Excel म्हणजे काय? | Excel Information in Marathi

Excel म्हणजे काय

संगणक यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर असतात ज्याद्वारे आपण कामांमध्ये गतिशीलता आणून सुयोग्य पद्धतीने आणि सहज काम पूर्ण करू शकतो. अश्याच प्रकारच्या एका सर्वात महत्वाच्या प्रोग्रॅम किंवा सॉफ्टवेअर बद्दल आजच्या लेखांमध्ये माहिती बघूया. 

हा प्रोग्रॅम म्हणजे एमएस एक्सेल जो की मायक्रोसॉफ्ट या कंपनीचा एक महत्त्वपूर्ण प्रोग्रॅम आहे. या लेखामध्ये आपण MS Excel म्हणजे काय? त्याचा वापर कसा केला जातो आणि त्याचे प्रकार अश्या सर्व प्रकारची माहिती अभ्यासणार आहोत.  

सर्वसाधारणपणे बोलायचे झाले तर (MS Excel) चा वापर हा आकडेवारीच्या स्वरूपात माहिती विश्लेषण व दस्ताऐवज बनवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो.

Excel म्हणजे काय? | Excel Meaning in Marathi

Excel हा एक अश्या प्रकारचा प्रोग्रॅम आहे ज्यामध्ये आकडेवारीच्या स्वरूपात माहितीचे संकलित करणे, त्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करून विश्लेषण करणे आणि याच सर्व माहितीच्या आधारावर दस्तऐवज तयार करणे म्हणजे मायक्रोसॉफ्ट एक्सेल होय. हा एक स्प्रेडशीट प्रोग्राम आहे आणि या स्प्रेडशीट, एक्सेल शीट ला वर्कबुक असे देखील म्हटले जाते. 

या एक्सेल प्रोग्रॅम चा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. त्याचप्रमाणे सर्व लहान-मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये सर्वात जास्त कार्य हे MS Excel वरच केले जाते. मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा एक स्प्रेडशीट प्रकारचा प्रोग्राम असून त्यामध्ये असंख्य स्तंभ म्हणजेच उभे कॉलम्स व असंख्य पंक्ती म्हणजेच आडव्या आणि उभ्या रोज दिलेल्या असतात. त्यामुळे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आकडेवारी संकलित करण्यास मदत होते.

आणखी माहिती वाचाCPU नक्की काय आहे? विस्तृत माहिती वाचा


एक्सेल चा वापर | Uses of Excel

MS Excel हा एक स्प्रेडशीट प्रकारचा प्रोग्राम असल्यामुळे यामध्ये असंख्य स्तंभ आणि असंख्य पंक्ती असतात. त्यामुळे यामध्ये सर्व ऑफिसेस मधील कर्मचाऱ्यांचे डिटेल्स त्याचप्रमाणे अटेंडन्स रेकॉर्ड याच प्रोग्रॅम मध्ये ठेवले जाते आणि तसेच या प्रोग्रॅम मध्ये असलेल्या फॉर्मूल्यांमुळे यामध्ये कर्मचाऱ्यांची सॅलरी शीट सुद्धा बनवली जाते. फायनान्स क्षेत्रामध्ये तर जवळपास 90% आकडेवारी हि MS Excel या साहाय्याने केली जाते. 

त्याचबरोबर मोठमोठ्या कंपन्या किंवा व्यवसाय मालक एक्सेल प्रोग्रॅम चा वापर जमाखर्चाची नोंद करून ठेवण्यासाठी करतात. यामध्ये मुख्यत्वे करून आकडेवारीची गणना केली जाते व ती सर्व माहिती आपल्याला नजरेच्या टप्प्यात ओळखू येण्यासाठी चार्ट किंवा आलेखाच्या स्वरूपात देखील माहितीची मांडणी करू शकतो. 


मायक्रोसॉफ्ट एक्सेल सुरु कसे करावे

  1. सर्वप्रथम संगणकाच्या स्क्रीनवर असलेल्या Windows या बटनावर क्लिक करा आणि नंतर ऑल प्रोग्रॅम्स मध्ये जाऊन त्यातील MS OFFICE हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. 
  2. नंतर तुम्हाला Microsoft Power Point, Microsoft Word, Microsoft Excel, असे पर्याय दिसतील.
  3. त्यातील Microsoft Excel या पर्यायावर क्लिक करून तुम्ही एक्सेल शीट उघडू शकता.
  4. याचबरोबर आणखी एक सोपा पर्याय सुचवायचा झाल्यास माऊस वर लेफ्ट क्लिक करून तुमच्या स्क्रीनवर काही पर्याय तुम्हाला पहावयास मिळतील त्यातील न्यू हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला एम एस ऑफिस मधील सर्व सॉफ्टवेअर प्रोग्रॅम दिसतील. त्यातील मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा पर्याय निवडा. 

अश्या प्रकारे तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर MS Excel हा प्रोग्रॅम ओपन झालेला दिसून येईल. 

आणखी माहिती वाचा – OS म्हणजे काय संपूर्ण माहिती


एक्सेल चे घटक | Excel Factor in Marathi

  1. स्तंभ । Column 

एक्सेल मधील स्तंभांबाबत अर्थात कॉलम बाबत माहिती घेऊयात, तर स्तंभ म्हणजे उभ्या कॉलमची सारणी असते एका एक्सेल वर्कशीट मध्ये एकूण 16384 स्तंभ आढळून येतात.

एक्सेल स्तंभ
  1. पंक्ती । Rows 

एक्सेल मध्ये एकूण १०४८५७६ पंक्ती किंवा रोज असतात. यामध्ये एक ते शेवटच्या आकड्यापर्यंत प्रत्येक ओळीला आपला एक स्वतंत्र क्रमांक दिलेला असतो. 

एक्सेल पंक्ती
  1. सक्रिय सेल । Active Cell

ज्यावेळी आपण एक्सेल वर्कशीट मध्ये काम करत असतो त्यावेळी माऊसच्या एका क्लिकने जो सेल आपण सिलेक्ट करतो व ज्यामध्ये आपण आकडे टाईप करत असतो तो सेल म्हणजेच सक्रिय सेल असतो. 

एक्सेल सक्रिय सेल
  1. ॲड्रेस बार । Address Bar

एक्सेल मधील ऍड्रेस बार चे मुख्य कार्य हे असते कि ज्या सेलमध्ये युजर काम करत असतो त्या सेलचा अर्थातच सक्रिय सेलचा पत्ता ऍड्रेस बार मध्ये दर्शविला जात असतो. 

  1. शीर्षक पट्टी | Title Bar

शीर्षक पट्टी किंवा टायटल बार हा एक्सेल शीट च्या सर्वात वरच्या बाजूला असतो यामध्ये आपण ज्या शीट मध्ये कार्य करतो त्या शीट चे म्हणजेच वर्कबुक चे नाव दिलेले असते. 

  1. फॉर्म्युला बार | Formula Bar

फॉर्मुला बार चे मुख्य कार्य सक्रिय सेल मध्ये जी काही माहिती आहे त्याला दर्शविणे व सेल मध्ये उपयोगात आणले जाणारे सर्वच गणितीय फॉर्मुले या बार च्या मदतीने दर्शविले जातात. या मुळे आपल्याला कळून येते कि कोणत्या सेल मध्ये फॉर्मुले आहेत आणि कोणत्या सेल मध्ये फॉर्मुले नाहीत.

अश्याच प्रकारे आणखी देखील एक्सेल मध्ये महत्वाचे घटक दिसून येतात या सर्व घटकांचा विशिष्ट्य सूचना देण्यासाठी वापर केला जातो. 


नेहमी विचारले जाणारे प्रश्न | FAQ

एक्सेल मध्ये किती स्तंभ/कॉलम असतात?

एक्सेल या स्प्रेडशीट मध्ये एकूण 16,384 स्तंभ/कॉलम  असतात. 

एक्सेल मध्ये किती पंक्ती/रोज असतात?

एक्सेल या स्प्रेडशीट मध्ये एकूण 1,048,576 पंक्ती/रोज असतात.


निष्कर्ष | Excel Information in Marathi 

वरील प्रमाणे आम्ही एक्सेल म्हणजे काय? त्याचा वापर अश्या प्रकारची बरीच उपयोगी आणि महत्वाची माहिती दिली आहे तुम्हाला नक्कीच वरील माहिती आवडली असेल अशी आशा करतो. 

आणि तसेच तुम्हाला आणखी कोणत्याही महत्वाच्या विषयाबद्दल माहिती हवी असेल तर नक्की कंमेंट करा, आणि या ब्लॉग पोस्ट ला शेअर करायला विसरू नका. 

धन्यवाद!

Leave a Reply

This Post Has 2 Comments

  1. पंकज मिसाळ

    अगदी सोप्या पद्धतीने आपण यात नमूद केले आहेत… 👌🏼