Big Data म्हणजे काय? | Big Data in Marathi

Big Data म्हणजे काय

नमस्कार मित्रांनो मागच्या पोस्ट मध्ये आपण आर्टिफिशिअल इंटेलिजेंस (AI) आणि डेटा अनॅलिटीक्स या बद्दल माहिती जाणून घेतली आहे, पण आता या दोन्ही चा एक महत्वाचा टप्पा म्हणजेच ‘बिग डेटा’ ह्या विषयाबद्दल मराठी मध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 

बऱ्याच वेळा बिग डेटा हा शब्द कानावर पडतो मात्र, त्याचा अर्थ नक्की काय, (Big Data Meaning in Marathi) किंवा त्याचा वापर कोठे, कधी व कोण कोणत्या क्षेत्रांमध्ये केला जातो हि सर्व माहिती आपल्याला ठाऊक नसते.

म्हणूनच आजच्या या पोस्ट मध्ये आपण Big Data म्हणजे काय? याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. 

बिग डेटा म्हणजे काय | Big Data in Marathi

बिग डेटा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान याचा वापर करून अतिशय वेगवान पद्धतीने होणाऱ्या माहिती च्या आदान प्रदानातून मोठ्या प्रमाणामध्ये तयार होणारा डिजिटल डेटा होय. जगभरामध्ये दिवसाला २.५ क्विंटीलियन डेटा तयार होत असतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आज संपूर्ण जगभरामध्ये तयार झालेला ९०% डेटा हा मागील दोन वर्षांमध्ये तयार झालेला आहे. 

अब्जावधी पेक्षा जास्त फोन्स, सेन्सर्स, सोशल मीडिया पोस्ट, संकेत स्थळे म्हणजेच गुगल मॅप, डिजिटल इमेजेस, GIF म्हणजेच चलचित्र त्यानंतर व्हिडिओ कॉल्स, कॉन्फरन्सेस, ई-मेल, जीपीएस आणि आयओटी म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT) या सर्वांवर आधारित उपकरणे निर्मितीची मुख्य स्त्रोत्र आहेत.

यासाठीच असंख्य तंत्र व प्रचंड वेगाने काम करणारी अशी शक्तिशाली संगणक प्रणाली म्हणजे सॉफ्टवेअर यांच्या मदतीने बिग डेटा चे अनॅलिसिस केले जात असते. व त्याच्या आधारे अचूक असे अनुमान बांधले जातात. याच्याच मदतीने युजर्स चा इंटरेस्ट म्हणजेच त्यांचे सजेशन्स हे मॅनेज केले जातात, म्हणजेच तुम्ही गुगलवर शोधल्या जाणाऱ्या सर्च आयटमचा अभ्यास करून त्याच्या आधारे तुम्हाला ऍड्स दाखविल्या जातात. 

फेसबुक वर तुम्ही शेअर केलेल्या पोस्ट तशाच लाईकचा अभ्यास करून तुम्हाला उत्पादनेही दाखवली जातात. ॲमेझॉन वर म्हणजेच किंडल वर तुमची वाचण्याची आवड लक्षात घेऊन तुम्हाला पुस्तके ही रेकमेंड केली जातात. ईबे वर तुम्ही नवीन कोणती वस्तू विकत घेऊ शकता हे देखील दर्शविले जाते.

आणखी माहिती वाचा Cryptocurrency बद्दल सविस्तर माहिती


बिग डेटा चा वापर | Uses of Big Data in Marathi

जसे की आपण पाहिले की बिग डेटा चा उपयोग हा गुगल, ॲमेझॉन, फेसबुक, ईबे, फ्लिपकार्ट अशा कंपन्यांना होऊ शकतो तर स्थानिक प्रशासनाला किंवा स्थानिक बिजनेस ला देखील याचा उपयोग नक्कीच होत असतो. जगातील बरीचशी प्रशासणे यासाठी Data Scientist नियुक्त करत आहेत. 

BIG DATA याचे पृथक्करण आणि विश्लेषण यात मोठी गुंतवणूक करत आहेत. प्राप्त माहितीनुसार संगणकीय प्रणालींच्या आधारावर नागरिकांच्या गरजा तसेच आवडीनिवडी व त्यांचे सामाजिक कल, त्यांची मते याचा अभ्यास करून युजर्सला हवे ते प्रॉडक्ट पुरविणे हे देखील होऊ शकते.

बिग डेटा बद्दल संपूर्ण माहिती

तसेच नाशिक सारख्या शहरांमध्ये देखील कुंभमेळ्या दरम्यान प्रशासनाने बिग डेटा चा वापर करून गर्दी यासारख्या समस्यांना पूर्णपणे आळा घातला आहे. तसेच भाविकांच्या अन्न, पाणी, सुरक्षा तसेच वाहतूक व त्यांची योग्य काळजी घेतली गेली आहे.  


बिग डेटाचे येत्या काळातील महत्व । Future Importance of Big Data

बिग डेटा चे महत्त्व येत्या काळामध्ये नक्कीच वाढत आहे, अलीकडच्या काळामध्ये “माहिती म्हणजे पैसे” असे म्हटले जायचे. म्हणजे ज्याच्याकडे उपयुक्त माहिती असेल तोच भविष्यात श्रीमंत होणार असा त्याचा अर्थ व्हायचा. मात्र नुसती माहिती असून उपयोग नाही तर त्या माहितीचा वापर करून त्यातून निर्णय व्यवसायांसाठी लागणारे थेट निष्कर्ष काढता येणे फार महत्त्वाचे आहे.

भारतामध्ये देखील आतापर्यंत हवामानाविषयीची उपयुक्त माहिती ही वेगवेगळ्या पद्धतीने गोळा करून पुढच्या वर्षी मान्सून कितपत फलदायी ठरेल, तसेच त्याचे अंदाज हे शक्य तितक्या अचूकपणे काढू शकतो याची क्षमता बिग डेटा मध्ये घेतली जाते. व यावरूनच आपल्या आयुष्याशी संबंधित अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार आहे हे उघडच आहे. 

व याच तंत्रज्ञानामध्ये ज्यांना माहिती असेल तशाच लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे. तंत्रज्ञानाची वैशिष्ट्य म्हणजेच माहितीचे नियोजन करण्यात ती प्रोसेस करणे विश्लेषण करून त्यातून योग्य निष्कर्ष प्राप्त करणे हेच. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की फक्त तांत्रिकिकरण नसून तर बुद्धीचा वापर देखील करावा लागतो.

हे पण वाचा – बिटकॉइन आहे तरी काय? संपूर्ण माहिती


बिग डेटा अनॅलिसिस कसे केले जाते । How Big Data is Analyzed

मोठं मोठे डेटा सायंटिस्ट प्रोडक्टिव्ह मॉडलर्स आणि प्रशिक्षित शास्त्रज्ञ तसेच कन्वेंशनल बी आय आणि ऍनॅलिटीक्स प्रोग्राम यांच्याद्वारे साठवलेला डेटा हा प्रक्रिया करून एकत्र करून साफ करून ह्या डेटा चे विश्लेषण केले जाते.

बिग डेटा अनॅलिसिस करताना पहिल्यांदा विविध सोर्सेस कडून हा डेटा संकलित म्हणजेच एकत्र केला जातो. बऱ्याचदा स्ट्रक्चर्ड आणि अनस्ट्रक्चर्ड डेटा हा एकत्र स्टोअर केलेला असतो, यामध्ये वेगवेगळे ऑर्गनायझेशन हे वेगवेगळे डेटा सोर्स  वापरतात. 

व त्यामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे डेटा सोर्स म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्ज त्यानंतर वेब सर्वर लॉग्स, क्लाऊड ॲप्लिकेशन्स, मोबाईल ॲप्लिकेशन्स, सोशल मीडिया कन्टेन्ट, कस्टमर ई-मेल तसेच सर्व रिस्पॉन्सेस फोन रेकॉर्ड, मशीन डेटा, Capture Connected to IOT साठवलेला डेटा हा प्रोसेस केला जातो व त्यानंतर तो डेटा विविध भागांमध्ये स्टोअर केला जातो. डेटा प्रोफेशनल हे विश्लेषणात्मक प्रश्नांसाठी हा डेटा व्यवस्थापित तसेच कॉन्फिगर आणि वेगळा करतात.

त्यानंतर या डेटाच्या Quality मध्ये सुधारणा केली जाते म्हणजेच Data Quality मध्ये सुधारणा केली जाते. डेटा प्रोफेशनल हे स्क्रबिंग टूल्स किंवा डेटा क्वालिटी सॉफ्टवेअर वापरून हा डेटा स्क्रब करतात, नंतर ते या डेटा मध्ये त्रुटी, प्रॉब्लेम शोधतात जसे की डुबलीकेशन्स, फॉरमॅटिंग मिस्टेक आणि ऑर्गनायझेशन. यानंतर साठवलेला डेटा हा प्रोसेस क्लीन करून त्या डेटामधून निष्कर्ष काढले जातात. 

ह्या पूर्ण कार्यामध्ये Data Mining Predictive Analytics, Machine Learning, Deep Learning, Text Mining, Artificial Intelligence, Mainstream business intelligence software, या सर्वांचा वापर केला जातो.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

बिग डेटा म्हणजे नक्की काय?

बिग डेटा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान याचा वापर करून अतिशय वेगवान पद्धतीने होणाऱ्या माहिती च्या आदान प्रदानातून मोठ्या प्रमाणामध्ये तयार होणारा डेटा किंवा डेटा संचयित करण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी आणि व्यवस्थापन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा संच म्हणजे बिग डेटा होय. 

बिग डेटा चा वापर कोठे कोठे करण्यात येतो?

Banking and Securities.
Communications, Media and Entertainment.
Healthcare Providers.
Environmental Protection
Education.
Government.
Insurance.
Retail and Wholesale Trade.

निष्कर्ष । Big Data Information in Marathi

अश्या प्रकारे आपण या पोस्ट मध्ये Big Data म्हणजे काय? याबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे. तरी तुमच्या या पोस्ट बद्दल काही सूचना असतील किंवा प्रश्न असतील तर नक्की कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. 

तसेच तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर सुद्धा करा. 

धन्यवाद!

Leave a Reply