वेब होस्टिंग म्हणजे काय? आणि Hosting चे विविध प्रकार

वेब होस्टिंग म्हणजे काय मराठी आणि त्याचे प्रकार

मित्रांनो,  जर तुम्ही वेबसाइट बनवत असाल आणि त्या वेबसाइट ला इंटरनेट वर आणायचे असेल तर आपल्याला वेब होस्टिंग ची आवश्यकता असते. त्यासाठी तुम्हाला होस्टिंग बदद्ल पूर्ण माहिती असायला पाहिजे. म्हणूनच आज आपण या लेखामध्ये Web Hosting बद्दल विस्तृत माहिती पाहणार आहोत. 

यामध्ये वेब होस्टिंग म्हणजे काय? व कसे कार्य करते, योग्य होस्टिंग पॅकेज निवडणे आणि होस्टिंग चे प्रकार या सर्व प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत.

तसेच डोमेन बद्दल विस्तृत माहिती साठी तुम्ही आमच्या डोमेन नेम ब्लॉग ला भेट देऊ शकता.

Web Hosting म्हणजे काय? (What is Web Hosting in Marathi)

आपल्या वेबसाईटचा Data आणि Files ज्या ठिकाणी साठवल्या जातात त्या Storage Space ला Web Hosting असे म्हणतात. ज्या सर्व्हर मध्ये आपल्या वेबसाईट च्या फाईली साठवून ठेवल्या जातात त्याला वेब होस्टिंग असे म्हणतात. 

बर्याचदा काही लोक होस्टिंग कडे दुर्लक्ष करतात, परंतु आपल्या Website ला यशस्वी बनवण्यासाठी होस्टिंग हा सर्वात महत्वाचा घटक मानला जातो. तसेच ही अशी सेवा आहे जी वेबसाईट ला इंटरनेट शी जोडण्याचे काम करते. 


वेब होस्टिंग कसे कार्य करते ( How to Web Hosting Work)

इंटरनेट वर वेबसाईट होस्ट करण्यासाठी होस्टिंग कंपन्या त्यांच्या सेवा व तंत्रज्ञान प्रदान करतात. 

आपण आपल्या वेबसाईट साठी होस्टिंग घेतल्यास त्या मध्ये आपल्या सर्व फाईली साठवून ठेवल्या जातात. जेव्हा वापरकर्ता त्याच्या वेब ब्राउसर च्या URL मध्ये पत्ता (Web Address) टाईप करतो.

तेव्हा त्या वापरकर्त्यांचा संगणक आपल्या वेबसाईट वर घेतलेल्या होस्टिंग सर्व्हरशी कनेक्ट होतो. नंतर ते सर्व्हर त्यांच्या Web Browser मध्ये आपली वेबसाईट दर्शविते.

आणखी माहिती वाचा – डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

वेब होस्टिंग बद्दल संपूर्ण माहिती

होस्टिंग सर्व्हिस प्रोव्हाडर | Best Hosting Provider in India

आपण भारतातील टॉप वेब होस्टिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या कोणकोणत्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे पाहूया. 

होस्टिंग

स्पेशल ऑफर

Hostinger

Bluehost

Hostgator

Namecheap

Cloudway

BigRock

  1. Hostinger

सध्या Hostinger हि वेब होस्टिंग सर्व्हिस खूप लोकप्रिय आहे. या होस्टिंग चे प्लॅन खूप स्वस्त आणि नवीन ब्लॉगर ला परवडणारे आहेत. होस्टींगर होस्टिंग सर्व्हर  सोबतच एक SSL वेब Security सर्टिफिकेट सुद्धा प्रदान करते. 

या होस्टिंग मध्ये मोठ्या प्रमाणात टूल्स आणि फीचर्स उपलब्ध आहेत, हि होस्टिंग वापरायला सोपी, User-Friendly आणि वर्डप्रेस ऑप्टिमाइझ आहे. त्याचप्रमाणे या होस्टिंग सोबत 30 Days Money Back Guarantee सुद्धा दिली जाते म्हणजेच जर ३० दिवसामध्ये आपल्याला त्यांची सर्व्हिस आवडली नाही तर आपले पैसे परत करते. 

2. Bluehost

Bluehost हि होस्टिंग सर्व्हिस वर्डप्रेस साईट्स साठी पॉवरफुल आणि लोकप्रिय होस्टिंग आहे. या होस्टिंग सर्व्हिस मध्ये विविध फीचर्स, टूल्स आणि फंक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच ब्लुहोस्ट हि होस्टिंग Easy to Use आणि Cheapest Price म्हणजेच कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. नवीन वेबसाईट आणि ब्लॉगर ला हि होस्टिंग परवडणारी आहे. Bluehost मध्ये अमर्यादित बँडविड्थ आणि SSD स्टोरेज च्या व्यतिरिक्त विनामूल्य SSL Certificate देखील प्रदान केले जाते. 

तसेच या होस्टिंग मध्ये काही समस्या असेल तर ब्लुहोस्ट त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी २४/७ तास उपलब्ध असते.  

3. Hostgator

HostGator हि एक उत्कृष्ट आणि बेस्ट होस्टिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे. हि होस्टिंग सर्व्हिस अमर्यादित स्टोरेज सह शक्तिशाली फीचर्स आणि टूल्स अगदी कमी किमतीमध्ये प्रोव्हाइड करते. तसेच HostGator हि Shared Hosting, Cloud Hosting, WordPress Hosting, VPS Hosting, Dedicated Hosting अश्या प्रकारच्या सर्वच होस्टिंग परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध करून देते. 

HostGator चा होस्टिंग स्पीड आणि फीचर्स मुळे हि होस्टिंग सर्व्हिस भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे हि कंपनी होस्टिंग सोबतच फ्री SSL Certificate सुद्धा प्रदान करते. तसेच हि कंपनी 24×7 टेक्निकल सपोर्ट, ४५ दिवसाची मनी बॅक गॅरंटी आणि 99.9% अपटाइम सुद्धा प्रदान करतात.


होस्टिंग चे प्रकार (Types of Web Hosting in Marathi)

होस्टिंग चे मुख्य चार 4 प्रकार मानले जातात या सर्व होस्टिंग प्रकाराचे विश्लेषण पुढीलप्रमाणे पाहूया.

1) सामायिक वेब होस्टिंग | Shared Hosting

सामायिक वेब होस्टिंग मध्ये हजारो वेबसाईटचा फायली एकाच ठिकाणी म्हणजेच एकाच सर्व्हर संग्रहित केल्या जातात. हजारो फाइल्स एकाच सर्व्हर वर साठवून ठेवणे म्हणजे शेअर्ड होस्टिंग होय. 

जर आपण नवीन वेबसाईट तयार केली असेल तर आपल्यासाठी सामायिक वेब Hosting ही उत्तम होस्टिंग आहे. कारण या मध्ये वेबसाईट ला होस्ट करणे खूप सोपे असते. 

जेव्हा वेबसाईट वरील रहदारी वाढणार तेव्हा ही वेब Hosting वापरणे योग्य होणार नाही कारण तुमच्या वेबसाईट चा स्पीड आणि सर्व्हर चा लोडींग वेग कमी होईल. 

जेव्हा तुमच्या Website वर भरपूर प्रमाणात ट्रॅफिक वाढेल, तेव्हा तुम्हाला VPS Hosting किंवा Dedicated Server यापैकी योग्य पर्याय निवडावा लागेल.

जर तुम्हाला स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करायचा या बद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर या समोरील लिंक वर क्लिक करा. 

2) आभासी खाजगी वेब होस्टिंग | VPS Hosting

व्हिपीएस होस्टिंग म्हणजे मध्ये एकाच प्रकारच्या सर्व्हर ला विविध virtual servers मध्ये विभागले जाते. यामध्ये एका वेबसाईट साठी एकाच प्रकारचे सर्व्हर स्पेस दिली जाते, त्या सर्व्हर वर फक्त त्या व्यक्ती चाच अधिकार असतो आणि तुम्ही स्वतः त्या सेवेचे वापरकर्ते असता.  

“आभासी खासगी ही वेब होस्टिंग किंमत थोडी जास्त आहे, त्यामुळे या होस्टिंग मध्ये विविध वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.” 

व्हिपीएस होस्टिंग शेअर्ड होस्टिंग च्या बाबतीत जास्त सुरक्षित असते, आणि ही वेब होस्टिंग मोठ्या प्रमाणात रहदारी हाताळू शकते. ज्या वेबसाईट मध्ये रहदारी कमी असते ते सुद्धा VPS होस्टिंग चा वापर करू शकतात.

3) समर्पित वेब होस्टिंग | Dedicated Hosting

डेडीकेटेड होस्टिंग मध्ये प्रत्येक वेबसाइट साठी वेगवेगळे होस्टिंग सर्व्हर प्रदान केले जाते, यामध्ये प्रत्येक वेबसाईट साठी स्वतंत्र सर्व्हर उपलब्ध असतो.

ज्या वेबसाईटवर अधिक प्रमाणात रहदारी असेल किंवा तसेच ज्या वेबसाइट ला जास्त प्रमाणात सिक्युरिटी ची आवश्यकता असते अशा वेबसाइट साठी ही समर्पित होस्टिंग खूप महत्त्वाची आहे. 

समर्पित होस्टिंग मध्ये आपल्या वेबसाइट ची स्पीड आणि परफॉर्मन्स वाढते, तसेच या होस्टिंग मध्ये आपण स्वतः होस्टिंग नियंत्रित करू शकतो त्यामध्ये Operating System आणि विविध प्रकारच्या settings मध्ये बदल करू शकतो.  

शेअर्ड आणि व्हीपीएस होस्टिंग च्या तुलनेत डेडीकेटेड होस्टिंग खूप खर्चिक असते, म्हणूनच जास्त रहदारी असणाऱ्या च वेबसाईट समर्पित वेब होस्टिंग चा वापर करतात. या Hosting मुळे आपण जास्त रहदारी मुळे होणारे नुकसान कमी करू शकतो.

4) क्लाउड वेब होस्टिंग | Cloud Hosting

आजच्या युगातील सर्वात सुरक्षित आणि लोकप्रिय होस्टिंग म्हणजे क्लाउड वेब होस्टिंग होय. या मध्ये अनेक सर्व्हर मिळून एक मोठे आणि शक्तीशाली क्लस्टर सर्व्हर निर्माण केले जाते. 

या मध्ये मोठ्या प्रमाणात रहदारी हाताळली जाते. म्हणूनच क्लाउड वेब होस्टिंग ही सर्वात जास्त लोकप्रिय आहे. जर काही कारणास्तव क्लाउड सर्वर मध्ये काही समस्या निर्माण झाली तर ऑटोमॅटिकली आपल्या वेबसाईट ची सर्व ट्रॅफिक दुसऱ्या क्लाउड सर्वर पाठवली जाते. 


योग्य Web Hosting पॅकेज निवडणे (Choose Right Web Hosting Plans)

वेबसाइट होस्ट करण्यासाठी खूप सारे होस्टिंग कंपन्या उपलब्ध आहेत, त्या कंपन्या आपल्याला वेगवेगळे प्लॅन ऑफर करतात. पण त्यापैकी योग्य Web Hosting पॅकेज निवडणे फार महत्वाचे असते. होस्टिंग कंपनी निवडताना आपल्याला पुढील गोष्टीची जाणीव असणे महत्वाचे असते. 

  • SSD Storage and Bandwidth
  • Speed and Performance
  • Uptime Guarantee
  • Customer Support
  • Server Location
  • SSL Certificates
  • Website Security
  • Migration Support
  • WordPress Installer
  • SEO Friendly

योग्य Web Hosting निवडण्यासाठी खालील काही मुद्दे उपयुक्त ठरतील. 

  1. आपण कोणत्या वेबसाइट साठी होस्टिंग घेणार आहोत.

2. आपल्या वेबसाइट वर आपल्याला किती रहदारीची अपेक्षा आहे.

3. आपल्या वेबसाइट वर होस्टिंग घेण्यासाठी पायाभूत सुविधा किती मजबूत आहे.

अशा प्रकारे वरील काही मुद्दाना लक्षात घेऊन आपण योग्य वेब होस्टिंग निवडू शकतो.


FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

वेब होस्टिंग काय आहे?

वेब होस्टिंग ही इंटरनेटशी कनेक्ट असलेल्या प्रत्येक वेबसाइटसाठी स्टोरेज स्पेस प्रदान करीत असते. यामध्ये वेबसाइट चा सर्व डेटा आणि फायली स्थानिक संगणकावरून ज्या वेब सर्व्हर स्पेस मध्ये अपलोड केल्या जातो त्याच सर्व्हर स्पेस ला वेब होस्टिंग म्हणतात.

होस्टिंग चे प्रकार कोणकोणते आहेत?

सामायिक होस्टिंग (Shared Hosting)
आभासी खाजगी होस्टिंग (VPS Hosting)
समर्पित होस्टिंग (Dedicated Hosting)
क्लाऊड वेब होस्टिंग (Cloud Hosting)


निष्कर्ष :- वेब होस्टिंग बद्दल संपूर्ण माहिती

या लेखामध्ये आपण वेब होस्टिंग काय आहे? (Web Hosting Meaning in Marathi) तसेच वेब होस्टिंग कसे कार्य करते, वेब होस्टिंग चे प्रकार, आणि टॉप वेब होस्टिंग सर्व्हिस प्रोव्हाइडर याबद्दल संपूर्ण आणि विस्तृत माहिती बघितली आहे.

या पोस्ट बद्दल तुमचे काही प्रश्न, सूचना किंवा समस्या असतील तर नक्कीच कंमेंट करा. जेणेकरून आम्ही तुमच्या सूचनेनुसार ब्लॉग पोस्ट ला अपडेट करू शकू. तसेच वरील पोस्ट मधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा.

धन्यवाद !

Leave a Reply

This Post Has One Comment