Top 12 SEO Ranking Factor in Marathi | एस.इ.ओ रँकिंग घटक

मराठी मधील टॉप SEO रँकिंग फॅक्टर

नमस्कार मित्रानो, मराठी स्पिरिट या वेबसाईट मध्ये तुमचे स्वागत आहे. 

मागील पोस्ट मध्ये आपण SEO म्हणजे म्हणजे काय? या बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे. मला अशा आहे कि SEO म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन या बद्दल माहिती समजली च असेल. तर चला या पोस्ट मध्ये आपण Best and Top SEO Ranking Factor याबद्दल जाणून घेऊया. 

जेव्हा पण आपल्याला एखाद्या माहितीची आवश्यकता असते, तेव्हा आपण लगेच सर्च इंजिन वर माहिती सर्च करतो. आणि ताबडतोब आपल्या मोबाईल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम दिसतात.

या मधील परिणाम वर क्लिक करतो व आपल्याला पाहिजे ती माहिती घेतो. पण कोणी विचार केला आहे का? कि हे परिणाम किंवा वेबसाईट पहिल्या रँक किंवा पहिल्या पेज वर कश्या प्रकारे आली. तर त्याचे मुख्य कारण आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. 

आपली वेबसाईट सर्च इंजिन मध्ये रँक झाली पाहिजे यासाठी खूप लोक प्रयत्न करतात. पण त्यांची वेबसाईट सर्च इंजिन वर लवकर रँक होत नाही. या साठीच आज आम्ही टॉप एसईओ रँकिंग फॅक्टर याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. या मराठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन रँकिंग फॅक्टर चा वापर करून तुम्ही तुमची वेबसाईट किंवा ब्लॉग सर्च इंजिन मध्ये रँक करू शकाल. 


Top SEO Ranking Factor in Marathi 2021

उच्च गुणवत्ता सामग्री ( High Quality Content ) 

सर्च इंजिन मध्ये रँकिंग मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे च गुणवत्ता सामग्री होय. तुम्ही खूप वेळ ऐकले असले किंवा बघितले असणार “Content Is The King”, जेव्हा पण आपण आपल्या ब्लॉग साठी किंवा वेबसाईट साठी कन्टेन्ट लिहतो तेव्हा तुम्ही पुढील महत्वाच्या गोष्टींवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. त्यामध्ये 

  • कन्टेन्ट यूनीकनेस 
  • फ्रेस कन्टेन्ट 
  • हेल्पफुल कन्टेन्ट 

या तिन्ही महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन कन्टेन्ट तयार केले पाहिजे. जेणेकरून जेव्हा पण Users आपल्या वेबसाईट वर येईल तेव्हा जास्तीत जास्त वेळ वेबसाईट वर घालवणार आणि त्यामुळेच सर्च इंजिन वर आपल्या वेबसाईट एक ट्रस्ट तयार होईल. त्याचप्रमाणे वेबसाईट चा Bounce Rate (बाउन्स रेट) सुद्धा कमी होईल.  

कन्टेन्ट तयार करताना गुणवत्ता सामग्री म्हणजे च त्या मधून लोकांना उपयुक्त असलेली माहिती किंवा लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन कन्टेन्ट तयार करावे.

शीर्षक टॅग आणि मेटा वर्णन 

जेव्हा पण तुम्ही एखादा ब्लॉग लिहता आणि पब्लिश करता, त्या ब्लॉग गुगल मध्ये रँकिंग मिळवण्यासाठी सर्वात मेन आणि प्रायमरी SEO Ranking Factor म्हणजे शीर्षक टॅग (Title Tag)  आणि मेटा वर्णन (Meta Description) हे आहेत. 

  •  शिर्षक टॅग (Title Tag) 

शिर्षक टॅग हा On Page SEO चा महत्वाचा घटक आहे. शीर्षक टॅग मध्ये मुख्य किवर्ड चा वापर करावा आणि आकर्षक असावे, जेणेकरून ते वाचकांना आकर्षित करू शकेल. यामुळे आपला CTR (Click Through Rate) देखील Increase होईल.

SEO Title in Marathi
  • मेटा वर्णन (Meta Description) 

मेटा वर्णन हे साधे व सोप्या शब्दांमध्ये असायला हवे, Meta Description वाचल्यानंतर आपल्या लेखामध्ये काय लिहिले आहे याची कल्पना आली पाहिजे, आणि वाचक आपला ब्लॉग  वाचण्यासाठी उत्सुक झाला पाहिजे.

SEO Meta Description Marathi

मेटा डिस्क्रिपशन मध्ये योग्य लॉन्ग टेल किवर्ड चा वापर करावा. मेटा वर्णन हे १५० कॅरॅक्टर पर्यन्त असायला हवे, तसेच आपल्या वाचकांना लवकर व स्पष्टपणे समजायला हवे.

HTTPs Protocol

आता नवीन गूगल रँकिंग अपडेट नुसार तुमच्या वेबसाईट ला HTTPS प्रोटोकॉल म्हणजे च SSL सर्टिफिकेट नसेल तर तो एक प्रकारचा नॉन रँकिंग फॅक्टर समजला जातो. 

जेव्हा तुम्ही Google Chrome चा वापर करत असाल तर, ज्या पण साईट ला HTTPS प्रोटोकॉल नसेल, त्या साईट ला insecure मध्ये दाखवले जाते.

SSL HTTPS प्रोटोकॉल

वेबसाईट secure असणे म्हणजेच त्या वेबसाईट मध्ये SSL सर्टिफिकेट इन्स्टॉल केलेले असते. तसेच ब्रॉउसर मध्ये ज्या साईट च्या URL समोर HTTPS असे लिहिलेले असेल तर ती वेबसाईट सुरक्षित आहे.  

HTTP म्हणजे Hypertext Transfer Protocol म्हणजेच वेबसाईट सुरक्षित नाही. तर HTTPS म्हणजे Hypertext Transfer Protocol Secure म्हणजेच वेबसाईट सुरक्षित आहे. 

Mobile Friendly

आजच्या युगामध्ये मोबाइल चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे सर्च इंजिन वर माहिती शोधण्यासाठी जास्तीत जास्त सर्च मोबाइल द्वारे दिले जाते. म्हणून च  वेबसाईट तयार करताना मोबाईल फ्रेंडली वेबसाईट तयार करावी. 

मोबाईल फ्रेंडली वेबसाईट

तसेच सर्च इंजिन मध्ये लवकर रँकिंग मिळवायची असेल तर आपली वेबसाईट मोबाइलवर कशा प्रकारे दिसते, साईट ची Loading स्पीड तसेच Page स्पीड किती आहे, ह्या सर्व गोष्टी तपासून Google Mobile Friendly Testing Tools मध्ये पाहायला हरकत नाही.

Website Page Speed

वेबसाईट ची लोडींग स्पीड हि सर्च इंजिन मध्ये रँकिंग मिळवण्यासाठी आणि User Experience साठी खूप महत्वाची आहे. जर वेबसाईट Speed Slow असेल तर वेबसाईट लोड होईल व ओपन होण्यास खूप वेळ घेईल. आणि जर स्पीड चांगली असेल तर साईट लोड होणार नाही व वेबसाईट लवकर ओपन होईल व युसर ला जास्त वेळ थांबावे लागणार नाही. 

म्हणून वेबसाईट स्पीड चांगला असेल तर आपल्या साईट वर रहदारी वाढेल व बेस्ट सर्च इंजिन रँकिंग मिळवणे सोपे होईल. त्याचप्रमाणे वेबसाईट स्पीड मेन्टेन असायला हवा. आणि वेळोवेळी पेज स्पीड व लोडींग स्पीड चेक करायला हरकत नाही.

High Quality Backlink

जेव्हा पण तुम्ही ब्लॉग वेबसाईट सुरु करता, तेव्हा ब्लॉग रँकिंग साठी बॅकलिंक हा खूप महत्वाचा भाग असतो. सर्च इंजिन मध्ये आपल्या वेबसाइटला रँक करण्यासाठी उच्च गुणवत्ता बॅकलिंक तयार केले जातात.

तसेच आपल्या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणावर Organic Traffic आणण्यासाठी आणि सर्च इंजिन मध्ये मोठ्या प्रमाणात ऑथॉरिटी मिळवण्यासाठी बॅकलिंक्स खूप महत्वाचा घटक आहे.

बॅकलिंक (Backink) म्हणजे काय ?

जेव्हा वेबसाइटला बाह्य (किंवा अन्य) साईट वरून लिंक मिळते तेव्हा त्यास बॅकलिंक असे म्हणतात. तसेच बॅक लिंक घेताना काळजीपूर्वक आणि उच्च गुणवत्ता किंवा ऑथॉरिटी असलेल्या वेबसाईट वरून घ्याव्यात.

Image Optimization

कुठला पण व्हिसिटर्स जेव्हा वेबसाईट वर येतो तेव्हा योग्य प्रमाणात साईट ला user experience असेल, म्हणजेच त्यामध्ये Image Optimization सुद्धा येईल. कारण आकर्षक इमेजेस आपल्या लेख मध्ये जेव्हा ऍड करतो त्यामुळे user ला एक प्रकारचा trustiness येतो. 

इमेज अपलोड करताना त्या प्रतिमेला योग्य प्रकारे ALT Tag द्यावा. तसेच सर्च इंजिन मध्ये Alt Tag म्हणजेच प्रतिमा म्हणून ओळखले जाते व त्यामुळे इमेज रँकिंग साठी मदत होते. 

Keyword Research

किवर्ड रिसर्च हा सर्च इंजिन ऑप्टिमाइझेशनमध्ये सर्वात महत्वाचा घटक मानला जातो, याच्या मदतीने आपण आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉग ला रँक करू शकतो. सर्च इंजिन वर आपल्या ब्लॉग ला किवर्ड च्याच मदतीने शोधल्या जाते, योग्य किवर्ड चा वापर केल्याने वेबसाईट ला मोठ्या प्रमाणात रँकिंग मिळु शकते. 

सर्च इंजिनवर कोणतीही माहिती शोधण्यासाठी काही शब्दांचा किंवा वाक्यांचा उपयोग करतो, त्या शब्दांना किंवा वाक्यांना कीवर्ड असे म्हणतात. वेबसाईटच्या URL मध्ये तसेच शिर्षका मध्ये कीवर्ड वापरला जातो. सहसा वेबसाईट साठी Long Tail कीवर्ड चा वापर केला पाहिजे, या कीवर्ड चा वापर केल्यामुळे वेबसाईटवर रहदारी वाढण्याची शक्यता जास्त असते.

Internal Link

Internal Linking म्हणजेच एका साईट वरील विविध अंतर्गत पेजेस वर जाण्यासाठी लिंक वापरली जाते. 

Internal Linking खूप महत्वाचा Top SEO Ranking Factor आहे, तसेच या मुळे आपल्या ब्लॉग पोस्ट ची रँकिंग वाढण्यास मदत होते. आपण आपले संबंधित पेजेस इंटरनल लिंकिंग मुळे एकमेकांशी जोडले जातात. त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना एका पेज वरून दुसऱ्या पेज वर जाता येते. 

External Link

External Link म्हणजे आपल्या Website वरून दुसऱ्या वेबसाईट वर जाण्यासाठी वापरण्यात येणारी लिंक होय. एक्सटर्नल लिंकिंग मध्ये एका वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटवर जाण्यासाठी लिंक वापरली जाते त्याला External link म्हणतात.

SEO Friendly URL

Google New Ranking Factors नुसार ब्लॉग ची URL खूप महत्वाचा भाग आहे. जेव्हा पण तुम्ही ब्लॉग पब्लिश करता तेव्हा URL योग्य कीवर्ड चा वापर करावा.  वेबसाईट ब्लॉग साठी URL तयार करताना ते  SEO friendly आणि short URL म्हणजेच लहान असायला हवे, जास्त मोठे आणि लांबलचक URL वापरू नये. 

योग्य URL 

https://www.marathispirit.com/blog-mhanje-kay/

अश्या प्रकारच्या URL चा वापर करु नये 

https://www.marathispirit.com//15/03/2021/category=blog/blog-mhanje-kay/

Explain and Unique Content 

आता सर्च इंजिन मध्ये सर्वात जास्त महत्व कंटेन्ट ला देण्यात आले आहे. कंटेन्ट तयार करताना कंटेन्ट नवीन असला पाहिजे आणि तसेच सामग्री मध्ये गुणवत्ता असायला हवी. सर्च इंजिन आता ज्या पृष्ठावर मोठ्या प्रमाणात लिंक घेतल्या आहेत त्या पृष्ठाना प्राथमिकता देत नाही. 

परंतु ज्या पृष्ठावरील कन्टेन्ट हे Unique आणि स्पष्टपणे लिहिलेले असेल अश्या पृष्ठाना सर्च इंजिन प्राथमिकता देत आहे. म्हणून कन्टेन्ट लिहिताना ते स्पष्टपणे आणि अर्थपूर्ण लिहणे गरजेचे असते.


FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न

टॉप एसईओ रँकिंग फॅक्टर कोणते आहेत?

टॉप एसईओ रँकिंग घटक खालील प्रमाणे दिलेले आहेत.
Content Uniqueness
HTTPS Protocol
Mobile Friendly
Website Page Speed
High-Quality Backlink
Image Optimization
Keyword Research
Internal Link
External Link
SEO Friendly URL
Explain and Helpful Content

टॉप फ्री एसईओ टूल्स कोणते?

SEMRush
MozBar
Ahrefs
Google Keyword Planner
Ubersuggest
Google Analytics
Answer The Public
Google Search Console

या विनामूल्य SEO टूल्स चा वापर तुम्ही वेबसाईट चा SEO चांगल्या प्रकारे करण्यासाठी केला जातो.


निष्कर्ष: Google SEO Ranking Factor

अशा प्रकारे तुम्ही मराठीमध्ये टॉप 12 एस.इ.ओ रँकिंग फॅक्टर च्या साहाय्याने तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉग ला सर्च इंजिन मध्ये रँकिंग मिळवू शकता. तसेच तुम्ही चांगल्या प्रकारे ब्लॉग मध्ये वरील घटकाचे पालन केले तर नक्कीच तुमची वेबसाईट सर्च इंजिनवर रँक होईल. 

आम्ही तुम्हाला अशाच प्रकारची उपयुक्त व टेकनिकल माहिती देण्याचा सदैव प्रयत्न करू. तसेच जर तुम्हाला हि ब्लॉग पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना सोशल मीडिया वर शेयर करा. 

धन्यवाद

Leave a Reply