Google AdSense म्हणजे काय? गूगल ऍडसेन्स बद्दल संपूर्ण माहिती

गूगल ऍडसेन्स म्हणजे काय

जेव्हा आपण ऑनलाईन अर्निंग करण्यासाठी एखादा ब्लॉग किंवा वेबसाईट सुरू करतो, तेव्हा आपल्याला त्या ब्लॉग किंवा वेबसाईट मधून पैसे कसे मिळवायचे हे माहीत नसते. आज आम्ही तुम्हाला ब्लॉग किंवा वेबसाईट मधून पैसे कमवण्याचा सर्वांत महत्वाचा आणि लोकप्रिय मार्ग सांगणार आहोत.

ब्लॉग किंवा वेबसाईट मधून पैसे कमवण्याचे खूप सारे मार्ग आहेत. जसे की, अफिलिएट मार्केटिंग, जाहिराती, स्पॉन्सरशिप आणि विविध प्रॉडक्ट ची विक्री करून ब्लॉग किंवा वेबसाईट मधून पैसे मिळवू शकता. पण या व्यतिरिक्त Google AdSense हा सुद्धा पैसे कमविण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. 

या पोस्ट मध्ये आम्ही Google AdSense म्हणजे काय? यामधून पैसे कसे कमवायचे आणि गूगल ऍडसेन्स बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. 

गूगल ऍडसेन्स म्हणजे काय? What is Google AdSense in Marathi

Google AdSense ही एक गूगल द्वारे चालवल्या जाणारी ऑनलाईन जाहिरात वेबसाईट आहे. गूगल ऍडसेन्स एक प्रकारची Advertise प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये वेबसाईट किंवा ब्लॉग मध्ये विविध प्रकारच्या जाहिराती प्रदान करते. ह्या जाहिराती प्रतिमा, व्हिडीओ, आणि बॅनर च्या स्वरूपात असतात. 

एकदा तुमच्या वेबसाईट ला गूगल ऍडसेन्स चे अप्रूव्हल मिळाले कि तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉग मध्ये जाहिराती गूगल कडून तुमच्या वेबसाईट मध्ये ब्लॉग च्या टॉपिक नुसार जाहिराती दाखवल्या जातात. जेव्हा पण तुमच्या वेबसाईट वरील येणारी ट्रॅफिक किंवा व्हिसिटर्स त्या जाहिराती वर क्लिक करतील त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतील. 

गूगल ने विकसित केलेली गुगल एडसेंस ही सर्वात प्रथम 2003 साली प्रसिध्द झाली. आज या कंपनीचा एवढा विकास झाला की ही कंपनी जगातील सर्वात लोकप्रिय जाहिरात कंपनी बनली आहे.


गूगल ऍडसेन्स कसे कार्य करते

गूगल ऍडसेन्स हा एक ऑनलाईन जाहिरात प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये वेबसाईट किंवा ब्लॉग वर जाहिराती प्रदान केल्या जातात. 

गूगल ऍडसेन्स च्या नियम आणि अटी नुसार जर वेबसाईट पात्र असेल तर आपल्याला ऍडसेन्स चे अपृवल मिळून जाईल त्यानंतर एक कोड प्रदान केला जाईल तो कोड वेबसाईट मध्ये टाकून तुम्ही तुमच्या वेबसाईट मध्ये व्हिसिटर्स ला जाहिराती दाखवू शकता. 

आणि जेव्हा एखादा व्हिसिटर या जाहिरात वर क्लिक करतो तेव्हा आपल्याला पैसे मिळतात. गूगल ऍडसेन्स मधून कॉस्ट पर क्लिक नुसार पैसे मिळत असतात.

आणखी माहिती वाचा – फेसबुक मधून पैसे कसे कमवायचे


गूगल ऍडसेन्स मधून पैसे कसे कमवायचे? | How to Make Money Google AdSense 

गूगल ऍडसेन्स बद्दल संपूर्ण माहिती

गूगल ऍडसेन्स मधून पैसे कमविण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याकडे ब्लॉग वेबसाईट असावी लागते आणि त्यानंतर वेबसाईट ला गूगल ऍडसेन्स थ्रू मोनीटाईस करावे लागते. जेव्हा पण त्या ब्लॉग वेबसाईट मध्ये व्हिसिटर्स येतील आणि जेव्हा जाहिराती वर क्लिक करतील तेव्हा गूगल कडून आपल्याला पैसे मिळतील. (Step by Step Guide Earn Money From Google AdSense in Marathi)

गूगल एडसेंस मधून जे काही पैसे मिळतात ते सर्व CPC (कॉस्ट पर क्लिक) वर अवलंबुन असते जर आपल्या वेबसाईट चा CPC जास्त असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील आणि जर CPC कमी असेल तर कमी पैसे मिळतील. 

तसेच गुगल अ‍ॅडसेन्स चा वापर करून युट्युब चॅनल मधून पैसे मिळवू शकतो. जर तुम्ही युट्युब चॅनल मध्ये अपलोड केलेल्या व्हिडिओ ला मोठ्या प्रमाणात लोक पाहत असतील आणि प्रतिसाद देत असतील तर गूगल अ‍ॅडसेन्स ची मान्यता प्राप्त करून तुमच्या युट्युब चॅनल मधून पैसे कमवू शकता. यामध्ये तुम्ही जे व्हिडीओ अपलोड करता त्या व्हिडीओ मध्ये गुगल एड्स दाखवल्या जातात. 

हे पण वाचा – इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे


गूगल अ‍ॅडसेन्स ची मान्यता कशी मिळवायची?

गूगल अ‍ॅडसेन्स ची मान्यता मिळवण्यासाठी तुमच्या वेबसाईट वर युनिक कन्टेन्ट असणे खूप महत्वाचे असते. त्याचबरोबर वेबसाईट मध्ये About Us, Contact Us, Privacy Disclaimer आणि Term & Condition इत्यादी प्रकारचे पेजेस असणे महत्वाचे असते.

यानंतर आपण गूगल अ‍ॅडसेन्स च्या अधिकृत वेबसाईट मध्ये जाऊन तुमचे अकाउंट तयार करून त्यामध्ये तुमच्या बद्दल व वेबसाईट बद्दल माहिती ऍड करावी लागते. तुमची माहिती ऍड केल्यानंतर गूगल ची टीम तुमची वेबसाईट चेक करते आणि त्यांच्या पात्रतेनुसार तुमची वेबसाईट योग्य असेल तर तुम्हाला गूगल ऍडसेन्स चे अपृवल मिळेल. 

ऍडसेन्स ची मान्यता मिळाल्यानंतर तुम्हाला एक कोड देण्यात येईल तो कोड तुम्हाला तुमच्या वेबसाईट वर टाकावा लागेल त्यानंतर वेबसाईट मध्ये जाहिराती दिसायला लागतील. 

   FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न 

गूगल ऍडसेन्स मधून किती पैसे कमावू शकतो?

यावर काही मर्यादा नाही. गूगल अ‍ॅडसेन्स मधून आपण कितीही पैसे कमावु शकता, हे सर्व आपल्यावर अवलंबून असते, आपल्या वेबसाईट मध्ये किती व्हिसिटर येतात आणि किती व्हिसिटर आपल्या जाहिराती वर क्लिक करतात. म्हणजेच आपण कॉस्ट पर क्लिक नुसार पैसे कमाऊ शकतो. 


निष्कर्ष : गूगल ऍडसेन्स बद्दल संपूर्ण माहिती 

या लेखामध्ये आपण मराठीमध्ये गूगल ऍडसेन्स म्हणजे काय? What is Google Adsense meaning in Marathi आणि ऍडसेन्स ची मान्यता कशी मिळवायची याबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे तर तुम्हाला या लेखामध्ये काही अडचण आली असेल तर आम्हाला नक्की कळवा. 

तसेच तुम्हाला लेख कसा वाटला कंमेंट मध्ये सांगा आणि पोस्ट शेयर करायला विसरू नका. 

धन्यवाद !!!

Leave a Reply