Cyber Security म्हणजे काय? | Cyber Security in Marathi

Cyber Security म्हणजे काय

नमस्कार मित्रांनो, वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे आपले आयुष्य हे नक्की सहज सोपे झाले आहे, पण त्याचबरोबर अडचणी देखील वाढलेल्या आहेत. हे अडचणी म्हणजेच सायबर गुन्हे किंवा सायबर क्राईम हे देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याच सायबर क्राईम आळा घालण्यासाठी आपल्याला सर्वात आधी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायला हवी.   

जर तुम्ही इंटरनेट वापरत असाल तर सायबर Security या शब्दाशी तुम्ही चांगलेच परिचित असाल, पण बऱ्याचश्या लोकांना सायबर क्राईम बद्दल काहीही माहित नसते, यामुळेच बरीचशी लोक सायबर क्राईम ला बळी पडतात, सायबर क्राईमूळे बऱ्याच लोकांना डेटा आणि बँक अकाउंट मधून पैसे गेले असे किस्से आपण ऐकले आहेत.

याच सर्व कारणांमुळे आज आपण सायबर सिक्युरिटी म्हणजे काय? व सायबर सेक्युरिटी चे प्रकार तसेच सायबर क्राइम व त्याचे प्रकार ह्या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. 

Cyber Security म्हणजे काय? | Cyber Security Meaning in Marathi

सायबर सिक्युरिटी मोबाईल, संगणक, सॉफ्टवेअर आणि विविध प्रक्रियांद्वारे सुरक्षेचे अनेक स्तर तयार करण्यात येतात, ज्यामुळे इंटरनेटवरील चुकीच्या होणाऱ्या हालचाली रोखल्या जातात आणि वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित ठेवता येतो. त्याचप्रमाणे विविध हॅकर्स च्या डेटा हल्ल्यापासून वाचण्यासाठी सायबर सुरक्षा हि खूप महत्वाची आहे. 

सायबर क्राईम्स हे कोणत्याही एका प्रकारे होत नसते ते बऱ्याच विविध पद्धतीने केले जाऊ शकते व ह्यामुळे सायबर सुरक्षा ही तुमच्या डिवाइस मध्ये असणे फार महत्वाचे झालेले आहे. सायबर गुन्हे हे दुसऱ्या फॅक्टर्स वर अवलंबून असतात. 


सायबर सिक्युरिटी चे प्रकार | Cyber Security Type in Marathi

सायबर सेक्युरिटी चे काही महत्वाचे प्रकार आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

 

सायबर सुरक्षा बद्दल संपूर्ण माहिती
  1. नेटवर्क सिक्युरिटी | Network Security

नेटवर्क सुरक्षा ही एक बेकायदेशीर हॅकर पासून कम्प्युटर नेटवर्क सुरक्षित करण्याची एक प्रोसेस आहे. नेटवर्क सेक्युरिटी मध्ये नेटवर्क द्वारा येणारी कंट्रोल केली जाते आणि Threats आणि Attacks अनधिकृत प्रवेश यांपासून संगणक नेटवर्क सुरक्षित ठेवण्यासाठी उपयोग होतो.

  1. एप्लीकेशन सिक्युरिटी | Application Security

Application Security हे तुमचे एप्लीकेशन आणि सॉफ्टवेअर यांना Malware आणि Attack पासून सुरक्षित ठेवते, व यामुळे तडजोड केलेल्या एप्लीकेशन सुरक्षित करण्यासाठी डिझाईन केलेला डेटा मध्ये प्रवेश करू शकतो.

  1. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी | Information Security

इन्फॉर्मेशन सिक्युरिटी म्हणजेच डेटाची अखंडता आणि गोपनीयता येथेच संरक्षण करण्याचे काम हे करत असते, स्टोरेज आणि ट्रान्सक्रीप्ट मध्ये देखील माहिती हे सुरक्षित ठेवते.

  1. ऑपरेशनल सिक्युरिटी | Operational Security

यामध्ये एक अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये तुमचा डेटा हा हाताळला जातो आणि तो डेटा प्रोटेक्ट करण्यासाठी काही ऍसेट्स सेट केले गेलेले असतात. तुम्ही एखाद्या नेटवर्क ॲक्सेस करताना तुम्हाला असलेल्या परमिशन्स तसेच त्यावरून तुमचा डेटा कुठे सुरू केला जाऊ शकतो हे ठरविले जाते.

  1. बिझनेस सिक्युरिटी | Business Security

याद्वारे बिझनेस ऑर्गनायझेशन हे सायबर सिक्युरिटी किंवा सायबर क्राईम या घटना कशाप्रकारे हाताळल्या जातात हे पाहिले जाते व डिझास्टर रिकव्हरी पॉलिसीच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला डेटा किंवा ऑपरेशन हे परत मिळवू शकता.

  1. एंड यूजर एज्युकेशन | End user Security

एंड यूजर एज्युकेशन यामध्ये तुम्हाला काही अनप्रेडीकटिबल सायबर क्राईम याबद्दल माहिती दिली जाते, म्हणजेच तुमच्या फोनमध्ये असलेले काही स्पेशल ई-मेल अटॅचमेंट ला तुम्ही कधीही उघडू नये, तसेच अनोळखी यूएसबी ड्रायव्हर हे तुमच्या फोनला लावू नये आणि सायबर क्राईम यापासून वाचण्यासाठी तुम्हाला उपयुक्त अशी माहिती दिली जाते.


सायबर सिक्युरिटी चे महत्व | Importance of Cyber Security

Cyber Security हि खूप जास्त महत्त्वाचे आहे कारण की या सुरक्षेमुळे तुमच्या सर्व डेटा फाईल्स सुरक्षित ठेवल्या जातात आणि तुमची पर्सनल माहिती ही बेकायदेशीरपणे वापरण्यापासून संरक्षण आणि मदत मिळते. 

तसेच संवेदनशील डेटा म्हणजे Sensitive Data तसेच प्रोटेक्टेड हेल्थ इन्फॉर्मेशन (PHI) पी. एच. आय तुमची संरक्षित आरोग्य माहिती वैयक्तिक ओळख (IP) न्याय योग्य माहिती म्हणजेच पर्सनल इन्फॉर्मेशन तसेच, तुमची इंटेल प्रॉपर्टी, वैयक्तिक माहिती, डेटा तसेच सरकारी आणि व्यावसायिक माहिती प्रणाली, या सर्वाना समाविष्ट करून हा सर्व डेटा सुरक्षित राहण्यासाठी सायबर सिक्युरिटी सर्वात महत्त्वाचा भाग आहे.

हे पण वाचा – Hacking व Ethical Hacking म्हणजे काय?


सायबर हल्ल्यापासून स्वतःला कसे वाचवावे ? Cyber Security Tips in Marathi

आजच्या वाढत्या इंटरनेट आणि टेकनॉलॉजि वापरामुळे आणेल प्रकारचे सायबर हल्ल्याच्या केस या झालेले आहेत आपण ऐकले आहे. जेवढा इंटरनेटचा सदुपयोग केला जातो तेवढाच दुरुपयोगही केला जातो. काही वाईट प्रकारचे लोक आपल्या समाजात असतात ते कायम सायबर हल्ल्या वापर करून युजर चा डेटा चोरण्याचा आणि त्यांच्या सिस्टीम ला हॅक करण्याचा पर्यंत करत असतात. 

सायबर हल्ल्यापासून स्वतःला आणि आपल्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी खालील गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

  • सिस्टिम नेहमी अपडेट करणे

तुम्ही जे पण अँप्लिकेशन किंवा सॉफ्टवेयर वापरात असाल, त्या सॉफ्टवेयर ला नेहमी नवीन व्हर्जन मध्ये अपडेट करणे आवश्यक असते. नवीन व्हर्जन मध्ये अपडेट केल्यामुळे सिस्टिमवर सायबर हल्ल्या होण्याचे प्रमाण खूप कमी असते. 

  • अनोळखी ई-मेल 

आजकाल इंटरनेटमुळे आपण नेहमी ई-मेल चा वापर करतो. याच गोष्टीचा फायचा हॅकर घेतात आणि तुम्हाला लालच देणारे मेल येत असतील तर अशा प्रकारच्या अनोळखी मेल मध्ये तुम्हाला लिंक दिलेली असते ज्या लिंक मध्ये वायरस देखील असू शकतो म्हणूनच कोणत्याही अनोळखी मेल आलेला मेल हा डेटा चोरण्याचा हा सायबर हॅकर सापळा देखील असू शकतो.

  • अँटी व्हायरस सॉफ्टवेअर वापरणे

तुमच्या सिस्टिम मध्ये नेहमी अँटी – व्हायरस सॉफ्टवेअर चा वापर करायला हवा, त्यामुळे सिस्टीम मध्ये व्हायरस ला येण्यापासून रोखतो तसेच तुमच्या सिस्टीम मध्ये असलेल्या व्हायरसला बद्दल तुम्हाला नोटिफिकेशन देतो आणि आपल्या सिस्टीमला सुरक्षित ठेवते.

  • योग्य पासवर्डचा वापर

आपण खूप वेळा ऐकले असेल खूप लोकांचा पासवर्ड मध्ये त्यांचे नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि सोप्या गोष्टीचा वापर केला असतो. याच गोष्टीचा फायदा हॅकर ला होतो आणि त्याला पासवर्ड ला क्रॅक कारण हे अतिशय सोपं जात. 

मजबूत पासवर्ड बनवताना नेहमी त्यामध्ये विशिष्ट चिन्हाचा, अंकांचा, अक्षरांचा, वर्णांचा वापर करावा आणि पासवर्ड हा थोड्या-थोड्या दिवसांनी बदलत राहावा जेणेकरून हॅकर्सना पासवर्ड हॅक करणे शक्य होत नाही.

  • अनोळखी लिंक 

आपल्याला नेहमीच मोबाईलमध्ये अनोळखी नंबरने लिंक येत असतील तर अशा प्रकारच्या अनोळखी लिंकमध्ये दिलेली लिंक मध्ये वायरस देखील असू शकतो त्यामुळे हॅकर आपल्या सिस्टीममध्ये सहज प्रवेश करू आणि आपला डेटा चोरीला जाऊ शकतो. 

  • अनोळखी WIFI नेटवर्क 

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या असुरक्षित किंवा अनोळखी वायफाय नेटवर्क वापरणे हे नेहमी टाळा.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

सायबर सुरक्षा म्हणजे काय?

सायबरसुरक्षा म्हणजे सायबरस्पेस मध्ये होणाऱ्या डिजिटल हल्ल्यांपासून आपल्या इंटरनेट नेटवर्क चे आणि प्रोग्राम्सचे संरक्षण करणे होय. हे सायबर हल्ले मुख्यतः संवेदनशील माहिती चोरी करणे आणि माहिती नष्ट करणे या उद्देशाने आपल्या नेटवर्क मध्ये प्रवेश करतात. 

सायबर सुरक्षेचे फायदे कोणकोणते आहेत?

सायबर सुरक्षा सर्व प्रकारच्या Virus पासून सुरक्षा प्रदान करते.
डेटा चोरीस संरक्षण आणि प्रतिबंध करते.
वापरकर्त्यांना अधिक गोपनीयता प्रदान करते.
सिस्टिम आणि नेटवर्क हॅक होण्यापासून  संरक्षित करते. 

सायबर सिक्युरिटी चे प्रकार कोणते आहेत?

1. नेटवर्क सुरक्षा | Network Security
2. एप्लीकेशन सुरक्षा | Application Security
3. इन्फॉर्मेशन सुरक्षा | Information Security
4. ऑपरेशनल सुरक्षा | Operational Security
5. बिझनेस सुरक्षा | Business Security
6. एंड यूजर सुरक्षा | End user Security
7. क्लाउड सुरक्षा । Cloud security.
अश्या प्रकारे अनेक सायबर सुरक्षेचे प्रकार आहेत.


निष्कर्ष | Cyber Security Information in Marathi

अश्या प्रकारे आपण सायबर सुरक्षा म्हणजे काय? व हि सुरक्षा कश्या पद्धतीने दिली जाते तसेच हॅकर्स पासून आपला डेटा सुरक्षित कसा ठेवावा या सर्वांबद्दल संपूर्ण माहिती बघितलीच आहे.

तसेच जर तुम्हाला माहिती समजली असेल तर नक्की कंमेंट करा, आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुमच्या काही सूचना, प्रश्न असतील तर निसंकोच पण विचारू शकता.  

धन्यवाद!!

Leave a Reply