ई-कॉमर्स म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते | E-Commerce Type in Marathi

ई-कॉमर्स म्हणजे काय

जेव्हा पण तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करण्याचा विचार करता. तेव्हा तुम्हाला ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, आणि इतर बऱ्याच वेबसाईट ची आठवण येते आणि या शॉपिंग साईट्स मध्ये तुम्ही वस्तू खरीदी करता आणि ऑनलाईन पेयमेन्ट म्हणजेच Transaction करता, आणि तुम्ही सुद्धा ई-कॉमर्स चा एक भाग बनता.  

पण तुम्ही कधी विचार केलाय, कि ई-कॉमर्स म्हणजे काय? आणि ई-कॉमर्स व्यवसाय कसा करतात? नसेल तर या पोस्ट मध्ये आपण ई-कॉमर्स बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 

ई-कॉमर्स म्हणजे काय? | What is E-Commerce in Marathi

 E-Commerce ही एक अशी सेवा असते. जी इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहकांना म्हणजेच कस्टमरला ला पुरवली जात असते. 

ई-कॉमर्स मध्ये सर्व खरेदी विक्रीच्या सुविधा ह्या ग्राहकाला इंटरनेटच्या माध्यमातुनच पुरविल्या जात असतात. तसेच उपलब्ध करून दिल्या जात असतात. अणि ह्यात पेमेंट पण आँनलाईन पद्धतीने च केले जात असते. म्हणजेच सर्व व्यवहार यात डिजीटली होत असतात. 

किंवा ई-कॉमर्स हा एक आँनलाईन मार्केटिंगचा असा व्यवसाय तसेच व्यापार आहे. ज्यात आँनलाईन पदधतीने सर्व प्रॉडक्ट, सर्विसची खरेदी-विक्री केली जात असते. अणि आज आपण ह्याच ईकॉमर्स व्यवसायाविषयी जाणुन घेणार आहोत.


ई-कॉमर्स चे प्रकार | E-Commerce Type in Marathi

 • व्यवसाय ते ग्राहक | Business to Consumer | B2C 

ह्या प्रकारच्या व्यवसायामध्ये ई कॉमर्स कंपनी आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस थेट ग्राहकांना आँनलाईन मार्केटिंग द्वारे तसेच प्रमोशन करून विकत असतात. या व्यवसायामध्ये व्यवसाय ते ग्राहक यामध्ये व्यापार होत असतो. 

For Ex :- Amazon, Flipkart, Walmart etc..

 • व्यवसाय ते व्यवसाय | Business to Business | B2B 

हा ईकॉमर्स व्यवसायाचा असा प्रकार आहे. ज्यात पहिली कंपनी दुसऱ्या कंपनीकडुन प्रॉडक्ट तसेच सर्व्हिसेस ची खरेदी विक्री करत असते. म्हणजेच या व्यवसायामध्ये व्यवसाय ते व्यवसाय असे व्यवहार केले जातात. जसे कि, कच्चा माल खरेदी करणे.  

 • ग्राहक ते ग्राहक | Consumer to Consumer | C2C

या प्रकारामध्ये ग्राहक स्वतः वस्तू तयार करून त्या वस्तू ला किंवा सेवेला दुसऱ्या ग्राहकाला ऑनलाईन विकत असतो. अशा प्रकारच्या Business Model मध्ये विक्रेता पण एक ग्राहकच असतो अणि खरेदी करणारा सुद्धा एक ग्राहकच असतो. म्हणूनच याला ग्राहक ते ग्राहक असे म्हटल्या जाते. 

आणखी माहिती वाचा – शेयर मार्केट म्हणजे काय? याबद्दल संपूर्ण माहिती


 ई-कॉमर्स व्यवसाय कशा पदधतीने केला जातो?

ई-कॉमर्स व्यवसायामध्ये कार्य ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही प्रॉडक्ट तसेच सर्व्हिसेस ची विक्री केली जाते. यात पैशांची देवाणघेवाण देखील आँनलाईन केली जाते.

ई-कॉमर्स बद्दल संपूर्ण माहिती

यात आपल्याला आपले एक आँनलाईन स्टोअर तयार करावे लागते. अणि त्यात प्रॉडक्ट तसेच सर्व्हिसेस ची मार्केटिंग म्हणजेच प्रमोशन करावे लागते. अणि मग जेव्हा एखादा ग्राहक ते प्रोडक्ट सर्विस विकत घेण्यासाठी येत असतो.

तेव्हा तो जो प्रॉडक्ट तसेच सर्व्हिस आँर्डर करतो ते प्रॉडक्ट सर्विस आपल्याला निर्मात्याकडे आँर्डर करावी लागते. मग तो निर्माता ते प्रॉडक्ट सर्व्हिस सप्लायर द्वारे ग्राहकाकडे पाठवत असतो.

किंवा यात सप्लायर किंवा निर्माता हे दोघे वेगवेगळे देखील असु शकतात. यात मग सप्लायर चा का शिपिंग चार्जेस असेल तर तो देखील आपल्याला द्यावा लागत असतो. 


ई-कॉमर्स व्यवसायाचे फायदे | Advantages of E-Commerce

E Commerce मध्ये खरेदी विक्रीच्या प्रक्रिया अतिशय जलद गतीने होत असते असतात. म्हणुन आँनलाईन खरेदीला कस्टमर जास्त प्राधान्य देत असतात.

 • ई-कॉमर्स मध्ये किंमत कमी अणि ग्राहकाला जास्त व्हॅल्यू दिल्या जात असते. म्हणुन खरेदी करणारे खरेदीसाठी जास्तीत जास्त लोक आकर्षित होतात. 
 • यामध्ये ग्राहक कुठेही न जाता आँनलाईन पद्धतीने कोणतीही वस्तु घरबसल्या खरेदी करू शकतो.

हे पण वाचा – संगणक म्हणजे काय? संपूर्ण माहिती


ई-कॉमर्स व्यवसायाचे तोटे | Disadvantages of E-Commerce 

 • ई-कॉमर्स मध्ये कधी कधी ग्राहकाने जे प्रॉडक्ट,सर्विस मागवलेली असते. त्याला तीच सर्विस डिलीव्हर न होता कधीकधी चुकीच्या प्रॉडक्ट ची डिलीव्हरी केली जात असते.
 • आँनलाईन एखादी वस्तु खरेदी करण्यासाठी जेव्हा ग्राहक आपल्या क्रेडिट कार्डची माहीती देत असतो.
 • तेव्हा पैसे चोरले जाण्याची शक्यता देखील असते. पण असा प्रकार Untrusted Site वरून खरेदी केल्यावरच घडत असतो. Trusted Sites वर असे प्रकार कधीच घडत नसतात.

भारतामध्ये ई-कॉमर्स ची सुरुवात केव्हा झाली | E-Commerce History in Marathi

भारतामधील ई-कॉमर्स व्यवसायाच्या सुरूवाती विषयी सांगावयाचे म्हटले तर भारतात E-Commerce व्यवसायाची सुरूवात Flipkart ह्या कंपनी पासुन झालेली आपणास दिसुन येते.

अणि Flipkart ह्या कंपनीची सुरूवात भारतात 2007 ते 2008 ह्या वर्षी झाली, त्यानंतर मग Amazon तसेच इतर कंपनी देखील उदयास आल्या. अणि त्यांनी देखील ई-कॉमर्सचा व्यवसाय सुरू केला.

अणि बघता बघता आज ऍमेझॉन तसेच फ्लिपकार्ट कंपनीने ईकॉमर्स व्यवसायामध्ये आपले एक वेगळेच नाव अणि स्टेटस निर्माण केले आहे हे देखील आपणास दिसुन येते. 


भारतामध्ये ई-कॉमर्स चे भविष्य काय आहे?

भारतामध्ये सध्या ई व्यवसाय हा सध्या फारच जोरात चालताना दिसुन येतो आहे. आँफलाईन पेक्षा आँनलाईन खरेदी विक्री व्यवहाराकडे खरेदीदार आणि विक्रेते यांचा कल वाढताना दिसुन येतो आहे.

अणि भविष्यात यात अजुन वाढ होत जाईल यात कोणतीच शंका नाही. कारण हळुहळु भारतातही आता ई-कॉमर्स व्यवसायामध्ये आमुलाग्र वाढ तसेच प्रगती होताना दिसुन येते आहे.

अणि भविष्यात भारतात ई-कॉमर्स व्यवसायात एक आमुलाग्र क्रांती देखील घडुन येईल असे म्हणावयास कोणतीच हरकत नाही.


FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न 

ई-कॉमर्स प्लँटफाँर्म कोणकोणते आहेत?

भारतामधील काही लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म पुढीलप्रमाणे आहेत.
Amazon
Flipkart
Snapdeal
Paytm
Myntra
Shopclue

याव्यतिरिक्त खूप सारे ईकॉमर्स प्लॅटफॉर्म आहेत. ज्यामधून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करता येतात.


निष्कर्ष 

अश्या प्रकारे ई-कॉमर्स म्हणजे काय? व ई-कॉमर्स बद्दल संपूर्ण माहिती (What is E-Commerce Meaning in Marathi) तुम्हाला कशी वाटली हे नक्की कंमेंट द्यारे कळवा. 

जर तुम्हाला या ब्लॉग पोस्ट मधील ईकॉमर्स ची माहिती उपयोगाची वाटत असेल तर नक्कीच हि पोस्ट सोशल मीडिया वर शेअर करा. आणि तुमच्या काही सूचना असतील तर कळवा. 

धन्यवाद !!!

Leave a Reply

This Post Has 8 Comments

 1. Pranali

  The Information About E-Commerce is very easy to understand & Proper

 2. Chetan Sharma

  Very nice explain the tipe of E-commerce,
  Thank you so much.

 3. Payal sakharkar

  Thank you,🙏

 4. Manesh khobare

  Very nice