NFT म्हणजे काय? What is NFT in Marathi

NFT म्हणजे काय

NFT काय आहे याविषयी आता अनेक लोकांना जाणून घ्यायचे आहे कारण आता सध्या नवीन ट्रेंड मध्ये NFT हे नाव वारंवार येत आहे. काही काळापूर्वी एक डिजीटल आर्ट NFT च्या माध्यमातून करोडो रुपयांमध्ये विकली गेली आहे. डिजिटल आर्ट क्षेत्रात आता खूप मोठी क्रांती NFT मुळे सुरू होते आहे. अनेकांना आता यात भरपूर पैसे मिळण्याची शाश्वती दिसून येते आहे. त्यामुळे आता NFT विषयी लोकांना जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होत आहे. 

आज याच NFT विषयी म्हणजेच Non Fungible Token विषयी आपण जाणून घेणार आहोत. NFT काय आहे, त्याचा वापर कसा केला जातो, NFT चा फुल फॉर्म, NFT मधून तयार झालेल्या काही प्रसिद्ध कलाकृती, NFT रजिस्टर कसा करतात आणि NFT विषयी इतरही माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

NFT म्हणजे काय? What is NFT Meaning in Marathi

NFT म्हणजे “Non Fungible Token” होय. NFT एक डिजिटल टोकन आहे जे ब्लॉकचेन सिद्धांतावर काम करते. आता मग प्रश्न समोर येतो की नक्की हे “Non Fungible Token” म्हणजे काय? तुम्हाला बिटकोईन माहिती असेलच? बिटकोईन ही एक क्रिप्टो करन्सी आहे आणि यामध्ये तुम्ही व्यवहार करू शकतात.

बिटकोईन हे ब्लॉकचेन च्या सिद्धांतावर काम करत असतात, म्हणजे जर समजा एखाद्याने बिटकोईन दुसऱ्याला विकले तर मग ते बिटकोईन आता ज्या व्यक्तीच्या खात्यात आहेत त्या व्यक्तीला त्या बिटकोईन चा मालक समजले जाते. म्हणजे बिटकोईन हे चलन आभासी जरी असले तरी देखील ते fungible आहे. म्हणजे एकदा त्याचे विस्थापन दुसऱ्या कोणाकडे गेले की त्याचा मालक तो व्यक्ती बनून जातो.

एखादी डिजिटल फाईल असेल आणि तिला खरेदी करणार कोणीही असेल तर मग तिच्यावर एक डिजिटल टोकन लावला जाईल. त्यातून मग त्या फाईलच्या main owner विषयी माहिती त्या टॅग मध्ये कायम असेल. म्हणजे ती गोष्ट इतर कोणालाही विकली गेली तरी तिचा मुख्य मालक हा कायम माहिती असेल. यालाच NFT म्हणजेच Non Fungible Token म्हणून आपण ओळखत असतो. 

वस्तूला कितीही वेळा आणि कुठेही जरी विकले गेली तरी देखील त्या वस्तुवरील NFT टॅग ने तुम्हाला त्याच्या खऱ्या मालकाविषयी माहिती मिळेल. यालाच अनेक लोक डिजिटल ओनरशिप म्हणून देखील ओळखतात. याचा वापर सध्या गेमिंग आणि क्रिप्टो आर्टस् मध्ये केला जातो आहे. गेमिंग मध्ये ऑनलाईन गेमिंग हे सर्वात मोठे क्षेत्र आहे ज्यात सध्या NFT चा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे.


NFT चा वापर कुठे केला जातो? How to Use NFT in Marathi

तुम्ही एखादा फोटो काढता आहात किंवा एखादे डिजिटल आर्ट बनवता आहात तर मग तुम्ही त्याला ब्लॉकचेन वर टाकून त्यासाठी टोकन घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला व्हिडीओ, डॉक्युमेंट यासारख्या गोष्टी देखील अपलोड करता येतात. 

ब्लॉकचेन मध्ये आपण गेम, कोणत्याही आर्टस् मग त्या डिजिटल असो किंवा फोटोग्राफी, म्युझिक डॉक्युमेंट इत्यादी रजिस्टर करू शकतात. एकदा फाईल अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक युनिक टोकन आयडी जनरेट करून दिला जातो. 

हा आयडी तुमच्या आर्ट साठी असतो त्यामुळे मग त्या आर्टला कोणीही खरेदी केले किंवा बघितले तर त्या आयडी वरून त्याचा खरा मालक कोण याची माहिती मिळते.

NFT या तंत्रज्ञानात Ethereum ERC 721 या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. याच्या माध्यमातून तुम्हाला टोकन दिले जाते आणि याच माध्यमातून तुमचे टोकन व्हेरिफाय देखील केले जाते.

>> हे पण वाचा – इंटरनेट बद्दल संपूर्ण माहिती


NFT साठी रजिस्टर कसे करतात?

तुमची स्वतःची एखादी डिजिटल आर्ट असेल मग ती काहीही असो, यात फोटो आले, व्हिडीओ आले, ऑडिओ फाईल्स आल्या आणि इतर जे काही डिजिटल स्वरूपात कलाकुसर आहेत ते सर्व आलेत, त्यांना तुम्हाला NFT साठी रजिस्टर करण्याची प्रोसेस आता आम्ही सांगत आहोत.

ब्लॉकचेन साठी अनेक वेबसाईट आहेत मात्र यातील opensea.io वर जाऊन तुम्ही कशा प्रकारे NFT मिळवू शकता याविषयी पुढे सांगतो.

NFT बद्दल संपूर्ण माहिती

वेबसाईटला भेट दिल्यानंतर तिथे तुम्हाला तुमचे खाते उघडायचे आहे. एकदा तुमचे खाते उघडले गेले की मग आता तुम्हाला डिजिटल आर्ट खरेदी करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी पर्याय समोर दिसतो. यासाठी तुम्हाला आधी तुमचे अकाउंट व्हेरिफाय देखील करावे लागते. खाते खोलने आणि व्हेरिफाय करणे या गोष्ट इथे फ्री आहेत.

तुम्हाला यात एक नवीन प्रोजेक्ट बनविण्यासाठी पर्याय मिळेल. त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला डिजिटल आर्ट अपलोड करायची आहे. तुमच्या आर्ट ला opensea कडून एक टोकन आयडी दिला जातो. या टोकन आयडी वरून तुमच्या आर्ट चे owner कोण आहेत हे कळते. 

तुमची आर्ट जेव्हा लाईव्ह होईल त्यानंतर तिला कोणीही व्यक्ती खरेदी करू शकतो. जेव्हा ती वस्तू विकली जाईल त्यानंतर तुम्हाला त्याबदल्यात कमाई होईल. पुढे त्या व्यक्तीने जरी ते आर्ट कोणाला विकले तर त्याचा काही हिस्सा तुम्हाला मिळून जाईल. तुमच्याकडे त्या आर्ट ची ownership असल्याने तुम्हाला हे काही टक्के मिळून जातात. 


तुमचे NFT असलेल्या प्रोडक्टचे कमिशन कसे मिळते?

आपल्याकडे सध्या क्रिप्टो करन्सी आहे त्या माध्यमातून आपण अनेक व्यवहार करत असतो. मात्र तुम्ही विकलेली क्रिप्टो करन्सी तुम्हाला पुढे भविष्यात काहिच कमिशन देत नाही NFT मात्र याउलट काम करते. 

तुमच्या आर्ट चे मालकी हक्क तुमच्याकडे आहेत आणि त्यामुळे एखाद्याने तुमच्या डिजिटल आर्ट ची खरी मालकी लपविण्याचा प्रयत्न करून ती विकण्याचा प्रयत्न केला तरी ते अवघड आहे. 

NFT मध्ये तुमचे डिजिटल आर्ट तितक्या जास्त लेव्हल वर सिक्युअर ठेवलेले असते. यामुळे तुम्हाला कधी तुमची आर्ट चोरी झाली ही समस्या होणार नाही.

एकदा एखादी आर्ट तुमच्या नावावर NFT असेल तर भविष्यात जर एखादा व्यक्ती त्या आर्टला पुढे विकून स्वतःसाठी पैसे कमवत असेल तर त्याचा काही टक्के भाग हा त्याच्या मालकाला मालकी हक्कामुळे नक्कीच मिळतो. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे पैसे जसे एखाद्याने एखादी आयडिया दिली तर त्याला मिळतात तसेच आता कलेच्या बाबतीत घडणार आहे.

>> आणखी माहिती वाचा – ई-कॉमर्स म्हणजे काय


NFT चे भविष्य काय आहे? Future of NFT In Marathi

एक NFT रिपोर्ट दरवर्षी येतो त्यातील 2020 रिपोर्ट मध्ये NFT विक्री 100 मिलियन अमेरिकी डॉलर्स ओलांडून पुढे गेली. भारतात आता क्रिप्टोकरन्सी साठी काही नियम लागू होणार आहेत. 

जशी डिमांड क्रिप्टो करन्सी ला होती त्याचप्रमाणे पुढील भविष्य हे NFT असेल असे अनेकांना वाटते आहे.

RBI देखील भारतात क्रिप्टो करन्सी आणत आहे त्यामुळे पुढे भारतात NFT सारख्या तंत्रज्ञानाला चालना देण्याचा प्रयत्न त्यांचा देखील असेल. 

त्यामुळे सध्या गुंतवणूक करत असाल तर NFT सारख्या टेक्नॉलॉजीचा एकदा लॉंग टर्म साठी विचार करण्यासाठी काही हरकत नाही. 


NFT विषयी अधिक माहिती | NFT Information in Marathi

NFT ही प्रणाली पूर्णपणे मोफत आहे. या प्रणाली मध्ये तुमचे डिजिटल आर्टस् सुरक्षित असतात. ब्लॉकचेन आणि त्याला व्हेरिफिकेशन ची जोड असल्याने यामध्ये अधिक सुलभता आणि सुरक्षितता येणाऱ्या काळात मिळणार आहे. 

तुमचा डेटा काही परमिशन नसताना कोणीही वापरू शकणार नाही किंवा त्या डेटा ला वापरल्यानंतर देखील तुमचा मालकी हक्क त्यावर सतत असेल. पुढे येणाऱ्या काळात आता NFT चा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे या तंत्रज्ञानाविषयी आत्ता पूर्ण माहिती करून घेणे कधीही चांगले असेल.

डिजिटल फाईल्स साठी काहीच दिवसात एक सर्वोत्कृष्ट प्लॅटफॉर्म म्हणून NFT असेल यात काही शंका नाही.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न FAQ

NFT सुरक्षित आहे का?

हो. NFT ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वर सुरू असल्याने हे पूर्णपणे सुरक्षित माध्यम आहे.

NFT फ्री आहे की PAID?

NFT हे तंत्रज्ञान पूर्णपणे फ्री आहे.

NFT चा फुल फॉर्म काय आहे?

NFT चा फुल फॉर्म हा Non Fungible Token आहे.


निष्कर्ष  

आजच्या ब्लॉग मध्ये आपण NFT म्हणजे काय? (What is NFT in Marathi) NFT चा वापर कसा करायचा तसेच आजच्या डिजिटल युगात NFT किती महत्वपूर्ण आहे आणि NFT चा उपयोग कश्या प्रकारे केला जातो. या बद्दल संपूर्ण माहिती मराठी भाषेमध्ये प्रदान केली आहे. 

आम्ही आशा करतो कि तुम्हाला NFT बद्दल संपूर्ण माहिती समजली असेलच जर या ब्लॉग बद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कंमेंट करा, आणि या ब्लॉग ला शेअर करायला विसरू नका. 

अशाच प्रकारची नवनवीन आणि इंटरेस्टिंग माहिती वाचायची असेल तर आमच्या मराठी स्पिरिट वेबसाईट ची नोटिफिकेशन बेल प्रेस करा. जेणेकरून आम्ही महत्वाची आणि उपयोगाची माहिती तुमच्या पर्यंत सर्वात आधी पोहचू शकणार. 

धन्यवाद !🙏🙏

Leave a Reply

This Post Has 3 Comments

  1. DigitalRitesh

    खूप सुंदर माहिती दिली आपण..

  2. Vivek Kuber

    NFT मधून आलेली करन्सी आपण इंडियन रूपीस मधे कन्व्हर्ट करू शकतो का?