Hacking & Ethical Hacking म्हणजे काय? (Full Guide in Marathi)

हॅकिंग आणि इथिकल हॅकिंग म्हणजे काय

ज्या लोकांचा कंप्यूटर क्षेत्राशी, इंटरनेट नेटवर्क शी संबंध आहे अशा व्यक्तींना चांगले माहीत असते की हॅकिंग काय असते? हँकिंगचा अर्थ काय होतो?

पण सामान्य व्यक्ती चा कंप्यूटर किंवा इंटरनेट शी कुठलाही संबंध येत नाही. अशा व्यक्तींना हँकिंग विषयी पुरेसे ज्ञान नसते. अणि असे लोक नकळत हँकर्स चा शिकार बनत असतात.

म्हणूनच आम्ही आज तुम्हा सर्वांसाठी एक सर्वात महत्वाच्या टॉपिक बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. तो टॉपिक म्हणजे Hacking & Ethical Hacking म्हणजे काय?

हॅकिंग म्हणजे काय? । Hacking in Marathi 

एखाद्या व्यक्तीच्या अनुमतीशिवाय जर आपण त्याच्या कंप्यूटर मधील पर्सनल डेटामध्ये प्रवेश करून त्याची वैयक्तिक माहीती मिळवत असाल.

किंवा त्याच्या डेटा सोबत काही छेडछाड करत असाल त्याच्या नकळत डेटाला डिलीट करत असाल किंवा अँक्सेस करत असाल अणि त्याच्या मिळवलेल्या माहीतीचा त्याला नकळत वापर करत असाल.

आणि त्या व्यक्तीच्या परवानगी शिवाय त्याच्या सिस्टममध्ये प्रवेश करून काही साँफ्टवेअर डाउनलोड करत असाल तर त्याला हँकिंग असे म्हटले जाते.


हॅकर्स कोण असतो? । Hackers in Marathi 

हॅकर हा एक असा व्यक्ती असतो जो आपल्या नकळत आपली कुठलीही परवानगी न घेता आपल्या कंप्यूटर सिस्टममध्ये प्रवेश करतो. अणि आपल्या कंप्यूटर मधील सर्व वैयक्तिक डेटा माहीती मिळवून त्या माहीतीचा इतर गुन्हेगारी कृत्यांसाठी वापर करतो.

हॅकिंग म्हणजे काय

म्हणुन हँकर ला टेक्निकल चोर असे देखील म्हटले जाते, कारण कोणाच्या परवानगीविना त्याच्या सिस्टममधील माहीतीचा गैरवापर करणे त्यात कुठलाही फेरबदल घडवून आणने हे एक बेकायदेशीर कृत्य आहे.


हॅकिंग चे प्रकार । Type of Hacking in Marathi

वरील प्रमाणे आपण हॅकिंग म्हणजे काय? आणि हॅकर्स कश्याला म्हणतात याबद्दल माहिती बघितलीच आहे आता हि हॅकिंग कोणत्या पद्धतीने होऊ शकते किंवा हॅकिंग चे प्रकार काय आहेत याबद्दल काही मुद्दे जाणून घेऊया. 

  • Website Hacking । वेबसाइट हॅकिंग
  • Network Hacking । नेटवर्क हॅकिंग
  • Email Hacking । ईमेल हॅकिंग
  • Ethical Hacking । इथिकल हॅकिंग
  • Password Hacking । पासवर्ड हॅकिंग
  • Computer Hacking । संगणक हॅकिंग

हे पण वाचा – Wi-Fi म्हणजे नक्की काय? सविस्तर माहिती वाचा

हॅकर्स चे प्रकार | Type of Hackers in Marathi

मुख्यतः हॅकर्स हे तीन प्रकारचे असतात त्यामध्ये ब्लॅक हॅट (Black Hat), ग्रे हॅट (Grey Hat) आणि तिसरा म्हणजे व्हाईट हॅट (White Hat) हॅकर्स यालाच इथिकल हॅकर्स असे सुद्धा म्हणतात. यामधील सुरुवातीचे दोन हॅकर्स लोकांचे नुकसान करणारे असतात तर शेवटचा हॅकर्स हा या दोन हॅकर पासून लोकांना वाचवत असतो. अश्या प्रकारे या तीन हॅकर्स बद्दल सविस्तर माहिती पाहूया. 

  1. ब्लँक हॅट हॅकर्स कशाला म्हणतात? । Black Hat Hackers in Marathi

ब्लॅक हॅट हॅकर्स (Black Hat Hacker) हा एक असा हॅकर असतो जो आपल्या नकळत आपल्या परवानगी शिवाय आपल्या सिस्टममध्ये प्रवेश करतो. अणि आपल्या सर्व महत्वाच्या डेटाला Documents ला Access करतो.

अश्या प्रकारच्या डेटा चा उपयोग करून समोरचा व्यक्तीस परत करण्यासाठी बेकायदेशीररीत्या पैशांची मागणी करत असतो, तसेच पैसे नही दिले तर हा आपल्याला ब्लँकमेल करण्याचे किंवा डेटा लीक करण्याची धमकी देतो.

हा हँकिंग चा एक बेकायशीर प्रकार आहे म्हणुन असा हॅकर पकडला गेल्यास त्याला कठोर तुरूंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते.

2. ग्रे हॅट हॅकर्स कशाला म्हणतात? । Grey Hat Hackers in Marathi

ग्रे हॅट हॅकिंग (Grey Hat Hacking)हा देखील हँकिंगचाच एक बेकायदेशीर प्रकार असतो. पण हा हँकर्स आपल्या सिस्टमला कुठल्याही प्रकारचे नुकसान पोहचवत नसतो. किंवा वैयक्तिक डेटा मिळवून त्याचा गैरवापर करत नसतो आपल्याला ब्लँकमेल देखील करत नसतो.

ग्रे हँट हँकर फक्त त्याच्या हँकिंग च्या नाँलेज चे परीक्षण करत असतो. अणि त्याला किती चांगल्या पद्धतीने हँकिंग जमते हे चेक करत असतो. यासाठी तो आपल्या सिस्टममध्ये प्रवेश करत असतो.

आणखी माहिती वाचा – इंटरनेट बँकिंग बद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती वाचा

3. इथिकल हॅकर्स कशाला म्हणतात? । Ethical Hacking in Marathi

Ethical Hacking लाच व्हाईट हॅट हॅकिंग (White Hat Hacking) असे सुद्धा म्हणतात.

इथिकल हॅकर्स हा बेकायदेशीर पद्धतीने काम करत नसतो, हा आपली परवानगी घेऊन आपल्या सिस्टमला हँक करत असतो.

मग सिस्टम हँक केल्यानंतर आपल्याला कळवत असतो की आपल्या सिस्टममध्ये कुठे बग्स (Bugs) आणि ईरर (Error) आहेत. ज्याद्वारे ब्लँक हँट हॅकर्स आपल्या सिस्टममध्ये प्रवेश करून डेटाला हँक करू शकतात.

मोठं मोठ्या कंपन्या आपल्या सिस्टममध्ये कुठे कमजोरी आहे कुठुन हँकर्स आपल्या सिस्टममध्ये विना परवानगी प्रवेश करू शकतो हे जाणुन घेण्यासाठी व्हाईट हॅट हँकरर्स ची मदत घेत असतात. 


इथिकल हँकरचे फायदे । Benefits of Ethical Hackers 

  • इथिकल हॅकर हा आपल्या सिस्टमला ब्लँक हँट हॅकर पासुन वाचवण्याचे काम करत असतो. यासाठी तो सिस्टमला टेस्ट करत असतो.
  • आपल्या सिस्टममध्ये कुठे Bugs, Error आहेत जिथून ब्लँक हँट हँकर्स सिस्टममध्ये प्रवेश करू शकतो हे कंपनीला सांगत असतात. ज्याने कंपनीचे भविष्यात होणारे खुप मोठे नुकसान टळत असते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न । FAQ 

Black Hat Hackers कोण असतो?

ब्लॅक हॅट हॅकर्स हा असा हॅकर्स आहे जो आपल्या परवानगी शिवाय आपल्या सिस्टममध्ये प्रवेश करतो, अणि आपल्या सर्व महत्वाचा डेटा डॉक्युमेंट्स ला Access करतो. आणि डेटा परत करण्यासाठी बेकायदेशीररीत्या पैशांची मागणी करत असतो. 

Grey Hat Hackers कोण असतो?

ग्रे हॅट हॅकर्स हा बेकायदेतरीत्या आपल्या परवानगी शिवाय आपल्या सिस्टिम मध्ये प्रवेश करतो पण हँकर्स आपल्या सिस्टमला कुठल्याही प्रकारचे नुकसान पोहचवत नसतो. किंवा वैयक्तिक डेटा मिळवून त्याचा गैरवापर करत नसतो आपल्याला ब्लँकमेल देखील करत नसतो.

Ethical Hacking म्हणजे काय?

या प्रकारच्या हॅकिंग चा वापर आपल्या सिस्टिम मध्ये बग्स आणि चुका शोधून काढण्यासाठी तसेच ज्या द्वारे ब्लॅक हॅट हॅकर्स आपल्या सिस्टिम मध्ये प्रवेश करू शकतात अश्या मार्गाला शोधणे आणि त्यावर योग्य उपाय करणे जेणेकरून ब्लॅक हॅट हॅकर्स आपल्या सिस्टिम ला हॅक करू शकणार नाही यालाच इथिकल हॅकिंग किंवा व्हाईट हॅट हॅकिंग असे म्हणतात.  


निष्कर्ष । Hacking Information in Marathi

अश्या प्रकारे आम्ही तुम्हाला हॅकिंग आणि इथिकल हॅकिंग म्हणजे काय? (Hacking & Ethical Hacking Meaning in Marathi) याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती मराठी मध्ये दिली आहे. तरी तुम्हाला वरील माहिती कशी वाटली याबद्दल कंमेंट करा. 

आणि वरील लेख आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना सोशल मीडिया वर शेअर करायला विसरू नका. 

तसेच तुम्हाला आणखी कोणत्या इंटरेस्टिंग विषया बद्दल माहिती हवी असेल तर नक्की कळवा, आम्ही त्या विषयावर योग्य आणि अचूक माहिती लिहण्याचा प्रयत्न करू. 

🙏धन्यवाद!🙏

Leave a Reply