Google Analytics म्हणजे काय? | Google Analytics in Marathi

गूगल ऍनालिटिक्स म्हणजे काय

नमस्कार मित्रांनो, आज तुमच्या साठी एका महत्वाच्या विषयाबद्दल माहिती घेऊन आलो आहोत, आणि तो विषय आहे Google Analytics. या गूगल अनॅलिटीक्स बद्दल ब्लॉगर, युट्युबर याना माहिती असेलच पण बाकी लोकांना याबद्दल काहीही माहिती नाही त्यांनी Google Analytics हे नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल. 

पण काळजी करू नका तुमच्या साठी आम्ही या पोस्ट मध्ये Google Analytics म्हणजे काय? (Google Analytics in Marathi) याबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. 

Google Analytics म्हणजे काय? | Google Analytics in Marathi

Google Analytics हा गुगल चा एक फ्री टूल्स आहे, Google analytics ला मराठी मध्ये डेटा विश्लेषण असे सुद्धा म्हणू शकतो, याचा वापर करून तुम्ही तुमच्या वेबसाईटवर वर कोण कोणते व्हिजिटर्स येत आहेत, ते कुठून येत आहेत? त्याचबरोबर ते कोणत्या सर्च इंजिन मधून येत आहेत? ते कोणत्या डिव्हाईस चा वापर करत आहेत? तसेच ते वेबसाइटवर किती काळ आहेत? याची सर्व माहिती Google Analytics आपल्याला देते. 

थोडक्यात सांगायचे झाल्यास आपल्या वेबसाईट चे सखोल परीक्षण करून एक महत्वाचा अहवाल आपल्याला प्रदान करते. तसेच वेबसाईट संबंधित सर्व रिपोर्ट गूगल अनॅलिटीक्स मध्ये मिळतात याचा फायदा असा कि या रिपोर्ट्स च्या मदतीने आपल्या वेबसाईट आणखी कश्या पद्धतीने सुधारता येईल याबद्दल योग्य निर्णय घेता येतो आणि वेबसाईट मध्ये योग्य तो बदल करून वेबसाईट ला सुधारता येते.

या टूल्स च्या साहाय्याने आपण वेबसाईट वर पुढील दिलेले काही रिपोर्ट्स पाहू शकतो जसे कि, User Activity, Sources of Traffic, Location of Visitors, Real Time Visitors, आणि Daily, Weekly, Monthly Reports पाहू शकता.


Google Analytics Set-up कसे करायचे?

जर तुम्हाला Google Analytics चा वापर करायचा असेल तर खालील स्टेप्स फोल्लो करा.

  1. सर्वप्रथम तुम्हाला Google Analytics वर जाऊन स्वतःचे अकाउंट क्रिएट करावे लागेल, जे की अगदी फ्री आहे.
how to setup google analytics

2. यानंतर तुमची वेबसाईट ची लिंक गूगल अनॅलिटीक्स मध्ये पेस्ट करा, तुमची वेबसाईट Verify

होण्यासाठी Google Analytics कडून एक कोड पाठवण्यात येईल. 

google analytics setup

3. तुम्हाला मिळालेला कोड तुमच्या वेबसाईट मध्ये Add करा.

अशाप्रकारे तुमच्या वेबसाईट चे व्हेरिफिकेशन होऊन तुम्ही गूगल एनालिटिक्स चा वापर करू शकता.

>> हे पण वाचा – सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय संपूर्ण आणि सविस्तर माहिती

गूगल अनालिटिक्स ची वैशिष्ट्ये | Google Analytics Features Marathi

Google Analytics चे महत्वाचे असे पाच Features आहेत, जे तुमची मदत करू शकतात.

Traffic Report – तुमच्या वेबसाईट वर येणारे सर्व ट्राफिक कुठून येत आहे, कसे येत आहे याबद्दलची पूर्ण माहिती देखील मिळते

Conversion Tracking – या फिचर मुळे जर तुम्ही तुमच्या वेबसाईटवर कोणता फॉर्म Upload केला असेल तर किती लोकं तुमच्या वेबसाईट वर येऊन तो फॉर्म देखील fill करत आहेत हे समजते किंवा किती लीड्स आला आहेत

Keyword Status – Google Analytics चे हे टूल अत्यंत खास आहे, कारण या टूल मार्फत तुम्हाला कोणत्या Keyword वरून सर्वात जास्त ट्राफिक आलेले आहे किंवा येत आहे हे समजते. त्याचबरोबर Visitors कोण कोणते keywords वापरून तुमच्या वेबसाईट पर्यंत पोहोचत आहेत हे देखील तुम्हाला समजते.

Traffics Source – या फिचरच्या माध्यमातून तुम्ही हे जाणून घेऊ शकता की कोण कोणत्या माध्यमा मधून तुमचा वेबसाईटवर ट्राफिक येत आहेत, किंवा कोणत्या वेबसाईट मुळे तुमच्या वेबसाईटवर ट्राफिक येत आहे.

Custom Dashboard – Google Analytics चे हे एक असे फिचर आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही, तुमच्या वेबसाईट चा रिपोर्ट Customized करून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता.

Real Time – Real Time मध्ये किती लोक तुमच्या वेबसाइटला भेट देत आहेत हे पण पाहू शकता त्याच बरोबर याचा उपयोग करुन तुम्ही तुमच्या  व्हिसिटर ची Geo-Graphics इन्फॉर्मेशन देखील जाणून घेऊ शकता. 

Google Analytics चा वापर का करावा? | How to Use Google Analytics

  • Google Analytics चा वापर का करावा याची बरीच कारणे आहेत, त्यातील काही गोष्टी जाणून घेऊ. 
  • Google Analytics हे पूर्णतः फ्री असून आपल्याला आपल्या वेबसाईट बद्दल योग्य ती माहिती दर्शवते.
  • Google Analytics चा वापर केल्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते.
  • हा एक Automatic Data Collection टूल्स आहे, यामुळे तुम्हाला Manually काहिही करायची गरज नसते. 
  • Google Analytics मध्ये तुम्ही दररोज, साप्ताहिक आणि महिन्याला तुमच्या वेबसाईट चा रिपोर्ट पाहू शकता.
  • Google Analytics चा वापर करून तुम्ही तुमच्या वेबसाईटचा बाउन्स रेट (Bounce Rate) देखील जाणून घेऊ शकता, म्हणजेच किती व्हिजिटर्स नी तुमच्या वेबसाईटवर किती वेळ घालवला आहे. 
  • Real Time मध्ये किती लोक तुमच्या वेबसाइटला भेट देत आहेत हे पण पाहू शकता.
  • त्याच बरोबर याचा उपयोग करुन तुम्ही तुमच्या  व्हिसिटर ची Geo-Graphics इन्फॉर्मेशन देखील जाणून घेऊ शकता जसे की Gender, Age, Location, etc.
  • Search engine आणि सोशल मीडियावरून तुमच्या वेबसाइटवर किती ट्रॅफिक येत आहे ते तुम्ही वेगळ्या पद्धतीने पाहू शकता.

FAQ | नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Google Analytics ची वैशिष्ट्ये कोणती?

Google Analytics म्हणजे एक प्रकारची अनॅलिटीक सेवा प्रदान करणारा टूल्स होय. जो तुम्हाला तुमच्या वेबसाईट, ब्लॉग वरील ट्राफिक बघण्याचे फीचर्स उपलब्ध करून देतो आणि वेबसाईट चा परफॉर्मन्स त्याच बरोबर तुमच्या व्हिजिटर्स बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता. 

Google Analytics Free आहे का?

होय! Google Analytics हा एक गुगल चाच एक प्लॅटफॉर्म आहे जेथे वेबसाईट चे विश्लेषण करून योग्य तो अहवाल सादर केला जातो आणि हा प्लॅटफॉर्म पूर्णतः विनामूल्य आहे. 


निष्कर्ष | Google Analytics Meaning in Marathi 

Google Analytics या टूल्स चा वापर करून तुम्ही तुमच्या वेबसाईट चा परफॉर्मन्स वाढवू शकता त्याच बरोबर तुमच्या व्हिजिटर्स बद्दल अधिक माहिती जाणून घेऊन, तुमच्या वेबसाईट मध्ये हवा तो बदल करू शकता, जेणेकरून तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉग ला रँकिंग मिळण्यासाठी मदत मिळेल. 

अश्या प्रकारे आपण गूगल ऍनालिटिक्स म्हणजे काय? (Google Analytics Information in Marathi) याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. वरील लेखाबद्दल तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर नक्की कळवा तुमच्या सूचनेनुसार ब्लॉग ला अपडेट करता येईल. 

तसेच तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली याबद्दल नक्की कंमेंट करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका.   

धन्यवाद !

Leave a Reply