टाँप वर्डप्रेस थीम्स | Top 10 WordPress Themes in Marathi

best wordpress themes in marathi

आज प्रत्येक ब्लाँगर आपल्या ब्लाँग वेबसाईटचा लेआऊट, फंट, डिझाईन इत्यादी आपल्याला पाहिजे तसे सेट करण्यासाठी वर्डप्रेस थीमचा वापर करत असतात. वर्डप्रेस थीममुळे आपल्याला आपल्या वेबसाईटची डिझाईन तसेच लेआऊट बदलता येत असतो त्यांचे पाहिजे तसे कस्टमाइझेशन करता येत असते.

मार्केटमध्ये आज अशा अनेक वर्डप्रेस थीम्सआहेत ज्या आपण फ्री मध्ये तसेच प्रिमियममध्ये देखील वापरू शकतो. म्हणुन आजच्या लेखातुन आपण अशाच बेस्ट वर्डप्रेस थीम्सविषयी सविस्तर माहीती पाहणार आहोत. (Top Responsive WordPress Blog Themes in Marathi)

WordPress Themes काय असते?

वर्डप्रेम थीम ही आपल्या ब्लाँग तसेच वेबसाईटची फ्रेमवर्क असते. थीम चा वापर करुन आपण आपल्या ब्लाँग तसेच वेबसाईटच्या दृश्य देखाव्यामध्ये पाहिजे ते बदल करू शकतो म्हणजेच आपली वेबसाईट तसेच ब्लाँग पाहताना समोरच्याला आकर्षक आणि प्रोफेशनल वाटला पाहिजे आणि पुढच्या वेळीही तो पुन्हा आपल्या वेबसाईटवर भेट देण्यासाठी आला पाहिजे.

अशा पदधतीने आपल्या ब्लाँग तसेच वेबसाईटचे कस्टमाईझेशन आपल्याला वर्ड प्रेस थीमचा वापर करून करता येत असते. वर्डप्रेस थीमद्वारे आपण आपल्या ब्लाँग वेबसाईटचे डिझाईन,लेआऊट,फंट इत्यादी कस्टमाईज करू शकतो. 


हे पण वाचा –

WordPress म्हणजे काय?


2021 मधील टाँप वर्ड प्रेस थीम्स? Best WordPress Themes in Marathi

तसे पाहायला गेले तर वर्ड प्रेस मध्ये अशा खुप थीम्स आहेत ज्या अतिशय उत्तम आहेत आणि त्या आपल्याला फ्री तसेच पेड मध्ये देखील उपलब्ध होत असतात.अशाच काही थीम्स ची यादी खालीलप्रमाणे:

Divi

divi wordpress themes

डिव्ही ही लोकप्रिय आणि best multipurpose wordpress theme आहे. कोणत्याही प्रकारच्या ब्लॉग किंवा वेबसाईट साठी या थीम चा वापर करता येतो. या थीम च्या साहाय्याने आपण ब्लॉग आकर्षक आणि प्रोफेशनल बनवू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला Divi ने प्रदान केलेल्या लेआउट मध्ये बदल करण्याची परवानगी असते. 


OceanWP

oceanwp best wp themes

OCEANWP ही एक Attractive आणि Responsive WordPress theme आहे. या थिम चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो सध्या या थीम चे 8,00000+ Active Installs झालेले आहेत. ही थीम कोणत्याही प्रकारच्या वेबसाईट किंवा ब्लॉग साठी विनामूल्य आहे. या थीम चा वापर करून आपण व्यावसायिक, न्यूज, मॅगझिन, ई कॉमर्स स्टोअर किंवा वैयक्तिक ब्लॉग अशा कोणत्याही प्रकारची वेबसाइट OceanWP मुळे अगदी सहजतेने तयार केली जाते.


Generate Press 

top wp themes marathi

जनरेट प्रेस  हि एक mobile friendly wordpress theme आहे.. जेनरेट प्रेस या थीम ला वेबसाईट गती आणि SEO लक्षात घेऊनच तयार करण्यात आले. या थीम चा वापर करून कोणतीही वेबसाईट किंवा ब्लॉग तयार करता येतो. या थीम चे फ्री आणि प्रीमियम असे दोन्ही Version आहेत. जर फ्री Version घेतले तर त्या मध्ये मर्यादित फिचर्स पाहायला मिळतील आणि जर प्रीमियम घेतले तर अनेक फिचर्स उपलब्ध होतील. या थिम चे फिचर्स पुढीलप्रमाणे पाहूया.


Astra

responsive themes marathi

Astra ही best Free and premium wordpress theme आहे. या थीम ल पर्सनल ब्लॉग, पोर्टफोलिओ, लाईस्टाईल, व्यावसायिक ब्लॉग, या बरोबरच ई कॉमर्स, ऑनलाईन स्टोअर आणि मासिके इत्यादी ब्लॉग वेबसाईट तयार करण्यासाठी योग्य थीम आहे. जर तुम्हाला या थिम चे काही advanced features हवे असतील तर तुम्ही astra चे प्रीमियम विकत घेऊ शकता.


Avada 

fast wordpress themes

अवाडा ही एक बहुउद्देशिय वर्डप्रेस थीम आहे. जी कोणत्याही प्रकारची वेबसाईट किंवा ब्लॉग तयार करण्यासाठी योग्य आहे. या थीम चा वापर ऑनलाईन स्टोअर, पोर्टफोलिओ, ई कॉमर्स स्टोअर किंवा इतर ब्लॉग वेबसाईट मध्ये केला जातो. तसेच या avada थीम मध्ये अमर्यादित डिझाईन, मोबाईल फ्रेंडली, SEO फ्रेंडली आणि woocommerce समर्थन अश्या विविध प्रकारची वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.


ColorMag

wordpress themes

कलर मँग ही Most Popular Free WordPress Theme आहे. ही थिम वापरायला सोपी आणि फ्री मध्ये उपलब्ध आहे. तसेच ही थीम न्यूज, मॅगझिन, वृत्तपत्र अशा कोणत्याही प्रकारच्या वेबसाईट तयार करण्यासाठी ही थीम उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या इच्छेनुसार या थीम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचा लेआउट देखील तयार करू शकतो. त्याचप्रमाणे या थीम चे Premium वर्जन सुद्धा घेऊ शकता त्या मध्ये आणखी खूप फिचर मिळतील.


Newspaper 

Newspaper faster themes

न्युज पेपर ही थीम ला बातम्या, वर्तमानपत्र, मॅगझिन, पर्सनल ब्लॉग,  ई-कॉमर्स शॉप, स्टोअर, WooCommerce, प्रकाशन किंवा पुनरावलोकन अशा कोणत्याही प्रकारच्या ब्लॉग वेबसाईट मध्ये वापरू शकता. तसेच themeforest वर newspaper ही बेस्ट सेलर थीम आहे. या थिम मध्ये multi-purpose आणि शक्तिशाली वैशिष्ट्ये आहेत. जे बेस्ट वेबसाईट तयार करण्यास मदत करतात.


Writee

writee wordpress theme

Writee ही पण एक विनामूल्य थीम आहे. ही थीम फूड ब्लॉग, ट्रॅव्हल्स ब्लॉग, फॅशन, adventures ब्लॉग, पर्सनल ब्लॉग अशा वैयक्तिक ब्लॉग साठी योग्य थीम आहे. तसेच ही थीम SEO आणि मोबाईल friendly आहे.


Ultra 

Ultra best themes

Ultra ही बहुउद्देशिय थीम असून सर्वच प्रकारच्या वेबसाईट मध्ये वापरल्या जाते. या थीम मध्ये अमर्यादित लेआउट, साइडबार, सोशल मीडिया एकत्रीकरण, अमर्यादित रंग अश्या प्रकारचे बरेच फिचर्स आहेत. अल्ट्रा ही थीम नवीन असणाऱ्या ब्लॉगर साठी सरळ आणि सेट अप करण्यासाठी खूप सोपी थीम आहे.


Total 

total wordpress themes

Total ही Responsive Multi-Purpose वर्डप्रेस थीम आहे. या थीम चा वापर सर्वच प्रकारच्या ब्लॉग वेबसाईट बनविन्यासाठी केला जातो. Unlimited Styling, Advanced Theme Panel, Responsive Design, Animation अश्या प्रकारची खूप वैशिष्टये Total या वर्डप्रेस थीम मध्ये उपलब्ध आहेत.


हे पण वाचा –

ब्लॉग म्हणजे काय? आणि वर्डप्रेस ब्लॉगिंग टिप्स


कोणत्याही वर्ड प्रेस थीम मध्ये कोणकोणते फीचर असणे गरजेचे असते?

 • कोणतीही वर्ड प्रेस थीम दिसायला साधी आणि सोपी असायला हवी.
 • वर्ड प्रेस थीम अशी असावी जी ब्राऊझरला देखील सपोर्ट करते.
 • वर्ड प्रेस थीम ही प्लग इनला देखील सपोर्ट करणारी असावी.
 • कोणत्याही थीममध्ये हेल्प आँप्शन असायलाच हवे.
 • कोणतीही ब्लाँगवरील वर्ड प्रेस थीम ही सर्वप्रथम एससीओ फ्रेंडली असणे गरजेचे असते.
 • वर्ड प्रेस थीम वापरण्याचे फायदे कोणकोणते आहेत?

 • वर्ड प्रेस थीमचा वापर करून आपण आपल्या ब्लाँग तसेच वेबसाईटची डिझाईन पाहिजे तशी कस्टमाईज करू शकतो.
 • वर्डप्रेस थीमद्वारे आपण आपल्या ब्लाँग वेबसाईटचा फंट चेंज करू शकतो आणि तो आपल्याला पाहिजे तसा पाहिजे तेवढा ठेवू शकतो.
 • वर्डप्रेस थीमचा अजुन एक फायदा हा आहे की याचा वापर करून आपल्या ब्लाँग वेबसाईटचा लेआऊट म्हणजेच आकार पाहिजे तसा सेट करू शकतो.
 • निष्कर्ष:

  आम्ही तुम्हाला बेस्ट वर्डप्रेस थीम याबद्दल महत्वाची आणि उपयुक्त माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला वर्डप्रेस थीम बद्दलची माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि मित्रांना शेअर सुद्धा करा जेणेकरून त्यांना उपयुक्त माहिती मिळेल.

  🙏🏻तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद🙏🏻

  Leave a Reply

  This Post Has 2 Comments

  1. Sandip

   sir tumchi theme konati ahe aani paid ahe ki free?

   1. Marathi Spirit

    आम्ही Free OceanWP Theme Use केली आहे.