FDI म्हणजे काय? | Foreign Direct Investment in Marathi

FDI म्हणजे काय

कोणत्याही देशाला जागतिक विकास घडवून आणायचा असेल किंवा देशातील अर्थव्यवस्था बळकट बनवायची असेल तर FDI हि संकल्पना खूप गरजेची असते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि देशाच्या विकासामध्ये हे FDI काय भूमिका पार पाडते आणि FDI म्हणजे नक्की काय?  या बद्दल महत्वाची माहिती पुढील लेखामध्ये जाणून घेऊया.

तर चला या Foreign Direct Investment बद्दलच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे आणि माहिती पुढील लेखामध्ये पाहूया.

FDI म्हणजे काय? | FDI Meaning in Marathi

जेव्हा एखादी परकीय कंपनी भारतातील कंपनी मध्ये १०% पेक्षा जास्त भाग (मालकी) खरेदी करते तेव्हा त्याला प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक (Foreign Direct Investment) असे म्हणतात. त्याचप्रमाणे जर विदेशी कंपनीने १०% पेक्षा कमी भाग खरेदी केले तर त्या गुंतवणुकीला परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक (Foreign Portfolio Investment) असे म्हटले जाते. 

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एफडीआय हि अश्या प्रकारची गुंतवणूक आहे ज्या मध्ये गुंतवणूकदार एखाद्या दुसऱ्या देशातील कंपनी मध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतो त्यालाच आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असे म्हणतो.

तसेच या गुंतवणूक सोयी मुळे दुसऱ्या देशातील कंपन्यांना, गुंतवणूकदारांना त्यांच्या आवडत्या विदेशी कंपनी मध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते. त्याचप्रमाणे या प्रत्यक्ष गुंतवुकीचा देशातील आर्थिक विकासासाठी खूप फायदा होतो. 

हे पण वाचा – म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती वाचा.


FDI मध्ये गुंतवणूक करण्याचे प्रकार । Types of Investment in FDI

तसेच तुम्हाला सुद्धा तुमच्या आवडीच्या विदेशी कंपनी मध्ये गुंतवणूक करायचे असेल तर सर्वात आधी या प्रत्यक्ष गुंतवणुकीबद्दल संपूर्ण माहिती करून घ्यायला हवी, आता आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट चे महत्वाचे प्रकार कोणते आहेत याबद्दल थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे पाहूया. 

  • ग्रीनफिल्ड FDI मध्ये विदेशी कंपनी एखाद्या देशात स्वतःची कंपनी उभारीत असते हि सुद्धा दुसऱ्या देशात झालेली प्रत्यक्ष गुंतवणूक च आहे. म्हणून अश्या प्रकारच्या गुंतवणुकीला ग्रीनफिल्ड इन्व्हेस्टमेंट असे म्हणतात. 
  • ब्राऊन फील्ड एफडीआय म्हणजे दुसऱ्या देशातील कंपनी मध्ये गुंतवणूक करणे होय. यामध्ये विदेशी एखाद्या मोठ्या कंपनी मध्ये गुंतवणूक करून त्या कंपनीचे शेअर्स घेतले जातात. 

संपूर्ण माहिती वाचा – बजेट म्हणजे काय? सविस्तर माहिती.

प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचे प्रकार | Types of Foreign Direct Investment (FDI) 

  1. Horizontal FDI

Horizontal FDI यामध्ये एखादी कंपनी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे, अगदी त्याच क्षेत्रात विदेशी कंपनी मध्ये गुंतवणूक करते. सोप्या भाषेत म्हटल्यास समान वस्तू किंवा सेवेचे उत्पादन करत असलेल्या कंपन्या ह्या प्रकारामध्ये येतात.   

  1. Vertical FDI

Vertical FDI या प्रकारामध्ये एखादी कंपनी तिला परस्पर पूरक असलेल्या विदेशी कंपनी मध्ये गुंतवणूक करते. जसे कि एखाद्या कंपनीला पक्का माल तयार करण्यासाठी कच्या मालाची गरज असते म्हणून Vertical FDI कंपनी तिला कच्चा माल पुरविणाऱ्या कंपनी मध्ये गुंतवणूक करीत असते. 

  1. Conglomerate FDI

Conglomerate FDI मध्ये दोन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनी मध्ये गुंतवणूक केली जाते तेव्हा त्याला Conglomerate FDI असे म्हणतात. यामध्ये जर एखादी US कंपनी Textile Industry मध्ये कार्यरत असेल तर ती भारतीय Automotive या क्षेत्रात असलेल्या कंपन्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकते. 

  1. Platform FDI 

प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचा शेवटचा प्रकार म्हणजे Platform FDI. यामध्ये व्यवसाय विस्तार परदेशात होत असतो आणि त्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाची निर्यात वेगवेगळ्या देशांमध्ये केली जाते. जसे कि, फ्रेंच परफ्यूम ब्रँड चॅनेलने यूएसएमध्‍ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारला आणि अमेरिका, आशिया आणि युरोपच्‍या इतर भागांमध्‍ये उत्‍पादने निर्यात केली.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन,


प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीचे फायदे | FDI Advantages in Marathi

  1. आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन
  2. तंत्रज्ञान, ज्ञान आणि संस्कृतीची देवाणघेवाण
  3. कमी उत्पादन खर्च
  4. एफडीआय देशाचे वित्त आणि तंत्रज्ञान क्षेत्र वाढवते
  5. एफडीआय आर्थिक विकासाला चालना देते
  6. स्पर्धात्मक बाजारपेठेची निर्मिती

प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीचे तोटे | FDI Disadvantages in Marathi

  1. देशांतर्गत गुंतवणुकीला अडथळा
  2. घरगुती नोकऱ्यांचे नुकसान
  3. नकारात्मक विनिमय दर
  4. जास्त खर्च
  5. आर्थिक गैर व्यवहार्यता

FAQ | नेहमी विचारले जाणारे प्रश्न 

1. FDI चा फुल्ल फॉर्म काय आहे?

FDI चे संक्षिप्त रूप Foreign Direct Investment असे आहे, याला मराठी मध्ये विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक असे देखील म्हणतात.

2. सोप्या भाषेत FDI नक्की काय आहे?

जेव्हा एखादी परकीय कंपनी भारतातील कंपनीचे १०% पेक्षा जास्त भाग म्हणजेच मालकी हक्क खरेदी करते तेव्हा त्याला प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (Foreign Direct Investment) असे म्हणतात. 

3. FPI म्हणजे काय?

जर विदेशी कंपनीने एखाद्या भारतीय कंपनीचे १०% पेक्षा कमी भाग खरेदी केले तर त्या गुंतवणुकीला विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक (Foreign Portfolio Investment) असे म्हटले जाते. 


निष्कर्ष | FDI Information in Marathi

अश्या प्रकारे आम्ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याबद्दल सविस्तर माहिती मराठी मध्ये सोप्या आणि सुलभ भाषेत देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तुमचे या लेखाबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की विचारा त्याचप्रमाणे FDI म्हणजे काय? हि ब्लॉग पोस्ट तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. 

धन्यवाद !

Leave a Reply