Top 26 Business Ideas in Marathi (Start in 2023)

top 26 business ideas in marathi

मित्रांनो वाढत्या लोकसंख्येचा परिणाम म्हणून आज प्रत्येकच क्षेत्रामध्ये नोकऱ्यांची कमतरता भासू लागली आहे. परिणामी तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. या बेरोजगारीलाच कंटाळून हल्लीचे तरुण व्यवसायिकतेकडे वळताना दिसत आहेत, मात्र कोणता व्यवसाय करावा किंवा एखादा व्यवसाय करावयास घेतल्यानंतर त्यातील चढ-उतार काय आहेत हे बऱ्याच तरुणांना माहीत नसते. त्यासाठी आम्ही हा छोट्याशा प्रयत्नाद्वारे आपणास तब्बल 26 छोट्या मोठ्या व्यवसायांच्या कल्पना (Small business ideas in marathi) सांगणार आहोत.

मित्रांनो आजच्या आपल्या Top Marathi Business Ideas या पोस्टमध्ये आपण कमी आणि मध्यम गुंतवणुकीच्या पुढील काही व्यावसायिक कल्पनांबद्दल चर्चा करणार आहोत.

अनुक्रमणिका show

सर्वोत्तम २६ व्यवसाय कल्पना | Best Business Ideas in Marathi

ऑनलाइन मार्केटिंग | Online / Digital Marketing

मित्रांनो कोविड कालावधीपासून ऑनलाइन जगतामध्ये फारच भरभराट दिसून आली आहे. ऑनलाइन उद्योग व्यवसायांमध्ये देखील प्रचंड वाढ झाली आहे. ऑनलाइन मार्केटिंग हा एक उत्तम व्यवसाय असून तो आपण पार्ट टाइम म्हणून देखील करू शकतो आणि यासाठी गुंतवणूक देखील अतिशय कमी लागते. 

ऑनलाइन मार्केटिंग मध्ये WhatsApp, Instagram, Facebook तसेच अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर आपण विविध वस्तू विकून चांगला नफा मिळवू शकतो. अगदी स्त्रिया देखील घरबसल्या हा व्यवसाय हाताळू शकतात. 

या व्यवसायासाठी तुम्हाला वेगळा काही पैसा लावण्याची गरज नाही. अगदी वस्तू खरेदीसाठी देखील नाही, जेव्हा समोरील ग्राहक तुम्हाला वस्तूची ऑर्डर देईल त्यावेळी आपण बाजारातून ती वस्तू खरेदी करून आपल्या नफ्यासह ती वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकता. अशाप्रकारे अगदी नगण्य गुंतवणुकीतून आपण चांगला पैसा कमवू शकता.

जर तुम्हाला तुमच्या व्यवसाय ऑनलाईन वाढवायचा असेल तर माहिती पोर्टल मराठी बिजनेस लिस्टिंग या प्लॅटफॉर्मचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ऑरगॅनिक पोहचवू शकता.

ब्लॉगिंग | Blogging

मित्रांनो ब्लॉगिंग देखील Online Business चाच एक प्रकार आहे. अलीकडच्या काळात लहान पोरांपासून प्रत्येक वयोगटातील व्यक्ती या क्षेत्रात उतरताना दिसत आहेत. अगदी गृहिणी देखील वेळात वेळ काढून या व्यवसायातून चांगलाच पैसा कमवित आहे. 

मराठी ब्लॉगिंग

या व्यवसायासाठी तुम्हाला ब्लॉगर हा प्लॅटफॉर्म अगदी मोफत उपलब्ध आहे मात्र तुम्हाला थोड्याशा ऍडव्हान्स लेव्हलला या व्यवसायात पदार्पण करायचे असेल तर अगदी पाच हजार रुपयापर्यंत देखील गुंतवणूक करून आपल्या ब्लॉग अर्थात वेबसाईट साठी डोमेन नेम आणि होस्टिंग खरेदी करून आपण वर्डप्रेस या प्लॅटफॉर्म वर ब्लॉगिंग करून महिन्याकाठी चांगलाच नफा मिळवू शकता. अगदी वर्षा दोन वर्षातच तुम्ही महिन्याकाठी एक लाख रुपयांपर्यंत देखील उत्पन्न गाठू शकता.

फ्रिलांसिंग | Freelancing

अगदी शून्य भांडवलात आणि घरबसल्या करता येणारा व्यवसाय म्हणजे फ्रीलान्सिंग होय. यासाठी आपल्यामध्ये असलेल्या स्किलचा पुरेपूर वापर करून आपण रग्गड पैसा कमवू शकतो.

फ्रीलान्सिंग मध्ये आपण वेबसाईट डिझाईन करणे, विविध विषयावर कंटेंट लिहिणे, फोटो अथवा व्हिडिओ एडिटिंग करून देणे युट्युब व्हिडिओ साठी विविध प्रकारची Thumbnail Design करून देणे इत्यादी गोष्टी करू शकता. फ्रीलान्सिंग ची जमेची बाजू म्हणजे हे काम तुम्ही आपल्या वेळेनुसार करू शकता आणि आपल्या मतानुसार त्यासाठी पैसे आकारू शकता.

एफिलिएट मार्केटिंग | Affiliate Marketing

अफिलिएट मार्केटिंग मध्ये तुम्हाला एखाद्या प्रॉडक्ट्स् चे प्रोमोशन आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉग च्या माध्यमातून म्हणजेच ऑनलाईन करायचे असते आणि त्यासाठी आपल्याला काही प्रमाणात कमिशन प्राप्त होत असते. या मार्केटिंग मध्ये वेबसाईट किंवा ब्लॉग च्या माध्यमातून एखाद्या कंपनीच्या वस्तू किंवा सेवांना प्रमोट केल्या जाते.

या प्रमोट केलेल्या वस्तू किंवा सेवांना आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉग मध्ये येणाऱ्या व्हिसिटर्स ने ते प्रॉडक्ट्स् खरेदी केल्यास त्या प्रॉडक्ट्स् च्या किमतीवर आपल्याला काही प्रमाणात कमिशन मिळते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या वेबसाईट मध्ये असलेल्या अफिलिएट लिंक वर क्लिक करते तेव्हा त्या कंपनीची वेबसाईट ओपन होते. आणि त्या मधून प्रॉडक्ट्स् खरेदी करता येतो.

यु-ट्यूब च्या माध्यमातून पैसे कमविणे

आजकाल स्वस्त इंटरनेट कनेक्शन्स मुळे समाजातील सर्वच लोकांच्या हातात इंटरनेट खेळू लागले आहे. परिणामी फावल्या वेळात लोकांना मनोरंजनासाठीही इंटरनेट वापराची सोय उपलब्ध झाली आहे. युट्युब च्या माध्यमातून आपण लोकांसाठी मनोरंजन सेवा उपलब्ध करून देऊ शकतो आणि बदल्यात गुगल एडसेन्स मार्फत चांगली कमाई करू शकता.

इव्हेंट मँनेजमेंट फर्म | Event Management Firm

मित्रांनो वर पाहिल्याप्रमाणे आजकाल प्रत्येक क्षेत्रात घाई वाढल्याने हल्ली बाहेरून काम करून घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आपल्या आसपासच्या परिसरात ज्यावेळी कुठलाही लहान मोठा कार्यक्रम करायचा असतो त्यावेळी सदर कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन करून संपूर्ण कार्यक्रम पार पाडणे ही जबाबदारी स्वतःवर घेऊन आपण त्या बदल्यात चांगली रक्कम मिळवू शकता. 

आजकाल प्रत्येकालाच स्वतःच्या कार्यक्रमांमध्ये एन्जॉय करायचे असते. त्यामुळे नियोजनाचे काम हे बाहेरील व्यक्तीकडे देण्यास आजकालची लोक सहज तयार होतात.

रिक्रूटमेंट फर्म | Recruitment Firm

मित्रांनो आजकाल जॉब्स प्रचंड मागणी आहे, आपण नवशिक्षित तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी सहाय्य करून त्याबाबत योग्य ती फी आकारू शकता. यासाठी तुम्हाला केवळ समाजामध्ये चांगले नेटवर्क बनवावे लागेल. यामध्ये तुम्ही विविध कंपन्यांशी बोलणी करून त्यांना कुशल कामगार पुरवणे व त्या बदल्यात उमेदवारांकडून पगाराच्या काही टक्के अथवा एक वेळ फी आकारून चांगलेच उत्पन्न मिळवू शकता.

 लॉण्ड्री व्यवसाय | Laundry Services

मित्रांनो आजकाल सर्वच क्षेत्रात घाई वाढत चालली आहे. प्रत्येकाला आपल्या दैनंदिन कामासाठी ही वेळ काढणे शक्य होत  नाही. त्यामुळे लहान गावातून तसेच परराज्यातून कामानिमित्त, नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त आलेल्या व्यक्तींचे कपडे घरी जाऊन आणणे ते धुऊन इस्त्री करून पुन्हा पोहोच करणे हा आजच्या काळातील एक उत्तम व्यवसाय बनत चालला आहे. यामधून तुम्ही कपडे धुणे व इस्त्री करणे याबरोबरच घरपोच सेवेचे योग्य ते सेवा मूल्य देखील आकारू शकता.

घरघुती कँटीन व्यवसाय | Home Canteen Business

आज काल प्रत्येकाला बाहेरच्या खाण्याचे वेड लागलेले आहे, त्यामुळेच ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांचे म्हणजेच झोमॅटो आणि स्विगी यांच्या व्यवसायामध्ये फार झपाट्याने वाढ झालेली आहे. 

आपणही आपल्या घरगुती काही ऑथेंटिक तसेच हॉटेल सारख्या डिश बनवून त्यास या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकतो, आणि ऑर्डर प्रमाणे पदार्थ बनवून घरबसल्या विकूही शकता. मात्र यासाठी तुम्हाला झोमॅटो आणि स्विगी या प्लॅटफॉर्मचे काही नियम व अटी पाळणे गरजेचे असेल, जे फार काही अवघड ही नसतात.

व्यवसाय विश्लेषण

डॉग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट | Dog Training Institute

मित्रांनो पाळीव प्राणी हा प्रत्येकालाच आवडत असतो त्यातल्या त्यात कुत्रा हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय मात्र शहरी समाज रचनेमध्ये पाळीव कुत्र्याला घरातच ठेवावे लागते. मात्र घरात ठेवण्यापूर्वी त्याला ट्रेनिंग दिली तर कुत्रा अतिशय छान रित्या राहतो, आजकाल अशा डॉग ट्रेनर्स ची मागणी फारच वाढताना दिसत आहे. आपणही या व्यवसायात उतरून चांगला पैसा कमवू शकता.

धूप आणि मेणबत्ती बनविणे | Incense and Candle Making

मित्रांनो दैनंदिन वापरातील दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे अगरबत्ती आणि मेणबत्ती होय, याच्या निर्मिती मधून आपण बऱ्यापैकी नफा मिळवू शकता याचा कच्चामाल ही फारसा काही महाग नसतो. आणि अगदी छोट्याशा भांडवलात एक मशीन घेऊन आपण हा घरगुती व्यवसाय सुरू करू शकतो.

पापड लोणचे बनविणे | Papad & Pickle Making

मित्रांनो शहरी समाजरचनेमध्ये नोकरीमुळे तसेच छोट्या छोट्या घरांमुळे उन्हाळ्याची ‘वाळवण’ बनवणे प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यामुळे हे सर्व पदार्थ बाहेरून खरेदी करत असतात.  

आपण आपल्या आसपासच्या परिसरातील व्यक्तींना ऑर्डर प्रमाणे, तसेच हे पदार्थ बनविणाऱ्या मोठ्या कंपन्यांना असे पदार्थ बनवून देऊ शकतो. आणि या बदल्यात ठोक पैसा घेऊन चांगलाच पैसा कमवू शकतो. या उद्योगाचे वैशिष्ट्य म्हणजे हा उद्योग आपण मोठ्या प्रमाणावर देखील घेऊन जाऊ शकतो.

नाश्ता हाऊस सुरू करणे | Starting a Breakfast House

मित्रांनो आजकालच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजणाला सकाळचे जेवण करणं शक्य होत नाही. त्याला पर्याय म्हणून सकाळी बाहेर कुठेतरी नाश्ता करण्याचा कल वाढत चालला आहे. 

नोकरी निमित्त सकाळीच घर सोडणाऱ्या युवकांना नाष्टा हाऊसच्या रूपाने आपण एक चांगला पर्याय आणि आपल्या स्वतःसाठी एक उत्पन्नाचे साधन म्हणून पाहू शकता. नाश्ता हाऊसच्या निर्मितीमधून आपण अगदी सकाळच्या काही तासांतच चांगला पैसा कमवू शकता, आणि दिवसभर इतर कामासाठी ही वेळ देऊ शकता.

स्टेशनरी आणि बुक शॉप व्यवसाय | Stationery & Book Shop

आपल्या परिसरातील एखाद्या शाळेसमोर किंवा आजूबाजूला आपण स्टेशनरी आणि गोळ्या बिस्किटाचे दुकान उभारून दिवसाकाठी चांगला नफा मिळवू शकता. 

शालेय साहित्यामध्ये आपण पेन पेन्सिल पासून वह्या, प्रकल्पास लागणारे साहित्य, विविध प्रकारचे कागद, चित्रकला साहित्य, इत्यादी. सर्व गोष्टी तसेच जोडीला गोळ्या बिस्किटांपासून कुरकुरे, लस्सी या प्रकारचे खाद्यपदार्थ ही ठेवू शकता, जेणेकरून शालेय विद्यार्थी आपल्या दुकानाकडे आकर्षिले जातील. हा व्यवसाय आपण अगदी पिढी जात देखील करू शकतो.

आर्थिक नियोजन | Financial Planning

पैसा हा अशी गोष्ट आहे जो पैश्याला जपेल त्यालाच पैसाही जपतो आपल्याकडे किती पैसा आहे यापेक्षा आपण त्या पैशाचे योग्य नियोजन कसे करतो यावर आपली भविष्यकाळातील आर्थिक स्थिती ठरत असते. आज आपण पैसा योग्य ठिकाणी गुंतविला तर भविष्यात तो आपल्याला निश्चितच परतावा देतो.

 मात्र पैसा कुठे गुंतवावा किती गुंतवावा व किती दिवसांसाठी गुंतवावा याचे ज्ञान पैशाने विकत घेता येत नाही. आपण या क्षेत्रात जर निपुण असाल तर धनाढ्य लोकांना किंवा अगदी सर्वसामान्य मात्र अतिरिक्त पैसा असणाऱ्या लोकांनाही पैसा गुंतवणुकीबद्दल सल्ला व सहाय्य देऊन बदल्यात टक्केवारीच्या रूपात अथवा फीस च्या रूपात पैसे घेऊ शकता.

आणखी माहीती वाचाशेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करायची संपूर्ण माहिती

आणखी माहीती वाचा – म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची सविस्तर माहिती

योगा क्लासेस | Yoga Classes

आज कालच्या धावपळीच्या युगात कोणालाच आपल्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे शरीराची वाढही फारच बेढब होते. तसेच आपल्याला दैनंदिन कामातही ऊर्जाहीन वाटल्यासारखे होते, आणि मग सुरू होते उपचारांची शृंखला. त्यामध्ये एक महत्त्वाचा उपाय म्हणजे योगा करणे होय. 

मात्र प्रत्येकालाच योगाची शास्त्रीय पद्धती माहीत नसते, म्हणून योगा ट्रेनर ची मागणी वाढत चालली आहे. आपणही अगदी सकाळ आणि संध्याकाळचे काही तास देऊन योगा शिकवू शकता आणि बदल्यात चांगली फी मिळवू शकता. योगा क्लासेस हे आपण घरी जाऊन देखील घेऊ शकता ज्याद्वारे आपण अधिकची फी देखील चार्ज करू शकता.

जिम ट्रेनर | Gym Trainer

आपले शरीर अतिशय सुडौल  आणि आकर्षक दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते. यासाठी बरेच जण जिम देखील लावतात मात्र जिम मधील विविध उपकरणांचा वापर करून व्यायाम कसा करावा याबाबत प्रत्येकच जण कुशल असेलच असे नसते.

येथे जिम ट्रेनर चे काम अस्तित्वात येते. आपण जिम मालकाच्या माध्यमातून काही टक्केवारी किंवा पगार घेऊन अथवा वैयक्तिकरित्या जिम ट्रेनिंग देऊन फी च्या स्वरूपात चांगला नफा मिळवू शकता. विशेष म्हणजे या कामासाठी तुम्हाला दिवसभर व्यतित करण्याची काहीही आवश्यकता नसते. अगदी सकाळ व संध्याकाळचे काही तास काम करून आपण चांगले उत्पन्न मिळवू शकतो.

गेम झोन | Game Zone

पूर्वीच्या काळी मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन दिले जाई, मात्र आजकाल पालक आपल्या पाल्यास बाहेर खेळण्यास पाठविण्यासाठी धजावत नाहीत, कारण आजकाल लहान मुलांसाठी बाहेरचे वातावरण पाहिजे तेवढे सुरक्षित राहिलेले नाही. 

मात्र घरात बसूनही मुलं कंटाळतात, मग अशा वेळेस पालक त्यांच्या हातात व्हिडिओ गेम्स देतात मात्र काही पालकांची व्हिडिओ गेम खरेदी करण्यासाठी तसेच संगणक व इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी उत्पन्नाची कमतरता असते. 

अशावेळी मुलांना पर्याय उपलब्ध होतो तो म्हणजे व्हिडिओ गेम सेवा पुरविणाऱ्या गेम्स झोनचा. आपण एका छोट्याशा जागेत काही संगणक आणि त्यामध्ये विविध व्हिडिओ गेम्स लोड करून मुलांना प्रति तास या आधारावर पैसे घेऊन व्हिडिओ गेम खेळण्यासाठी देऊ शकता. तसेच नेहमी येणाऱ्या मुलांसाठी महिन्याचे सबस्क्रीप्शन ठेवून त्यावर आकर्षक सूट देऊन आपला व्यवसाय वाढवूही शकता.

पेस्ट कंट्रोल सेवा पुरविणे | Pest Control Services

शहरी जीवनमानामध्ये घरांचे आकार हे लहान होत चालले आहेत. परिणामी वस्तू देखील खूपच कंजस्टेड स्वरूपात ठेवाव्या लागतात. या वेळी विविध वस्तूंच्या सपाट्यांमध्ये तसेच घराच्या विविध कोपऱ्यांमध्ये झुरळ, मच्छर, ढेकूण, मुंग्या इत्यादी प्रकारची कीटक आपले स्थान निर्माण करत असतात.

जोपर्यंत यांची संख्या मर्यादित असते तोपर्यंत आपल्याला फारसा काही त्रास होत नाही. मात्र पुढे जाऊन अन्नपदार्थांची नासधूस, कपडे किंवा काही कागदपत्रे यांची नासधूस या कीटकांमुळे होत असते. अशावेळी आपण पेस्ट कंट्रोल सुविधा पुरवून त्या बदल्यात फी आकारू शकता. तसेच वार्षिक स्वरूपात पेस्ट कंट्रोलचे काम घेऊन दरमहा पेस्ट कंट्रोल करून आपण चांगले उत्पन्न मिळू शकतो.

चालते फिरते फूड ट्रक्स | Food Truck Business 

मित्रांनो आज काल लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकच वयोगटातील व्यक्तींना बाहेरील फास्ट फूड/ जंकफूड यांचे जणू व्यसनच लागलेले आहे. बाहेर खायचे म्हटले की लहानांबरोबरच वृद्ध देखील आनंदीत होतात. मात्र प्रत्येकच लहान मुले तसेच वृद्धांसाठी हाकेच्या अंतरावर खाण्याची ठिकाणे उपलब्ध नसतात.

यावेळी आपण विविध दर्जेदार आणि चवदार मात्र आरोग्यासही उपकारक अशा खाद्यपदार्थांची निर्मिती करून आपल्या सजविलेल्या फूड ट्रकमध्ये त्यास विक्रीसाठी ठेवू शकता. आणि विविध ठिकाणी आपण असा फूड ट्रक फिरवून नवनवीन ग्राहकांना आपल्या चवदार खाद्यपदार्थांची ओळख करून देऊ शकता. या व्यवसायातून आपला खर्च वजा होऊन देखील चांगला नफा आपल्या पदरात पडत असतो.

घर सामान शिफ्टिंग सेवा पुरविणे | Home Furniture Shifting Services

नोकरी म्हटलं की आपले पूर्वापार घर सोडून नोकरीच्या ठिकाणी स्थलांतरित होणं हे आलंच, आणि ओघानेच बदलीनिमित्त वारंवार घर बदली करण्याचे दिव्य देखील अशा नोकरदार वर्गासमोर येऊन उभे राहते. 

अशावेळी आपण त्यांना अगदी माफक किमतीत घर सामानाची एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बदली करून ते व्यवस्थित रित्या लावून देणे यांसारखी कामे करू शकता. ज्याद्वारे चांगल्या नफ्यासोबतच समाजामध्ये आपले चांगले नेटवर्क निर्माण होण्यासाठी ही मदत होऊ शकते.

जॉगिंग ट्रॅक वर आरोग्यदायी वस्तू/पदार्थ विकणे

मित्रांनो चांगलं आरोग्य हे एका संपत्ती पेक्षा काही कमी नसते, या संबंधित तुम्ही हि म्हण ऐकलीच असेल कि, आरोग्यम धनसंपदा.  आणि चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. आजकाल बहुतांश लोक सकाळच्या वेळी जॉगिंग ट्रॅक वर धावण्याचा व्यायाम करताना आढळून येतात, मात्र फक्त व्यायाम करूनच आरोग्य चांगले राहील याची शाश्वती देता येत नाही. त्यासाठी सकस आहार देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. 

अशावेळी आपण जॉगिंग ट्रॅकच्या जवळ विविध आरोग्यदायी पदार्थ जसे की अंडे, फळांचे सलाद, मोड आलेल्या कडधान्याचे मिश्रण, विविध प्रकारचे काढे आणि कोरफडी सारख्या वनस्पती विक्रीसाठी ठेवून अगदी सकाळच्या तास दीड तासात चांगली रक्कम घरी घेऊन जाऊ शकता. विशेष म्हणजे हा व्यवसाय आपण पार्ट टाइम म्हणून देखील करू शकता. सकाळी हा व्यवसाय आटोपल्यानंतर आपण आपल्या दैनंदिन नोकरी किंवा दुसऱ्या व्यवसायासाठी वेळ देऊ शकता. 

रेझिन पासून विविध कलाकृती बनविणे | Resin Arts

मित्रांनो आज काल सिम्पल मात्र क्रिएटिव्ह गोष्टींची क्रेझ तरुणांमध्ये फारच वाढताना दिसत आहे. आपण अगदी थोड्याशा खर्चामध्ये कच्चामाल आणून ऑर्डर प्रमाणे अथवा आधीच बनवून बाजारामध्ये रेझिनच्या विविध वस्तू  विकू शकता. यासाठी फार काही कौशल्याचीही आवश्यकता नसते. थोड्याशा सरावाने देखील आपण उत्तम प्रकारचे रेझिन वस्तू बनवून चांगला नफा मिळवू शकता.

दैनंदिन वापराच्या आणि किराणा मालाच्या वस्तू घरपोच पुरविणे

आजकाल बहुतांश गृहिणी देखील नोकरी करताना दिसतात किंवा आपल्या पिढीजात व्यवसायात मदत करतानाही दिसून येतात. अशावेळी घरगुती किराणा किंवा इतर वापराच्या वस्तू खरेदी करणे यासाठी गृहिणींना फारसा वेळ मिळत नाही. 

अशावेळी आपण ऑर्डर प्रमाणे घरगुती वापराच्या वस्तू आणि किराणामाल घर पोहोच करून त्या बदल्यात काही रक्कम सेवेच्या स्वरूपात स्वीकारू शकता. यामध्ये समाजातील विविध स्तरांतील लोकांशी आपले सलोख्याचे संबंध देखील निर्माण होतात, ज्याद्वारे आपण दुसरा कुठलाही व्यवसाय सुरू केला तर त्यासाठी चांगले आणि विश्वासू ग्राहक आधीपासूनच आपल्याकडे निर्माण असतात.

सीजनल वस्तूंचा बिजनेस करणे | Seasonal Business

आपल्या भारत या देशामध्ये सर्वधर्मसमभाव मानले जाते, येथे प्रत्येक जाती धर्माचे लोक एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी होत असतात. अशावेळी विविध सणांच्या निमित्ताने विविध वस्तूंची गरज आणि मागणी बाजारात तयार होत असते. जसे की संक्रांतीसाठी पतंग, होळीसाठी रंग, रक्षाबंधनासाठी राख्या, दिवाळीसाठी पणत्या इत्यादी. 

यावेळी आपण सीजनल स्वरूपात या वस्तूंची उपलब्धता करून काही कालावधीसाठी हा व्यवसाय चालवून चांगला नफा मिळवू शकता. मात्र या व्यवसायामध्ये आपल्याला ग्राहकांच्या मागणीचा चांगला अंदाज हवा कारण सदर सण संपल्यानंतर उरलेल्या वस्तू या वर्षभर सांभाळाव्या लागतात.

डान्स क्लासेस | Dance Classes

मित्रांनो आजकाल पारंपारिक नृत्य शैली लोप पावत चालली आहे. तसेच आधुनिक नृत्य शैलीचा विकासही होत आहे. या दोन्ही गोष्टींची सांगड घालत आपण पारंपारिक नृत्य शैली सह आधुनिक नृत्य शैली जोपासून ती विद्यार्थ्यांना शिकवून चांगले उत्पन्न मिळू शकतो. 

यामध्ये स्नेहसंमेलन कालावधीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. आपण काही शाळांशी संपर्क करून स्नेहसंमेलनाच्या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा देखील स्वतःवर घेऊ शकतो, आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळवू शकतो. या व्यवसायाची खासियत म्हणजे आपण व्यवसायाबरोबरच आपला नृत्य कलेचा छंद देखील जोपासू शकतो.

निष्कर्ष | Top Marathi Businesses to start in 2023

अश्या प्रकारे तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत पण तुम्हाला कळत नाही कि कोणता व्यवसाय करायला हवा. तर आम्ही तुम्हाला टॉप २६ फ्युचर बिसिनेस आयडिया याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन आणि माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या बिसिनेस आयडिया मधून तुम्ही कोणताही व्यवसाय सिलेक्ट करू शकता हे व्यवसाय अगदी कमी भांडवलामध्ये करू शकता. 

तूम्हाला नक्कीच वरील पोस्ट मधील बिसिनेस आयडिया आवडल्या असतीलच यात शंका नाही. तसेच आणखी काही कमी गुंतवणुकीमध्ये सुरु करता येणाऱ्या व्यवसायाबद्दल तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कंमेंट मध्ये कळवा, तसेच तुम्ही कळविलेल्या व्यवसायाचा वरील ब्लॉग मध्ये उल्लेख करण्यात येईल. 

त्याचप्रमाणे हा लेख तुमच्या मित्रांना आणि जवळच्या व्यक्तीला शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा नवनवीन व्यवसाय कल्पना सुचतील, आणि व्यवसाय करण्यासाठी प्रेरित होतील. 

धन्यवाद!

Leave a Reply