फ्रीलांसिंग म्हणजे काय? | What is Freelancing in Marathi

फ्रीलांसिंग म्हणजे काय

आज सर्व जग डिजिटल होत चालले आहे त्यामुळे तरूणपिढी देखील डिजिटल पदधतीने काम करण्यालाच मुळ पसंती दर्शवते आहे. ज्यात त्यांना आपल्या स्किल्स नुसार आपल्याला पाहिजे त्या लोकेशन वरून पाहिजे ते काम करण्याची संधी मिळत असते. म्हणजेच फ्रीलांसिंग करता येत असते. ज्यात आपल्याला कामाचे पुर्णपणे स्वतंत्र (Freedom) प्राप्त होत असते. 

आज आपण ह्याच फ्रीलांसिंग स्किल्स विषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत की फ्रीलांसिंग म्हणजे काय? Freelancing चे फायदे आणि तोटे इत्यादी विस्तृत माहिती ह्या लेखातुन जाणुन घेणार आहोत. जेणेकरून आपल्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला अचुकपणे प्राप्त होतील. 

तसेच आजच्या काळात प्रत्येकाला नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे म्हणून आज आम्ही मराठी स्पिरिट च्या माध्यमातून तुमच्यासाठी Freelancing या बद्दल संपूर्ण माहिती आणि फ्रीलांसिंग मधून ऑनलाईन पैसे कसे कमवू शकतो याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन घेऊन आलो आहोत.  

अनुक्रमणिका show

फ्रीलांसिंग म्हणजे काय? Freelancing Meaning in Marathi

Freelancing म्हणजे स्वयंसेवा. म्हणजे यात कोणी आपल्यावरचा बाँस नसतो. आपणच आपल्या कामातील आपल्यावरचे बाँस असतो. फ्रीलांसिंग हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कलेनुसार, आवडीनुसार काम करण्याची संधी मिळते आणि कामाच्या मोबदल्यात पैसे सुद्धा मिळतात. 

फ्रीलांसिंग मध्ये कोणतीही व्यक्ती त्याच्या मर्जीनुसार आणि केव्हाही काम करू शकते तसेच या मध्ये काम करण्यासाठी तुमच्याकडे मोठे ऑफिस आवश्यक नाही केवळ तुम्ही जे काम करता त्यामध्ये निपुणता असणे खूप गरजेचे असते. तसेच फ्रीलांसिंग करण्यासाठी शिक्षणाची अट नाही केवळ तुम्ही फ्रीलान्सर म्हणून जे काम करत आहात त्या कामाचे कौशल्य असणे खूप महत्वाचे असते. अश्या प्रकारे अशिक्षित व्यक्ती देखील फ्रीलांसिन्ग मधून मोठ्या प्रमाणात काम करून पैसे कमवू शकते. 

फ्रीलान्सिंग मध्ये आपण एखाद्या संस्थेसाठी किंवा एखाद्या कंपनीसाठी काम करत नसून केवळ एखाद्या व्यक्ती साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन काम केले जाते या कामाचा आपल्याला चांगल्या प्रकारे मोबदला देखील मिळतो.

आणखी वाचा – डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

फ्रीलांसर म्हणजे काय? | Freelancer Information in Marathi

Freelancer म्हणजे एक अशी व्यक्ती जी स्वतःचे कौशल्य वापरून अनेक ग्राहकांचे स्वतंत्ररित्या काम करून पैसे कमवीत असते. तसेच फ्रीलान्सर हा त्यांच्या स्किल्स चा वापर करून इतरांसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन काम करत असतो.

फ्रीलांसर म्हणजे काय

फ्रीलान्सर चे काम असते आपल्या स्किल्स वापरून आपल्या स्वतःसाठी फ्रीलान्सिंग चे काम शोधणे अणि आपल्या Clients ने सांगितलेल्या प्रमाणे काम करणे. तसेच चांगल्या प्रकारे आणि उत्कृष्ट दर्जाचे कार्य करणे आणि विविध प्रकारच्या Clients ला आकर्षित करणे. 

फ्रीलांसर कसे बनावे? | How To Become A Freelancer?

ज्या व्यक्ती मध्ये Highly Marked Demanded असलेले एखादे कौशल्य असेल आणि एखाद्या कौशल्यामध्ये तज्ञ म्हणजेच निपुण असेल ती व्यक्ती फ्रीलान्सर बनू शकते. 

फ्रीलांसर बनण्यासाठी आपल्या अंगी असलेल्या कलेत आधी Expert व्हावे लागते. अणि मग (Freelancer  Job in Marathi) फ्रीलान्स साईट वर आपली नाव नोंदणी देखील करावी लागते जेणेकरून क्लायंट आपल्याला आपला पोर्टफोलिओ, आपल्या गरजेच्या, आवश्यक स्किल्स नुसार फ्रीलान्सिंग साठी Hired करत असतात.

आणखी वाचा – कन्टेन्ट मार्केटिंग म्हणजे काय?

फ्रीलांसिंग चे फायदे | Advantages of Freelancing

  • वेळेचे स्वातंत्र फ्रीलांसिंग मध्ये आपण आपल्या वेळेनुसार काम करु शकतो आपल्याला पाहिजे त्यावेळेत काम करू शकतो.
  • जागेचे स्वातंत्र फ्रीलांसिंग मध्ये आपण घरात बसुन किंवा कुठेही पिकनिकला बाहेर गेलेलो असतानाही मौज मज्जा करत आपले काम करू शकतो. तसेच यामध्ये आपल्याला ऑफिस ला जाण्याची आवश्यकता नसते. 
  • आपल्याला कोणते काम करायचे आहे? तसेच किती काम करायचे आहे? कोणते काम नाही करायचे? कोणाचे काम करायचे आहे? ते ठरवण्याचे स्वातंत्र आपल्याला स्वताला असते. आपल्या आवडीचे काम आपण निवडु शकतो.
  • आपल्याला पाहिजे तेवढे म्हणजे आपली जेवढी क्षमता असेल तितके काम आपण यात करु शकतो. एवढेच काम करावे लागेल तेवढेच काम करावे लागेल असे कोणतेच बंधन नसते. आपण जेवढे काम करतो तेवढेच पैसे आपल्याला मिळत असतात.
  • फ्रीलांसिंग मध्ये कोणी आपल्यावरचा बाँस नसतो आपण स्वतः च आपल्यावरचे बाँस असतो.
  • यात कोणत्याही प्रकारची पैशांची गुंतवणुक काम मिळविण्यासाठी आपल्याला करावी लागत नाही.
  • यात आपण मोबाईल तसेच लँपटाँप या दोघांपैकी कशादवारे देखील काम करू शकतो फक्त त्यासाठी आपल्याला चांगल्या नेटवर्क ची तसेच इंटरनेट बँलन्सची आवश्यकता असते. 
  • यामध्ये आपल्या कामाची किंमत आपण स्वतः ठरवत असतो. 
  •  फ्रीलान्सिंग मध्ये आपण पाहिजे तेव्हा सुट्टी अथवा विश्रांती घेऊ शकतो.

फ्रीलांसिंग चे तोटे / नुकसान  | Disadvantages of Freelancing

  • फ्रीलांसिंग मध्ये कामासाठी क्लायंट आपल्याला स्वतः शोधावे लागतात. 
  • यात कामाची सुरक्षितता नसते म्हणजे ह्या महिन्यात ज्याच्यासाठी आपण काम करतो आहे तो क्लाईंट आपल्याला पुढच्या महिन्यात देखील काम देईलच याची कोणतीही खात्री यात नसते.
  • कामाचे एक फिक्स वेळापत्रक यात नसते आपला क्लाईंट जर परदेशातील असेल तर तेथील वेळेनुसार कधीही रात्री अपरात्री देखील काम येते अणि आपल्याला ते दिलेल्या वेळेत करावेच लागते.
  • यात कोणतीही शिस्त नसते म्हणजे कधीही झोपायचे कधीही उठायचे अणि कधीही काम करायचे यात स्वयंशिस्त अजिबात नसते.
  • फ्रीलान्सिंग मध्ये काम करत असताना जर कामामध्ये काही चुकी झाली तर त्या चुकीला तुम्ही स्वतः जबाबदार असता. 
  • जोपर्यत आपण काम करतो तोपर्यतच आपल्याला यातुन पैसे मिळत असतात.ज्या दिवशी काम करणे बंद केले त्यादिवशी पैसे येणे पण बंद होतात.
  • मार्केट मध्ये टिकुन राहण्यासाठी अणि  Client मिळण्यासाठी आपल्याला स्किल्स मध्ये Continuous Improvement करावी लागते.
  • चांगले अणि मोठे High Paying Client चे काम मिळवण्यासाठी आपल्याला Freelancing Gig and Portfolio Highly Build करावा लागतो.

फ्रीलान्स चे काम करण्यासाठी कशाची आवश्यकता असते. 

  1. Client :- Freelancing साठी आपल्याला सगळयात जास्त जर कशाची आवश्यकता असते तर तो म्हणजे Client.
  2. Skill :- आपल्या अंगी कोणती तरी एक कला असणे यासाठी गरजेचे असते अणि त्यात आपण Expert असणे देखील गरजेचे असते.
  3. Mobile, Laptop :- आपल्याकडे आपला स्वतःचा एक अँड्राँईड मोबाईल तसेच लँपटाँप असणे फार गरजेचे असते.
  4. Good Internet Connection :- ऑनलाईन काम करण्यासाठी आपल्या मोबाईल तसेच लॅपटॉप ला इंटरनेट कनेक्शन देखील असावे लागते.
  5. Email Id :- फ्रीलान्सिंग साईट वर आपली as Freelancer म्हणुन नाव नोंदणी करण्यासाठी आपला स्वतःचा एक ईमेल आयडी आपल्याजवळ असावा लागतो.
  6. Bank Account No :- आपण केलेल्या कामाचे क्लाईंट कडुन Payment Receive करण्यासाठी आपले बँकेत एक अकाऊंट देखील असणे फार गरजेचे असते. कारण त्याशिवाय आपल्याला आपले पैसे प्राप्त होत नाहीत.

आणखी माहिती वाचा – SEO म्हणजे काय?

फ्रीलान्स चे काम कुठुन अणि कसे मिळते? | How to Start Freelancing in Marathi

Freelance ही एक Skill आहे जिची मार्केट मध्ये खुपच डिमांड आहे. कारण खुप प्रकारच्या कंपन्या ज्यांना आपले काम करून घेण्यासाठी आपल्या कंपनीतील Daily Employee सोबत Extra Work करण्यासाठी फ्रीलांसर ची गरज देखील भासत असते.

अणि हीच वेगवेगळया कंपन्याची अणि फ्रीलान्सिंग च्या कामाची गरज भरून काढण्यासाठी खूप सारे प्लॅटफॉर्म इंटरनेट वर उपलब्ध आहेत. जिथुन फ्रीलांसर ला काम मिळत असते, अणि कंपन्यांना देखील त्यांचे काम करून घेण्यासाठी त्यांच्या Requirement नुसार Skill असलेला फ्रीलांसर प्राप्त होत असतो.

टॉप फ्रीलांसिंग वेबसाईट | Top Freelancing Websites in India

ह्या सर्व अशा वेबसाईटस आहेत ज्या फ्रीलान्सिंग च्या कामासाठी फार प्रसिद्ध आहेत. या साईट्स वरून फ्रीलान्सर ला वेगवेगळया व्यक्ती कडून त्यांच्या कौशल्या नुसार काम प्राप्त होत असते. 

टॉप फ्रीलांसिंग स्किल्स | Top Freelancing Skills

  • Content writing
  • Graphic designing
  • Video editing
  • SEO expert 
  • Web development 
  • Coding 
  • Consultancy

ह्या वरील सर्व अशा skill आहेत ज्यांची market मध्ये नेहमी demand असते अणि ही demand दिवसेंदिवस अजून वाढत जाणार आहे.

फ्रीलान्सिंग मधून पैसे कसे कमवायचे । Earn Money Freelancing in Marathi

Freelancing हा एक पैसे कमविण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ज्यात आपल्याला मार्केट मध्ये सगळयात जास्त मागणी असलेल्या स्किल्स शिकाव्या लागतात, त्यात पारंगत व्हावे लागते अणि कामासाठी ग्राहक शोधावे लागतात.

अणि मग आपण त्यात आपल्या कौशल्य पातळी नुसार आपल्या ग्राहकाला कामासाठी पैसे चार्ज करू शकतो अणि अशा पदधतीने फ्रीलांसिंग चे काम करून आपण फ्रीलान्सिंग मधुन भरपुर पैसे कमवू शकतो.

फ्रीलान्सिंग करत असताना लोकांना खूप प्रश्न निर्माण होतात त्यापैकी लोकांना पडलेले काही प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे पाहूया. 

FAQ नेहमी विचारले जाणारे प्रश्न

आपण जॉब करून फ्रीलान्सिंग करू शकतो का?

Freelancing ही एक अशी सर्व्हिस आहे जी आपण Daily Job करून Part Time म्हणजेच Extra Income मिळवण्यासाठी फ्रीलान्सिंग करू शकतो. कारण यात आपल्याला जेवढी आवश्यकता असते अणि जेवढा रिकामा वेळ असतो तेवढेच काम आपण घेऊ शकतो. म्हणुनच आपण जॉब करून देखील फ्रीलान्सिंग करू शकतो.

आपण फ्रीलान्सिंग मध्ये करिअर करू शकतो का?

Freelancing ही एक अशी फिल्ड आहे जिचा स्कोप मार्केट मध्ये फारच जास्त प्रमाणात आहे.अणि सर्व जग डिजिटल होत असल्यामुळे ऑनलाईन सर्व्हिसेस ला जास्त डिमांड आहे, अणि भविष्या मध्ये अधिक वाढत जाणार यात शंकाच नाही. तसेच आपल्या अंगी असलेल्या स्किल्स नुसार आपण स्वतःचा फ्रीलान्सिंग बिझिनेस स्टार्ट करू शकतो. तसेच म्हणून स्वतःचा ब्रँड मार्केट मध्ये लाँच करू शकतो. जर आपल्या स्किल्स वर सातत्याने काम करत असू तर नक्कीच आपण फ्रीलान्सिंग मध्ये फुल्ल टाइम करियर करू शकता. 

फ्रीलांसर कोणकोणते काम करू शकतो?

Freelancer आपल्या अंगी असलेल्या स्किल्स नुसार कोणतेही काम करू शकतो. त्याच्यावर असे कोणतेच बंधन नसते.

फ्रीलांसर बनण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते?

Freelancer बनण्यासाठी आपल्या अंगी Highly Market Demand Skills असणे अणि त्यात आपण Expert असणे देखील गरजेचे आहे.

अंतिम निष्कर्ष

अशा पद्धतीने या लेखात आपण फ्रीलांसिंग म्हणजे काय? (What is Freelancing in Marathi) फ्रीलान्सिंग बद्दल संपूर्ण माहिती आणि Freelancing Job बद्दल मराठी मध्ये संपूर्ण मार्गदर्शन मिळवले आहे आणि फ्रीलांसिंग मधून पैसे कश्याप्रकारे कमविता येतात हे देखील जाणून घेतले. 

तरी सदर लेखाबद्दल तुमचे काही प्रश्न किंवा सूचना असतील तर नक्कीच आम्हाला कळवा आणि लेख आवडल्यास मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त  शेअर करा जेणेकरून त्यांफ्रीलांसिंगना देखील सदर माहीतीचा लाभ घेता येईल.

धन्यवाद !!!

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. shraddha

    you are doing superb job for marathians this is time to upgrade