वर्डप्रेस म्हणजे काय? WordPress वर वेबसाइट कशी बनवायची

वर्डप्रेस म्हणजे काय? वर्डप्रेस बद्दल संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो, बऱ्याच लोकांना स्वतःची वेबसाईट किंवा ब्लॉग तयार करायचा असतो, परंतु कोडींग चे knowledge नसल्यामुळे ते लोक वेबसाईट सुरु करू शकत नाहीत. पण आता आपल्याला वर्डप्रेस मध्ये वेबसाईट सुरु करण्यासाठी कोणत्याही कोडींग  knowledge आवश्यकता नाही कारण आता वर्डप्रेस मध्ये अगदी सोप्या पद्धतीने वेबसाईट सुरु करू शकतो.

आज आपण या लेखामध्ये वर्डप्रेस म्हणजे काय आहे? (What is WordPress in Marathi), वर्डप्रेस मध्ये वेबसाइट कशी बनवायची तसेच वर्डप्रेस मध्ये कोणते वैशिष्ट्य आहेत जे वर्डप्रेस ला अधिक लोकप्रिय बनवतात.

या सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखामध्ये पाहायला मिळतील म्हणून तुम्ही हा लेख काळजीपूर्वक वाचायला हवा.

तर चला मग न उशीर करता वर्डप्रेस म्हणजे काय आहे ते शिकूया. WordPress Tutorial and Learn WordPress in Marathi.


वर्डप्रेस म्हणजे काय? |WordPress Meaning in Marathi

WordPress हा जगातील सर्वात मोठा वेबसाईट निर्मिती टूल आहे, ज्यांच्या साहाय्याने आपण प्रोफेशनल वेबसाईट आणि ब्लॉग तयार करू शकतो. वर्डप्रेस म्हणजे मुक्त स्रोत व्यवस्थापन प्रणाली होय. म्हणजेच कन्टेन्ट मॅनेजमेंट सिस्टिम होय, आणि यामध्ये PHP आणि SQL चे मिश्रण आहे. वर्डप्रेस ही सर्वात सोपी आणि शक्तीशाली वेबसाईट आणि ब्लॉगिंग व्यवस्थापन प्रणाली आहे.

वर्डप्रेस मध्ये आपल्याला वेबसाईट चांगल्या पद्धतीने तयार करता येते, कारण वर्डप्रेस मध्ये वेबसाईट तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कोडींग नॉलेज ची किंवा वेब डिझाईन शिकण्याची गरज नसते. यामध्ये आपण कोडिंग चे किंवा वेब डिझाईन चे ज्ञान नसताना सुद्धा चांगल्या तर्हेने वेबसाईट तयार करू शकतो. 

तसेच यामधून आपण प्रोफेशनल वेबसाईट फ्री मध्ये सुरु करू शकतो, परंतु याला डोमेन आणि वेब होस्टिंग ची आवश्यकता असते.  

वेबसाईट तयार करण्यासाठी वर्डप्रेस मराठीमध्ये सर्व टूल्स आणि पर्याय उपलब्ध असतात. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने वेबसाईट बनवू शकतो. जर आपण नवीन ब्लॉग किंवा वेबसाईट तयार करत असाल तर आपल्यासाठी वर्डप्रेस हा उत्तम प्लैटफॉर्म ठरेल. 

वर्डप्रेस “Matthew Charles Mullenweg यांनी वयाच्या 20 व्या वर्षी तयार केले. आणि वर्डप्रेस 2003 मध्ये launch करण्यात आलं. तेव्हा पासून वर्डप्रेस इतका लोकप्रिय झाले की जगातील सरासरी 40℅ वेबसाईट ह्या वर्डप्रेसवर तयार केल्या जातात.


प्रोफेशनल वेबसाईट तयार करण्यासाठी वर्डप्रेसच का वापरले जाते

प्रोफेशनल वेबसाईट वर्डप्रेस च का निवडतात, या शिवाय जगामध्ये खूप Website Creation Tools आहेत, पण तरीही वर्डप्रेस चाच वापर करतात त्याची काही कारणे पाहूया.

1) प्रोफेशनल वेबसाईट तयार करण्यासाठी कोडींग येणे सर्वात महत्वाचे आहे. ज्याला कोडींग येते त्यालाच वेबसाईट तयार करता येते.

2) किंवा आपण कोणत्याही Web Developer ला सांगून, वेबसाईट तयार करून घेऊ शकतो. पण वेब डेव्हलोपर कडून वेबसाईट तयार करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात किंमत मोजावी लागते. 

पण WordPress Marathi Blogs मध्ये वेबसाईट तयार करण्यासाठी या गोष्टीची आवश्यकता नसते म्हणजेच वर्डप्रेस मध्ये आपल्याला कोडींग न शिकताही किंवा Developer ला पैसे न देताही वेबसाईट तयार करता येते. म्हणूनच प्रोफेशनल वर्डप्रेस चाच वापर करतात.


वर्डप्रेस चे प्रकार (Type of WordPress in Marathi)

वर्डप्रेस चे प्रकार इन मराठी

वर्डप्रेस चे दोन मुख्य प्रकार पडतात ते आपण जाणून घेऊया.

1) WordPress.Com

या प्रकारांमध्ये आपल्याला विनामुल्य वेबसाईट तयार करता येते, यामध्ये वेबसाईट बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारची किंमत मोजावी लागत नाही. नवीन ब्लॉग बनवण्यासाठी WordPress.com हा एक उत्तम प्लैटफॉर्म आहे. पण यामध्ये आपल्याला काही ठराविक फीचर्स चाच वापर करता येतो. जसे आपण blogger.com वर आपली वेबसाईट तयार करतो त्याचप्रकारे WordPress.com वर वेबसाईट बनवू शकतो. 

2) WordPress.Org

WordPress.org लोकप्रिय Open-Source वेबसाइट प्लैटफॉर्म आहे. ज्यांच्या साहाय्याने आपण फ्री मध्ये प्रोफेशनल वेबसाईट किंवा ब्लॉग तयार करू शकतो. पण यासाठी तुम्हाला डोमेन आणि  होस्टिंग ची आवश्यकता असते.  यामध्ये आपण Theme, Plugin आणि इतर रिसोर्सेस  चा वापर करून कुठल्याही प्रकारची वेबसाईट बनवू शकतो. 


वर्डप्रेस ची वैशिष्ट्ये | WordPress Feature in Marathi  

आजच्या काळात वर्डप्रेस हे खूप लोकप्रिय झाले आहे. वेबसाईट किंवा ब्लॉग तयार करण्यासाठी वर्डप्रेस हा उत्तम प्लैटफॉर्म समजला जातो. वर्डप्रेस कसे काम करते? व वर्डप्रेसचे काही वैशिष्ट्ये आहेत. हे वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे पाहूया.

 • मुक्त स्रोत व्यवस्थापन | Open Source

वर्डप्रेस हे Open Source म्हणजेच मुक्त स्रोत व्यवस्थापन प्रणाली आहे. म्हणूनच वर्डप्रेसचा अगदी सोप्या पद्धतीने याचा वापर केला जातो. तसेच कोणत्याही कोडींग नॉलेज न शिकताही आपण वर्डप्रेसचा वापर सुलभतेने करू शकतो.

 • वापरायला सोपे |  Easy to Use

वर्डप्रेस हे वापरण्यास खूप सुलभ आहे. वर्डप्रेसचा वापर करण्यासाठी आपल्याला डेव्हलपर होण्याची गरज नाही. आपण स्वतः युट्युब वर वर्डप्रेस संदर्भात विडिओ पाहून ब्लॉग सुरु करू शकतो. 

 • कमी खर्चिक | Cost Effective

जेव्हा तुम्ही वर्डप्रेस मध्ये वेबसाईट बनवता तेव्हा वर्डप्रेस तुम्हाला काही फीचर्स फ्री मध्ये प्रोव्हाइड करतो, पण तुम्हाला सर्वच रिसोर्सेस चा वापर करायचा असेल तर तुम्हाला काही प्रमाणात खर्च करावा लागतो.  

 • एस.ई.ओ सुविधा | SEO Facility

वर्डप्रेस मध्ये आपल्याला SEO च्या खूप साऱ्या सुविधा मिळतात. आपल्या वेबसाइट किंवा ब्लॉगचा  रँकिंग करण्यासाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन खूप महत्वाचा आहे. वर्डप्रेस मध्ये आपण SEO Plugins (Rank Math, Yoast SEO) च्या मदतीने आपल्या वेबसाईट सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन चांगल्या तर्हेने करू शकता. 

 • No Need Coding knowledge 

वर्डप्रेस मध्ये वेबसाईट तयार करण्यासाठी Programing knowledge ची काहीही आवश्यकता नसते. या मध्ये आपण कोडींगचे ज्ञान नसतानाही चांगल्या प्रकारे वेबसाईट तयार करू शकतो. तसेच वर्डप्रेसचा वापर करणे खूप सोपे आहे.


वर्डप्रेस वर वेबसाइट कशी तयार करायची? | Start WordPress Website in Marathi

WordPress हे एक सर्वात लोकप्रिय CMS (Content Management System) आहे. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची वेबसाईट फ्री मध्ये बनवू शकतो .

वर्डप्रेस हा वेबसाईट बनवण्यासाठी एक उत्तम प्लैटफॉर्म बनला आहे, मी सुद्धा वर्डप्रेस चाच वापर करतो. वर्डप्रेस मध्ये मुक्त स्रोत Open Source सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत, तसेच वर्डप्रेस मध्ये विविध प्रकारचे Features आणि Plugins उपलब्ध आहेत, या मधील काही Features आपण फ्री मध्ये सुद्धा वापरू शकतो. जे आपल्या ब्लॉग पोस्ट ला Fully Customize करू शकतात.

जर तुम्हाला तुमचा वर्डप्रेस वेबसाईट तयार करायची असेल तर पुढील स्टेप Follow करा | Step by step WordPress Website Tutorial in Marathi

 1. डोमेन आणि वेब होस्टिंग निवडणे 

वर्डप्रेस वर वेबसाईट तयार करण्यासाठी Domain Name ची गरज असते, डोमेन नेम हे वेबसाईटचा पत्ता असतो, जे व्हिसिटर्स आपल्या वेब साइटला भेट देण्यासाठी येतात ते Users वेबसाईटचा पत्ता Browser च्या URL मध्ये टाईप करतात. 

तसेच वेबसाईट साठी Web Hosting सुद्धा खूप महत्वाची आहे. यामध्ये आपल्या वेबसाईट च्या सर्व प्रकारच्या फायली एका सर्व्हर मध्ये साठवल्या जातात. तसेच तुम्ही डोमेन आणि होस्टिंग एकाच कंपनी कडून खरेदी करू शकता. 

2. वर्डप्रेस इन्स्टॉल करणे 

डोमेन आणि होस्टिंग घेतल्यानंतर तुम्हाला cPanel मध्ये सॉफ्टवेअर इंस्टॉलर म्हणून एक पर्याय दिसेल, त्या मधून तुम्हाला WordPress Installation in Marathi करता येईल. 

3. वर्डप्रेस Themes निवडणे 

वर्डप्रेस थिम्स निवडणे

आता वर्डप्रेस स्थापित झालेले आहे त्यानंतर तुम्हाला वर्डप्रेस मध्ये जाऊन Appearance या पर्यायावर क्लिक करून Theme मध्ये जाऊन तुम्ही नवीन Theme Add करू शकता. वर्डप्रेस तुम्हाला विविध प्रकारच्या Themes फ्री मध्ये प्रोव्हाइड करतो. त्यामधील कोणत्याही थिम चा तुम्ही वापर करू शकता.

4. Customize ब्लॉग आणि Plugins 

प्लगइन स्थापित करणे

वेबसाईट Customize करताना आपल्याला आवश्यक Plugins Install करावे लागतात, Plugins चा वापर करून आपण आपला आकर्षक वर्डप्रेस ब्लॉग बनवू शकतो. त्यामध्ये Social Share Buttons, Contact Form, About us, Website speed, Table of Contents, यासारखे खूप Plugins इन्स्टॉल करणे गरजेचे असते.

5. Publish ब्लॉग पोस्ट 

वर्डप्रेस मध्ये नवीन पोस्ट तयार करणे

आपण वर्डप्रेस मध्ये योग्य Theme आणि Plugins सुद्धा स्थापित केले आहेत, त्यानंतर आपल्याला Post या Option मध्ये जाऊन नवीन ब्लॉग पोस्ट तयार करून Publish करू शकतो.

6. आपला ब्लॉग Google आणि अन्य सर्च इंजिनवर सबमिट करणे 

ब्लॉग गुगल आणि अन्य सर्च इंजिनवर सबमिट करणे

शेवटच्या स्टेप मध्ये तुम्हाला वेबसाईट ला Google Search Console मध्ये सबमिट करावा लागतो, जेव्हा तुम्ही ब्लॉग ला सबमिट करता तेव्हा तुम्हाला एक Code मिळतो तो तुम्हाला वेबसाईट मध्ये Add करणे गरजेचे असते. त्यानंतर दोन किंवा तीन दिवसांमध्ये तुमची वेबसाईट किंवा ब्लॉग Google Search इंजिन किंवा इतर सर्च इंजिन मध्ये दिसायला लागतो. 


FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

वर्डप्रेस काय आहे?

वर्डप्रेस हा जगातील सर्वात मोठा Content Management System (CMS) आहे ज्यांच्या साहाय्याने आपण प्रोफेशनल वेबसाईट आणि ब्लॉग तयार करू शकतो. वर्डप्रेस खूप सारे themes आणि Plugins फ्री उपलब्ध आहेत, तसेच वर्डप्रेस मध्ये वेबसाईट आणि ब्लॉग तयार करण्यासाठी coding skills ची आवश्यकता नसते.

WordPress.com आणि WordPress.Org या दोघांमध्ये काय फरक आहे?

WordPress.Com मध्ये आपल्याला विनामुल्य वेबसाईट तयार करता येते. पण या मध्ये आपण WordPress चे काही मर्यादित features वापरू शकतो.नवीन वेबसाइट तयार करणाऱ्यासाठी WordPress.com हा एक उत्तम प्लॅटफॉर्म  आहे.
WordPress.org लोकप्रिय आणि open-source वेबसाइट प्लॅटफॉर्म आहे. ज्यांच्या साहाय्याने आपण प्रोफेशनल वेबसाईट आणि ब्लॉग तयार करू शकतो. पण या मध्ये तुम्हाला डोमेन आणि होस्टिंग ची आवश्यकता असते. 

निष्कर्ष

या पोस्ट मधून तुम्हाला वर्डप्रेस म्हणजे काय? (WordPress Meaning in Marathi) कळलेच असेल आणि वर्डप्रेस चे वैशिष्ट्ये सुद्धा चांगल्या तर्हेने समजले च असतील. तसेच तुम्हाला सुद्धा तुमचा ब्लॉग सुरु करायचा असेल तर तुम्ही WordPress.Com वर स्वतःचा ब्लॉग सुरु करू शकता.

वर्डप्रेस वर वेबसाईट सुरु करण्यासाठी आमची हि ब्लॉग पोस्ट खूप महत्वपूर्ण ठरेल. तुम्हाला आमच्या या पोस्ट मधून काही उपयोगी माहिती मिळाली असेल तर नक्कीच हि पोस्ट तुमच्या मित्रांना शेअर करा. तसेच तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल तर नक्कीच कंमेंट करून सांगा.  

Leave a Reply

This Post Has 2 Comments

 1. suresh

  monsterinsight व्हायरस आहे की काय?

  1. Marathi Spirit

   MonsterInsights हा एक WordPress मधील Secure आणि लोकप्रिय Google Analytics प्लगइन आहे, याच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या वर्डप्रेस वेबसाइटला Google Analytics शी सहजपणे कनेक्ट करू शकता.