आजचे युग हे डिजिटल टेक्नॉलॉजी चे युग आहे आणि या डिजिटल टेकनॉलॉजि च्या वापरामुळे आपली बरीचशी दैनंदिन कामे अतिशय सोपी झाली आहे. अश्याच प्रकारच्या नवनवीन डिजिटल टेकनॉलॉजि बद्दल आपण मराठी स्पिरिट ब्लॉग पोस्ट मध्ये माहिती जाणून घेत असतो. तर आज अश्याच एका विषया बद्दल आपण माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण Data Analytics म्हणजे काय? (Data Analytics Meaning in Marathi) या टॉपिक बद्दल सविस्तर माहिती मराठी मधून जाणून घेऊया.
आता बऱ्याचश्या लोकाना डेटा विश्लेषण किंवा डेटा विश्लेषण म्हणजे नक्की काय असेल असा प्रश्न पडला असेल. तर चला वेळ न घालवता पाहूया, डेटा विश्लेषण बद्दल संपूर्ण माहिती.
Data Analytics म्हणजे काय? | Data Analytics in Marathi
Data Analytics म्हणजे कच्या स्वरूपाच्या डेटा चे विश्लेषण करून त्या डेटा ला योग्य व उपयुक्त डेटा मध्ये रूपांतरित करणे आणि त्या डेटा मधून अचूक निष्कर्ष काढून डेटा सादर करणे म्हणजे डेटा अनॅलिटिक्स होय. डेटा एनालिटिक्स मध्ये महत्वाची व उपयुक्त माहिती शोधून काढणे, तसेच निर्णय घेण्यास समर्थन देणे व डेटाची तपासणी करणे, चुकीचा डेटा नष्ट करणे, आणि डेटाचे रूपांतर करणे मॉडेलिंग करणे हि सर्व कार्य डेटा विश्लेषण मध्ये केली जातात.
डेटा विश्लेषण मध्ये बरेसे पैलू आणि इनसाईट्स असतात जी विविध स्वरूपात आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि विविध तंत्रज्ञानामध्ये वापरले जातात. तसेच विविध व्यवसाय, विज्ञान, आणि पब्लिक डोमेन मध्ये देखील याचा वापर केला जातो. आजच्या ह्या व्यावसायिक जगात डेटा एनालिटिक्स ही डिसिजन मेकिंग मध्ये देखील मदत करते व व्यवसाय हा अधिक प्रभावीपणे ऑपरेट करण्यास मदत करते.
Data Analysis याचा वापर स्टार्टअप, स्पीड आणि स्किल साठी लागणारी स्पेसिफिक माहिती म्हणजेच बिझनेस इंटेलिजन्स यालाच आपण बिग डेटा म्हणू शकतो. डेटा एनालिसिस याचा वापर प्रत्येक व्यवसायात मग एखादा स्टार्टअप, असो किंवा हजारो उत्पादन आणि करोडो रुपयांची जबर असणारे बहुराष्ट्रीय कंपन्या, असो त्यांची निर्मिती तसेच लेबर अशा प्रत्येक कामासाठी मोठ्या प्रमाणात संगणीकरण करण्यात आले आहे.
>>आणखी माहिती वाचा – Artificial Intelligence म्हणजे काय सविस्तर माहिती
संगणकाचा वापर फक्त बिल बनवणे, मालाची इन्व्हेंटरी ठेवणे तसेच विक्री झालेल्या प्रोडक्शन ची नोंद त्याच्या पलीकडे जाऊन देखील त्यांच्या बेसिक माहितीवरून व्यवसायाला स्केल तसेच स्पीड प्रदान करण्यासाठी आपल्याजवळ असलेली व्यावसायिक माहिती याचे विविध दृष्टीने विश्लेषण करणे, तसेच त्या आधारे कंपनीला उपयुक्त किंवा मदत होईल अशा सूचना करणे हे सर्व Data Analytics द्वारे केले जाते.
डेटा एनालिटिक्स चे विविध प्रकार | Type of Data Analytics
- Descriptive Data Analytics
या पण तर तिच्या डेट मध्ये पूर्वीचा डेटा एक सामान केला जातो व असलेल्या अडचणीचे निराकरण केले जाते. डिस्क्रिप्टिव डेटा विश्लेषण प्रकार आहे, जो डेटा पॉईंट्स मध्ये रचना करून त्याचे रचनात्मक पद्धतीने वर्णन करते व दर्शविते तसेच सारांश करण्यात देखील मदत करते. व ह्याच पद्धतीमुळे डेटाची प्रत्येक कंडीशन ही पूर्ण केली जाते. स्टॅटिस्टिकल डेटा अनालिसिस साठी डिस्क्रिप्टीव्ह डेटा अनलिसिस महत्त्वाची प्रोसेस आहे.
- Diagnostic Data Analytics
डायग्नोस्टिक डेटा अनालिसिस एक ऍडव्हान्स प्रोसेस आहे जी ‘ते असे का आहे?’ या प्रश्नाचे उत्तर देते. डायग्नोस्टिक डेटा अनलिसिस हे ड्रिल डाऊन, डेटा डिस्कवरी आणि को रिलेशन या सर्व प्रकारे वापरली जाते.
- Predictive Data Analytics
प्रॉडक्टिव्हिटी डेटा अनालिसिसच्या मदतीने संकलित केलेल्या संख्या एक डेटा च्या आधारावर संभाव्य असे उत्पादकता सुधारणा प्रकल्पांसाठी क्षेत्र ओळखण्यामध्ये प्रॉडक्टिव्हिटी डेटा अनालिसिस ची मदत घेतली जाते व तसेच विश्लेषण दरम्यान च्या भागांमध्ये डेट प्रॉडक्टिव्हिटी मध्ये नुकसान झाले आहे त्या क्षेत्रांचे देखील विश्लेषण केले जाते.
>> हे पण वाचा – Google Analytics म्हणजे काय विस्तृत माहिती
- Real Time Data Analytics
रियल टाईम अनालिसिस च्या मदतीने लॉजिक आणि मॅथेमॅटिक्स याचा वापर करून निष्कर्षा साठी एक उत्तम इन साईट ची प्रदान केली जाते.
डेटा विश्लेषण कसे केले जाते? | How is Data Analysis Done?
सर्वात प्रथम डेटाचे संकलन केले जाते, म्हणजेच तुम्हाला हवा असलेला डेटा ओळखणे आणि एकत्र करणे. जर हा एकत्र केलेला डेटा वेगवेगळ्या सौर्सेस द्वारे आलेला असेल तर या सर्व डेटा चा डेटा अँनालिस्ट इंटिग्रेशन च्या मदतीने वापर केला जातो.
मात्र जेव्हा डेटा एकाच सौर्स चा असेल तर डेटा अनलिसिस संबंधित डेटा वेगळा कंपार्टमेंट मध्ये हलवण्यात येतो व यावर पुढची प्रोसेस केली जाते व यामुळे डेटा सेटवर सहज परिणाम न होता या डेटाचे एनालिसिस केले जाते.
Adjusting Data Quality म्हणजेच डेटा गुणवत्ता ही समयोजित करणे. आता पुढे संकलित डेटा मध्ये डेटा क्वालिटी ही शोधली जाते म्हणजे त्याचा प्रॉब्लेम शोधला जातो व तो दुरुस्त केला जातो. कॉर्पोरेट स्टॅंडर्ड यांच्या सेटिंग नुसार हा डेटा अनॅलिटिकल मॉडेल यानुसार सेट केला जातो. डेटा क्वालिटी मध्ये इन कन्सिस्टन्सी Error आणि Duplicate Entry हे प्रॉब्लेम आढळून येतात, आणि डेटा प्रोफाइलिंग तसेच Data Demonstration च्या मदतीने याचे निराकरण केले जाते.
Data Analytics वापरू इच्छित असलेल्या बऱ्याचशा विश्लेषकात्मक मॉडेल्स म्हणजेच, आवश्यकतेनुसार डेटा हाताळला जातो व तो व्यवस्थापित देखील केला जातो. डेटा गुणवत्ता या प्रोसेसची शेवटची पायरी म्हणजे डेटा कव्हर पॉलिसी या पॉलिसीद्वारे खात्री केली जाते की हा डेटा बरोबर व कॉर्पोरेट स्टॅंडर्ड यांच्या मान्यतेनुसारच वापरला जात आहे.
त्यानंतर डेटा अनॅलिस्ट हे डेटा सायंटिस्ट यांच्या मदतीने अनॅलिटिकल मॉडेल्स बनवतात जे अगदी योग्य असे विश्लेषण करू शकतात. हे मॉडेल आणि डेटा अनॅलिटिकल सॉफ्टवेअर म्हणजेच प्रॉडक्ट मॉडलिंग टूल्स आणि Computer Programming Languages म्हणजेच Python, SQL यांचा वापर करून बनवले जातात, व हे अनॅलिटिकल मॉडेल बनवून झाल्यानंतर यांच्यावर एक्सपिरिमेंट डेटा सेटच्या मदतीने प्रशिक्षण देखील दिले जाते.
या चाचणीच्या परिणाम अनुसार असलेल्या चुकांवर निराकरण केले जाते, व मॉडेलमध्ये बदल देखील केले जातात. व शेवटी डेटा अनॅलिस्ट आपली मॉडेल आणि बिझनेस एक्झिक्युटिव्ह यांना प्रेझेंट करतात.
डेटा एनालिटिक्स चा वापर | Uses of Data Analytics in Marathi
डेटा ऍनालिटिक्स चा वापर करून कमी कालावधी मध्ये अचूक निर्णय घेता येतात, तसेच पाहायला गेले तर तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये या टेक्नॉलॉजी ला सर्वात जास्त महत्त्व आले आहे. डेटा एनालिटिक्स च्या मदतीने कंपन्यांना ग्राहकांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यात मदत होते त्यांच्या प्रॉडक्टची जाहिरात करण्यात म्हणजेच Ads रण करण्यात देखील मदत होते.
तसेच Personalize Content किंवा Unique Content तयार करण्यासाठी आणि प्रॉडक्ट कसे डेव्हलप केले जातात यात देखील मदत होऊ शकते. म्हणूनच बिझनेस सेक्टर मध्ये डेटा अनॅलिसिसचा वापर स्वतःचा बिझनेस वाढवण्यासाठी व त्याचा विस्तार वाढवण्यासाठी किंवा स्वतःच्या बिजनेस मध्ये अधिक प्रगती करण्यासाठी डेटा वापर सर्वात जास्त केला जातो.
डेटा ऍनालिटिक्स चा वापर कोण कोणत्या क्षेत्रांमध्ये केला जातो
डेटा ऍनालिटिक्स चा वापर ट्रान्सपोर्टेशन, तसेच शाळांमध्ये, इंटरनेट वेब सर्च रिझल्ट, तसेच मार्केटिंग आणि डिजिटल ॲडव्हर्टायझिंग, लॉजिस्टिक्स अँड डिलिव्हरी, सेक्युरिटी आणि फ्रॉड डिटेक्शन या सर्व क्षेत्रांमध्ये केला जातो.
निष्कर्ष | Data Analytics Information in Marathi
डेटा अॅनालिटिक्स म्हणजे काय? या बद्दल विस्तृत माहिती आपण या पोस्ट मध्ये बघितलीच आहे, तरी वरील माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल कमेंट करा. आणि जर हि पोस्ट आवडली तर नक्की शेअर करायला विसरू नका.
तसेच तुमचे या पोस्ट बद्दल काही सूचना असतील तर नक्की आम्हाला सुचवा आम्ही तुमच्या सूचनेनुसार या पोस्ट मध्ये बदल करू.
धन्यवाद!