स्कीमा मार्कअप म्हणजे काय? | Schema Markup in Marathi

स्कीमा मार्कअप म्हणजे काय

मागील ब्लॉग पोस्ट मध्ये आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन चे विविध फॅक्टर, ऑन पेज एसईओ, ऑफ पेज एसईओ आणि टेकनिकल एसईओ तसेच सर्च इंजिन मार्केटिंग या बद्दल संपूर्ण माहिती बघितलीच आहे.

आजच्या पोस्ट मध्ये आपण टेकनिकल एसईओ चा मुख्य घटक म्हणजेच स्कीमा मार्कअप या बद्दल संपूर्ण माहिती पाहू. या पोस्ट मध्ये स्कीमा मार्कअप म्हणजे काय? (Schema Markup Meaning in Marathi) त्याचे प्रकार त्याचा वापर कसा केला जातो आणि या स्कीमा मार्कअप चा आपल्या वेबसाईट साठी काय फायदा होतो याबद्दल महत्वाची माहिती जाणून घेऊया. 

तर चला पाहूया, मराठी मध्ये स्कीमा मार्कअप बद्दल संपूर्ण माहिती….

स्कीमा मार्कअप म्हणजे काय? | What is Schema Markup in Marathi

स्कीमा मार्क म्हणजेच schema.org होय. स्कीमा मार्क अप हा एक स्ट्रक्चरल डेटा तसेच एक प्रकारचा कोड असतो. या कोड च्या माध्यमातून आपल्या वेबसाईट किंवा ब्लाँग च्या संबंधित सर्वच माहिती सर्च इंजिन बॉट व्यवस्थित पणे समजून घेत असतो. 

जर आपण स्कीमा मार्कअप चा वापर वेबसाईट मध्ये केला नाही तर आपल्या साईट मधील पोस्ट सर्च इंजिन मध्ये रँक होणार नाहीत किंवा सर्च इंजिन बॉट ला साईट मधील डेटा समजणार नाही म्हणून स्कीमा मार्कअप चा वापर प्रत्येक ब्लॉगर ने केलाच पाहिजे तसेच स्कीमा मार्कअप मुळे सर्च इंजिन वर लवकर रँकिंग मिळवता येते.  

थोडक्यात सांगायचे म्हटले तर स्कीमा मार्क अप मुळे सर्च इंजिन क्रॉलर ला आपल्या वेब पेजेस ची माहिती समजुन घेण्यास खूप मदत होते आणि आपल्या वेबसाईट वरील विविध ब्लॉग कोणत्या विषयाशी निगडित आहेत हे सुद्धा स्पष्टपणे समजते. तसेच वेबसाईट ब्लॉग मध्ये स्कीमा मार्कअप चा वापर केला तर ब्लॉग ची वेब पेजेस रिच स्निपेट मध्ये दर्शविली जातात. 

स्कीमा मार्कअप हा एक एसइओ म्हणजेच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन चा प्रकार आहे ज्याला जगातील काही लोकप्रिय सर्च इंजिन म्हणजेच Google, Microsoft, Yahoo आणि Yandex यांनी एकत्र येऊन स्कीमा मार्कअप तयार केले आहे. 


SEO मध्ये स्कीमा मार्कअप का गरजेचा असतो?

  • SEO साठी स्कीमा मार्कअप चा वापर करणे खूप महत्वाचे असते, कारण स्कीमा मार्कअप हा कोड असतो हा कोड सर्च इंजिनला हे सांगतो की आपला ब्लाँग तसेच वेबसाइट कोणत्या विषयाशी निगडित आहे तसेच आपण ब्लॉग मध्ये कोणत्या प्रकारचा डेटा, कंटेट पब्लिश करत असतो.
  • आपला ब्लाँग इतर ब्लाँगच्या तुलनेत अधिक उठावदार आणि आकर्षक दिसत असतो. ज्याचे परिणाम स्वरूप आपल्या ब्लाँगकडे युझर आकर्षित होतात तसेच सर्च इंजिन वर रँकिंग मिळते आणि ब्लाँगवरील युझरची एंगेजमेंट म्हणजेच ट्रॅफिक देखील वाढते.
faq schema markup स्कीमा मार्कअप म्हणजे काय? | Schema Markup in Marathi
  • स्कीमा मार्क अप अँप्लाय केल्याने आपल्या ब्लाँगचा सीटीआर म्हणजेच क्लीक थ्रु रेट देखील वाढत असतो.

>> आणखी माहिती वाचा -: टॉप 12 SEO रँकिंग फॅक्टर मराठी


Type of Schema Markup | स्कीमा मार्कअप चे प्रकार

1. Organization Schema Markup

या स्कीमा मार्कअप मुळे कुठलीही कंपनी त्यांच्या ब्लॉग, वेबसाईट द्वारे त्यांचा ऑफिशिअल लोगो, ऑफिसचे लोकेशन, कॉन्टॅक्ट डिटेल्स, अश्या विविध प्रकारची माहिती सर्च इंजिन च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवू शकते. तसेच यामध्ये सर्च इंजिन आपल्या कंपनीचा स्पष्ट पणे परिचय करून देते. 

यामुळे युझरला त्या कंपनीची महत्वपूर्ण माहीती प्राप्त होत असते, आणि कंपनीशी संपर्क साधणे अधिक सोपे होते.

2. Local Business Schema Markup

लोकल बिझनेस स्कीमा मार्कअप दवारे कस्टमरला आपल्या कंपनीचे लोकेशन काय आहे तिचा मुळ पत्ता काय आहे? कंपनी कधी ओपन होते कधी बंद होत असते, याविषयी माहिती प्रदान करते म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आपल्या युझर ला लोकल बिझिनेस बद्दल महत्वाची माहिती देत असते. 

3. Product Schema Markup

एखाद्या प्रॉडक्ट बद्दल माहिती प्रदान करण्यासाठी तसेच त्या प्रॉडक्ट ची विक्री करण्यासाठी Product Schema चा वापर केला जातो. 

4. Article Schema Markup

आर्टिकल स्कीमा मार्कअप चा वापर न्युज तसेच ब्लाँगवरील पोस्टमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. या द्वारे सर्च इंजिन बोट ला कोणत्याही प्रकारच्या वेबसाईट मधील असलेला कन्टेन्ट, इमेज, इन्फोग्राफिक समजून घेण्यास मदत होते 

5. Video Schema Markup

व्हिडिओ स्कीमा मार्कअप मुळे सर्च इंजिन कुठल्याही ब्लाँग वेबसाइटवरील व्हिडिओला सहजपणे क्राँल तसेच इंडेक्स करत असते.

6. Event Schema Markup

इव्हेंट स्कीमा मार्कअप द्वारे एखाद्या कार्यक्रमाची वेबिनारची वेळ,जागा,कार्यक्रमात सहभागी होण्याची फी इत्यादी बद्दल माहिती प्रदान केली जाते. तसेच युझर ला इव्हेंटकडे आकर्षित केले जाते आणि त्यांना कार्यक्रमाची जागा,वेळ,फी सांगुन कार्यक्रमाचे तिकिट खरेदी करण्यास प्रोत्साहित करू शकतो.

7. Review & Rating Schema Markup

सध्या कुठलाही ग्राहक एखादी प्रॉडक्ट किंवा सर्विस खरेदी करण्याच्या आधी त्या प्रॉडक्ट सर्व्हिसेस ची रेटिंग आणि रिव्हिव चेक करत असतो.

ह्याने वेबसाइट वर आलेल्या युझरला कोणते प्रॉडक्ट चांगले आहे याबद्दल जास्त शोधाशोध न करता चटकन कळुन जाते. आणि कोणते प्रोडक्ट खरेदी करावे हे ठरवता येत असते.

8. Recipe Schema Markup

ह्या स्कीमा मार्कअप चा वापर केल्याने आपण युझर ला विविध प्रकारच्या रेसिपीस बद्दल माहिती देऊ शकतो म्हणजेच एखादा पदार्थ कश्या प्रकारे बनविला जातो त्याला बनवण्यासाठी किती कालावधी लागतो तसेच तो पदार्थ बनवण्यासाठी कुठल्या सामग्रीचा वापर केला गेला याविषयी माहिती प्रदान केली जाते. 


FAQ | नेहमी विचारले प्रश्न 

SEO मध्ये स्कीमा मार्कअप म्हणजे काय?

स्कीमा मार्कअप म्हणजेच (schema.org) ही एक स्ट्रक्चरल डेटा तसेच कोड आहे या कोड किंवा संरचीत डेटा च्या साहाय्याने सर्च इंजिन ला आपल्या वेबसाइटवरील माहिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते. 


निष्कर्ष | Schema Markup Information in Marathi

अश्या प्रकारे वरील सर्व स्कीमा मार्कअप बद्दल माहिती आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्कीमा मार्कअप म्हणजे काय? एसइओ मध्ये स्कीमा मार्कअप चे महत्व आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्कीमा मार्कअप चे प्रकार याबद्दल आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती प्रदान केली आहे तरी तुम्हाला वरील सर्व माहिती समजलीच असेल अशी आशा करतो. 

या पोस्ट बद्दल तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर नक्कीच कळवा, आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. तसेच तुम्हाला सदर लेख कसा वाटला याबद्दल नक्की कंमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. 

धन्यवाद !

Leave a Reply