बॅकलिंक म्हणजे काय? What is Backlink in Marathi

बॅकलिंक म्हणजे काय व बॅकलिंक्स कशी बनवायची

नमस्कार मित्रांनो,

जेव्हा पण तुमच्या ब्लॉग ला सर्च इंजिन मध्ये SEO पॉईंट ऑफ व्हिव ने Successful बनवायचा असेल तर वेबसाइट ला High Quality बॅकलिंक असणे महत्वाचे आहे. बॅकलिंक मुळे वेबसाइट ला सर्च इंजिन मध्ये एक प्रकारचा ट्रस्ट तयार होतो त्यामुळे तुमच्या वेबसाइट ची ऑथॉरिटी वाढते.

वेबसाईट साठी उच्च गुणवत्ता बॅकलिंक तयार करायच्या असतील तर आपण या लेखामध्ये बॅकलिंक म्हणजे काय? व उच्च गुणवत्ता बॅकलिंक्स कसे तयार करावे या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

तर चला बघूया बॅकलिंक काय आहे? व ते कश्या प्रकारे काम करते 

बॅकलिंक म्हणजे काय? (BackLink Meaning in Marathi)

जेव्हा पण तुम्ही ब्लॉग वेबसाईट सुरु करता तेव्हा ब्लॉग रँकिंग साठी बॅकलिंक्स हा खूप महत्वाचा भाग असतो. सर्च इंजिन मध्ये आपल्या वेबसाइटला रँक करण्यासाठी उच्च गुणवत्ता बॅकलिंक तयार केले जातात.

What is Backlink in Marathi

तसेच आपल्या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणावर Organic Traffic आणण्यासाठी High Quality बॅक लिंकचा वापर केला जातो. (What is Backlink in Digital Marketing and How to Create Backlink in SEO)

सोप्या भाषेत बॅकलिंक काय असते?

जेव्हा एका पेज वरन दुसऱ्या साईट च्या पेज ला लिंक दिली जाते त्याला च बॅकलिंक म्हणतात.

जेव्हा वेबसाइटला बाह्य (किंवा अन्य) साईट वरून लिंक मिळते तेव्हा त्यास बॅकलिंक असे म्हणतात.

उदाहरणार्थ, 

जर एखाद्या वेबसाईटला सर्च इंजिन मध्ये चांगली ऑथॉरिटी असेल आणि त्या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात व्हिसिटर्स येत असतील, तर अशा वेबसाईटवर आपल्या वेबसाइटची लिंक दिली असता. त्या साईट मधनं आपल्या वेबसाइट ला ऑथॉरिटी मिळते व आपल्या वेबसाइट मध्ये मोठ्या प्रमाणात व्हिसिटर्स पण येऊ शकतात आणि आपल्या वेबसाईटवर रहदारी वाढू लागेल यालाच बॅक लिंक घेणे असे म्हणतात.

आणखी वाचा – SEO म्हणजे काय व त्याचे प्रकार 


बॅकलिंक चे कोण कोणते प्रकार आहेत | Backlink Type in Marathi

बॅक लिंक चे दोन मुख्य प्रकार आहेत #1. डू-फॉलो बॅकलिंक  #2. नो-फॉलो बॅकलिंक ते पुढीलप्रमाणे पाहूया. 

1) डू-फॉलो बॅकलिंक | Do-Follow Backlink in Marathi

Do Follow बॅकलिंक लाच लिंक जूस असे सुद्धा म्हटले जाते. या मध्ये डू-फॉलो बॅकलिंक्स चा सहाय्याने एका वेबसाईट वरून दुसऱ्या वेबसाईट मध्ये लिंक ज्युस पास केला जातो, या लिंक च्या साहाय्याने सर्च इंजिन वर आपली वेबसाईट ची रँकिंग वाढायला मदत होते आणि चांगली ऑथॉरिटी मिळते 

आपण दुसऱ्या वेब साईटच्या पोस्ट मध्ये जे लिंक देतो ते सर्व लिंक Do Follow लिंक असतात.

Dofollow backlinks समजण्यासाठी खालील उदाहरण दिले आहे,

<a href="www.yourdomain.com">LinkText<a/>

डू-फॉलो बॅकलिंक चे फायदे | Benefits Of Dofollow Backlink In Marathi

 • वेबसाइट ची ऑथॉरिटी  मदत होते 
 • सर्च इंजिन मध्ये रँकिंग वाढते 
 • मोठ्या प्रमाणात व्हिजिटर्स येतात 
 • पेज रँक वाढायला मदत होते 

2) नो-फॉलो बॅकलिंक | No-Follow Backlink in Marathi

या प्रकारच्या लिंक मध्ये लिंक ज्युस पास केल्या जात नाही, या लिंक च्या मदतीने आपल्या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढू शकते, पण या रहदारीचा सर्च इंजिन च्या रँकिंग वर काहीही परिणाम होत नाही. म्हणूनच No follow व Do Follow ह्या दोन्ही लिंक घेणे महत्त्वाचे असते.

No Follow लिंक च्या मदतीने आपल्या वेबसाईटवर Traffic वाढते. पण या लिंक चा सर्च इंजिन च्या रँकिंग वर काहीही परिणाम होत नाही.

<a href="www.yourdomain.com"> rel="nofollow">Link Text</a>

नो-फॉलो बॅकलिंक बॅकलिंक चे फायदे | Benefits Of Nofollow Backlink In Marathi 

 • मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक येते 
 • डोमेन आणि पेज ची ऑथॉरिटी इम्प्रोव्ह होते  
 • ब्रॅण्ड ची Awareness वाढते 

आणखी वाचा – डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय व त्याचे प्रकार

आता आपण बॅकलिंक म्हणजे काय (What is Backlink Building in Marathi) व त्याचे कोण कोणते प्रकार आहेत हे समजून घेतले, खालील प्रमाणे बॅकलिंक्स मध्ये असणाऱ्या काही महत्वाच्या संज्ञा विषयी जाणून घेऊया. 

1) लिंक ज्युस | Link Juice

आपल्या वेबसाईटची लिंक दुसऱ्या वेबसाईटला जोडली असता, जेव्हा Crawler त्या लिंक वरून Crawl करून आपल्या वेबसाईटवर येतो, त्यामुळे आपल्या वेबसाइट ला लिंक ज्युस पास होतो.  Link Juice आपल्या ब्लॉग ची रँकिंग सुधारण्यास मदत करते आणि त्यामुळे सर्च इंजिन मध्ये वेबसाईट ची ऑथॉरिटी वाढते 

2) कमी गुणवत्ता लिंक | Low Quality link 

एखाद्या चुकीच्या साईटची किंवा स्पॅम साईट वरण आपल्या साईट ला लिंक येते त्या लिंक लाच Low Quality link म्हणतात. अशा बॅकलिंक्स आपल्या वेबसाईटला जोडल्या असता, आपल्या वेब साइट चे नुकसान होते व त्यामुळे आपल्या साईट ची रँकिंग डाऊन होऊ शकते. म्हणून च लिंक घेताना उच्च गुणवत्तेच्या वेबसाईट तपासून लिंक घेणे महत्वाचे असते.

3) उच्च गुणवत्ता लिंक | High Quality Link 

High Quality Link च्या लिंकला सर्च इंजिन मध्ये खूप महत्व असते. उच्च गुणवत्ता किंवा लोकप्रिय असणाऱ्या साईट वरून घेतलेली लिंक आपल्या वेबसाईट ला सर्च इंजिन मध्ये लवकर रँक करण्यास सहायता करते. अश्या साईट वरून No-Follow Backlink घेतली असता आपल्या साईट ची रँकिंग साठी खूप मदत होते.

आणखी वाचा – वर्डप्रेस म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये


उच्च गुणवत्ता बॅकलिंक कशी बनवायची

खाली आम्ही काही उदाहरणे दिली आहेत, त्या मधून चांगल्या प्रकारे बॅकलिंक बनवू शकता. Step by Step to Create High Quality Backlink. 

1) गेस्ट पोस्टिंग 

High quality बॅक लिंक तयार करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे Guest Posting होय. जर आपण चांगल्या आणि जास्त लोकप्रिय वेबसाईटवर किंवा ब्लॉग वर Guest Posting करत असाल तर तुम्हाला सर्वात चांगली आणि उच्च दर्जाची बॅक लिंक मिळते. 

यामध्ये आपल्याला गेस्ट पोस्ट साईट ओनर ला कॉन्टॅक्ट करून त्यांना आपण Unique आर्टिकल देतो आणि त्या बदल्यात त्यांच्या साईट वरून उच्च दर्जाची बॅकलिंक मिळवतो. 

अशा प्रकारे तुम्ही गेस्ट पोस्टिंग करून चांगल्या व उच्च दर्जाच्या बॅकलिंक मिळवू शकता. यामधून आपल्या ब्लॉग वर रहदारी येते, आणि आपला ब्लॉग सर्च इंजिन वर रँक होऊ शकतो.

2) कंमेंट लिंक

उच्च गुणवत्तेच्या बॅक लिंक तयार करण्यासाठी कंमेंट लिंक हा सर्वात सोपा मार्ग समजला जातो. High Authority असलेल्या साईट वर किंवा ब्लॉग वर कंमेंट करून, त्या कंमेंट मध्ये आपल्या वेबसाइटची किंवा पेज ची लिंक दिली जाते, यालाच कंमेंट लिंक असे म्हणतात.

कमेंट लिंक मधून सहसा No Follow लिंकच मिळते, त्यामुळे सर्च इंजिन मध्ये वेबसाइट ची Authority आणि Trust वाढायला मदत होते. 

3) सोशल बुकमार्किंग लिंक 

सोशल बुक मार्किंग म्हणजे च सोशल मीडिया साईट्स, या मध्ये आपल्याला दोन्ही प्रकारच्या Do Follow आणि नो Follow लिंक मिळवता येतात. सोशल बुकमार्किंग चे खूप सारे फायदे आहेत, याचा साहाय्याने आपण साईट ची माहिती ऑनलाईन साठवून ठेऊ शकतो. 

सोशल बुकमार्किंग साईट्स मधून बॅकलिंक घेतली तर आपल्या वेबसाईट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हिसिटर्स येऊ शकतात, केवळ आपल्याला योग्य प्रकारे कन्टेन्ट प्रमोट करता आले पाहिजे. Social Bookmarking च्या मदतीने आपली वेबसाईट फास्टली इंडेक्स होते, व सोशल सिग्नल च्या साहाय्याने रँकिंग होण्यास मदत होते. 

जर तुम्हाला व सोशल मीडिया म्हणजे काय व त्याचे कोणकोणते फायदे आहेत हे माहिती करून घ्यायचे असेल तर आमच्या ब्लॉग पोस्ट ला भेट द्या. 

4) प्रश्न आणि उत्तर 

अश्या प्रकारच्या प्रश्न आणि उत्तर वेबसाईट्स मध्ये प्रश्न विचारली जातात व त्याची उत्तरे दिल्या जातात, या वेबसाईट मध्ये आपल्याला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळते व आपण काही प्रश्नांची उत्तरे देऊन  त्या मध्ये आपल्या वेबसाईट ची लिंक समाविष्ट करू शकतो. 

यामुळे आपल्याला High Quality ची लिंक मिळते आणि मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक येऊ शकते. म्हणून अशा प्रकारच्या वेबसाईट वरून बॅक लिंक घेतली तर ती आपल्या साईट साठी खूप महत्वाची ठरेल. 

Question and Answer मध्ये पुढील प्रमाणे काही वेबसाईट्स येतील  – Quora आणि Reddit.

5) फोरम लिंक 

आपण Forum join करून High Quality च्या लिंक बनवू शकतो. फोरम साईट मध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातात, आणि या प्रश्नाची उत्तरे आपल्याला द्यायची असतात. या उत्तरांमध्ये  आपण आपल्या वेबसाईटची किंवा पोस्टची लिंक देऊ शकतो व तसेच Forum च्या Profile मध्ये आपल्याला चांगली बॅकलिंक येऊ शकते.


FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Do-Follow Backlink म्हणजे काय?

Do Follow बॅकलिंक लाच लिंक ज्यूस असे म्हटले जाते. या बॅकलिंक च्या साहाय्याने एका वेबसाईट वरून दुसऱ्या वेबसाईट मध्ये लिंक ज्युस पास केला जातो, तसेच Do-Follow Backlink च्या साहाय्याने सर्च इंजिन वर आपली वेबसाईट ची रँकिंग वाढायला मदत होते आणि चांगली ऑथॉरिटी मिळते.

No-Follow Backlink म्हणजे काय?

No Follow बॅकलिंक मध्ये लिंक ज्युस पास केल्या जात नाही, या लिंक च्या मदतीने आपण आपल्या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढवू शकतो, पण या रहदारीचा सर्च इंजिन च्या रँकिंग वर काहीही परिणाम होत नाही. No-Follow Backlink घेतल्यामुळे डोमेन आणि पेज ची ऑथॉरिटी इम्प्रोव्ह होते आणि ब्रॅण्ड ची Awareness वाढण्यास मदत होते.

बॅकलिंक म्हणजे काय?

बॅकलिंक म्हणजे एका वेबपेज किंवा वेबसाइट ची लिंक दुसऱ्या वेबसाइट वेबपेज वर ऍड करणे होय. सर्च इंजिन मध्ये वेबसाइटला रँक करण्यासाठी उच्च गुणवत्ता बॅकलिंक तयार केले जातात. तसेच आपल्या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणावर ऑरगॅनिक ट्रॅफिक आणण्यासाठी High Quality बॅक लिंकचा वापर केला जातो.


निष्कर्ष :

मला खात्री आहे की तुम्हाला आमच्या या लेखांमधून बॅकलिंक म्हणजे काय? (Backlink in Marathi) बॅकलिंक चे प्रकार,  बॅकलिंक कसे तयार करावे हे समजले असेल.

तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच कंमेंट करा आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.

🙏🙏धन्यवाद! 🙏🙏

Leave a Reply

This Post Has 14 Comments

 1. तुकाराम गायकर

  खूप छान मार्गदर्शन केले. धन्यवाद सर.
  💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

 2. Charudatta Sawant

  छान माहिती दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद.
  फोरमची काही उदाहरणे, नवे देऊ शकाल का?

 3. Pandurang Chemate

  खूप छान माहिती दिली सर, त्याबद्दल धन्यवाद 🌹🙏👍🌹🌹🌹🌹

 4. Vijay pralhad nikam

  खूपच छान

 5. 360marathi

  Amazing information about backlinks dear.. Keep posting

  marathi madhye fakt tumhich digital marketing bddl quality content detay

  once again amazin

 6. marathi beast

  thank you sir for this valueable

 7. M.T

  Thanks For the Valuable Information…

 8. Como Font

  I read this post your post so charming and uncommonly instructive post appreciation for sharing this post.