बजेट म्हणजे काय? | Budget Information in Marathi (Year 2023)

बजेट म्हणजे काय

आपल्या सर्वांच्या आयुष्यात अर्थसंकल्प म्हणजेच बजेट (Budget) खूप महत्त्वाचा असतो. घर खर्च चालवायचा असो किंवा खरेदीसाठी बाहेर फिरायला जाण्यापासून ते दैनंदिन गरजा पूर्ण करण्याच्या असतील तर सर्वात आधी आपण बजेटचा विचार करतो, आणि नंतरच पैसे कसे खर्च करायचे हे ठरवतो. 

तसेच जर देश चालवण्याचा मुद्दा असेल तर बजेट या शब्दाचा अर्थ अधिक व्यापक होतो. देशातील सामान्य माणसापासून ते  श्रीमंत माणसापर्यंत तसेच लहान मोठे उद्योग, शेतकरी अश्या प्रत्येकावर आर्थिक बजेटचा खूप प्रभाव पडतो. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पाबाबत प्रत्येक व्यक्तीला माहिती असणे खूप आवश्यक आहे.

म्हणूनच आज आम्ही मराठी मधून बजेट म्हणजे काय? आणि देशाचे बजेट कसे तयार केले जाते? त्याचबरोबर अर्थसंकल्पाचे महत्त्व आणि देशाच्या अर्थसंकल्पाशी संबंधित इतर महत्त्वाच्या बाबींचीही माहिती घेऊन आलो आहोत. 

चला तर बजेट या महत्वाच्या संकल्पनेबाबत मराठी मधून सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अर्थसंकल्पीय Budget म्हणजे काय? | Budget in Marathi

बजेट म्हणजे भविष्यामध्ये होणाऱ्या खर्च आणि उत्पन्नाचा एक अहवाल होय, यामध्ये विविध योजना आणि उद्दिष्टांच्या आधारावर भविष्यामध्ये होणाऱ्या उत्पनाचे आणि खर्चाचा एक प्रकारचा आराखडा तयार केला जातो. या आराखड्याच्या साहाय्याने विविध क्षेत्रामधून एकूण अंदाजे कमाई किती होणार असेल आणि त्यामधून ते वेगवेगळ्या योजना आणि सेवांमध्ये किती खर्च करू शकते याचे एक अंदाजित तयार केलेले अनुमान असते.

बजेट हा एका विशिष्ट कालावधीसाठी तयार केला जात असतो, म्हणजेच एक आठवडा, एक महिना, किंवा एक वर्ष आणि तसेच हा बजेट एका दिवसाचा पण असू शकतो. जसे लग्नाचे बजेट, पार्टीचे बजेट, घराचे बजेट इ.

Budget हे सरकार, व्यवसाय आणि एका व्यक्तीद्वारे सुद्धा तयार केले जाते, प्रत्येक वर्षांमध्ये आपले एकूण उत्पन्न आणि खर्चाचे आगनण करून पुढील वर्षाचा बजेट तयार केला जातो. तसेच एका व्यक्तीने बनविलेला बजेट हा त्या व्यक्तीच्या संबंधित असतो. त्याचप्रमाणे व्यावसायिक संस्था बजेट तयार करतात ते सुद्धा त्या संस्थेचा किंवा व्यवसायाचा उत्पन्न आणि खर्च लक्षात घेऊन तयार करतात. 

आणि जेव्हा सरकारच्या बजेट तयार होत असतो तेव्हा या बजेट कडे सर्व लोकांचे लक्ष लागलेले असते. कारण हा बजेट सर्व देशाचा असतो यामध्ये विविध प्रकारचे उद्दिष्ट नवनवीन योजना याबद्दल माहिती मिळते. तसेच हा गव्हर्नमेंट बजेट दर वर्षी १ फेब्रुवारी या तारखेला असतो आणि आपल्या देशाच्या अर्थमंत्री हा बजेट सादर करतात. 

आणखी माहिती वाचा – डिजिटल रुपी म्हणजे काय? संपूर्ण माहिती


Union Budget of India 2023 in Marathi | केन्‍द्रीय बजेट

आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे 1 फेब्रुवारी २०२३ या तारखेला जो अर्थसंकल्प म्हणजेच आर्थिक बजेट सादर करणार आहेत, तो अर्थसंकल्प देशातील अंदाजित खर्चाच्या आणि उत्पन्नाच्या अंदाजाला गृहीत धरून बनवलेला असेल. हा बजेट 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षासाठी लागू होईल म्हणूनच त्याला ‘बजेट 202३-2४’ (FY 2023-2024) असे संबोधले जाईल.

Budget सरकारद्वारे आगामी आर्थिक, वर्षाची कमाई आणि खर्चाचा तपशील आहे ज्याचा आधारावर सरकार द्वारे ठरवले जाते की, आपल्या संसाधनांच्या तुलनेत किती खर्च करु शकते? 

बजेट हा केवळ अंदाज आहे ज्यात भविष्याबद्दल फक्त अंदाज बांधन्यात येतो. हा अंदाज एकदम बरोबर लावण्यासाठी सांख्यिकी, उपलब्ध माहिती, आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा वापर केला जातो, म्हणूनच अंदाज अधिक अचूक ठरतात, याचे सर्व संशोधन सरकारच्या बजेटमध्ये केले जाते, एकदा बजेट तयार झाला की त्याचा वेळोवेळी आढावा घ्यावा लागतो. तसेच डेटा आणि फीडबॅक गोळा करण्यासाठी आठवडे आणि महिने लागतात. आणि सर्व माहिती गोळा करून झाल्यानंतर त्यावर चर्चा करण्यात येते आणि नंतर सर्वांच्या सल्ल्याने बजेट सादर केला जातो. 


Budget महत्वाचे का आहे? | Why is budget important?

बजेट हि आपल्या पैशावर नियंत्रण ठेवत असते तसेच याला आपण पैशाची योजना असे देखील म्हणून शकतो. कारण आपला पैसे हा पूर्ण वर्षांमध्ये कोणकोणत्या ठिकाणी वापरणार आहोत याबद्दल माहिती होते. सर्व प्रकारचे उत्पन्न आणि खर्च असलेल्या लोकांसाठी त्यांची संपत्ती व्यवस्थित ठेवण्याचा हा एक सोपा, उपयुक्त मार्ग आहे. 

Budget तयार करण्याचे महत्त्व म्हणजे हा एक आर्थिक धडा आहे ज्यावर जास्त जोर दिला जाऊ शकत नाही. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता हवी असल्यास, Budget चे पालन करणे हा एकमेव पर्याय आहे.

अर्थसंकल्पाचा फायदा सर्वांनाच होत असतो, तसेच तुमचे पैसे शक्य तितक्या चांगल्या प्रकारे आणि योग्य ठिकाणी खर्च करण्यासाठी प्रोत्साहित करते. देशामध्ये आर्थिक निधीसाठी Budget सर्वात महत्त्वाचे साधन आहे. Budget  च्या माध्यमातून सरकार द्वारे पुढील वर्षाचे आय आणि व्यय याचे अनुमानित स्पष्टीकरण केले जाते.  

सरकारकडून विभिन्न कल्याणकारी योजना, अनुदान, संरक्षण खर्च, इतर योजना आणि संरचनात्मक विकास कार्ये, वेतन आणि इतर बाबींसाठी Budget ची आवश्यकता असते.


FAQ | नेहमी विचारले जाणारे प्रश्न 

भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केला?

सर्वात पहिला भारतीय आर्थिक बजेट हा जेम्स विल्सन यांनी 18 फेब्रुवारी 1869 रोजी सादर केला. त्याकाळात ते इंडिया कौन्सिलचे वित्त सदस्य होते.
आणि त्याचप्रमाणे स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी तत्कालीन अर्थमंत्री आर. के. शनमुखम शेट्टी यांनी सादर केला. ते राजकारणी तसेच वकील आणि अर्थतज्ज्ञ होते. 

अर्थसंकल्पीय बजेट काय आहे? 

बजेट स्टेटमेंट दिलेल्या कालावधीसाठी अंदाजे महसूल, खर्च आणि नफा याची सूची असतेच आणि हा नफा आणि तोटा अंदाजावर बनवला असल्यामुळे हा आर्थिक अहवाल ऐतिहासिक डेटावर आधारित नसून अंदाजांवर आधारित असतो. साधारणपणे, हे मागील आर्थिक परिणाम आणि आगामी वर्षाचे खर्च यांन्ना विचारात घेतले जाते. 

Budget कोणत्या आधारावर निश्चित केला जातो?

भारत सरकार च्या नॉमिनल जीडीपीच्या आधारावर बजेट ची रुपरेखा निश्चित केली जाते आणि राजकोष घाटा च्या आधारावर निश्चित कर्ज सीमा पर्यंत सरकार कर्ज घेते आणि त्याच आधारावर Budget तयार केले जाते.


निष्कर्ष | Budget Meaning in Marathi

अश्या प्रकारे वरील लेखामध्ये आपण बजेट म्हणजे काय? या बद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती बघितलीच आहे तरी तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की कंमेंट करा. तसेच आपल्या देशाचा आर्थिक बजेट म्हणजे अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२३ या तारखेला सादर होणार आहे. 

त्याचप्रमाणे आर्टिकल आवडले असेल तर सोशल मीडिया वर विविध लोकांना मित्रांना शेअर करा आणि अश्या च प्रकारची इंटरेस्टिंग आणि नवनवीन टेकनॉलॉजि ची माहिती मराठी मध्ये वाचा. 

धन्यवाद !!

Leave a Reply

This Post Has 4 Comments

  1. Tinkujia

    Nice information…desi language me news padhne Ka maza Kuch or hai..

  2. Ankita bhalerao

    This information is usefull Thanks👍😊