Internal Linking म्हणजे काय? | Internal Linking in Marathi

Internal Linking म्हणजे काय

ब्लॉग ला सर्च इंजिन मध्ये रँकिंग मिळवायची असेल तर SEO म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे खूप महत्वाचे आहे. आणि या SEO चा एक महत्वाचा रँकिंग फॅक्टर इंटरनल लिंकिंग आहे. जर आपण ब्लॉग मध्ये इंटरनल लिंकिंग चा योग्य वापर केला तर नक्कीच आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. 

पण नवीन ब्लॉगर इंटरनल लिंकिंग करताना खुप चुका करत असतात ज्यामुळे इंटरनल लिंकिंग करण्याचा कुठलाही फायदा त्यांना प्राप्त होत नाही. म्हणूनच आज आपण या पोस्ट मध्ये Internal Linking म्हणजे काय? इंटरनल लिंकिंग करताना कोणती काळजी घ्यायला हवी, अंतर्गत दुव्याचे फायदे याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहूया. ज्यामुळे तुम्हाला हि इंटरनल लिंकिंग करताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि इंटरनल लिंकिंग चा फायदा सुद्धा होईल. 

चला तर पाहूया इंटरनल लिंकिंग बद्दल संपूर्ण माहिती 

Internal Linking म्हणजे काय? | Internal Linking Meaning in Marathi

इंटरनल लिंकिंग म्हणजे एकाच वेबसाईट मधील विविध अंतर्गत पेजेस वर जाण्यासाठी ज्या लिंक चा वापर केला जातो, त्यालाच इंटरनल लिंकिंग किंवा अंतर्गत दुवा असे म्हटले जाते. या अंतर्गत दुव्याच्या साहाय्याने वेबसाईट मधील संबंधित पेजेस एकमेकांशी कनेक्ट करू शकतो, म्हणजेच एका ब्लॉग मध्ये आपण दुसऱ्या ब्लॉग पोस्ट ची लिंक ऍड करू शकतो. 

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एकाच वेबसाईट वरील एका पेज ला दुसऱ्या पेज सोबत जोडणे म्हणजे अंतर्गत लिंकिंग होय. यामुळे प्रेक्षकांना एका पेज वरून दुसऱ्या पेज वर जाणे सोपे होते.  

तसेच इंटर्नल लिंक हे एकच डोमेन नेम असलेल्या वेबसाईट वरील पृष्ठाना निर्देशित करतात, हे दुवे बाह्य दुव्यांपेक्षा (External link) पूर्णपणे भिन्न असतात. कारण बाह्य दुव्यामध्ये इतर डोमेन नेम असलेल्या वेबसाईट वरून लिंक घेतल्या जातात. 

Internal Linking information marathi

या लिंक चा फायदा असा होतो कि युसर ला दुसरा ब्लॉग वाचण्यासाठी वेबसाईट च्या होम पेज वर जाण्याची गरज पडत नाही तो त्या ब्लॉग मधूनच दुसऱ्या ब्लॉग वर या लिंक च्या साहाय्याने जाऊ शकतो, आणि हवी असलेली माहिती मिळवू शकतो.

त्याचबरोबर इंटरनल लिंकिंग हा एक सर्वात महत्वाचा SEO रँकिंग फॅक्टर आहे यामुळे आपल्या ब्लॉग पोस्ट ची रँकिंग सुधारण्यास खुप मदत होते.  


इंटरनल लिंकिंग का महत्वाची असते? | Importance of Internal Links

  • इंटर्नल लिंक मुळे आपल्या वेबसाईट वरील एक ब्लॉग पोस्ट दुसऱ्या पोस्ट सोबत जोडल्या जाते, यामध्ये आपल्या साईट वरील एखादी जुनी पोस्ट जिच्यावर ट्रॅफिक कमी असेल तिला नवीन पोस्ट सोबत जोडू शकतो म्हणजेच इंटरलिंक करू शकतो. 
  • त्यामुळे आपल्या नवीन ब्लॉग पोस्ट वरती visit करत असलेला user एका पोस्ट वरून त्याच्याशी संबंधित असलेल्या दुसऱ्या पोस्टवर माहीती वाचण्यासाठी जात असतो. यामुळे आपल्या साईट चा बाउन्स रेट देखील कमी होतो. 
  • तसेच User आपल्या ब्लॉग पोस्ट वर जास्त वेळ घालवतो त्यामुळे आपल्या ब्लॉग पोस्ट ची User Engagement देखील वाढते. आणि युझर जास्तीत जास्त वेळ ब्लाँगवरील पोस्ट वाचतात. याचा अजुन एक फायदा होतो तो म्हणजे सर्च इंजिन रँकिंग वाढण्यास मदत होते. 
  • कारण सर्च इंजिन मध्ये ज्या वेबसाईट किंवा ब्लॉग पोस्ट वर user जास्त वेळ घालवतो तिथल्या पोस्ट वाचतो आणि कंमेंट करतो ती वेबसाईट इतर वेबसाइट पेक्षा युझरला जास्त value देत आहे असा संकेत सर्च इंजिन ला मिळतो आणि याच कारणाने सर्च इंजिन देखील त्या वेबसाइट हळु हळु रँक करत असते आणि आपल्या ब्लॉग वरील ऑरगॅनिक ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते. 

हे पण वाचा – बॅकलिंक बद्दल संपूर्ण माहिती


SEO मध्ये इंटरनल लिंकिंग चे फायदे | Internal Linking Benefits

  • इंटरनल लिंकिंग केल्याने सर्च इंजिनला आपल्या ब्लॉगवरील सर्व पेजेस, पोस्ट इंडेक्स करायला अणि ते पेजेस, पोस्ट कश्या संदर्भात आहे हे समजून घ्यायला अधिक सोपे होते. यामुळे च आपल्या ब्लॉग पोस्ट व पेजेस लवकर इंडेक्स, क्रॉलिंग करणे अधिक सोयीस्कर होते. 
  • आपल्या वेबसाईट वरील ब्लॉग पोस्ट हि तेव्हाच अधिक माहितीपूर्ण बनते जेव्हा एका ब्लॉग पोस्ट विषयी किंवा त्या पोस्ट च्या संबंधित असलेल्या विषयावर अधिक माहिती देणाऱ्या इतर पोस्ट एकमेकांसोबत इंटरलिंक केल्या गेल्या असतील. ज्यामुळे युझर ला त्या विषयाची सखोल आणि संपूर्ण माहिती प्राप्त होण्यास मदत होते. 
  • इंटर्नल लिंकिंग मुळे आपल्या वेबसाईट ची Authority, Page Ranking आणि Website Ranking वाढण्यास खूप मदत होते, आणि त्याचप्रमाणे आपल्या साईट चा बाउन्स रेट देखील कमी होतो.   
  • त्याचप्रमाणे इंटर्नल लिंक चा वापर केल्यामुळे आपल्या ब्लॉग Page View आणि CTR मध्ये मोठ्या प्रमाणात वृद्धी होऊन ऑरगॅनिक ट्रॅफिक मध्ये वाढ होते.  

इंटरनल लिंकिंग करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी 

  1. इंटरनल लिंकिंग करताना आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की एका पोस्ट शी संबंधित अधिक माहीती देत असलेल्या दुसऱ्या पोस्टला अंतर्गत दुव्याच्या साहाय्याने कनेक्ट करावे. यामुळे युझर कडून इंटरलिंक केलेल्या पोस्ट ला वाचण्याची जास्त शक्यता असते. कारण युझर ला त्या विषयाबद्दल अधिक माहिती प्राप्त करायची असते. उदा :- आपण जर SEO म्हणजे काय? ह्या विषयावर एखादे आर्टिकल लिहिले आहे तर या पोस्ट शी संबंधित SEO चे घटक कोणते? On Page SEO म्हणजे काय? किंवा Off Page SEO बद्दल संपूर्ण माहिती अश्या पोस्ट इंटरलिंक करायला हव्यात. 
  1. इंटर्नल लिंकिंग करताना मुख्य किवर्ड चा वापर करायला हवा, समजा आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन या टॉपिक वर एखादी पोस्ट लिहिली आहे तर आपण इंटर्नल लिंक करताना सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन किंवा SEO या मुख्य किवर्ड चा वापर करायला हवा. 
  1. एका ब्लॉग पोस्ट मध्ये अधिक प्रमाणात इंटर्नल लिंक तयार करू नये, याने पोस्ट वाचणारा युझर गोंधळात पडण्याची शक्यता असते. म्हणून इंटर्नल लिंक तयार करताना साधारणतः एका पोस्ट मध्ये ५ अंतर्गत दुवे ऍड करावे. 
  1. एका ब्लॉग पोस्ट मध्ये अधिक प्रमाणात इंटर्नल लिंक तयार करू नये, याने पोस्ट वाचणारा युझर गोंधळात पडण्याची शक्यता असते. म्हणून इंटर्नल लिंक तयार करताना साधारणतः एका पोस्ट मध्ये ५ अंतर्गत दुवे ऍड करावे. तसेच ज्या पोस्ट ची रँकिंग, पेज व्युव्ह वाढवायचे असेल अश्या पोस्ट ला अधिक इंटर्नल लिंक तयार कराव्यात. 

इंटरनल लिंकिंग कशी करायची? | Internal Link Meaning in Marathi

  • सर्वात आधी ज्या किवर्ड किंवा anchor text ला अंतर्गत दुवा द्यायचा आहे, तो किवर्ड माऊस कर्सर ने सिलेक्ट करून घ्यावा.
  • किवर्ड सिलेक्ट केल्यानंतर एक लिंक आयकॉन दिसेल त्या वर क्लिक करा नंतर आपल्याला ज्या पोस्ट ची लिंक द्यायची आहे ती लिंक add करा. 
  • यात आपण दोन पदधतीने लिंक ऍड करू शकतो एक डायरेक्ट लिकिंग दुसरे टेक्स्ट किंवा किवर्ड शी संबंधित पोस्ट शोधून त्याला इंटरनल लिंक देऊ शकतो.
इंटरनल लिंकिंग
  • इंटर्नल लिंक ऍड करताना तीन पर्याय दिसतात एक म्हणजे Open new tab या मध्ये आपण जी इंटर्नल लिंक ऍड केलेली आहे ती नवीन टॅब मध्ये ओपन होईल.
  • दुसरा पर्याय Set to nofollow हा असेल यामध्ये जर आपल्याला Nofollow लिंक द्यायची असेल तर हा पर्याय सिलेक्ट करावा. आणि तिसरा पर्याय म्हणजे Set to sponsored link यामध्ये जर आपण स्पॉन्सर केलेली लिंक ऍड केली असेल तर या पर्यायावर वर क्लिक करावे.  
Internal Linking example

वरील योग्य पर्याय सिलेक्ट केल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करावे. 


FAQ | नेहमी विचारले जाणारे प्रश्न

इंटरनल लिंकिंग महत्वाची का आहे?

इंटरनल लिंकिंग खूप महत्वाचे आहे कारण सर्च इंजिन ला आपल्या वेबसाईट ब्लॉगवरील सर्व पेजेस, पोस्ट इंडेक्स करायला अणि ते पेजेस, पोस्ट कश्या संदर्भात आहे हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे सोपे होते आणि त्यामुळे सर्च इंजिन रँकिंग सुधारण्यास मदत होते. तसेच युझर आपल्या ब्लॉग पोस्ट वर जास्त वेळ घालवतो त्यामुळे आपल्या ब्लॉग पोस्ट ची User Engagement देखील वाढते. आणि त्यामुळे वेबसाईट ब्लॉग चा बाउन्स रेट कमी होतो आणि ऑरगॅनिक ट्रॅफिक वाढण्यास मदत मिळते. 

इंटरनल लिंकिंग चे प्रकार कोणते आहेत? | Type of Internal Link

Contextual links
Navigational links
Footer links
Image links

एका पोस्ट मध्ये किती इंटरनल लिंक देता येतील?

एका पोस्ट मध्ये साधारणतः दोन ते दहा किंवा त्यापेक्षा जास्त इंटरनल लिंक देऊ शकतो.

इंटरनल लिंक्स हे बॅकलिंक आहेत का?

नाही, इंटरनल लिंक हे एकच डोमेन नेम असलेल्या वेबसाईट वरील पृष्ठाना निर्देशित करतात, म्हणजेच एकाच वेबसाईट मधील एक पेज दुसऱ्या पेज सोबत जोडले जाते. म्हणून त्यांना आपण बॅकलिंक म्हणू शकत नाही. बॅकलिंक म्हणजे बाह्य दुवे (External Link) होय. बाह्य दुव्यामध्ये इतर डोमेन नेम असलेल्या वेबसाईट वरून लिंक घेतल्या जातात.

अंतर्गत लिंकिंग चे उदाहरण काय आहे?

इंटरनल लिंक हा एक दुवा आहे जो एकाच डोमेन मधील दुसर्‍या पेज ला निर्देशित करते. म्हणजेच एकाच वेबसाईट मधील एक पेज दुसऱ्या पेज सोबत कनेक्ट केले जाते. इंटरनल लिंक हायपरलिंक्स मध्ये दर्शविले जातात.


निष्कर्ष | Internal Linking Information in Marathi

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला इंटरनल लिंकिंग म्हणजे काय? इंटरनल लिंकिंग कश्या प्रकारे केली जाते, तसेच इंटरनल लिंकिंग चे फायदे आणि इंटरनल लिंकिंग करताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल.

या ब्लॉग पोस्ट बद्दल तुमचे काही प्रश्न, समस्या किंवा सूचना असतील तर नक्की कळवा, आम्ही तुमच्या सूचनेनुसार या पोस्ट ला अपडेट करू. तसेच तुम्हाला अंतर्गत दुव्या बद्दलची वरील माहिती कशी वाटली कंमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या मित्रांना सुद्धा वरील ब्लॉग पोस्ट शेअर करा.   

धन्यवाद !!

Leave a Reply