इंटरनेट म्हणजे काय? Internet Full Information in Marathi

इंटरनेट म्हणजे काय आणि इंटरनेट बद्दल संपूर्ण माहिती

आजच्या या डिजिटल मार्केटिंग च्या दुनियेत असं कोणीच नसेल की ज्याने इंटरनेट हा शब्द कधी ऐकलाच नसेल. जेव्हा एखाद्याला कोणत्याविषयाबद्दल काहीतरी जाणून घ्यायचे असते तेव्हा आपणं लगेच त्याला म्हणतो की, “ इंटरनेट वर सर्च कर”. 

पण इंटरनेट या संकल्पनेचा कधीतरी खोलवर तूम्ही अभ्यास केलाय का? किंवा इंटरनेट काय आहे? मग इंटरनेट मधील क्रियाकलाप नेमके कसे घडवून आणल्या जातात याबद्दल कधीतरी तुमचा मनात उत्सुकता निर्माण झालीय का?

चला तर मग आजच्या या लेखात आपण मराठी मध्ये इंटरनेट म्हणजे काय? (What is Internet in Marathi) इंटरनेटचा भूतकाळ, इंटरनेट ची कार्यप्रणाली तसेच इंटरनेटमुळे आपल्या दैनंदिन जीवनात घडून आलेले अमुलाग्र बदल या सर्वांबद्दल सर्व माहिती स्टेप बाय स्टेप आणि सविस्तर पने जाणून घेऊया. 

इंटरनेट म्हणजे काय? | Internet Meaning in Marathi

इंटरनेट अर्थ ला मराठी मध्ये “आंतरजाल” किंवा “महाजाल” असे सुद्धा म्हणतात. 

इंटरनेट म्हणजे काय तर नेटवर्क चे असे जाळे जे संपूर्ण जगभरात पसरले आहे. इंटरनेटचे हे जाळे जगभरातील सर्व डिजिटल उपकरणांना टॉवर्स आणि कृत्रिम उपग्रहांच्या माध्यमातून वायरलेस  कनेक्शन व्दारे एकमेकांना जोडले गेले आहे. जगातील संगणक प्रणालीला जोडण्यासाठी हाय-बँडविड्थ डेटा लाइनचा वापर केला जातो, यामधे इंटरनेटचा समावेश होतो.


इंटरनेटचा फुल फॉर्म | Internet Full Form 

इंटरनेटमुळे संपुर्ण जगभरातील सर्व वेब सर्व्हर एकमेकांशी जोडले गेले आहे. इंटरकनेक्टेड नेटवर्कचा तो एक छोटा फॉर्म आहे. इंटरनॅशनल नेटवर्किंग चे संक्षिप्त रूप म्हणजे च “इंटरनेट” Inter=International, net=Networking. 

याला वर्ल्ड वाइड वेब (WWW) असेही म्हणतात. वापरकर्त्याला वर्ल्ड वाइड वेब वरील एखादा डेटा संप्रेरीत करण्यासाठी हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल (http) ची परवानगी लागते. यामध्ये हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल (एचटीटीपी) म्हणजे च वितरित होणाऱ्या महिती प्रणाली साठी ची एक अनुप्रयोग-स्तरीय प्रोटोकॉल.

>> हे पण वाचा – सोशल मीडिया म्हणजे काय?


इंटरनेट चा इतिहास | History of the Internet in Marathi

  • इंटरनेट च्या जन्माआधी फक्त “तंत्रज्ञान” ही एकमात्र संकल्पना अस्तित्वात होती. इंटरनेट ही संकल्पना अस्तित्वात येण्यामागे कोण्याही एका व्यक्तीचा हात नाही. त्या वेळचे संशोधक व अभियंते यांनी त्यांच्या डोक्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कल्पना आणि विचारांवर काम करुन विविध प्रकारचे आणि अद्भुत वैशिष्ट्य असलेले तंत्रज्ञान विकसित केले.  
  • त्या काळात तंत्रज्ञानाचे जाळे हे सर्व जगभरात असावे अशी कल्पना बऱ्याच जणांनी केली. मात्र सर्वांवर मात करत सर्वप्रथम निकोला टेस्ला यांनी 1900 मध्ये त्यांच्या ‘ वायरलेस सिस्टिम’ या कल्पनेचे समर्थन केले. त्यांच्या नंतर पॉल ओलेट (Paul Otlet) आणि वन्नेवर बुश (Velneshwar Bush) या शास्त्रज्ञांनी 1930 आणि 1940 मध्ये ज्ञानाचे भांडार असलेली पुस्तके आणि ईतर माध्यमे यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोधण्यायोग्य स्टोरेज सिस्टीम ची कल्पना केली. 
  • 1960 पर्यंत इंटरनेट व्यवहाराची संकल्पना अस्तित्वात नव्हती. या शतकाच्या आरंभी एम.आय.टी (MIT) च्या जे.सी लिकलाईडर (J.C Licklider) यांनी इंटरगँलेक्टिक नेटवर्क (Intergalactic Network) ची कल्पना केली जी त्या काळात अत्यंत लोकप्रिय झाली. त्यानंतर संशोधकांनी इलेक्ट्रॉनिक डेटा प्रभावीपणे प्रसारित करण्यासाठी “पॉकेट स्विचिंग” या कल्पनेला वाव दिला. 
  • 29 ऑक्टोबर 1969 मध्ये ए.आर.पी.ए (ARPA) नेटने त्यांचा पहिला संदेश दिला तो म्हणजे “ नोड-टू-नोड” संप्रेषण (एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर) . मात्र लॉगिन संदेश हा खूप लहान व साधा असूनही ARPA चे नेटवर्क आपटले (crash) गेले. 
  • १९७० च्या दरम्यान रॉबर्ट कान (Robert Kahn) आणि विंटन सर्फ (Vinton Cerf) यांनी ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल (TCP) व इंटरनेट प्रोटोकॉल (IP) यांसारखे तंत्रज्ञान विकसित केले ज्यामुळे एका नेटवर्क मधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये डेटा प्रसारित करणे सोयीस्कर झाले. 
  • १ जानेवारी १९८३ ला ARPA नेटने टीसीपी (TCP) आणि आयपी (IP) चा अवलंब केला ज्या मुळे नेटवर्क नेटवर्क चे एकत्रीकरण सुरु झाले आणि आधुनिक इंटरनेट जन्माला आले. 1990 मध्ये “बर्नर्स-ली” ने वर्ल्ड वाईड वेब (www) चा शोध लावला. 
  • येथूनच ऑनलाईन जगाने महाकाय रूप धारण केले आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहचले.वेब मुळे इंटरनेट हे सर्वसामान्य लोकांमध्ये अत्याधिक लोकप्रिय झाले. आणि बघता  बघता इंटरनेट ने आपल्या दैनंदिन जीवनात एक महत्वाची भूमिका बजावली.

भारतामध्ये इंटरनेट सेवेची सुरुवात कधीपासून झाली याबद्दल तुम्ही पुढील विकिपीडिया (Wikipedia) लिंक वर पाहू शकता. 


इंटरनेट कश्या प्रकारे कार्य करते? 

What is the Internet Called and How Does the Internet Work? वापरकर्ता कोणते उपकरण वापरत आहे किंवा तो कोणत्या ठिकाणी आहे या सर्व गोष्टींची पर्वा न करतां इंटरनेट वरील डेटा हा विश्वास करण्यालायक आहे याची खात्री करण्यासाठी ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल (TCP) व इंटरनेट प्रोटोकॉल (IP) हे दोघं एकत्रितपणे कार्य करतात.

इंटरनेट मधून डेटा हा पॅकेट च्या स्वरूपात वितरीत केला जातो. इंटरनेटवर पाठविलेल्या डेटाला एक संदेश म्हणतात, हे संदेश आणि पॅकेट्स इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) आणि ट्रान्सपोर्ट कंट्रोल प्रोटोकॉल (टीसीपी) वापरून एका स्त्रोताकडून पुढील स्त्रोत पर्यंत प्रवास करतात.  

ज्यावेळी इंटरनेट कनेक्शनचा वापर करून एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर माहिती प्रसारित केली जाते तेव्हा नियमांची एक प्रणाली त्यावर नियंत्रण ठेवते. 

>> हे पण वाचा – लिंक्डइन सोशल नेटवर्क काय आहे?

संगणक प्रणालीची त्याची एक वेगळी भाषा असते. इंटरनेट हे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल (TCP) व इंटरनेट प्रोटोकॉल (IP)  चे अनुसरण करणारे पॅकेट राउटिंग नेटवर्क वापरून कार्य करते. त्यानंतर संगणक न्युमेरिक पत्ता (address) वापरून इंटरनेट प्रोटोकॉल सिस्टीम डेटा समोर कसा पाठवायचा या संबंधित सूचना देते.  

ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल व इंटरनेट प्रोटोकॉल हे दोघे डेटाचे हस्तांतरण विश्वसनीय असल्याची खात्री करतात. कोणतेही पॅकेट गमावलेले नाही याची पूर्तता करते आणि नंतर सर्व पॅकेट्स क्रमानुसार एकत्रित करतात. यामुळे डेटाच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम न होता डेटा लवकरात लवकर वापरकर्ता जवळ पोहचवला जातो. 

इंटरनेट या संकल्पनेत आणखी दोन महत्त्वाच्या बाबी म्हणजेच  इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाईडर (आय.एस.पी) आणि नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर (एन.एस.पी). ISP आणि NSP हे दोन्हीही इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाईडर आणि नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हाईडर ची संक्षिप्त रूपे आहेत. या दोन्हीही बाबी महत्वाच्या आणि मूलभूत सुविधा प्रदान करतात. जेव्हा इंटरनेट वरून एखादी माहिती प्रसारित केली जाते तेव्हा त्यासाठी जी परवानगी लागते ती इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाईडर आणि नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर द्वारे दिली जाते. 

इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाईडर आणि नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हाईडर  हे आणखी एक महत्त्वाची भुमिका बजावतात आणि ति म्हणजे प्रोटोकॉल व पायाभूत सुविधांचे एकत्रीकरण करणे, जेणेकरून इंटरनेट वर पाठवलेल्या माहितीला नेमक कुठं जायचं आहे हे समजण्यास मदत होते.

>> हे पण वाचा – स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करावा पूर्ण माहिती


इंटरनेटचे फायदे | Advantages of Internet

आपण विचारही नाही करू शकत असे असंख्य फायदे आणि वैशिष्ट्ये आपल्याला इंटरनेट प्रदान करतो. आजच्या या डिजिटल युगात इंटरनेट शिवाय जगणे खूप कठीण आहे. इंटरनेट मुळे कधीतरी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा आज शक्य झाल्या आहेत आणि आपले जीवन आधीपेक्षा अधिक सोपे व सोयीस्कर झाले आहे.

  1. इंटरनेट मुळे आपण दूरवर असलेल्या आपल्या नातेवाईकांशी, किंवा कामानिमित्त बाहेरील देशांमधील लोकांना घरबसल्या संवाद साधू शकतो.
  1. विविध सोशल नेटवर्किंग साइट उदा. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यु-ट्युब, यांसारख्या साईट्स च्या माध्यमातून आपणं आपले गुण आणि कौशल्य संपुर्ण जगातील लोकांपर्यंत पोहचवू शकतो. 
  1. सर्वसाधारण व्यक्ती घरबसल्या त्याला आवश्यक असलेली कोणतीही माहिती इंटरनेट वर शोधू शकता. तंत्रज्ञान, आरोग्य आणि विज्ञान, सामाजिक अभ्यास, भौगोलिक माहिती, माहिती तंत्रज्ञान, उत्पादने इत्यादी विविध विषयांची माहिती शोध इंजिनच्या मदतीने शोधली जाऊ शकते.
  1. इंटरनेट मनोरंजनासाठी विशेष माध्यम म्हणून कार्यरत आहे. उदा ऑनलाईन टेलिव्हिजन, ऑनलाईन गेम, ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन तिकीट बुकिंग, ऑनलाईन बिल पेमेंट, ईमेल आणखी बरच काही. 
  1. यामधे आणखी विशेष इंटरनेटचे महत्त्व म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ची संकल्पना प्रदान करते. ज्यामुळे आपणं आपला ऑनलाईन बिझनेस करू शकतो आणि एखादा नवीन उद्योग कसा सुरु करायचा याबद्दल ही बरीचशी माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळते. 

इंटरनेट चे खूप सारे फायदे पाहायला मिळतात पण त्याचप्रमाणे इंटरनेट चे तोटे (Disadvantages of Internet) सुद्धा आहेत. 


FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न 

आंतरजाल म्हणजे काय?

आंतरजाल हे नेटवर्क चे विशालकाय आणि सर्वात मोठे जाळे आहे जे संपुर्ण जगात पसरले आहे तसेच संपूर्ण जगभरातील सर्व वेब सर्व्हर ला एकमेकांशी जोडले गेले आहे. इंटरनेट ला मराठी मध्ये “आंतरजाल” आणि “महाजाल” असे सुद्धा म्हटले जाते.  

इंटरनेट चा फुल्ल फॉर्म काय आहे?

इंटरनेट चे संक्षिप्त रूप इंटरकनेक्टेड नेटवर्क आहे. Inter – Interconnected, Net – Network म्हणजे च इंटरनेट याला वर्ल्ड वाइड वेब (WWW) असेही म्हणतात.

निष्कर्ष 

आज या लेखामध्ये आपण इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेट कसे काम करते? तसेच आजच्या डिजिटल युगात इंटरनेट चा उपयोग कश्या प्रकारे केला जातो. या बद्दल संपूर्ण माहिती विस्तृत पणे जाणून घेतली आहे. 

आम्ही आशा करतो कि तुम्हाला Internet Information in Marathi आमचा लेख नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला अश्याच प्रकारची इंटरेस्टिंग माहिती आणखी वाचायची असेल तर लगेच आमच्या मराठी स्पिरिट या वेबसाईट ला भेट द्या. आम्ही तुमच्या साठी दररोज डिजिटल मार्केटिंग, नवनवीन टेकनॉलॉजि आणि इंटरनेट च्या अश्या इंटरेस्टिंग टॉपिक बद्दल महत्वाची माहिती शेयर करतो.  

तसेच तुम्हाला इंटरनेट बद्दल संपूर्ण माहिती कशी वाटली जर हि माहिती तुमच्या उपयोगात आली असेल तर नक्कीच आमचा लेख तुमच्या मित्रांना शेयर करा. 

🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. Deepak

    Mast information , kup Chan लिहिले आहे