HDD आणि SSD म्हणजे काय? | HDD & SSD in Marathi

HDD आणि SSD म्हणजे काय

आपण Computer विकत घेण्यासाठी दुकानात गेल्यानंतर दोन शब्द नेहमीच कानावर पडतात आणि ते म्हणजे एच डी डी आणि एस एस डी (HDD & SSD म्हणजे काय?) तर बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नसते. म्हणून आजच्या या लेखामध्ये आपण याच HDD आणि SSD बद्दल जाणून घेणार आहोत.

स्टोरेज अर्थात साठवणूक क्षमता याबाबत लोक फार जागरूक झालेले आहेत. अगदी मोबाईल घेतानाही सर्वांनाच किमान 128 GB स्टोरेज तरी हवेच असते, पण स्टोरेज क्षमतेबरोबरच साठवून ठेवलेला डेटा कोणत्या प्रकारच्या मेमरी मध्ये साठविला जातो तो प्रकारही तेवढाच महत्त्वाचा ठरतो. 

संगणकामध्ये दोन प्रकारच्या मुख्य मेमरी असतात त्यामध्ये एक प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. रॅम आणि रोम या दोन प्रकारच्या मेमरी चा समावेश प्रायमरी मेमरी मध्ये होतो आणि सेकंडरी मध्ये हार्ड डिस्क ड्राइव्ह आणि सॉलिड स्टेट ड्राईव्ह अश्या प्रकारच्या मेमरी चा समावेश होतो. ह्या दोन्ही प्रकाच्या मेमरी खूप महत्वाच्या असतात. 

तसेच संगणक प्रणालीमध्ये साठवून ठेवलेला डेटा हा कशा पद्धतीने सेव्ह होतो, आणि आपण मागणी केल्यानंतर तो डेटा आपल्याला किती वेळात पुन्हा मिळविता येतो यावरून त्या संगणकामध्ये कोणत्या प्रकारची मेमरी आहे हे कळते. 

HDD म्हणजे काय? | Hard Disk Drive in Marathi

HDD म्हणजेच हार्ड डिस्क ड्राइव्ह ही एक दुय्यम म्हणजेच सेकंडरी स्वरूपाची मेमरी आहे. यामध्ये साठविलेला डेटा संगणक प्रणाली बंद केल्यानंतर पुसल्या जात नाही आणि डेटा पुन्हा मिळविता येतो, म्हणूनच याला नॉन व्होलाटाईल स्टोरेज डिवाइस (Non Volatile Storage Device) किंवा नॉन व्होलाटाईल मेमरी म्हणून ओळखले जाते.  

1956 मध्ये आय. बी. एम. या संगणक क्षेत्रातील कंपनीने हार्ड डिस्क ड्राइव्ह चा वापर सर्वप्रथम सुरू केला. HDD हे डेटा स्टोरेज क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते. या प्रकारच्या हार्ड डिस्क मध्ये माहिती सेव्ह करण्यासाठी मॅग्नेटिझम प्रणालीचा वापर होतो.

यामध्ये आपण जेथे माहिती लिहितो किंवा पुन्हा मिळवितो त्यास स्पिनिंग प्लॅटर असे म्हणतात. स्पिनिंग प्लॅटर जेवढा मोठा तेवढी जास्त HDD ची क्षमता असते. या स्पिनिंग प्लॅटर वरील डेटा लिहिणे किंवा वाचणे यासाठी एक हेड असतो. हेड आणि प्लॅटर यांच्या फिरण्याच्या गतीवरून त्या HDD चा परफॉर्मन्स समजतो. 

आज बाजारात अगदी 512 जीबी पासून तर दोन टीबी पर्यंत विविध क्षमतेमध्ये एचडीडी मिळत आहे, कमी किमतीमध्ये जास्त साठवणूक क्षमता हे एचडीडी चे मुख्य वैशिष्ट्य आहे. एच डी डी डेस्कटॉप मध्ये वापरणार की लॅपटॉप मध्ये वापरणार यावरून त्यातही वेगवेगळे प्रकार बघावयास मिळतात.

डेस्कटॉप मध्ये 3.5 इंचाचा फॉर्म फॅक्टर तर लॅपटॉप मध्ये 2.5 इंचाचा फॉर्म फॅक्टर असलेल्या एचडीडी चा वापर होताना दिसतो. या एचडीडी च्या जोडणी साठी SATA या प्रकारच्या केबलचा वापर केला जातो.

आणखी माहिती वाचा > ऑपरेटिंग सिस्टिम बद्दल संपूर्ण माहिती वाचा


SSD म्हणजे काय? | Solid State Drive in Marathi

SSD चा लॉंग फॉर्म सॉलिड स्टेट ड्राईव्ह (Solid State Drive) असा होतो. आपल्या सोबत नेहमी असणारा आपला पेन ड्राईव्ह हा SSD याच स्टोरेज प्रकारातील आहे.  

आकाराने लहान वजनांनीही हलके मात्र साठवणूक क्षमता अधिक ही एस एस डी ची वैशिष्ट्ये आहेत. मात्र एचडीडी च्या तुलनेत ह्या प्रकारची हार्ड डिस्क थोडीशी महाग असते. एचडीडी प्रमाणे एसएसडी मध्ये कुठल्याही प्रकारचे यांत्रिक भाग नसतात, म्हणूनच यास स्टिक मेमरी म्हणूनही ओळखले जाते.

या प्रकारात एका मायक्रोचीप द्वारे आपली माहिती सेव्ह केली जाते, येथे कुठलेही यांत्रिक भाग नसल्यामुळे एस एस डी चा आकार छोटा होतो. एसएसडी ही एचडीडी पेक्षा वेगवान असते. अर्थातच आपल्याला असे म्हणता येईल की HDD पेक्षा SSD अधिक कार्यक्षम आहे. SSD ची जोडणी करण्यासाठी SATA स्लॉट्स असतात ज्याद्वारे SSD ची जोडणी करू शकतो.

आणखी माहिती वाचा – कंट्रोल प्रोसेसिंग युनिट म्हणजे काय?


HDD आणि SSD मध्ये काय फरक आहे? | Difference Between HDD & SSD

HDD | Hard Disk Drive SSD | Solid State Drive
HDD full form हार्ड डिस्क ड्राइव्ह.SSD full form सॉलिड स्टेट ड्राईव्ह.
हार्ड डिस्क ड्राइव्ह ची किंमत हि SSD पेक्षा कमी असते. सॉलिड स्टेट ड्राईव्ह ची किंमत खूप जास्त असते.  
स्टोरेज क्षमता या बाबतीत तुम्हाला HDD उत्तम ठरेल कारण या मध्ये जास्त स्टोरेज क्षमता असते. सॉलिड स्टेट ड्राईव्ह ची स्टोरेज क्षमता हि हार्ड डिस्क ड्राइव्ह च्या तुलनेत खूप कमी असते. 
हार्ड डिस्क ड्राइव्ह मध्ये स्टोरेज क्षमता जास्त असल्यामुळे संगणकामध्ये कार्यक्षमता कमी होते, म्हणजेच डेटा वाचन लेखन आणि प्रतिक्रिया देताना वेळ घेते. SSD मध्ये स्टोरेज क्षमता कमी असल्यामुळे यामध्ये कार्यक्षमता अधिक असते, म्हणूनच यामध्ये डेटा वाचन लेखन आणि जलद प्रतिक्रिया मिळते. 
HDD मध्ये जास्त इलेक्ट्रिसिटी उर्जा ची गरज असते, त्याचप्रमाणे HDD हे बाजारामध्ये सहज मिळून जाते. तसेच SSD मध्ये इलेक्ट्रिसिटी ऊर्जा खूप कमी प्रमाणात लागते, पण SSD हि बाजारामध्ये सहज उपलब्ध नसते.  
HDD चा आकार हा SSD च्या तुलनेत जास्त असतो. एसएसडी हि आकाराने HDD पेक्षा खूप लहान असते.

संगणक खरेदी करताना HDD घ्यावी की SSD?

संगणक विकत घेताना विक्रेता आपल्याला SSD हवी की HDD याची विचारणा हमखासच करतोच मात्र त्यावेळी आपल्याला काय हवे ते सुचत नाही. तुम्हाला वेगापेक्षा अधिक स्टोरेज हवे असेल आणि बजेटही थोडेसे हलकेच असेल त्यावेळी आपण HDD या प्रकारची मेमरी निवडू शकता. 

तसेच तुम्हाला रोजचे काम अधिक असेल, त्यामध्ये वेगाची ही आवश्यकता असेल, मात्र तुम्हाला जास्त माहिती साठविण्याची गरज पडत नसेल, अथवा माहिती साठविण्यासाठी तुम्ही काही बाह्य स्त्रोत वापरत असाल तर तुमच्यासाठी SSD हा पर्याय उपयुक्त ठरू शकेल. यामध्ये तुम्हाला अगदी थोड्याशा साठवणूक क्षमतेसाठी बराच पैसा मोजावा लागू शकतो. मात्र यामध्ये तुम्हाला परफॉर्मन्स अगदीच चांगला मिळेल. 


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

HDD चा फुल्ल फॉर्म काय आहे?

HDD चा फुल्ल हार्ड डिस्क ड्राइव्ह (Hard Disk Drive) हा आहे.

SSD चा फुल्ल फॉर्म काय आहे?

SSD चा फुल्ल फॉर्म सॉलिड स्टेट ड्राइव्ह (Solid State Drive) हा आहे. 

तुम्हाला HDD घ्यायला हवी कि SSD?

सॉलिड स्टेट ड्राइव्ह म्हणजेच SSD हे हार्ड डिस्क ड्राइव्ह म्हणजेच HDD च्या तुलनेत अधिक जलद आहे. तसेच तुम्हाला संगणकामध्ये जास्त माहिती साठविण्याची गरज पडत नसेल, किंवा माहिती साठविण्यासाठी तुम्ही काही बाह्य स्त्रोत वापरत असाल तर तुमच्यासाठी SSD हा उत्तम पर्याय आहे. 


निष्कर्ष | HDD & SSD Information in Marathi

मित्रांनो HDD & SSD म्हणजे काय या दोन सेकंडरी मेमरी बद्दल बहुमूल्य माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही बहूमूल्य माहिती तुम्हास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

तसेच संगणक खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणीसाठी हा लेख नक्कीच शेअर करा. 

धन्यवाद !!

Leave a Reply