले जाणारे top level domain घ्यावे.

अशा प्रकारे डोमेन घेताना वरील गोष्टी लक्षात घ्याव्या. डोमेन हे योग्य आणि काळजीपूर्वक निवडायचे कारण पुढे आपले डोमेन हे आपला ब्रँड बनेल.

आणखी वाचा – ब्लॉग व ब्लॉगिंग म्हणजे काय?


डोमेन नाव खरेदी करण्यासाठी किती किंमत मोजावी लागते.

डोमेन नाव ची किंमत ही आपण कोणत्या डोमेन आणि होस्टिंग रजिस्टर कंपनीकडून घेतो यावर अवलंबून असते. जर डोमेन नाव विकत घ्यायचे असल्यास सरासरी 500 ते 1000 रुपयांपर्यंत मिळून जाईल. 


FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

डोमेन नेम काय आहे? 

डोमेन नाव म्हणजे आपल्या साईट चा ऍड्रेस होय. जो आपल्या वेबसाईट ला सर्च इंजिन मध्ये शोधण्यासाठी मदत करतो. प्रत्येक वेबसाईट ला एक विशिष्ट प्रकारचे डोमेन नेम असते जे वेबसाईट ला विशिष्ट प्रकारची ओळख प्रदान करते.

डोमेन नेम चे प्रकार किती व कोणकोणते आहेत?

1. शीर्ष स्तरीय डोमेन | Top Level Domain
टॉप लेवल डोमेन होय. हे सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे डोमेन आहे.
उदाहरणार्थ :- ● com ● net ● .org
2. देश कोड उच्च स्तरीय डोमेन | Country Code Top Level Domain
CcTLD या डोमेन चा वापर केवळ एका विशिष्ट देशामध्ये केला जातो.
उदाहरणार्थ :- ● .in ● .ca ● .us


निष्कर्ष

लेखामध्ये आपण डोमेन नाव काय आहे? ते कसे कार्य करते (Domain Meaning) आणि त्याचा विविध प्रकाराबद्दल माहिती बघितली आहेच. तसेच या लेखाबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. 

तसेच तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना शेयर करा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा.

🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏

Leave a Reply

This Post Has 2 Comments

 1. Nilkanth P. Ingale

  डोमेन संबंधी संपूर्ण माहिती दिली आहे ती मला चांगली कळली आहे.मी आपला आभारी आह
  ‌‍………….. धन्यवाद साहेब / बाईसाहेब