GDP म्हणजे काय? | GDP Meaning in Marathi

GDP म्हणजे काय

नमस्कार मित्रानो, आजच्या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण देशाच्या अर्थव्यवस्थेतील मूलभूत समजल्या जाणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच जीडीपी अर्थातच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला मराठीत स्थूल / सकल देशांतर्गत उत्पादन म्हटले जाते या विषयाबद्दल माहिती पाहणार आहोत.

जी.डी.पी आपल्याला कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती व प्रगती यांचे आकलन करून देण्यास महत्त्वपूर्ण ठरतो. अनेक वेळा बातम्या पाहत असताना आपण ऐकतो की GDP दर स्थिर राहिला, जीडीपी दर वाढला, कमी झाला, पण हा GDP म्हणजे काय? याचे आगणन कसे केले जाते आणि त्याचा वापर कसा होतो याचा कधी विचार केलाय का? नसेल तर हरकत नाही, आजच्या पोस्ट मध्ये आम्ही जी.डी.पी विषयी सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. 

जीडीपी म्हणजे काय? | GDP Information in Marathi

GDP म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट (Gross Domestic Product) अर्थातच सकल देशांतर्गत उत्पादन होय. एका विशिष्ट कालावधीमध्ये त्या देशात उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा यांचा एकत्रित खर्च यास जी.डी.पी अर्थातच सकल देशांतर्गत उत्पादन म्हटले जाते.

देशाची आर्थिक संपत्ती स्थिती ही ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट च्या माध्यमातून मोजता येते. भारत देशात GDP अर्थातच सकल देशांतर्गत उत्पादन हे दर तीन महिन्यांच्या कालावधीनंतर मोजले जाते, म्हणजेच आपल्या देशात एका वर्षांमध्ये चार वेळेस विविध क्षेत्रातील वस्तू व सेवांच्या आधारे सकल राष्ट्रीय उत्पादनाचा मागावा घेऊन मोजमाप केले जाते. 

जी.डी.पी मोजमापासाठी कृषी ,उद्योग आणि सेवा या तीन मुख्य क्षेत्रांच्या कामगिरीचा अभ्यास केला जातो. हल्लीच सरकारने यामध्ये शिक्षण, आरोग्य, बँकिंग क्षेत्र, संगणक या बाबींचा देखील समावेश केलेला आहे. या क्षेत्रातील आर्थिक कामगिरी मध्ये चढ-उतार आल्यास जी.डी.पी मध्ये देखील त्याचा परिणाम बघावयास मिळतो. 

जर एखाद्या देशात उत्पादित होत असणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचे प्रमाण जास्त असेल तर त्या देशाचा विकास झाला असे म्हणता येऊ शकते कारण याच उत्पादित वस्तू आणि सेवांच्या विक्रीतून देशात अधिकाधिक पैसा परकीय चलनाच्या रूपात येतो व  परिणामी देशाची आर्थिक भरभराट होते आणि देशाची आर्थिक स्थिती सुधारते.

आणखी माहिती वाचा – बजेट म्हणजे काय संपूर्ण माहिती


GDP कसा काढला जातो? | GDP Calculated in Marathi

Gross Domestic Product चा मूळ अर्थच स्थूल किंवा सकल देशांतर्गत उत्पादन असा होतो याचा अर्थ या सर्व सेवा आणि उत्पादने आपल्या देशाच्या अंतर्गतच तयार झालेल्या असणार. जी.डी.पी मोजमाप करताना अशाच वस्तूंचे आणि सेवांचे मोजमाप केले जाते ज्या आपल्या भारत देशामध्ये उत्पादित झालेल्या आहेत. तसेच भारत या देशामध्ये जी.डी.पी मोजमापाची सुरुवात स्वातंत्र्यानंतर अवघ्या काहीच वर्षात म्हणजेच 1950 पासून झालेली आहे.

जी.डी.पी मोजमापासाठी पुढील प्रमाणे दिलेल्या सूत्राचा वापर करावा.

GDP = C + I + G + (X-M)

  • C – Consumption | खाजगी वापर / खर्च / उपभोग 
  • I – Investment | एकूण गुंतवणूक
  • G – Government Expenses | सरकारी खर्च
  • X – Export | निर्यात
  • M – Import | आयात

तसेच या सूत्राला मराठी भाषेमध्ये खालील प्रमाणे मांडता येईल. 

सकल देशांतर्गत उत्पादन = खाजगी वापर / खर्च / उपभोग + एकूण गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात- आयात)

अश्या प्रकारे वरील दिलेल्या सूत्राच्या आधारे देशाचा GDP म्हणजेच सकल देशांतर्गत उत्पन्न काढल्या जाते. 


GDP चे प्रकार | Type of GDP in Marathi 

मित्रांनो आता आपण जी.डी.पी चे प्रकार किती आणि कोणते आहेत याबद्दल माहिती करून घेऊयात. 

ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट चे प्रकार

वास्तविक जीडीपी | Real Gross Domestic Product 

रियल ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट अर्थात वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन किंवा वास्तविक जीडीपी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून देशाचे एकूण आर्थिक उत्पादन होय, या GDP च्या आधारे वस्तू व सेवांच्या किमतीतील बदल समायोजित केल्या जातात तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेचा अचूकपणे अंदाज वर्तवण्यात वास्तविक जीडीपी सर्वात महत्वाचा घटक मानला जातो. 

नाममात्र जीडीपी  | Nominal Gross Domestic Product

या पद्धतीमध्ये सकल देशांतर्गत वस्तू आणि सेवांच्या वर्तमान काळातील बाजार किमतींचे अध्ययन केले जाते आणि त्या आधारावर GDP काढल्या जातो. 

हे पण माहिती वाचा – फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बद्दल सविस्तर माहिती


जी. डी. पी चे फायदे | Benefits of GDP in Marathi 

मित्रांनो एवढं सगळं वाचल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडणे साहजिकच आहे आणि तो म्हणजे जीडीपी मोजमापाचे फायदे काय? किंवा जीडीपी कशासाठी मोजला जातो? तर जीडीपी च्या आकडेवारीनुसार आपला देश आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही हे कळते. तसेच देशाचा विकास होत आहे कि नाही याबद्दल माहिती मिळते. 

परिणामी सरकार या जीडीपी च्या आकडेवारीवर आधारित विविध ध्येय धोरणे देखील ठरवत असते त्याचा येत्या कालावधीत चांगला परिणाम बघावयास मिळतो. तसेच देशावर आर्थिक संकट ओढावत असेल तर त्याची पूर्वकल्पना मिळते देशात येणाऱ्या मंदीची आधीच चाहूल लागणे शक्य होते यासाठी जीडीपी मोजमाप फायदेशीर असते.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

GDP चा फुल फॉर्म काय आहे | GDP Full Form In Marathi

GDP या शब्दाचा फुल्ल फॉर्म Gross Domestic Product यालाच मराठी मध्ये सकल देशांतर्गत उत्पादन असे म्हणतात. 

जीडीपी काढण्याचे सूत्र काय आहे?

GDP = Consumption + Investment + Government Expenses + (Export – Import).
सकल देशांतर्गत उत्पादन = खाजगी वापर / खर्च / उपभोग + एकूण गुंतवणूक + सरकारी खर्च + (निर्यात- आयात).


निष्कर्ष | Gross Domestic Product in Simple Words

अशा प्रकारे आम्ही जीडीपी (GDP in Marathi) या संकल्पनेबद्दल सर्व प्रश्नांचे उत्तरे व सविस्तर माहिती दिली आहे, आम्हाला आशा आहे हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. 

तरी तुमचा या लेखाबद्दल चा अभिप्राय कमेंट्स मध्ये नक्की कळवा, तसेच तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारा आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि या लेखाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. 

धन्यवाद!!

Leave a Reply