बिटकॉइन म्हणजे काय? | What is Bitcoin in Marathi

बिटकॉइन म्हणजे काय

जसजसं हे एकविसावं शतक उलगडत गेलं, तसे टेक्नॉलॉजी सुद्धा बहरत गेली, वाढत गेली, आणि अजूनही त्यात वाढ होतच आहे. या शतकात मोबाईल आले त्यानंतर स्क्रीन टच मोबाईल आले, त्याचबरोबर इंटरनेटचं जाळं सर्वत्र पसरलं. आणि यामुळेच विविध विषयांच्या माहितीची देवाण-घेवाण माणसांना करता येऊ लागली.

आजच्या या एकवीसाव्या शतकामध्ये सर्वांनाच श्रीमंत व्हायचे आहे. यासाठी सर्वच जण प्रयत्न करत असतात कोणी सेविंग करतो, तर कोणी प्रॉपर्टी विकत घेत असतो, त्याचप्रमाणे काही लोक गुंतवणूक करून देखील करत असतात पण हीच गुंतवणूक करायची म्हटली तर कुठे करायची कशी करायची याबद्दल खूप लोकांना माहिती नसते तर चला बिटकॉइन म्हणजे काय? याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. 

मागील पोस्ट मध्ये आपण शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि क्रिप्टोकरन्सी या तीन लेखाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतलीच आहे, पण आजच्या पोस्ट मध्ये आपण बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सी बद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत.

बिटकॉइन म्हणजे काय? | What is Bitcoin in Marathi 

बिटकॉइन ला आभासी चलन (Virtual Currency) किंवा डिजिटल करंसी (Digital Currency) असे संबोधले जाते हि एक लोकप्रिय क्रिप्टो करंसी आहे. बिटकॉइन हि एक अशी डिजिटल करंसी आहे ज्याला तुम्ही हाताने स्पर्श करू शकत नाही किंवा उघड्या डोळ्यांनी बघू देखील शकत नाही. ते फक्त इंटरनेटवर ऑनलाइन स्टोअर किंवा रजिस्टर होते.

2008 साली Bitcoin.Org हे डोमेन इंटरनेटवर रजिस्टर झाले होते. पण याचा नेमका आविष्कार कोणी केला हे आजपर्यंत कोणाला सुद्धा माहिती नाही. यानंतर सातोषी नाकामोटो यांच्या नावाने कोणीतरी एक डॉक्युमेंट देखील प्रस्थापित केले होते, ज्यामध्ये लिहिले होते कि बिटकॉइन हे एक इलेक्ट्रॉनिक चलन असून याचा वापर सर्व आर्थिक व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला कोणत्याही देशाच्या परवानगीची गरज नाही.

बिटकॉइन हे एक Decentralized Currency आहे, याचा अर्थ असा की या चलनावर कोणाचाही ताबा नाही. मित्रांनो आपण जे काही व्यवहार करतो, त्याच्यावर बँकांचा कंट्रोल असतो आणि या सर्व बँकांवरती रिझर्व बँक ऑफ इंडिया चा कंट्रोल असतो. परंतु बिटकॉइन वर कोणाचाही कंट्रोल नाही. आजच्या घडीला जगामध्ये शेकडो Cryptocurrency उपलब्ध आहेत.

बिटकॉइन बद्दल संपूर्ण माहिती

जसे की Ethereum, Litecoin, Dogecoin, Ripple, Libra, Ethereum, Cardano, Stellar इत्यादी.


बिटकॉइन बद्दल आश्चर्यकारक माहिती | Bitcoin Information in Marathi

मित्रांनो बिटकॉइन ही बऱ्याच वेळे पासून नेहमी विवादित असलेली प्रसिद्ध क्रिप्टोकरेंसी आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल जानेवारी 2010 मध्ये एका बिटकॉइन ची किंमत पाच ते सहा रुपये होती पण आता 2022 च्या जानेवारीपर्यंत एका बिटकॉइन ची किंमत तब्बल 25 ते 30 लाख रुपये आहे.

 बिटकॉइन ची किंमत

एवढेच नाही तर मित्रांनो या बिटकॉइन ची किंमत तब्बल पन्नास लाख रुपये, इथपर्यंत देखील पोहोचली होती. या गोष्टीवर बऱ्याच लोकांचा विश्वास बसणार नाही पण हि गोष्ट 100% खरी असून, तुम्ही Google वर स्वतः चेक देखील करू शकता. 

>> आणखी माहिती वाचा – स्टॉक मार्केट बद्दल सविस्तर माहिती


बिटकॉइन कसे चालते | How Works Bitcoin in Marathi

मित्रांनो बिटकॉइन हे एका विशिष्ट पद्धतीने काम करते यालाच Peer to Peer नेटवर्क असेदेखील म्हणतात. यामध्ये फक्त दोन व्यक्तीच असतात. त्यातील एक सेंड करणारी आणि दुसरी रिसिव्ह करणारी असते. बिटकॉइन Send करणार्‍याकडे आणि रिसिव्ह करणाऱ्याकडे स्वतःचा एक Unique Address असतो. आणि याद्वारेच त्यांचा व्यवहार शक्य होऊ शकतो. बिटकॉइन Access करण्यासाठी युजर कडे स्वतःची Private key सुद्धा असते.

बिटकॉइन चा व्यवहार तपासून पाहण्याचे काम Miners करत असतात. हे Miners हाय पॉवर चे संगणक वापरून मॅथेमॅटिकल अल्गोरिदम सोडवतात, ही मायनिंग ची प्रक्रिया काही सेकंदताच पूर्ण होते, आणि याचा रिवॉर्ड म्हणून मायनर्स ला एक बिटकॉइन दिला जातो. 

बिटकॉइन चे सर्व रेकॉर्ड ऑनलाईन ब्लॉक मध्ये स्टोअर केले जातात एकदा का हे ब्लॉक फुल्ल झाले, त्यानंतर वेगळे ब्लॉक तयार करून ही प्रक्रिया तशीच चालू राहते, यालाच  Blockchain System असे म्हटले जाते.


बिटकॉइन मधून पैसे कसे कमावू शकतो 

मित्रांनो बिटकॉइन ची वाढती किंमत लक्षात घेऊन गुंतवणूकदार शेअर मार्केट प्रमाणेच बिटकॉइन खरेदी करतात व योग्य किंमत भेटल्यानंतर विकून टाकतात. तुमचा बँकेचा एटीएम पिन किंवा यु पी आय पिन (UPI PIN) जर हरवला तर तो पण बँकेत जाऊन रिकव्हर करू शकतो पण बीटकॉइनच्या बाबतीमध्ये तसे नाही. 

जर का तुमची दिलेली Private Key हरवली तर तुम्ही स्वतः विकत घेतलेले बिटकॉइन ॲक्सेस करू शकत नाही. बिटकॉइन वर कोणाचाच कंट्रोल नसल्यामुळे तुम्ही याचा पिन रिकव्हर देखील करू शकत नाही. 

म्हणूनच आजच्या घडीला Private Key हरवल्यामुळे जवळपास 25 टक्के बिटकॉइन हे हरवले आहेत. तज्ञांच्या सल्ल्यानुसार बिटकॉइन चे व्यवहार करण्याअगोदर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

>> हे पण वाचा – मेटावर्स म्हणजे काय? संपूर्ण माहिती


बिटकॉइन मध्ये गुंतवणूक कशी करावी

तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आता प्रश्न पडला असेल की बिटकॉइन सारख्या क्रिप्टो करेंसी मध्ये गुंतवणूक कशी करावी?

मित्रांनो यासाठी तुम्ही विविध Applications किंवा ऑनलाईन वेबसाईटचा देखील उपयोग करू शकता. Wazirx, Coinswitch अँप द्वारे तुम्ही 75 पेक्षा जास्त क्रिप्टो करेंसी मध्ये गुंतवणूक करू शकता. 

त्याचबरोबर CoinDCX हे एप्लीकेशन देखील बिटकॉइन व इतर क्रिप्टो करेंसी मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उत्तम मानले जाते. भारतामध्ये एक करोड पेक्षा अधिक लोक क्रिप्टो करेंसी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी या Application चा वापर करतात.

हे Application ओपन केल्यानंतर तुमची KYC केली जाते, त्यानंतर तुम्ही स्टेप-बाय-स्टेप बिटकॉइन खरेदी करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन केले जाते. त्याच बरोबर शेअर मार्केटमध्ये जशी तुम्ही स्टॉक लिमिट लावू शकता तशीच इथे देखील स्टॉक लिमिट लावता येते. 

तरीसुद्धा जर तुम्हाला कुठे अडचण आली तर तुम्ही यांच्या कस्टमर केअरला कॉल करून मदत मिळवू शकता. या एप्लीकेशन द्वारे तुम्ही इन्स्टंट पेमेंट डिपॉझिट किंवा विड्रॉल (Withdrawal) देखील करू शकता.


भारतामध्ये बिटकॉईन बद्दल कोर्टाचे निर्णय

एप्रिल 2018 साली रिझर्व बँक ऑफ इंडियाने क्रिप्टो करेंसी च्या ट्रेडिंग वर सरसकट बंदी आणली होती. पण या गोष्टीवर इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने नाराजी व्यक्त करत, सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली.

ज्यामध्ये भारताने देखील इतर देशांप्रमाणे क्रिप्टो करेंसी च्या ट्रेडिंग ला परवानगी द्यावी, त्याचबरोबर इतर अनेक देशांमध्ये क्रिप्टो करेंसी ही Legal मानली गेली आहे. त्याचबरोबर अनेक देश हे स्वतःची क्रिप्टो करन्सी लॉन्च करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. 

त्यामुळे भारताने देखील या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, क्रिप्टो करेंसीच्या ट्रेडिंग ला परवानगी द्यावी, आणि याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावण्यात आला व भारतामध्ये क्रिप्टो करेंसी च्या ट्रेडिंग ला परवानगी देण्यात आली.  म्हणजेच आता भारतातील कोणतीही व्यक्ती आता क्रिप्टो करेंसी मध्ये Legally इन्वेस्टमेंट करू शकते. 


निष्कर्ष | Bitcoin Information in Marathi 

तर मित्रांनो बिटकॉइन म्हणजे काय? What is Bitcoin in  Marathi या आजच्या लेखामध्ये आपण बिटकॉइन बद्दल सर्व माहिती जाणून घेतली. 

तर बिटकॉइन चा योग्य तो अभ्यास करून तुम्ही सुद्धा यामध्ये गुंतवणूक करू शकता. Bitcoin मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा. जर तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. 

धन्यवाद!

Leave a Reply