Wifi म्हणजे काय? Wifi Information in Marathi (Full Guides)

Wifi Information in Marathi

नमस्कार मित्रांनो, रोजच्या दैनंदिन वापरात तुम्ही बऱ्याच वेळा वायफाय हा शब्द ऐकला असेल. वायफाय म्हणजे, “एका मोबाईल मधून दुसऱ्या मोबाईल मध्ये इंटरनेट ची केलेली देवाण घेवाण” बस एवढीच मर्यादित माहिती सर्वांना माहीत असेल. पण खरोखर वायफाय ची माहिती एवढीच मर्यादित असेल का? मुळीच नाही.

चला तर मग आपल्या आजच्या या लेखात आपण वायफाय बद्दल संपुर्ण माहिती जसे की Wifi चा अर्थ  काय आहे? Wi-Fi कसे काम करते? आणि सोबतच त्यांची वैशिष्ट्ये आणि तोटे याबद्दल संपुर्ण माहिती जाणून घेऊयात. 

Wifi म्हणजे काय? What is Wifi in Marathi

तुम्ही इंटरनेट हा शब्द ऐकले असेलच. इंटरनेट हे संक्षिप्त रूप आहे इंटरनॅशनल नेटवर्किंग चे. इंटरनॅशनल नेटवर्किंग म्हणजे नेटवर्क चे असे जाळे जे संपुर्ण जगभरात पसरले आहे आणि ज्यामधे संपुर्ण जगातील यांत्रिक उपकरणे जसेकी लॅपटॉप, टॅबलेट, पी सी, नोटबुक, संगणक एकमेकांशी जोडलेले आहेत. अशा डिव्हाईस दरम्यानचे कनेक्शन हे पूर्णपणे वायरलेस आहे.

वायफाय म्हणजे काय? तर वेगवेगळया डिव्हाईस मधील कनेक्शन केवळ टॉवर्स आणि कृत्रिम उपग्रहाद्वारे जोडणे शक्य झाले आहे. आणि या सर्व डिव्हाईस मध्ये नेटवर्किंग च कनेक्शन वायरलेस असते, याच विशिष्ठ वायरलेस नेटवर्किंग लाच वायफाय असं म्हणतात.

वायफाय ही एक प्रकारची टेक्नॉलॉजी आहे. यामधे सर्व प्रकारची यांत्रिक उपकरणे वायरलेस इंटरनेट कनेक्शन च्या माध्यमातुन जोडले गेले आहे. 

ही टेक्नॉलॉजी लोकल एरिया नेटवर्किंगक (LAN) च्या अंतर्गत येते.

हे पण वाचा – संगणक म्हणजे काय?


वायफाय चा फुल फॉर्म | Wifi Full Form in Marathi

वायफाय हे वायरलेस फिडेलिटी (Wireless Fidelity) चे संक्षिप्त रूप आहे तसेच वायफाय ला Wireless Technology म्हणून देखील ओळखले जाते. 

कदाचित Wireless Fidelity हा शब्द ऐकायला आणि लक्षात ठेवायला जरा तिचकट जात असावा ज्यामुळे त्याचे रूपांतर (Wi – Wireless, Fi – Fidelity) Wi-Fi  मध्ये करण्यात आला. 


Wi-Fi ची कार्यप्रणाली | Working Principle of Wi-Fi in Marathi

आजच्या डिजिटल युगात साधारणतः एक दिवसही इंटरनेट सर्व्हिस शिवाय जगणे म्हटल म्हणजे फार अवघड होऊन जात. डिजिटल उपकरणे आणि इंटरनेट मधील हे कनेक्शन अधिक सोईस्कर बनवण्यासाठी वायरलेस टेक्नॉलॉजी म्हणजेच Wifi Calling सारख्या सुविधांचा अवलंब करण्यात आला.

Wifi बद्दल संपूर्ण माहिती

Wi-Fi Standard मध्ये नेटवर्क च्या उपलब्धतेसाठी कुठल्याही वायर किंवा केबल्स ची आवश्यकता नसते. यामध्ये रेडिओ लहरींच्या माध्यमातून इंटरनेट च्या सिग्नल ची देवाणघेवाण केली जाते. Radio Waves च्या रूपातील इंटरनेट चे हे सिग्नल्स टॉवर्स आणि राउटर व्दारे प्रसारित केले जातात.

राउटर हे एक हार्डवेयर उपकरण आहे जे स्वतःभोवती एक Wifi झोन तयार करते आणि त्या झोन मधिल सर्व यांत्रिक उपकरणांना नेटवर्क ची सेवा पुरवते.

टॉवर्स आणि राउटर द्वारा प्रसारित केले गेलेले हे सिग्नल अडॉप्टर जसे की संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, पीसी यांसारख्या उपकरणांद्वारे स्वीकृत केले जातात.

आताच्या नवीन लॅपटॉप आणि स्मार्टफोन्स मधे Wi-Fi चीप उपलब्ध असतात. तसेच सोबतच त्यामधे वाय-फाय आणि हॉटस्पॉट सारखे Features सामाविष्ट केलेले असतात ज्यांच्या मदतीने आपण दोन डिव्हाईस मधील नेटवर्क ची देवाण घेवाण करु शकतो आणि सोबतच लोकल एरिया म्हणजेच कॉफी कॅफे, मोठ मोठ्या युनिव्हर्सिटी, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट यांसारख्या ठिकाणी उपलब्ध असलेले फ्री इंटरनेट च्या सुविधांचा देखिल तूम्ही पुरेपूर वापर करू शकता.


वायफाय चा इतिहास | History Of Wifi in Marathi

सर्वप्रथम 1991 मध्ये वायफाय ही संकल्पना अस्तित्वात आली आणि नंतर बदलत्या काळानुसार वाय-फाय च्या टेक्नॉलॉजी मध्ये बदल होत गेला.

  1. यामध्ये सर्वात आधी समावेश होतो तो “Wi-Fi 802.11b” चा. याची उत्पत्ती 1999 मध्ये झाली होती आणि या टेक्नॉलॉजी ची वारंवारता ही 11Mbps होती जी इतर प्रकारांच्या तुलनेत सर्वात कमी आहे.
  1. त्यानंतर दोन नंबर वर येते ती म्हणजे “Wi-Fi 802.11a”. वाय-फाय च्या ह्या दुसऱ्या पिढीत जास्त काही फरक नव्हता. याची वारंवारता ही पहिल्या पिढीच्या मानाने जरा जास्त होती आणि राउटर जवळून आलेल्या सिग्नल ला परिभाषित करण्याचे काम ही पिढी करत होती.
  1. नंतर 2003 मध्ये “Wi-Fi 802.11g”. चा उगम झाला. याची frequency ही 54Mbps होती.
  1. नंतर सलग 2009, 2014 आणि 2019 मध्ये समोरच्या पिढ्या जन्माला येऊ लागल्या,. 

 “Wi-Fi 802.11n (600Mbps) , Wi-Fi 802.11ac (3.4Gbps) व Wi-Fi 802.11ax ( 9.6 Gbps)” . याची वारंवारता त्याच्या काळानुसार वाढलेली दिसते, आणि त्याच्या वारंवारतेनुसार त्याच्या गुणवत्तेत आणि त्याच्या वेगातही बदल दिसून येतो.


वायफाय चे फायदे| Advantages Of Wifi In Marathi

  1. वायरलेस तंत्रज्ञानामुळे कोणतेही ऑनलाईन ऑनलाईन कार्य करणे हे आधीच्या तुलनेत अधिक सोईस्कर झाले आहे.
  1. या वायरलेस तंत्रज्ञानात आपण एकापेक्षा अधिक उपकरणांना इंटरनेटशी कनेक्ट करु शकतो.
  1. बहुदा स्थानिक क्षेत्रांतील उपलब्ध असलेले फ्री इंटरनेट झोन मध्ये गेल्यानंतर हॉटस्पॉट च्या मदतीने मनसोक्तपणे तूम्ही त्या फ्री वायफाय चा आनंद घेऊ शकता.

आणखी वाचा – CPU म्हणजे काय?


वायफाय चे तोटे | Disadvantages Of Wi-Fi in Marathi

वायफाय हे कितीही महत्वाचे असले तरीही त्याचे काही तोटे देखिल आहेत.

  1. जेव्हा एखाद्या वाय-फाय झोन मध्ये एका ठराविक मर्यादेपेक्षा अधिक उपकरणे फ्री नेटवर्क चा वापर करत असतील तर त्या झोन मधिल इंटरनेट सेवेच्या गुणवत्तेत विपरीत परिणाम होऊ शकतो आणि परिणामी इंटरनेट चा वेग मंदावते.
  2. जेव्हा एखाद्या वाय-फाय झोन मध्ये एका ठराविक मर्यादेपेक्षा अधिक उपकरणे फ्री नेटवर्क चा वापर करत असतील तर त्या झोन मधिल इंटरनेट सेवेच्या गुणवत्तेत विपरीत परिणाम होऊ शकतो आणि परिणामी इंटरनेट चा वेग मंदावते.
  3. जेव्हा एखाद्या वाय-फाय झोन मध्ये एका ठराविक मर्यादेपेक्षा अधिक उपकरणे फ्री नेटवर्क चा वापर करत असतील तर त्या झोन मधिल इंटरनेट सेवेच्या गुणवत्तेत विपरीत परिणाम होऊ शकतो आणि परिणामी इंटरनेट चा वेग मंदावते.

उदा: आपल्या घरातील टीव्ही ही चित्रीकरणासाठी कुत्रीम उपग्रह किंवा टॉवर्स जवळून Radio Signal प्राप्त करते. तसेच आपला मोबाईल देखिल नेटवर्क साठी टॉवर किंवा राउटर जवळून Radio Signal रिसिव्ह करतो.

आता यामधे जे Radio Signal टीव्ही आणि मोबाईल द्वारे स्वीकृत केले गेले त्या दोघांच्या वारंवारतेचे Frequency) भिन्नता असू शकते. जेव्हा भिन्न वारंवारता असलेले Radio Signal एकत्र येतात तेव्हा ते कामात अडथळा आणू शकतात.


FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न 

वायफाय चे संक्षिप्त रूप काय आहे?

वायफाय हे वायरलेस फिडेलिटी (Wireless Fidelity) चे संक्षिप्त रूप आहे. कदाचित वायरलेस फिडेलिटी हा शब्द ऐकायला आणि लक्षात ठेवायला जरा तिचकट जात असावा त्यामुळे त्याचे रूपांतर (Wi – Wireless, Fi – Fidelity) Wi-Fi  मध्ये करण्यात आला.

वायफाय चा उद्देश काय आहे?

या वायरलेस तत्रंज्ञानामुळे संपूर्ण जगातील यांत्रिक साधनांना म्हणजे लॅपटॉप, टॅबलेट, आयफोन, पीसी, फोन, किंवा संगणक आणि इतर वायरलेस उपकरणाला कोणत्याही केबल्स शिवाय वायफाय च्या मदतीने एकमेकांशी जोडल्या जातात, तसेच या मधील हे वायरलेस कनेक्शन केवळ टॉवर्स आणि कृत्रिम उपग्रहाद्वारे शक्य झाले आहे.


वायफाय बद्दल संपूर्ण माहिती

आजच्या या लेखात आपण Wifi म्हणजे काय? (What is Wifi Meaning in Marathi) तसेच वायफाय बद्दलची संपूर्ण आणि इतर महत्वाची माहिती पाहली आहे.

तसेच तुम्हाला आमची आजची हि पोस्ट कशी वाटली कंमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हि ब्लॉग पोस्ट आवडली असेल तर शेयर करा. 

या संपूर्ण लेखात तुम्हाला काही शंका किंवा कुठली चूक झालेली लक्षात आली तर आम्हाला comment करून नक्कीच कळवा.

धन्यवाद !!!

Leave a Reply