Server म्हणजे काय? | Server Meaning in Marathi

Server म्हणजे काय

नमस्कार मित्रांनो, आपला आजचा विषय आहे सर्व्हर (Server) .

संगणका बद्दल संपुर्ण माहिती या आधीच्या लेखातून तुम्हाला मिळाली असेलच. वापरकर्त्याला हवी असलेली माहिती संगणकाच्या माध्यमातून तो किती सहजरीत्या प्राप्त करू शकतो. पण ही माहिती एवढ्या सहजरीत्या आणि अचूकपणे वापरकर्त्यासमोर कशी प्रकट होत असेल? तर यामागे देखिल एक गुपित आहे, आणि ते जाणून घेण्यासाठी तुम्ही (Server Meaning in Marathi) हा लेख नक्कीच वाचला पाहिजे

तर आपल्या आजच्या या लेखात आपण सर्वर काय आहे? ते कशा प्रकारे कार्य करते, सर्व्हर चा इतिहास तसेच सर्व्हर चे विविध प्रकार त्याचबरोबर फायदे आणि तोटे याबद्दल संपुर्ण माहिती जाणून घेऊयात.

सर्व्हर म्हणजे काय? । Server in Marathi

जेव्हा तुम्ही सर्च इंजिन वर जाऊन काहीतरी सर्च करता, तेव्हा तुम्हाला योग्य तोच आऊटपुट भेटण्यामागे एक विशिष्ट्य प्रोग्राम कारणीभूत असतो आणि तो म्हणजे सर्व्हर

सर्व्हर हा शब्द ऐकायला जरी नविन असला तरीही त्याची कार्यप्रणाली जवळपास संगणकासारखीच आहे. आणि एका विशिष्ठ हेतूसाठी त्याची रचना करण्यात आलेली आहे. संगणकाच्या तुलनेत त्याची कार्यक्षमता अधिक असते. तसेच ते जास्त टिकाऊ आणि दीर्घायुश्यी असून जास्त काळ काम करण्यास तत्पर असतात. सर्व्हर हा सुध्दा एक प्रकारचा संगणक आहे, जो इतर संगणकाना माहीती प्रदान करतो.

उदा, जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला माहिती नसते तेव्हा त्याबद्दल जाणुन घेण्यासाठी गूगल किंवा इतर सर्च इंजिन च्या मदतीने शोधता. नंतर ज्या ठराविक विषयाबद्दल तुम्ही नोंदणी केलेली असेल ती संगणकापासून सर्व्हरकडे जाते. सर्व्हर ती ठराविक नोंदणी स्वीकारून त्यावर प्रक्रिया करून योग्य तीच माहिती संगणकाला परत पाठवतो. आणि आपुटपुट च्या स्वरूपात तुम्हाला हवी असलेली माहिती सहजरीत्या प्राप्त होते. 


सर्व्हर ची कार्य | Functions of Server

माहिती तंत्रज्ञान यात सर्व्हर चा दुहेरी अर्थ निघतो. याचा वापर संगणकाचे वर्णन करण्यासाठी केला जातो जो नेटवर्क मधील संसाधनांची पूर्तता करतो. सर्वसाधाणपणे सर्व्हर वापरण्याचा हेतू फक्त येवढाच की संगणकाच्या कार्य क्षमतेत आणि गुणवत्तेत वाढ होईल, जेणेकरून त्याला दिलेली कोणतेही कार्य तो सहजरीत्या पार पाडेल.

जेव्हा एखादे कोणते संगणक सर्व्हर (Computer Server) चा वापर करतात तेव्हां त्यांना क्लायंट असं म्हणतात, आणि त्या संपुर्ण मॉडेल ला क्लायंट सर्व्हर मॉडेल म्हणून ओळखतात. 

थोडक्यात आपण संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम ची वैशिष्टे वापरून कोणत्याही संगणकाला सर्व्हर मध्ये रुपांतरीत करू शकतो. मात्र हार्डवेयर आणि ऑपरेटिंग सिस्टिम च्या काही मर्यादेमुळे सर्व्हर खूप साऱ्या Connection चे समर्थन करण्यास सक्षम नसते.

एखाद्या डेस्कटॉप पीसी मध्ये कोणतेही कार्य पार पाडण्यासाठी ज्या ज्या भागांचा वापर केला जातो ते सर्व भाग सर्व्हर संगणकात देखील उपलब्ध असतात. मात्र डेस्कटॉप पीसी च्या तुलनेत ते अधिक कार्यक्षम आणि टिकाऊ असतात जे कुठल्याही प्रकारचा खंड न पडता सतत कार्यरत राहू शकतात.


सर्व्हर चा इतिहास | History Of Server in Marathi

संगणकाचा एक प्रकार म्हणजेच Mainframe Computer ने पहिल्या सर्व्हर चि भुमिका पार पाडली. सर्व्हर हे एक इलेक्ट्रॉनिक डीव्हाईस आहे जे थेट संगणकाशी संबंधीत आहे.

सर्व्हर चा इतिहास हा वेळेनुसार विभाजित करून त्यांचे वर्णन करता येणार नाही. सुरुवातीला त्यांचे कार्य मेनफ्रेम सारख्या आकाराने मोठ्या असलेल्या संगणकाद्वारे केले गेले. नंतर हळू हळू वैयक्तिक संगणकाद्वारे देखिल करता येऊ लागले, आणि नंतर इतर संगणकीय प्रणालीद्वारे सर्व्हर चा वापर होऊ लागला.

आधुनिक सर्व्हर | Modern Server

आधुनिक सर्व्हर चे अ‍ॅनालॉग म्हनून मेनफ्रेम्स कॉम्प्युटर चा वापर केला आणि यामगचे कारण असे की  ते त्यांचे स्वतःचे विसंगत प्रोटोकॉल वापरत होते ज्यामधे वापरकर्त्याला फक्त एक निर्माता निवडून त्यांचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर वापरावे लागले. 

पहिला वैयक्तिक संगणक जेव्हा अस्तित्वात आला तेंव्हा सर्व्हर पिसी वापरकर्ते मेनफ्रेम संगणकाचा वापर कमी करू लागले. आणि त्यासोबतच वापरकर्त्याना संयोजीत नेटवर्क आणि संवाद साधण्यास मदत झाली.

आधुनिक सर्व्हरचे घटक | Modern Server Components

सर्व्हर म्हणून वापरल्या जाणार्‍या वैयक्तिक संगणकाच्या संख्येत जोमाने वाढ होत गेली. सुरुवातीला वर्तमानातील प्रथम सर्व्हर गेल्या शतकाच्या अखेरीस 1970 मध्ये दिसू लागले, त्यांनी डेटा वेअरहाउसची भूमिका पार पाडली.  त्यांना फाईल सर्व्हर असे म्हणतात.  

फाइल सर्व्हरद्वारे केवळ वापरकर्त्यांचा डेटा संग्रहित केला जाऊ शकत नाही परंतु वापरकर्ता आपल्या फाईल्स या सर्वर मध्ये साठवून ठेऊ शकतो.

जसजसा ग्लोबल नेटवर्क चा विकास झाला तसतसा सर्व्हर चा संचार होऊ लागला. नंतर 1991 मध्ये सर्व्हर ला वर्ल्ड वाइड वेब (www) चे मानक मानल्या गेले. त्यानंतर काही महिन्यांत त्यामधे 26 सर्व्हर चा समावेश झाला ज्यामुळे ते अधिक कार्यक्षम आणि शक्तिशाली बनले. 1993 च्या शेवटी या सर्वर ची संख्या 200 पेक्षा जास्त झाली आणि 1995 पर्यंत ते असंख्य झाली. आताचे आधुनिक सर्व्हर प्रती सेकंदात शेकडो टेराबाइट एवढी माहिती ऑपरेट करू शकतात.

>> अधिक माहिती वाचा – CLOUD COMPUTING म्हणजे काय? संपूर्ण माहिती


सर्व्हर चे प्रकार | Types Of Server in Marathi

क्लायंट आणि सर्व्हर यांच्यातील संवाद साधण्याचा मार्ग हा त्याच्या कार्याच्या प्रकारावर अवलंबून असतो. त्याच्या विविध कार्यानुसार सर्व्हर चे विविध प्रकार आहेत. त्यांपैकी काही मोजके आणि महत्वाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

सर्व्हर चे प्रकार
 1. वेब सर्व्हर । Web Server

Web Server चे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे वेब ब्राऊझर आणि वेगवेगळया सर्च इंजिन सारख्या क्लायंट ला एकत्रित करणे त्यावर नेमकी ती प्रक्रिया करणे आणि नंतर त्यांना योग्य रित्या वितरित करणे.

या दरम्यान सर्व्हर आणि क्लायंट यांचे संप्रेषण हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल (http) व्दारे केला जाते.

वेब सर्वर मध्ये मुख्यतः http सर्व्हर, मायक्रोसॉफ्ट इंटरनेट इन्फॉर्मेशन सर्व्हिस (IIS) यांचा समावेश होतो. 

 1. फाइल सर्व्हर | File Server

फाइल सर्व्हर चा वापर एखाद्या फाइल ला साठवून ठेवण्यासाठी केला जातो. नेटवर्क चा कोणताही वापरकर्ता त्याच्या फाईल्स किंवा महत्वाचा डाटा फाइल सर्व्हर मध्ये सुरक्षित रित्या साठवून ठेऊ शकतो. 

फाइल सर्व्हर हा संगणक नेटवर्क मधील मध्यवर्ती सर्व्हर असतो जो क्लायंट ला फाइल सिस्टीम प्रदान करतो.

म्हणुनच फाइल सर्व्हर वापरकर्त्यांना त्यांच्या अंतर्गत डेटासाठी मध्यवर्ती स्टोरेज देण्याच्या तयारीत असतो, जेणेकरून एकापेक्षा अधिक वापरकर्ते समान दस्तावेज, स्प्रेडशीट आणि ईतर डेटासह सहज कार्य करू शकतात.

 1. मेल सर्व्हर | Mail Server

मेल सर्व्हर मध्ये भरपूर सोफ्टवेअर मॉडेल असतात. जे ईमेल पाठवणे, प्राप्त करणे, अग्रेसित करने आणि रद्द केलेले मेल पुनर्प्राप्त करण्यास सक्षम होण्यासाठी कार्य करतात. मेल सर्व्हर चा एकमेव उद्देश म्हणजे Virtual पोस्ट ऑफीस च्या रुपात कार्य करणे.

जर वापरकर्ता मेल सर्व्हर मध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असला तर त्याला ईमेल क्लाएंट ची आवश्यकता असते आणि हे इंटर्नल मेसेज प्रोटोकॉल (आयएमपी) किंव्हा पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल (पिओपि) व्दारे केले जाते.

 1. डेटाबेस सर्व्हर | Database Server

हा एका प्रकारचा प्रोग्राम आहे ज्याचे काम आहे इतर प्रोग्रॅम्स ला डेटाबेस सिस्टीम मध्ये प्रवेश देणे. या सॉफ्टवेअर मध्ये ओरॅकल, पोस्ट ग्री SQL आणि DB 2 सामाविष्ट आहे. डेटाबेस सर्व्हर फाईल्स ला साठवून वेब सर्व्हर चे समर्थन करते. 

 1. गेम सर्व्हर | Game Server

ऑनलाईन गेम मधील डेटा व्यवस्थापनाचे कार्य गेम सर्व्हर करते. या सर्वर साठी हार्डवेअर विशिष्ठ प्रदात्यांचा डेटा सेंटर वरून मर्यादीत नेटवर्क द्वारें येऊ शकते.

 1. प्रॉक्सी सर्व्हर | Proxy Server

हे सर्व्हर संगणक नेटवर्क मध्ये संप्रेषण इंटरफेस म्हणून कार्य करते. म्हणजेच नेटवर्क वरील सर्व विनंत्या स्वीकारून त्यास त्यांच्या IP पत्त्यावर प्रेषित करतो. सोबतच त्या सर्व्हर चा उपयोग संप्रेषण फिल्टर करण्यासाठीं, बँडविडथ वर नियंत्रण ठेवण्यासाठी, लोड संतुलनासाठी डेटा कॅशे करण्यासाठीं केला जातो.

 1. DNS सर्व्हर | DNS Server

DNS सर्व्हर मानवी अनुकूल होस्ट नावा संबंधीत IP पत्त्यामध्ये अनुवादित करते. सोबतच नेटवर्क वरील नाव निराकरणास हे सर्वर जबाबदार राहते.

 1. क्लाउड सर्व्हर | Cloud Server

क्लाउड सर्व्हर चे भरपूर प्रकार आहेत आणि यामध्ये प्रत्येक क्लाउड सर्व्हर चे आप आपले एक विशेष कार्य असते. 

क्लाउड सर्व्हर च एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क सिस्टिम (VPS) ज्यामधे तुम्ही कुठलेही सॉफ्टवेअर इंस्टॉल करून रन करू शकता.

 1. प्रिंट सर्व्हर | Print Server

जर एकापेक्षा जास्त प्रिंटर्स हे एकमेकांना जोडले गेले असतील तर त्यांचा व्यवस्थापनाचे कार्य प्रिंट सर्व्हर कडे असते.

प्रिंट सर्व्हर ही एक अशी यंत्रणा आहे जी प्रिंटर्स ला क्लायंट कॉम्पुटर सोबत जोडण्याचे कार्य करते. हे कॉम्प्युटर जवळून प्रिंटिंग ची कार्य स्वीकारून योग्य त्या प्रिंटर कडे ते कार्य सोपवते.


सर्व्हर चे फायदे | Advantages of Server in Marathi

 1. सर्व्हर हे एक प्रकारची विश्वसनीयता जोडून ठेवण्याचे काम करते.
 2. कामात खंड न पाडता सतत कार्यरत राहण्यासठी क्षमता त्यात असते.
 3. सर्व्हर हे आकार किंवा क्षमता बदलण्यास सक्षम असते.
 4. सर्व्हर हे नेहमीच सहकार्य करण्यास तत्पर असते.
 5. सर्व्हर चा कार्य करायचा वेग हा डेस्कटॉप पीसी च्या तुलनेत अधिक असतो.
 6. एखादी महत्त्वाची फाइल चुकुन जरी डिलीट झाली तरी बॅकअप च्या साहाय्याने आपण ती माहिती पुनर्संचयित करू शकतो.

सर्व्हर चे तोटे | Disadvantages Of Server in Marathi

 1. सर्व्हर चा एक सर्वात मोठा तोटा म्हणजे डेस्कटॉप पीसी च्या तुलनेत हे जास्त महाग असते.
 2. सर्व्हर आधारीत सोफ्टवेअर हे शेवटपर्यंत टिकत नाहीत. केवळ पाच वर्षांपूरती त्याचा कालावधी मर्यादीत असतो आणि त्यानंतर मात्र तो निष्कामी होऊन जातो.
 3. सर्व्हर डाऊन होणे: काहीतरी ऑनलाईन कामानिमीत्त जेव्हां तुम्ही सायबर कॅफे वर जाता तेव्हा बऱ्याचदा तुम्हाला असं सांगण्यात येते की,  “सर्व्हर डाऊन आहे त्यामूळे तुमचं काम होउ शकत नाही”.

आता सर्वात आधी सर्व्हर डाऊन होणे म्हणजे काय ते जाणून घ्या.

जेव्हा एखाद्या विशिष्ठ हेतूसाठी असंख्य वापरकर्ते एकाच वेळी एखाद्या ठराविक URL ला भेट देत असतील तर सर्व्हर एकाच वेळी एवढ्या वापरकर्त्यांना सेवा देण्यास असमर्थ ठरते आणि परिणामी सर्व्हर डाऊन ची समस्या उद्भवते.


FAQ | नेहमी विचारले जाणारे प्रश्न

1. सोप्या शब्दात सर्व्हरला काय म्हणतात?

सर्व्हर हा शब्द ऐकायला जरी नविन असला तरीही त्याची कार्यप्रणाली जवळपास संगणकासारखीच आहे, जेव्हा तुम्ही सर्च इंजिन वर जाऊन काहीतरी सर्च करता, तेव्हा तुम्हाला योग्य तोच रिझल्ट मिळण्यामागे एक विशिष्ट्य प्रकारचा प्रोग्राम कारणीभूत असतो आणि तो प्रोग्रॅम म्हणजेच सर्व्हर.

सर्व्हर चे प्रकार किती व कोणकोणते आहेत?

सर्व्हर चे विविध कार्यानुसार विविध प्रकार आहेत, त्यांपैकी काही मोजके आणि महत्वाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. 
1. वेब सर्व्हर । Web Server
2. फाइल सर्व्हर | File Server
3. मेल सर्व्हर | Mail Server
4. डेटाबेस सर्व्हर | Database Server
5. गेम सर्व्हर | Game Server
6. प्रॉक्सी सर्व्हर | Proxy Server
7. प्रिंट सर्व्हर | Print Server
8. DNS सर्व्हर | DNS Server
9. क्लाउड सर्व्हर | Cloud Server
10. ॲप्लिकेशन सर्व्हर । Application Server

सर्व्हर डाउन होणे म्हणजे काय?

जेव्हा असंख्य वापरकर्ते एकाच वेळी एखाद्या ठराविक URL ला भेट देत असतील तर सर्व्हर एकाच वेळी एवढ्या वापरकर्त्यांना सेवा देण्यास असमर्थ ठरते आणि परिणामी सर्व्हर डाऊन ची समस्या उद्भवते.


निष्कर्ष | Server Information in Marathi

या लेखातून सर्वर बद्दलची संपुर्ण माहिती सोप्या शब्दांत आणि सविस्तरपणे आम्ही तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला आहे. सर्व्हर बद्दल समाधानकारक माहिती तुम्हाला मिळाली असेलच अशी आम्हाला अपेक्षा आहे.

जर आजचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या परिचयाच्या सर्व मित्रमंडळी सोबत नक्कीच शेअर करा. तसेच या लेखात काही त्रुटी असल्यास कृपया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. जेणेकरून आम्ही त्यात योग्य तो बदल करू आणि इतर वाचकांना देखिल फायद्याचे ठरेल.

आणि सोबतच अशा प्रकारची इंटरनेट, संगणक आणि नवनवीन टेकनॉलॉजि बद्दल च्या माहितीसाठी आमच्या मराठी स्पिरिट वेब साईट ची नोटिफिकेशन बेल प्रेस करा. 

Leave a Reply