CPU म्हणजे काय? CPU Information in Marathi (Detail Guides)

what is CPU in Marathi

नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या लेखात आपण CPU बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

सी.पी.यु ची पायाभूत मराठी माहिती तर जवळपास सर्वांनाच माहीत असेल. जे मुख्य CPU ची कार्य प्रणाली असते त्यावर तो यशस्वीरीत्या कसे काम करतो?, संपुर्ण संगणकाला न चुकता तो कसे नियंत्रित करतो?, CPU ची निर्मिती कशी झाली?, तसेच सीपीयू CPU म्हणजे काय? आणि  CPU चे फायदे या सर्वांचा सविस्तरपणे अभ्यास करू.  (Step by Step CPU Full Information In Marathi)

हे पण वाचा – संगणक म्हणजे काय? कसे कार्य करते

चला तर मग जाऊया CPU (Central Processing Unit) च्या विश्वात एका रोमांचक प्रवासाला.      

CPU म्हणजे काय? | What is CPU Meaning in Marathi

CPU म्हणजे काय?, किंवा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट चा थोडक्यात आढावा लक्षात घेण्यासाठी आपणं एक सोप्प उदाहरण पाहू.

जेव्हा मानवी शरीराची निर्मिती झाली तेव्हा त्याच्या संपुर्ण शरीरावर नियंत्रण/देखरेख ठेवण्यासाठी आणखी एका महत्वाच्या अवयवाची निर्मिती झाली. या सर्वोत्तम अवयवाला “मेंदू” असे नाव देण्यात आले. आता मात्र मानवी शरीराचे प्रत्येक लहान-लहान कार्य हे मेंदूच्या नियंत्रणाखाली असते. आणि मेंदुशिवाय मानवी शरीर हे पूर्णपणे निकामी होऊन जाते.

हे झालं मानवी शरिराबद्दल. आता इलेक्ट्रॉनिक उपकरणाबद्दल जर विचार केला तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही एखादया विशिष्ट प्रकारच्या यंत्रणेची रचना केलेली आहे. आणि त्यापैकीच एक आहे “CPU” ज्याचे काम आहे संगणका सारख्या अतुलनीय इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर नियंत्रण ठेवणे.  

CPU ची व्याख्या | Central Processing Unit Meaning in Marathi

सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU)चे संक्षिप्त रूप म्हणजे च सी.पी.यू . CPU संगणकामधील एक इलेक्ट्रॉनिक सर्किटरी आहे. संगणकाव्दारे निर्देशित केलेले वेगवेगळे कार्य घडवून आणण्याचे काम CPU करते.” CPU ला आणखी सेंट्रल प्रोसेसर, मुख्य प्रोसेसर किंवा जस्ट प्रोसेसर असेही म्हटले जाते.

सी.पी.यु ला कोणतेही कार्य घडवून आणण्यासाठी भिन्न भिन्न ऑपरेशन्स चा सहारा घ्यावा लागतो. उदा. अंकगणित, तर्कशास्त्र, नियंत्रण तसेच इनपुट आणि आऊटपुट ऑपरेशन इत्यादी.


सीपीयू चा फुल्ल फॉर्म काय आहे? CPU Full Form in Marathi

CPU चा मराठीमध्ये फुल्ल फॉर्म सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. CPU Full form is the Central Processing Unit आहे .


सीपीयू चा इतिहास | History of CPU in Marathi

बदलत्या काळानुसार ज्या प्रमाणे Computer च्या पिढ्यांमध्ये बदल होत गेला, त्याची उत्क्रांती होत गेली त्याच प्रमाणे  सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या इतिहासातही बदल होत गेला. विकसित झालेल्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिट च्या यंत्रणेमुळे बऱ्याचश्या गोष्टींवर प्रभाव पडला.

उदा. संगणकाची कार्यक्षमता वाढली, संगणकाच्या किमतीत सीपीयु च्या गुणवत्तेनुसार बदल झाला तसेच उच्च तंत्रज्ञानाचा Computer वापरकर्त्यांस उपलब्ध झाला.

हे पण वाचा – इंटरनेट म्हणजे काय?

आतापर्यंत सीपीयु च्या एकुण पाच पिढ्या होऊन गेल्या –

अ) व्हॅक्यूम ट्यूब्

 1. संगणकाची पहिली पिढी ही 1940 ते 1956 यादरम्यान मेमरी म्हणून व्हॅक्यूम ट्यूब्स आणि मॅग्नेटिक ड्रम्स चा वापर करत होती. त्यामुळे व्हॅक्यूम ट्यूब ही सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ची पहिली पिढी म्हणून ओळखली जाते. व्हॅक्यूम ट्यूब्स ह्या आकाराने खूप मोठ्या होत्या, स्वतःला सामावून घेण्यासाठी त्यांना एका संपुर्ण खोलीची गरज भासत होती. 
 1. ज्या वेळी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे कार्यरत राहत, त्या वेळी त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या विजेचे प्रमाण हे खूप जास्त होते. परिणामी सिपियू हे अत्याधिक गरम होत असे. सिपीयु च्या या वाढलेल्या तापमानामुळे बऱ्याचदा संगणक खराब होऊन जात असत. 
 1. संगणकाची ही पहिली पिढी प्रोग्रामिंग भाषेवर अवलंबून होती. प्रोग्रामिंग भाषा ही एक विशिष्ट प्रकारची भाषा आहे जी केवळ संगणकीय यंत्रणेद्वारे समजली जाते.
 1. प्रथम पिढीचा संगणक हा एका वेळी एकच कार्य करण्यास सक्षम होता. या संगणकांत इनपुट म्हणून पंच कार्ड आणि पेपर टेप वापरत होते. आणि येणारे आऊटपुट हे त्यावरच प्रिंटआउट होत होते.

ब) ट्रान्सिस्टर 

 1. 1956 ते 1963 या काळात व्हॅक्यूम ट्यूब्स ची जागा ट्रांसिस्टर ने घेतली. ट्रांसिस्टर मुळे Computer आधीपेक्षा अधिक स्वस्त, वेगवान, आकाराने लहान, कार्यक्षम आणि विश्वासार्ह झाले. 
 1. 1950 मध्ये ट्रांसिस्टर चा वापर मोठ्या प्रमाणात होउ लागला. ट्रांसिस्टर मध्येही इनपुट आणि आऊटपुट ऑपरेशन साठी पंच कार्डचा वापर करत होते. ट्रान्झिस्टर मध्ये Computer हा अणू उर्जा उद्योगासाठी वापरला गेला.
 1. ट्रांसिस्टर हा प्रतीकात्मक असेम्ब्ली भाषेचा वापर करत होता. तसेच या पिढीमध्ये उच्च स्तरीय भाषा जसेकि कोबोल आणि फोर्ट्रान यांचा विकास झाला.

क) इंटिग्रेटेड सर्किट्स

 1. सीपीयू च्या तिसऱ्या पिढीत म्हणजे च 1964 मध्ये इंटिग्रेटेड सर्किट्स जन्माला आले. या पिढीमध्ये इनपुट आणि आऊटपुट ऑपरेशन साठी पंच कार्ड आणि पेपर टेप चा वापर पूर्णपणे बंद झाला. 
 2. थोडक्यात सांगायच झाल तर या पिढीत वापरकर्ता कीबोर्ड आणि मॉनिटर सारख्या यंत्रणेच्या माध्यमातून संगणकाशी संवाद साधू लागला. 
 3. तिसऱ्या पिढीतील इंटिग्रेटेड सर्किट वाले हे संगणक अत्याधिक लोकप्रिय झाले. तसेच व्हॅक्यूम ट्यूब आणि ट्रान्झिस्टर पेक्षा कमी खर्चिक होते.
 4. इंटिग्रेटेड सर्किट मुळे त्यावेळच्या संगणकाला एकाच वेळी अनेक प्रकारचे कार्य करणे शक्य झाले. 

ड) मायक्रोप्रोसेसर 

 1. 1971 मध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या चौथ्या पिढीमध्ये मायक्रोप्रोसेसर चा समावेश होतो. मायक्रोप्रोसेसर ची रचना काही अशा प्रकारे करण्यात आली होती की एका सामान्य चीपवर हजारो संकलित सर्किट तयार केले गेले. 
 1. 1971 मध्ये, इंटेल 4004 चिप विकसित केली गेली. पहिल्या पिढीतील व्हॅक्यूम ट्यूब्स च्या तुलनेत ही एकमात्र चीप अधिक कार्यक्षम होती.
 2. 1981 मध्ये, होम यूजर चा पहिला संगणक आयबीएमने विकसित केला. त्यानंतर 1984 मध्ये, मॅकिन्टोश चा शोध लागला. त्यामुळे डेस्कटॉप संगणकात आणि जीवनाच्या बर्‍याच क्षेत्रात मायक्रोप्रोसेसरचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. 
 1. मायक्रोप्रोसेसर मुळे संगणक प्रणाली ही आधीच्या तुलनेत अधिक स्वस्त आणि शक्तिशाली झाली. 
 1. या पिढीमध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस (GUI) , माऊस तसेच इतर हँडहेल्ड उपकरणांचा विकास झाला. यामुळे वापरकर्त्याला संगणकासोबत संवाद अधिक सुलभ झाला. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून तो इतरांशी ही संवाद साधू लागला. 

ई) कृत्रिम बुद्धिमत्ता

 1. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पाचव्या पिढीचा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे.  या सेंट्रल प्रोसेसिंग युनिट वर विकासाची प्रक्रिया अजूनही सुरु आहे. 
 1. अजूनही व्हॉइस रेकग्निशन सारखे काही अनुप्रयोग वापरले जातात. कृत्रिम बुद्धिमत्तेचे लक्ष्य असे एक साधन विकसित करणे आहे की जे नैसर्गिक भाषेला/इनपुटला प्रतिसाद देऊ शकेल.

Wikipedia (विकिपीडिया) मध्ये तुम्ही CPU चे प्रकार कोणकोणते आहेत या बद्दल माहिती पाहू शकता


CPU ची रचना कश्या प्रकारे असते 

सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे मुख्यतः तिन विभागात विभागले गेले आहे. Comprehensive Guide About the Parts of CPU in Marathi and Information About Computer Central Processing Unit in Marathi)

CPU Information in Marathi .

मेमोरी किंवा स्टोरेज युनिट  

सी.पी.यु हे युनिट सर्व सूचना, डेटा आणि निकाल संग्रहित करू शकते.

आवश्यकतेनुसार हे स्टोरेज संगणकाच्या घटकांना माहिती पुरवते. यालाच प्राथमिक स्टोरेज किंवा मुख्य मेमरी किंवा रॅम (Random Access Memory) म्हणून देखील ओळखले जाते.

प्राथमिक मेमरी आणि सेकंडरी मेमरी ह्या संगणकातील दोन प्रकारच्या मेमरी असतात. मेमरी युनिट हे प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सूचना संग्रहित करते. तसेच आऊटपुट डिव्हाईस वर जाहीर होण्यापूर्वी अंतिम 

निकाल संग्रहित करतो. सर्व इनपुट आणि आऊटपुट मुख्य मेमरी द्वारे प्रसारित केले जातात.

एरिथमेटिक लॉजिक युनिट (ALU)

या युनिटचे दोन उपविभाग आहेत.

 • अंकगणित विभाग

अंक, वजाबाकी, गुणाकार आणि विभागणी जसे गणितीय ऑपरेशन करणे अंकगणितिय विभागाकडे असते. सर्व जटिल ऑपरेशन्स वरील ऑपरेशन्सची पुनरावृत्ती  करुन केली जातात.

 • लॉजिक विभाग

डेटाची तुलना करणे, निवडणे, जुळविणे आणि विलीन करणे यासारख्या लॉजिक ऑपरेशन्स करण्याचे काम लॉजिक सेक्शन विभागाकडे असते.

कंट्रोल युनिट

संगणकाच्या सर्व भागाचे ऑपरेशन नियंत्रित करण्याचे काम कंट्रोल युनिट करते.

तसेच संगणकमधील डेटा आणि सूचनांचे हस्तांतर नियंत्रित करणे व सर्व युनिट चे व्यवस्थापन करण्याचे कामही कंट्रोल युनिट द्वारे पार पाडले जाते.


सीपीयू कश्या प्रकारे कार्य करते 

CPU चे मुख्य कार्य म्हणजे च Computer ने इनपुट डीव्हाईस च्या माध्यमातुन ज्या सूचना प्राप्त केल्या त्यावर योग्य ती प्रक्रिया करून आऊटपुट डिव्हाईस च्या मदतीने योग्य आऊटपुट देणे.

सीपियु चे मूलभूत चार कार्य आहेत-

 1. प्रोग्राम मेमरी मधुन सूचना एकत्रित करणे

सीपियु ची पाहिली पायरी म्हणजेच मेमरी मध्ये आलेल्या सर्व सूचना एकत्रित करणे. सर्व सूचना ह्या प्रोग्राम मेमरी कडे असतात.

सर्व सूचनांना योग्या तोच आऊटपुट मिळवून देण्यासाठी प्रोग्राम चा काउंटर स्वतःला त्या योग्य बनवतो. जेणेकरून सर्व निर्देश हे क्रमानुसार असतील.

मेमोरी मधुन सूचना एकत्रित करत्यावेळी त्याचा वेग खूप कमी होऊन जातो. परिणामी आऊटपुट भेटतांना सीपीयू चा वेग देखिल कमी होऊन जातो. ही समस्या हाई स्पीड कॅशे आणि पाइपलाइन आर्किटेक्चर द्वारे हाताळली जाते.

 1. डीकोड

या चरणात इनपुट मधुन सूचना एकत्रित केल्यावर आलेल्या सूचनांवर नेमकी कोणती प्रतिक्रिया द्यायची हे निर्धारित केल्या जाते. या प्रक्रियेला डीकोड चरण असं म्हणतात.

त्या नंतर सीपीयू च्या सर्व भागांवर नियंत्रण ठेवत एकत्रित केलेल्या सर्व सूचनांना सिग्नल मध्ये रुपांतरीत करते.

आलेल्या सूचनांना निर्देशा नुरूप बिट्स चा एक गट ठरवतो की नेमके कोणते ऑपरेशन करावे लागेल. उपस्थित असलेले ईतर फील्ड ऑपरेशन साठी आवश्यक महिती प्रदान करतात.

 1. अमलात आणणे

पहिल्या दोन चरणानंतर हे तिसरे चरण पार पाडले जाते. सिपियु आर्किटेक्चर चा वापर करून सर्व क्रिया क्रमानुसार लावते.

प्रत्येक क्रियेदरण्यान सीपीयू अर्थ चे भाग इलेक्ट्रिकली जोडले जातात, जेणेकरून ते सर्व ऑपरेशन वर आवश्यक अंमलबजावणी करू शकतील.

 1. स्टोअर

डेटा कार्यनवित् केल्यावर सर्व आऊटपुट डेटा मेमरी मध्ये संग्रहित केला जातो. ह्या मेमोरी रजिस्टर च्या मानाने कमी खर्चिक आणि उच्च क्षमतेच्या असतात.


FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न 

CPU नक्की काय आहे?

CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा संगणकाचा मुख्य घटक आहे संगणकाव्दारे निर्देशित केलेले वेगवेगळे कार्य घडवून आणण्याचे काम CPU करते म्हणूनच सीपीयूला संगणकाचा मेंदू सुद्धा म्हटल्या जाते. 

CPU चे भाग किती व कोणकोणते आहेत?

सीपीयूमध्ये तीन मुख्य भाग आहेत, सीपीयू भागांच्या साहाय्याने कार्य पूर्ण करतो, ज्यांची नावे खाली दिली आहेत. 
1. मेमोरी किंवा स्टोरेज युनिट
2. अंकगणित विभाग आणि लॉजिक विभाग
3. कंट्रोल युनिट

सीपीयू मेमोरी, स्टोरेज युनिट, अंकगणित तर्कशास्त्र युनिट, कंट्रोल युनिट मिळून बनलेला असतो. 


सीपीयू बद्दल संपूर्ण माहिती मराठीमध्ये 

या लेखामध्ये सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट म्हणजे काय? (What is CPU in Marathi and CPU Types) आणि CPU कशा प्रकारे कार्य करते याबद्दल आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. 

आमच्या या पोस्ट मधून काही उपयोगी माहिती मिळाली असेल तर नक्कीच हि पोस्ट तुमच्या मित्रांना सोशल मीडिया वर शेअर करा. तसेच तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा.   

तसेच आमच्या या ब्लॉग पोस्ट बद्दल तुमच्या काही सूचना असतील तर नक्कीच सांगा जेणेकरून आम्हाला हि पोस्ट अद्ययावत करता येईल. 

🙏🙏धन्यवाद ! 🙏🙏

Leave a Reply

This Post Has 2 Comments

 1. Shilpa

  Kup Chan mahiti dileli ahe tumi 👌