Cryptocurrency म्हणजे काय? | Cryptocurrency Meaning in Marathi

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय

आपण दररोज बिटकोईन्स, डॉज कोईन्स (Dodge Coins) यांच्याविषयी सध्या ऐकत आहोत कारण भारतात क्रिप्टोकरन्सीला परवानगी द्यावी की नाही याविषयी अजूनही संभ्रम सुरू आहे, आणि त्यासोबत Elon Musk सारखे मोठे Investor आणि Innovators डॉज कोईन्स सारख्या क्रिप्टो करन्सीला सपोर्ट करत आहेत. आता हि Cryptocurrency म्हणजे काय? याबद्दल संपूर्ण माहिती आज या लेखामधून पाहूया. 

आपल्याही मनात या क्रिप्टो विषयी शंका असतीलच जसे कि, क्रिप्टोकरन्सी भारतात लीगल आहे का? (Cryptocurrency in Marathi) क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे आहे का? तसेच क्रिप्टोकरन्सी मधून किती नफा मिळू शकतो? असे इतरहि खूप प्रश्न असतील तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही या लेखाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो आहोत.

Cryptocurrency म्हणजे काय? | Cryptocurrency Meaning in Marathi

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर क्रिप्टोकरन्सी ही एक प्रकारची डिजिटल करन्सी आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या बँक खात्यातील पैसे न हाताळता, ऑनलाईन UPI च्या माध्यमातून पैशांचे Transaction करतो. अगदी त्याच प्रमाणे क्रिप्टोकरन्सी हि पूर्णपणे आभासी असते, आपण तिला फिजिकली हाताळू शकत नाही. 

आपल्या UPI मधून पैसे आपण एकमेकांना पाठवतो मात्र ते पैसे एका ठिकाणी बँकेत साठविलेले असतात. अगदी त्याचप्रमाणे आपण खरेदी केलेल्या क्रिप्टोकरन्सी या एका ठिकाणी म्हणजेच Crypto Wallets किंवा Crypto Exchange च्या Wallets मध्ये साठविलेले असतात. हे Wallets म्हणजे आपले क्रिप्टो चे बँकेत असलेले एक अकाउंट असा संदर्भ घेऊ शकतो.

म्हणजे इथून पुढे आपल्याकडून होणारे सर्व क्रिप्टो व्यवहार याच खात्याच्या माध्यमातून म्हणजे क्रिप्टो वालेट्स च्या माध्यमातून होतील. आपल्या बँकेच्या खात्याला जशी सुरक्षितता असते त्याचप्रमाणे आपल्या Crypto Wallets ला देखील सुरक्षितता असते.

>> हे पण वाचा – NFT म्हणजे काय?


क्रिप्टोकरन्सीचे फायदे | Benefits of Cryptocurrency in Marathi

आपण क्रिप्टोकरन्सी चे सर्व फायदे हे मुद्द्यां च्या साहाय्याने जाणून घेऊयात जेणेकरून ते लवकर समजतील.

  • Crypto Currency मध्ये आपण गुंतवणूक म्हणून पैसे टाकू शकतो. क्रिप्टो हे कमी आणि लिमिटेड प्रमाणात लाँच केले जातात आणि त्यामुळेच यात जसे गुंतवणूक करणारे वाढतात तशी याची किंमत वाढत जाते. 
  • स्पष्ट सांगायचे झाले तर आपले बँक व्यवहार हे डीप वेब मध्ये होतात तर क्रिप्टो व्यवहार हे सर्व डार्क वेब मध्ये होत असतात. यावरून हे लक्षात येते की क्रिप्टो मधील व्यवहार हे पूर्णपणे Anonymous असतात. त्यामुळे हे व्यवहार सर्वसामान्य डिजिटल व्यवहारांपेक्षा खूप जास्त सुरक्षित असतात.
  • क्रिप्टो मध्ये काही काळापूर्वी फक्त डॉलर्स मध्ये गुंतवणूक करता येत होती. मात्र आता भारतात Wazirx, CoinSwitch सारख्या एक्सचेंज मुळे आता भारतीय रुपयांमध्ये देखील गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. 
  • आपल्याला शेअर मार्केट मध्ये थोडीफार भीती वाटत असेल तर तुम्ही क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करू शकता, कारण इथे तुम्ही थोडा अभ्यास केला किंवा नाही केला मात्र तुमचे नशीब आणि निवडलेला कॉइन चांगला असेल तर वर्षभरात तुमचे पैसे नक्कीच डबल होतील.
  • आपण फक्त 100 रुपयांपासून क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करू शकतो, म्हणजे शेअर सारखे तुम्हाला एक पूर्ण शेअर घ्यावा लागत नाही तर तुम्ही 100 रुपयांमध्ये बिटकोईन सारख्या मोठ्या क्रिप्टोचा जेवढा भाग येतो तो घेऊ शकता.

>> हे पण वाचा – Share Market म्हणजे काय?


जगातील टॉप क्रिप्टोकरन्सी | Top Cryptocurrencies in the World

जगात बिटकोईन म्हणजे क्रिप्टोकरन्सी असे म्हटल्या जाते पण या व्यतिरिक्त सुद्धा अनेक चांगल्या आणि रिटर्न देणाऱ्या क्रिप्टोकरन्सी बाजारात उपलब्ध आहेत.  

world top cyrptocurrency marathi

Bitcoin | BTC

बिटकोईन क्रिप्टो करन्सी जगभरात प्रथम क्रमांकाची आहे, याच क्रिप्टो करन्सी ने जगाला क्रिप्टो विषयी ओळख करून दिली. आज कोणाला क्रिप्टोकरन्सी हे नाव माहिती नसले तरी देखील त्याला बिटकोईन हे नाव नक्कीच माहित असते.

बिटकोईन चे संस्थापक हे संतोषी नाकामोटो हे आहेत असे सांगितले जाते मात्र याविषयी अजून स्पष्टता नाहीये.

Ethereum | ETH

व्हिटॅलिक बुटरीन (Vitalik Buterin) यांनी ETHEREUM ही क्रिप्टो करन्सी सुरू केली, ETHEREUM च्या टोकन कोईनला Ether म्हणून ओळखले जाते. बिटकोईन नंतर जगभरात दुसऱ्या क्रमांकाची लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी म्हणून Ethereum ला ओळख निर्माण झालेली आहे.

Dogecoin | DOGE

एक विनोद म्हणून सुरू झालेली क्रिप्टोकरन्सी अनेकांना श्रीमंत बनवून गेली. बिटकोईन आणि कुत्रा यांची तुलना करण्यासाठी DOGECOIN सुरू करण्यात आले. मात्र एलोन मस्क सारख्या मोठ्या इनोव्हेटर्स ने त्याविषयी ट्विट्स करत त्याला सपोर्ट करत याची किंमत 1 पैशावरून 60 रुपयांपर्यंत गेली. 

>> आणखी माहिती वाचाम्युच्युअल फंड म्हणजे काय? संपूर्ण माहिती वाचा

याशिवाय अनेक चांगल्या क्रिप्टो करन्सी आहेत त्यांची लिस्ट खाली दिलेली आहे. 

  1. Shiba Inu | SHIB
  2. Matic Network
  3. Cardano | ADA
  4. Polkadot | DOT
  5. Dash | DASH
  6. WazirX | WRX
  7. Tether USD | USDT
  8.  Dent | DENT
  9. Litecoin | LTC

नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

1. क्रिप्टोकरन्सी कसे कार्य करते?

क्रिप्टोकरन्सी हि एक क्रिप्टोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेली एक डिजिटल करन्सी आहे. हि करन्सी पूर्णपणे आभासी आहे, त्यामुळेच आपण या करन्सी ला फिसिकली हाताळू शकत नाही.

क्रिप्टोकरन्सी मध्ये होणारे सर्व खरेदी आणि विक्री चे व्यवहार हे सुरक्षित असतात, कारण सर्व क्रिप्टो व्यवहार हे क्रिप्टो वॉल्लेट्स च्या माध्यमातून होतात. आणि ज्या प्रमाणे आपल्या बँक खात्याला जशी सुरक्षितता असते तशीच या वॉल्लेट्स ला सुरक्षितता असते.


निष्कर्ष | क्रिप्टोकरन्सी विषयी मराठी माहिती

Cryptocurrency Guide यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भारतात अनेक Crypto Exchanges काम करत आहेत, त्यावर अकाउंट ओपन करून तुम्ही क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करू शकता आणि पैसे कमवू शकता. 

तसेच Cryptocurrency हा विषय तसा एका लेखातून समजून घेण्यासारखा नाही. मात्र तरी देखील क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? (Cryptocurrency Information in Marathi) या विषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला Cryptocurrency बद्दल माहिती समजली असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा लेख शेअर करा. 

धन्यवाद !!

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. ganesh

    chaan