Cloud Computing म्हणजे काय? | Cloud Computing in Marathi

Cloud Computing म्हणजे काय

आतापर्यंत बऱ्याच लोकांनी क्लाऊड कॉम्पुटिंग या बद्दल नक्कीच ऐकले असेल, परंतु या क्लाऊड कॉम्पुटिंग चा अर्थ काय होतो? त्याचा वापर कसा केला जातो? याबद्दल कोणी जाणून घ्यायचा प्रयत्न केला नसेल परंतु आज आम्ही तुमच्या साठी Cloud Computing या युनिक टॉपिक बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलो आहे.

Cloud Computing म्हणजे काय? । Cloud Computing Meaning in Marathi 

आजच्या दैनंदिन जीवनात Internet चा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, तसेच या इंटरनेट च्या माध्यमातून विविध प्रकारच्या संगणकीय सेवा प्रदान केल्या जात आहे, जसे कि सॉफ्टवेअर, एखादे सर्वर किंवा स्टोरेज स्पेस उपलब्ध करून देणे इत्यादी.. यालाच आपण क्लाऊड कॉम्पुटिंग असे म्हणू शकतो. 

“सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास इंटरनेट च्या माध्यमातून विविध प्रकारच्या संगणकीय सेवा वापरकर्त्याला प्रदान करणे म्हणजे क्लाऊड कॉम्पुटिंग होय.”

ॲमेझॉन किंवा गुगल या सर्विस चा वापर करताना आपला सर्व डेटा हा क्लाऊड मध्ये साठविला जातो, आणि जर तुम्ही ट्विटरचा वापर करत असाल तर तुम्ही इनडायरेक्टली क्लाऊड कम्प्युटिंग सर्विस याचा वापर करत आहात. मागील काही वर्षांपासून क्लाऊड कम्प्युटर आणि क्लाऊड कम्प्युटिंग या दोन्हीचा सर्वात जास्त प्रमाणामध्ये विस्तार झाला आणि वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. 

क्लाऊड कम्प्युटिंग या सर्विस मध्ये इन्फ्रास्ट्रचर प्लॅटफॉर्म अप्लिकेशन आणि स्टोरेज स्पेस यासारख्या सर्व सुविधा ग्राहकाला उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये वापरकर्ता आपल्या गरजेनुसार कोणत्याही सर्विस चा वापर करू शकतो आणि ज्या सर्व्हिस चा वापर युजर करत आहे त्याच सर्विस चे पैसे द्यावे लागतात. 

क्लाऊड कम्प्युटिंगची बरीचशी उदाहरणे पाहायला मिळतात जसे की YouTube, Facebook, Google, Dropbox, Gmail, Picasa, Flickr इत्यादी… 

आणखी माहिती वाचा – वेब होस्टिंग बद्दल संपूर्ण माहिती


क्लाऊड कम्प्यूटिंगची सुरुवात केव्हा झाली?

आता ज्या लोकांनी सन १९९० ते २००० या कालावधी दरम्यान कोणत्याही संस्थे मध्ये काम केले असेल, त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी संगणक आल्यानंतर झालेला बदल देखील नक्कीच आठवत असेल.

सन २००० च्या सुरुवातीला टेक्नॉलॉजी मध्ये बरेचशे बदल होऊ लागले व या बदलांमुळे संगणकाशी संबंधित उद्योगात देखील बरीचशी वाढ झाली. जशी की दूरसंचार कंपन्यांनी वर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) म्हणजेच खाजगी नेटवर्क पुरवायला सुरुवात केली, त्यामुळे कंपन्यांना आपल्या कार्यालयामध्ये स्वतःचे सर्वर ठेवण्याची गरज राहिली नाही. आणि हे सर्व क्लाऊड कम्प्यूटिंग मुळे शक्य झाले.

यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणणाऱ्या बराचश्या गोष्टी त्या काळामध्ये कम्प्युटर सेक्टरमध्ये घडल्या होत्या. क्लाऊड कम्प्युटिंग म्हणजेच आपण संगणकावर करत असलेले काम हे आभासी पद्धतीने साठवून ठेवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म किंवा व्यवस्था आहे.


क्लाऊड कम्प्युटिंग चे प्रकार । Type of Cloud Computing in Marathi

क्लाऊड कम्प्युटिंग चे मुख्यतः चार प्रकारांमध्ये विभाजन केले जाते ते पुढील प्रमाणे पाहूया. 

  1. Private Cloud

या प्रकारच्या क्लाऊड मध्ये एखादी कंपनी किंवा संस्था Private Cloud Services चा वापर करते. ज्या कंपनी ला किंवा संस्थेला मोठ्या प्रमाणात सुरक्षितता आणि लवचिकता हवी असते अश्या कंपन्या Private Cloud चा वापर करणे योग्य समजतात. तसेच या प्रकारचे प्रायव्हेट क्लाऊड च्या किमती जास्त असतात. 

  1. Public Cloud

हे क्लाऊड इंटरनेट चा साहाय्याने थर्ड पार्टी सर्व्हिस प्रदात्याकडून चालविले जातात, जसे कि फेसबुक, गुगल, ऍमेझॉन, मायक्रोसॉफ्ट इत्यादी.. 

तसेच या पब्लिक क्लाऊड मध्ये वापरकर्त्याला सर्व्हर, स्टोरेज, आणि विविध सॉफ्टवेअर अश्या प्रकारच्या सुविधा इंटरनेट च्या साहाय्याने प्रदान केल्या जातात. या प्रकारच्या क्लाऊड इंफ्रास्ट्रक्चर मध्ये युजर्सला कोणतेही कंट्रोल भेटू शकत नाही व त्याचबरोबर वेबसाइट इन्फ्रास्ट्रक्चर देखील त्यांना बघता येत नाही. 

हे पण वाचाData Analytics म्हणजे काय? सविस्तर माहिती वाचा

  1. Community Cloud 

कम्युनिटी म्हणजेच समुदाय, हे क्लाऊड मल्टी टॅलेंट चा एक समुदाय आहे. या प्रकारच्या क्लाऊड चा अनेक कंपन्या किंवा संस्था याना ऍक्सेस दिलेला असतो आणि त्या सर्व प्रकारचा डेटा माहिती एकमेकांना शेअर करत असतात. 

  1. Hybrid Cloud

ज्यामध्ये दोन पेक्षा जास्त प्रकारच्या क्लाऊडचे एकत्रिकरण करून हायब्रीड क्लाऊड बनवले जातात. प्रायव्हेट, पब्लिक आणि कम्युनिटी या तिन्ही क्लाऊडला एकत्र करून हायब्रीड क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर हे बनविले जाते. मात्र हे सर्व क्लाऊड कम्बाईन करून एक ‘मल्टिपल डेव्हलपमेंट मॉडेल’ तयार करण्याचे काम करत असतात ज्यामुळे आपल्याला बराचसा फायदा होतो.


Cloud Computing Services in Marathi

क्लाऊड कम्प्यूटिंग हे काही महत्वाच्या सेवा प्रदान करते त्या सेवांबद्दल थोडक्यात मराठी माहिती खालील प्रमाणे पाहूया. 

  1. Infrastructure as a Service (IaaS)

या सर्विस च्या अंतर्गत कंपनी विशिष्ट स्टोरेज क्षमते सह आणि नेटवर्किंग व्यवस्थेसह स्वतः सर्वर खरेदी करतात. मात्र ही सेवा घेत असताना त्याबरोबर मिळालेल्या सुविधा मिळतील पण इतर कोणतीही सेवा त्यात तुम्ही घेऊ शकत नाही. यामुळे भांडवली चा खर्च कमी होऊन कंपन्यांना याचा फायदा होतो. 

  1. Platform as a Service (PaaS)

प्लॅटफॉर्म सर्विस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सेवेअंतर्गत देखील बऱ्याच कंपन्या विशिष्ट स्टोरिंग कॅपॅसिटी आणि नेटवर्किंग कॅपॅसिटी मध्ये स्वतःचे सर्वर हे खरेदी करत असतात. व त्याचबरोबर त्यांना विविध सॉफ्टवेअर एकमेकांना जोडणारे मिडल वेअर्स देखील उपलब्ध करून दिले जातात.

जसे की बिझनेस इंटेलिजन्स, स्टेटस मॅनेजमेंट यासह इतरही काही सेवा या उपलब्ध करून दिलेल्या असतात. तसेच या अंतर्गत कंपनी मध्ये वेळोवेळी होणारे बदल परीक्षण उपाय व्यवस्थापन या सेवा देखील उपलब्ध करून दिलेल्या असतात. 

  1. Software as a Service (SaaS)

ही क्लाऊड कम्प्युटिंग सेवा तंत्रज्ञानातील एक परिपूर्ण सर्व समाविष्ट सेवा आहे असे देखील आपल्याला सांगता येईल. आता उदाहरण द्यायचे झाले तर आपण इंटरनेट द्वारे ई-मेल पाठवण्यासाठी जीमेल किंवा याहू या सेवेचा वापर करतो. म्हणजेच एक प्रकारे आपण सॉफ्टवेअर सर्विस सेवेचा वापर करत असतो. 

आणखी माहिती वाचा – Big Data म्हणजे काय? सविस्तर माहिती


निष्कर्ष । Cloud Computing Information in Marathi

अश्या प्रकारे क्लाऊड कॉम्पुटिंग म्हणजे काय? या विषयाबद्दल संपूर्ण आणि विस्तृत माहिती जाणून घेतली आहे. आम्हाला आशा आहे कि वरील माहिती तुम्हाला नक्कीच समजली आणि आवडली असेल. 

तसेच वरील पोस्ट तुमच्या मित्रांना शेअर करा आणि या पोस्ट बद्दल तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर नक्की कंमेंट मध्ये विचार. 

धन्यवाद ! 

Leave a Reply

This Post Has 2 Comments

  1. ASHA

    VERY IMPORTANT INFORMATION I RECEIVED ABOUT CLOUD COMPUTING, THANKU SO MUCH