ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे | How to Earn Money From Blogging in Marathi

ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि यामध्ये एक चांगल्या पगाराची नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. तसेच इंटरनेट चा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळेच या स्पर्धेच्या युगामध्ये इंटरनेट च्या साहाय्याने पैसे कमविणे खूप सोपे झाले आहे. जर तुम्हाला सुद्धा इंटरनेट च्या माध्यमातून Online मोबाइल द्वारे पैसे कमवायचे असतील तर आम्ही या पोस्ट मध्ये स्वतःचा ब्लॉग तयार करून ऑनलाईन पैसे कसे कमविता येतात याबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे. 

ऑनलाईन इंटरनेट मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल सर्वात चांगला पर्याय म्हणजे ब्लॉगिंग होय. तसेच आजच्या काळात कित्येक लोक स्वतःचा ब्लॉग सुरु करून  मोठ्या प्रमाणावर पैसे कमवत आहेत. एखादी नोकरी करून तुम्ही जेवढे पैसे कमावत असाल त्यापेक्षा ही जास्त पैसे तुम्ही ब्लॉग मधून कमवू शकता. म्हणूनच तुम्ही नक्कीच ब्लॉग सुरु करायला हवा. 

तर चला या पोस्ट मध्ये आपण ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे आणि ब्लॉगिंग मधून पैसे कमवण्याचे सोपे मार्ग याबद्दल संपूर्ण माहिती बघूया. तुम्हाला सुद्धा ब्लॉगिंग करून पैसे कमवायचे (Make Money Blogging for Beginners in Marathi) असतील तर हि पोस्ट नक्की वाचा. 


ब्लॉगिंग मधून पैसे कमवण्याचे सोपे मार्ग | Make Money From Blogging in Marathi

ब्लॉगिंग मधून पैसे कमवण्याचे सोपे मार्ग

गुगल अ‍ॅडसेन्स | Google AdSense

ब्लॉग मधून पैसे कमावण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे गुगल अ‍ॅडसेन्स होय. गुगल अ‍ॅडसेन्स मध्ये विविध प्रकारच्या जाहिराती दिल्या जातात. ह्या जाहिराती व्हिडीओ किंवा फोटो च्या स्वरूपात असतात.

मराठी ब्लॉग म्हणजे काय? आणि ब्लॉग मधून पैसे कमविण्यासाठी सर्वप्रथम आपल्या ब्लॉग मध्ये गुगल अ‍ॅडसेन्स ची मान्यता प्राप्त करून घ्यायचे असते. अ‍ॅडसेन्स ची मान्यता मिळाली म्हणजेच आपली ब्लॉग मधून कमाई सुरु झाली. 

आता आपल्या ब्लॉग मध्ये विविध प्रकारच्या गुगल अ‍ॅडसेन्स च्या जाहिराती दिसायला लागतात, या जाहिराती वर जर व्हिसिटर्स ने क्लिक केले तर आपल्याला त्या क्लिक चे पैसे मिळतात. अश्या प्रकारे आपण गुगल ऍडसेन्स मधून मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतो. 


अफिलिएट मार्केटिंग | Affiliate Marketing

अफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम अफिलिएट प्रोग्रॅम जॉईन करून घ्यावा. अफिलिएट प्रोग्रॅम मध्ये सहसा एखाद्या कंपनी च्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ला प्रमोट केले जाते.

आपल्या मराठी ब्लॉग वेबसाईट च्या माध्यमातून आपण विविध प्रकारचे एफिलिएट प्रोग्रॅम जॉईन करून त्याच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ला ईझिली प्रमोट करू शकतो. आणि जेव्हा या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ला ब्लॉग वर येणारे व्हिसिटर्स पाहतात व या प्रॉडक्ट ला विकत तेव्हा आपल्याला या प्रॉडक्ट च्या विक्री वर काही प्रमाणात कमिशन प्राप्त होते. अशा पद्धतीने आपण एफिलिएट मार्केटिंग च्या माध्यमातून पैसे कमवू शकतो.  

आम्ही आमच्या दुसऱ्या ब्लॉग पोस्ट मध्ये अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? व अफिलिएट मार्केटिंग कसे सुरु करायचे याबद्दल संपूर्ण माहिती दिलेले आहे.


स्पॉन्सरशिप | Sponsorship  

स्पॉन्सर पोस्ट मध्ये एखादी कंपनी तिचे ब्रँड, प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस ला ची माहिती आपल्या ब्लॉग मध्ये टाकण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात पैसे देते. जर आपल्या वेबसाईट ब्लॉग मध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक येत असेल आणि आपली साईट खूप लोकप्रिय असेल तर आपल्याला खूप कंपन्या स्पॉन्सरशिप साठी विविध प्रकारच्या ऑफर्स देतात. 

स्पॉन्सर पोस्ट करण्यासाठी ब्लॉग किंवा वेबसाईट मालक मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात. स्पॉन्सरशिप च्या साहाय्याने आपण ब्लॉग मधून मोठ्या प्रमाणात पैसे मिळवले जातात.  


ऑनलाईन कोर्सेस विक्री | Selling Online Course

जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान असेल तर तुम्ही त्या विषयी विविध प्रकारचे व्हिडीओ कोर्सेस तयार करून ब्लॉग च्या साहाय्याने विकू शकता. 

जसे कि, Marathi Blogging, SEO, Affiliate Marketing, Web Designing, Graphic Designing, Video Creating अश्या विविध प्रकारचे कोर्सेस तयार करून त्याची ऑनलाईन विक्री करू शकता. ब्लॉग मधून ऑनलाईन कोर्सेस विकून पैसे मिळवले जातात. 


जाहिरात | Other Advertisement

ज्या प्रमाणे Google AdSense च्या जाहिराती मधून पैसे मिळवल्या जातात अगदी त्याचप्रमाणे इतरही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस च्या जाहिराती आपल्या ब्लॉग मध्ये देऊन आपण मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतो. यामध्ये विविध प्रकारचे विज्ञापन, पोस्टर इत्यादी चा समावेश होतो. 


वेबसाईट किंवा ब्लॉग ची विक्री | Sell Blog and Website

आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉग वर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असेल आणि ऍक्टिव्ह युसर्स ची संख्या अधिक असेल तर आपण आपली वेबसाईट किंवा ब्लॉग ची विक्री करून लाखो रुपये कमवू शकतो. ब्लॉग किंवा वेबसाईट ची विक्री करून तुम्ही एका वेळेस मोठी रक्कम मिळवू शकता.


ऑनलाईन सेवा | Online Services

आज अश्या खूप साऱ्या वेबसाईट आहेत ज्या Online सर्व्हिसेस देऊन मोठ्या प्रमाणात पैसे कमवितात. यामध्ये आपण आपल्या ब्लॉग वरील व्हिसिटर्स ला सेवाहि देतो आणि यामधून पैसे सुद्धा कमवितो.

जसे कि आपल्या ब्लॉग वरील व्हिसिटर्स ला एखाद्या टूल्स ची गरज आहे तर आपण वेबसाईट मध्ये विविध प्रकारचे टूल्स प्रोव्हाइड करायला हवेत. तसेच इतरही खूप प्रकारच्या सर्व्हिसेस आपण ब्लॉग च्या माध्यमातून देऊ शकतो. 


ई बुक विक्री | E-Book Selling

जर तुम्ही ब्लॉग लिहता तर तुम्हाला लिहण्याची आवड असेलच, तर तुम्ही एखाद्या लेखकाप्रमाणे E-Book तयार करून तुमच्या ब्लॉगवर Online विकू शकता. एक वेळेस तुम्ही हे E-Book लिहले तर तुम्ही आयुष्यभर त्या बुकची विक्री ब्लॉगवर करू शकता. 

अशा प्रकारे तुम्हाला वरील ८ मार्गानी ब्लॉग मधून पैसे कमवता येतील. परंतु या मार्गामधून पैसे तेव्हाच कमवता येतील, जेव्हा तुमच्या ब्लॉग वर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असेल.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

नवीन ब्लॉगर्स पैसे कसे कमवू शकतात?

जेव्हा नवीन ब्लॉगर ब्लॉग सुरु करतात तेव्हा पैसे कमवण्यास थोडा वेळ लागू शकतो. सुरुवातीच्या काळात तुम्ही इतर लोकांना मदत करून आणि त्यांच्या ब्लॉगिंग बद्दल अडचणी सोडवून त्यामधून काही प्रमाणात पैसे कमवू शकता. 

आणि जेव्हा तुमच्या ब्लॉग वर मोठ्या प्रमाणात रहदारी येईल तेव्हा विविध प्रकारच्या जाहिराती गूगल ऍडसेन्स, प्रॉडक्ट विक्री, अफिलिएट मार्केटिंग अश्या खूप साऱ्या माध्यमातून पैसे कमवू शकता. 

ब्लॉग मधून पैसे कमविण्यासाठी सोपे मार्ग कोणते?

Google AdSense | गुगल अ‍ॅडसेन्स 
Affiliate Marketing | अफिलिएट मार्केटिंग
Sponsorship | स्पॉन्सरशिप 
Selling Online Course | ऑनलाईन कोर्सेस विक्री 
Other Advertisement | जाहिरात
Sell Blog and Website | वेबसाईट किंवा ब्लॉग ची विक्री
Online Services | ऑनलाईन सेवा
E-Book Selling | ई बुक विक्री
या व्यतिरिक्त खूप सारे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहेत ज्या मधून तुम्ही पैसे कमवू शकता.

ब्लॉगमधून आपल्याला किती पैसे मिळतात?

ब्लॉग मधून किती पैसे कमवता येतील हे आपल्या ब्लॉग वर अवलंवून असते. त्याचप्रमाणे आपल्या ब्लॉग वर येणाऱ्या ट्रॅफिक मधील किती लोक आपल्या जाहिरातीवर क्लिक करतात यावर देखील ब्लॉग अर्निंग अवलंबून असते. 


निष्कर्ष

ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे मराठी (How to Earn Money from Blogging in Marathi) या लेखामधून आम्ही तुम्हाला ब्लॉग मधून पैसे कमवण्याचे ८ सोप्या मार्गाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. 

जर तुम्हाला वरील माहिती महत्वाची आणि उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि हो हा लेख तुम्हाला कसा वाटलं याबद्दल कंमेंट करायला विसरू नका. 

धन्यवाद !!!

Leave a Reply

This Post Has 5 Comments

  1. Manjusha Aher

    chhan mahiti milali ,i will also try my best

  2. shriansh

    khupach chan.

  3. Salman

    Chan