मेटावर्स म्हणजे काय? | What is Metaverse in Marathi

मेटावर्स म्हणजे काय

भविष्यात तुमच्या डोळ्यांवर एक चष्मा किंवा उपकरण लावून तुम्ही सध्या जे काही करता, मग ते एखाद्या ठिकाणी फिरायला जाने असो किंवा एखाद्या नातेवाईकाला किंवा मित्राला भेटणे असो की शॉपिंग करणे असो ते जर एका खोलीत बसून करता आले तर? थोडंस विचित्र आणि अशक्य वाटतय ना? परंतु आता ही गोष्ट भविष्यात येणाऱ्या मेटावर्स या तंत्रज्ञानाने शक्य होणार आहे.

आज काल युट्युब, गुगल, फेसबुक आणि इतरहि ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर सोशल मीडिया वर मेटॉवर्स या तत्रंज्ञानाची खूप चर्चा सुरु आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्या साठी मेटावर्स म्हणजे काय? आणि मेटाव्हर्स बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. 

चला तर पाहूया…

मेटावर्स म्हणजे काय? | What is Metaverse in Marathi

Meta हा एक ग्रीक शब्द आहे, आणि या शब्दाचा अर्थ च्या पलीकडे असा होतो. तसेच वर्स या शब्दाचा अर्थ संपूर्ण जग, विश्व असा होतो. आणि या दोन शब्दांना मिळवून मेटावर्स शब्द तयार होतो आणि याचा अर्थ आपल्या कल्पनेच्या पलीकडचे जग, विश्व असा होतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपल्या विश्वासारखेच एक आभासी विश्व होय. 

Metaverse Technology मध्ये आपल्या विश्वा प्रमाणेच एक Artificial विश्व असेल, या या विश्वामध्ये सर्व काही काल्पनिक परंतु सत्य भासणारे असेल. आपण सध्या जे इंटरनेट वापरतो ते देखील एक वेगळे विश्व आहे आणि आपण मोबाईल किंवा कॉम्प्युटर च्या सहाय्याने हे विश्व अनुभवतो आहे. मात्र आपण जे इंटरनेट वापरतो ते द्विमितीय (2D) आहे. 

पण Metaverse हे एक त्रिमितीय 3D विश्व होय. यामध्ये तुम्हाला सर्व काही तुम्ही तिथे असताना घडते आहे असे भासेल मात्र त्यावेळी तुम्ही तुमच्या घरी किंवा एखाद्या ठिकाणी बसून त्याचा अनुभव घेत असाल. 


मेटावर्सचा इतिहास – History of Metaverse in Marathi

मेटावर्स विषयी संपूर्ण माहिती

मेटाव्हर्स या शब्दाचा उल्लेख नील स्टीफनसन यांनी लिहिलेल्या स्नो क्रॅश नावाच्या काल्पनिक कादंबरी आढळतो. सध्या काही काळापूर्वी आपल्याकडे जशी लॉकडाऊनची स्थिती होती, आपण सर्व घरात होतो आणि कोणीही बाहेर फिरू शकत नव्हतं. जवळपास अशीच एक स्थिती त्या पुस्तकात सांगितलेली आहे. अशा स्थितीत लोक घरात बसून सगळं काही काल्पनिक म्हणजेच व्हर्च्युअल रित्या अनुभवत होते. तेव्हा त्या विश्वाला निल यांनी मेटावर्स असे म्हटले होते.

2003 साली “सेकंड लाईफ” नावाने एक कॉम्पुटर गेम लाँच झाला होता, त्यामध्ये आपण आपले एक वेगळे विश्व बनवू शकत होतो, हे देखील एक मेटावर्स होते. त्यानंतर अनेक कंपन्यांनी मेटावर्स बनविण्याचा प्रयत्न केला पण मात्र तितके यश आले नाही. 

काही काळापूर्वी मेटावर्स या नावाचा संबंध फेसबुक सोबत आला, फेसबुकने त्यांच्या पॅरेंट कंपनीचे नाव मेटा असे ठेवले. फेसबुकने हे देखील जाहीर केले की पुढे येणाऱ्या काळात ते मेटावर्सला अवलंबून घेणार आहेत.

>> हे पण वाचा – IPO नक्की काय आहे? आणि IPO बद्दल विस्तृत माहिती


मेटावर्स कसे निर्माण होते? – How does Metaverse get created in Marathi?

अनेक वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून मेटावर्स बनविण्याचे काम केले जात आहे. त्या प्रत्येक तंत्रज्ञानाची थोडक्यात ओळख करून घेऊयात.

Virtual Reality

हे तंत्रज्ञान सध्या बाजारात उपलब्ध आहे आणि हे यशस्वी देखील आहे. एक मोठा हेडसेट डोक्याला आणि डोळ्यांना लावून तुम्ही VR चा आनंद घेऊ शकता. परंतु हे वजनी असल्याने याला आपण जास्तवेळ वापरू शकत नाही. अनेक लोकांनी हे वापरून सांगितले आहे की जास्त वापराने मोशन सिकनेस जाणवतो. 

सध्या आपण VR मधून ज्या गोष्टींचा आनंद घेतो आहे ते सर्व तितक्या चांगल्या लेव्हलचे नाहीये. अनेक VR गेम्स आलेले आहेत मात्र त्यातील ग्राफिक्स आपल्याला खऱ्या विश्वाचा आनंद देत नाही. आता आपण जे VR हेडसेट बघतोय त्यांची साईझ मोठी आहे मात्र पुढे तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीनुसार यात बदल होत यांची साईझ आणि VR क्वालिटी सुधारेल असे वाटते.

Augmented Reality 

Augmented Reality चा अर्थ असा होतो की आपल्या खऱ्या विश्वासोबत काही काल्पनिक पात्र देखील जोडले जातील. Pokemon Go सारखे स्मार्टफोन म्हणजे AR चे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे आपले खरे विश्व आहे आणि त्यात आपण एखादी आर्टिफिशिअल गोष्ट ऍड करतो आहे. समोर मोकळ्या मैदानात 3D सिंह, वाघ उभे करता येतात हे तुम्ही गुगल वर बघितले असेलच. हे आपल्याला AR मुळेच शक्य झाले आहे.

NFT | Non Fungible Token

आपल्याला जेव्हा एखादी प्रॉपर्टी मेटावर्सच्या माध्यमातून खरेदी करायची असेल तेव्हा NFT म्हणजेच Non Fungible Token वापरले जाईल. NFT हे एक प्रकारे डिजिटल टोकन असेल त्यावरून आपण एखाद्या प्रॉपर्टीची मालकी जाणून घेऊ शकतो. NFT सध्या डिजिटल आर्टस् ला मालकी दाखविण्यासाठी वापरली जाते. हे डिजिटल आर्ट सध्या सेल देखील होत आहेत. याच NFT बद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर आमच्या पोस्ट ला भेट द्या.

5G Technology

आपल्याला जेव्हा मेटावर्स चा आनंद घ्यायचा आहे तेव्हा एक चांगल्या वेगाने आपला डेटा पाठविणे आणि रिसिव्ह करणे यासाठी फास्ट इंटरनेट कनेक्शन गरजेचे असेल. 

Blockchain Technology

जेव्हा कधी मेटावर्स या गोष्टीची चर्चा केली जाते तेव्हा ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सी या दोघाचे नाव नक्कीच समोर येते. आता यात NFT चा देखील समावेश झालेला आहे. मेटावर्स मध्ये आपण खरेदी विक्री चे व्यवहार करता येणार आहेत. तेव्हा आपल्याला जे चलन लागणार आहे ते डिजिटल चलन असेल आणि परिणामतः आपल्याला क्रिप्टो कडे जावेच लागणार आहे. 

हे सर्व घडत असताना आपल्यासोबत हॅकर्स फ्रॉड करू शकतील ही देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मेटावर्स मध्ये सिक्युरिटी साठी ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान नक्कीच सर्वात जास्त उपयुक्त ठरणार आहे.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

  1. मेटावर्स चा अर्थ काय आहे?

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास Metaverse हे एक डिजिटल आर्टिफिशिअल, वर्चुअल विश्व आहे ज्यामध्ये सर्व काही काल्पनिक परंतु सत्य भासणारे असेल.


निष्कर्ष | Metaverse Full Information in Marathi

अश्या प्रकारे वरील सर्व तंत्रज्ञानाचा एकत्रितपणे वापर करून मेटावर्स हे तत्रंज्ञान तयार केले जाईल. मात्र याला भरपूर वेळ लागणार आहे.

वरील प्रमाणे Metaverse म्हणजे काय? (What is the Meaning of Metaverse in Marathi) व मेटाव्हर्स बद्दल संपूर्ण आणि उपयोगी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, नक्कीच तुम्हाला वरील माहिती आवडेल. 

तसेच तुम्हाला Metaverse काय आहे हे समजले असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. त्यांना सुद्धा मेटॉवर्स बद्दल माहिती मिळेल. 

🙏धन्यवाद !🙏

Leave a Reply