ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे काय | Operating System in Marathi

ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे काय

आजच्या युगामध्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईल किंवा इंटरनेट चा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो, जर मोबाईल किंवा इंटरनेट नसते असा विचार केला तर आपण आपल्या जीवनाची कल्पनादेखील करू शकत नाही.

मोबाईल, संगणक हे एवढे महत्वाचे आहे तर हे सर्व डिव्हाइस कश्या प्रकारे काम करत असतील याचा कधी विचार केलाय का? कि मोबाईल, संगणकाला एखादी आज्ञा दिल्यानंतर लगेच काही सेकंदातच आपल्याला उत्तर मिळून जाते. 

मोबाईल, संगणक आणि लॅपटॉप या सर्वच डिवाइस चे कार्य सुरळीत चालण्यासाठी यामध्ये एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टिम (Operating System in Marathi) कार्य करत असते. 

आज आपण या पोस्ट मध्ये ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे काय? याच महत्वाच्या विषयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

जसे कि, Windows, Android, Apple macOS, Microsoft Windows, Google’s Android OS, and Apple iOS.

Linux Operating System बद्दल संपूर्ण माहिती वाचा.

ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे काय? | Operating System in Marathi

Operating System हि आपल्या मोबाईल किंवा संगणकातील सर्वात महत्वाची कार्य प्रणाली आहे, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये OS असे देखील म्हटले जाते. ऑपरेटिंग सिस्टिम संगणकाच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधील सर्वच कामांना संचालित करण्याचे आणि कंट्रोल करण्याचे कार्य करत असते. 

तसेच आपण जरी संगणकाला इंग्लिश, मराठी या भाषेमधून आज्ञा देत असू पण संगणकाला केवळ ० ते १ म्हणजेच Binary Language समजते. आणि आपण दिलेल्या आज्ञेचे बायनरी भाषेमध्ये रूपांतर करण्यासाठी संगणकाला OS ची गरज भासते. 

ऑपरेटिंग सिस्टम हे वापरकर्ता आणि संगणक यामध्ये एक प्रकारचे इंटरफेस प्रदान करतो आणि या इंटरफेस च्या माध्यमातून वापरकर्ता संगणकाशी संवाद साधू शकतो. ऑपरेटिंग सिस्टिम हे खूप साऱ्या छोट्या छोट्या प्रोग्रॅम्स चा एक समूह आहे, OS शिवाय संगणक हा व्यर्थ आहे.

तसेच हा प्रोग्रॅम्स चा समूह कॉम्प्युटरच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ला मॅनेज करण्याचे कार्य करतो. संगणक यामध्ये सर्वप्रथम OS लोड केले जाते, आणि लोड केलेले हे ऑपरेटिंग सिस्टिम संगणकाच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मध्ये एखाद्या ब्रिज सारखे काम करते, जेणेकरून कम्प्युटरचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकमेकांसोबत इंटरॅक्ट करू शकतील.

ऑपरेटिंग सिस्टिम ची बरीच वेगवेगळी नावे आहेत, पण त्या सर्वांचे काम मात्र एकच आहे की वापरकर्त्याला संगणकाशी Communicate करण्यास मदत करणे. Windows OS, Linux OS, IOS, Android OS, MS DOS, Symbian OS ही आतापर्यंतच्या काही प्रमुख ऑपरेटिंग सिस्टीमची नावे आहेत.

आणखी माहिती वाचा – कंट्रोल प्रोसेसिंग युनिट म्हणजे काय? संपूर्ण माहिती


ऑपरेटिंग सिस्टम काय काम करते? । How Operating System Work

संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टम हि अनेक महत्त्वपूर्ण कार्य करीत असते, जसे की जर एखाद्या व्यक्तीने कीबोर्ड च्या माध्यमातून दिलेली आज्ञा संगणकाच्या मॉनिटर वर म्हणजेच स्क्रीन वर प्रदर्शित करणे, हार्ड डिस्क ड्राईव्ह ला व्यवस्थापित करणे, त्याचबरोबर संगणकाच्या इतर डिवाइस सोबत संवाद साधण्याचे कार्य OS करीत असते. या व्यतिरिक्त देखील खूप कार्य OS करीत असते ते खालील प्रमाणे पाहूया. 

ऑपरेटिंग सिस्टिम बद्दल संपूर्ण माहिती

Memory Management

मेमरी मॅनेजमेंट म्हणजेच, प्रायमरी मेमरी किंवा मेन मेमरी व्यवस्थापन करणे तसेच या मेमरी मधील प्रत्येक कार्याला ट्रॅक करणे, आणि कोणत्या ठिकाणी अधिक मेमरी वापरली जात आहे आणि कुठे वापरली जात नाही यावर लक्ष ठेवणे, तसेच नवीन मेमरी उपलब्ध करून देणे. अश्या प्रकारची सर्व कार्य ऑपरेटिंग सिस्टिम करीत असते.

Processor Management

ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये प्रोसेसर चे वेळेनुसार कश्या प्रकारे व्यवस्थापन केले जाईल आणि त्याचे शेड्यूलिंग कसे असेल हे ठरविले जाते. तसेच OS प्रोसेसर आणि प्रोसेसिंग च्या प्रक्रियेवर सतत नजर ठेवून असते. यासाठी OS च्या ज्या प्रोग्रॅम चा वापर केला जातो त्याला ट्रॅफिक कंट्रोलर असे म्हणतात.

Device Management

OS आपल्या ड्रायव्हर च्या माध्यमातून डिवाइस कम्युनिकेशनचे मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापन करत असते, यासाठी OS सर्व डिवाइस वर नजर ठेवून असतो. आणि यासाठी जो प्रमुख प्रोग्राम वापरला जातो त्याला इनपुट आऊटपुट कंट्रोलर असे म्हणतात. कोणत्या प्रोसेसर ला किती वेळा साठी डिवाइस द्यायचे आहे हे OS ठरवत असते. 

आणखी माहिती वाचा – रॅम आणि रोम मध्ये काय फरक आहे संपूर्ण माहिती

File Management

संगणकामधील विविध फाइल्स चे स्थान, स्टेटस या व्यतिरिक्त फाईल केव्हा बनवली गेली, कोणी बनविली आणि फाईल ची साईज किती आहे अश्या प्रकारचे फाईल्स चे प्रत्येक कार्य OS ट्रॅक करते. 

Security

संगणकाला सुरक्षा प्रदान करणे हे ऑपरेटिंग सिस्टिम चे मुख्य आणि सर्वात महत्वाचे कार्य आहे. तुमच्या डिवाइस ला Unauthorized Access पासून वाचविणे, म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त तुमचे कॉम्पुटर इतर कोणीही हाताळू शकणार नाही. यासाठी पासवर्ड ठेवण्याची पूर्ण अनुमती आपल्याकडे असते आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही कंप्यूटर चालू करता त्यावेळी तुम्हाला पासवर्ड विचारला जातो, यामुळे तुमच्या डिवाइस ला सुरक्षा प्रदान होते.


ऑपरेटिंग सिस्टिम चे प्रकार | Type of Operating System in Marathi

वेळेनुसार आपली टेक्नॉलॉजी बहरत गेली आहे, त्याचबरोबर संगणकामध्ये देखील गेल्या काही वर्षात तुफान बदल झालेले आहेत. जेव्हापासून संगणक अस्तित्वात आले तेव्हापासूनच ऑपरेटिंग सिस्टिम देखील कार्यरत आहे. पण वेळेनुसार कम्प्यूटर मध्ये अमुलाग्र बदल झाल्यामुळे ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये देखील वेळोवेळी बदल करण्यात आलेले आहेत. 

आणि यामुळेच वेळोवेळी ऑपरेटिंग सिस्टिम चे नवनवीन वर्जन आणि फीचर्स तयार करण्यात आलेले आहेत. ऑपरेटिंग सिस्टमचे खूप प्रकार आहेत पण आपण काही महत्वाचे OS चे प्रकार पाहूया.

Multi User Operating System

Multi User म्हणजेच हे ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला एकापेक्षा अधिक लोकांना एकत्रित कार्य करण्याची परवानगी देते म्हणजे एकाच वेळेस एकच एप्लिकेशन्स अनेक लोकांना ऍक्सेस करण्याची परवानगी मिळते, याचा वापर मुख्यतः ऑफिसेस मध्ये केला जातो.

Single User Operating System

Single-user या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये एकाच वेळी फक्त एकाच व्यक्तीला कार्य करता येते जसे पर्सनल कॉम्पुटर मध्ये वापरले जाणारे ऑपरेटिंग सिस्टम हे सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टम असते.

Multitasking Operating System

Multitasking या ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये तुम्हाला एका वेळी अनेक टास्क करता येतात, जसे की ईमेल लिहिता-लिहिता गाणी ऐकणे, किंवा फेसबुक चालवणे या सर्व गोष्टी तुम्ही मल्टिटास्किंग ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये करू शकता.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

OS चा अर्थ काय आहे?

OS चा शब्दाचा फुल्ल फॉर्म ऑपरेटिंग सिस्टिम (Operating System) असा होतो.  

सर्वाधिक लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम कोणत्या?

Microsoft Windows, Apple macOS, Google’s Android OS, Apple iOS, Linux Operating System

ऑपरेटिंग सिस्टीमचे प्रकार कोणते आहेत?

Multi User Operating System
Single User Operating System
Multitasking Operating System
Batch Operating System
Real-Time Operating System
Time-Sharing Operating System
Distributed Operating System
Embedded Operating System
Network Operating System
Mobile Operating System


निष्कर्ष | Operating System Information in Marathi

ऑपरेटिंग सिस्टिम शिवाय संगणक हे व्यर्थ आहे, जर तुमच्या कॉम्पुटर मध्ये ऑपरेटिंग सिस्टिम INSTALL नसेल, तर तुमचा कीबोर्ड, कंप्यूटर, माउस, सीपीयू, यामध्ये कधीही संभाषण होऊ शकणार नाही. 

ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे काय? (Operating System Meaning in Marathi) हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमचा अभिप्राय कळवा आणि जर तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर कंमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. 

तसेच आम्हाला आशा आहे कि तुम्हाला नक्कीच पोस्ट आवडली असेल, तरी तुमचे काही प्रश्न आणि सूचना असतील तर नक्की कळवा. 

धन्यवाद !

Leave a Reply