डिजिटल रुपया म्हणजे काय? । Digital Rupee in Marathi

डिजिटल रुपया म्हणजे काय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी RBI येत्या आर्थिक वर्षामध्ये डिजिटल रूपी लॉंच करणार आहे अशी घोषणा केली होती. त्याप्रमाणे आज म्हणजेच १ नोव्हेंबर २०२२ रोजी डिजिटल करन्सी म्हणजेच डिजिटल रुपया लाँच करण्यात आला आहे. 

आज डिजिटल रुपी लाँच झाली आहे, म्हणूनच आपण आजच्या लेखाचा विषय Digital Rupee in Marathi हाच निवडला आहे. तर चला डिजिटल रुपया म्हणजे काय? आणि अर्थव्यवस्थेसाठी Digital Currency किती महत्वाची ठरणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती मराठी मधून जाणून घेऊया. 

तसेच तुम्हाला आणखी डिजिटल क्रिप्टोकरन्सी बद्दल माहिती हवी असेल तर ब्लॉग ला नक्की भेट द्या.

डिजिटल रुपया म्हणजे काय? । Digital Rupaya in Marathi

डिजिटल रूपी म्हणजेच ई-रूपी (इलेक्ट्रॉनिक रुपया) ही भारतीय रुपयाचे एक डिजिटल व्हर्जन आहे जे चलनात आणण्यासाठी RBI प्रयत्नशील आहे. रिजर्व बँक ऑफ इंडिया ने डिजिटल रूपी च्या दोन आवृत्या जारी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पहिली आवृत्ती ही होलसेल असले जी फक्त इंटर बँक सेट्टलमेंट साठी वापरली जाईल आणि दुसरी आवृत्ती ही किरकोळ असेल जी सामान्य लोकांसाठी बनवली जाईल.

रिजर्व बँक ने प्रस्तावित केलेल्या इंडिरेक्ट मॉडेल नुसार डिजिटल रूपी किंवा ई-रूपी हा तुम्ही तुमच्या डिजिटल वॉलेट म्हणजेच Google Pay, Phone Pay, Amazon Pay आणि UPI अँप्स मध्ये बँक किंवा सर्विस प्रोवायडर च्या मदतीने ठेवता येईल. रिजर्व बँक ऑफ इंडिया ने प्रस्तावित केलेल्या कन्सेप्ट नोट मध्ये ही सांगण्यात आले आहे की आर. बी. आय डिजिटल रूपी जारी करेल मात्र त्याचे वितरण ही व्यावसायिक बँका द्वारे केले जाईल. 

बऱ्याचशा लोकांना हा गैरसमज झाला आहे की डिजिटल रूपी एक क्रिप्टो करंसी आहे. व डिजिटल रूपी ही त्या क्षेत्राशी जोडलेली देखील असू शकते मात्र रिसर्व बँक ऑफ इंडिया कडून याबद्दल कोणतेही निर्देश अजून आलेले नाहीत. बिटकॉईन डिजिटल करन्सी आणि इथेरीअम ह्या क्रिप्टो करंसी पब्लिक आहेत मात्र डिजिटल रूपी हि आर. बी. आय ने जारी केलेली असल्यामुळे हि करन्सी Reserve Bank of India द्वारेच मॅनेज केली जाईल. 


CBDC म्हणजे काय? । Central Bank Digital Currency

डिजिटल रुपये CBDC चा फूल फॉर्म सेंट्रल बँक डिजिटल करंसी आहे व रिजर्व बँक ऑफ इंडिया कडून काढण्यात आलेली हि एक कायदेशीर निविदा आहे. सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे सी.बी.डी.सी हे मध्यवर्ती बँक यांच्या कडून जारी केलेले एक प्रकारचे चलनच आहे मात्र ते कागदाच्या स्वरूपामध्ये नसून ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील सार्वभौम चलन आहे आणि हेच चलन मध्यवर्ती बँकांच्या बॅलेन्स शीट वर दायित्व म्हणून वापरले जाते. 

२०२२ मध्ये सेंट्रल बँक डिजिटल करंसी चा अभ्यास करण्यासाठी एक कार्यकारी कमिटी संस्थापित केली होती व त्यानंतर रिजर्व बँक ऑफ इंडिया यांनी ७ ऑक्टोबर २०२२ रोजी डिजिटल रूपी म्हणजेच ई-रूपी यासाठी एक संकल्पना जारी केली. 

रिजर्व बँक ऑफ इंडिया च्या कन्सेप्ट नोट नुसार मध्यवर्ती बँक ह्या डिजिटल रूपी चे प्रक्षेपण करतील. मात्र डिजिटल रूपी हा सध्या नियोजनात आहे आणि रिजर्व बँक ऑफ इंडिया च्या प्रायोगिक चाचण्यांच्या परिणामांवर अवलंबून त्याचे अंतिम स्वरूप ही बदलू देखील शकते. 


FAQ | नेहमी विचारले जाणारे प्रश्न

ई-रूपी ट्रान्सफर केला जाऊ शकतो का?

होय, Digital Rupee किंवा Electronic Rupee याची रीटेल व्हर्जन म्हणजेच साधारण आवृत्ती ही टोकन आधारित असल्याचे सांगितले जात आहे. आता हे सोप्याभाषेमध्ये सांगायचे म्हणजे तुम्ही प्राप्त कर्त्याची प्रायवेट की म्हणजेच EMAIL-ID याद्वारे तुमची प्रायवेट की म्हणजेच पासवर्ड वापरुन तुम्ही डिजिटल रूपी ही ट्रान्सफर करू शकता.


निष्कर्ष | Digital Rupee Information in Marathi 

अश्या प्रकारे डिजिटल रुपी म्हणजे काय? याबद्दल सविस्तर माहिती बघितली आहे. तरी तुम्हाला डिजिटल रुपया काय आहे आणि याचा कश्या प्रकारे वापर केला जाऊ शकतो तसेच अर्थव्यवस्थेसाठी किती महत्वाचा आहे याबद्दल माहिती समजलीच असेल. 

तसेच तुम्हाला डिजिटल करन्सी बद्दल चा हा लेख आवडला असेल तर नक्कीच कंमेंट मध्ये सांगा आणि शेअर करायला विसरू नका. 

धन्यवाद!

Leave a Reply