साईटमँप म्हणजे काय? | Sitemap Meaning in Marathi

Sitemap म्हणजे काय

आपण मागील पोस्ट मध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन याबद्दल संपूर्ण माहिती बघितलीच आहे. SEO च्या सहाय्याने आपण वेबसाईट किंवा ब्लॉग ला सर्च इंजिन वर रँक करू शकतो. पण SEO मध्ये एक सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे साइटमॅप. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि SEO मध्ये साइटमॅप कसा काय महत्वाचा घटक आहे. 

तर साइटमॅप हा सर्च इंजिन ला सबमिट केला नाही तर आपला ब्लॉग सर्च इंजिन मध्ये दिसणारच नाही, रँकिंग तर दूरच राहील. म्हणून सर्च रिझल्ट मध्ये आपला ब्लॉग वेबसाईट दिसण्यासाठी आणि रँकिंग मिळवण्यासाठी सर्वात आधी या साइटमॅप बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायला हवी. 

तुम्हाला सर्च इंजिन मध्ये तुमचा ब्लॉग रँक करायचा असेल तर नक्कीच साइटमॅप म्हणजे काय? (Sitemap in Marathi) आणि साइटमॅप कसा तयार केला जातो याबद्दल संपूर्ण माहिती वाचायला हवी. 

Sitemap म्हणजे काय? | Sitemap in Marathi

आपण जेव्हा नवीन ब्लॉग तयार करतो तेव्हा या ब्लॉग बद्दल सर्च इंजिन ला माहिती कशी मिळणार. तर हि सर्व ब्लॉग च्या संबंधित माहिती साइटमॅप सर्च इंजिन ला प्रदान करत असतो. 

जेव्हा आपण एक नवीन ब्लॉग बनवतो तेव्हा त्या ब्लॉग चा एक साइटमॅप तयार करायचा असतो आणि या साइटमॅप ला सर्च इंजिन मध्ये सबमिट करावे लागते. या साइटमॅप च्या मदतीने आपल्या ब्लॉग मधील नवनवीन पोस्ट, पेजेस आणि इमेजेस सर्च इंजिन मध्ये इंडेक्स होतात आणि सर्च रिझल्ट मध्ये दिसू लागतात. 

तसेच आपल्या ब्लॉग वेबसाईट चा साइटमॅप सबमिट केल्यामुळे आपल्या ब्लॉग वेबसाईट ची ट्रॅफिक वाढायला लागते परिणामी SEO Ranking सुद्धा Increase होते. म्हणूनच साइटमॅप हा सर्वात महत्वाचा आणि उपयोगी असणारा घटक आहे.

साईटमँप ही एक प्रकारची xml फॉरमॅट मध्ये असलेली फाईल असते. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉग ची एक ब्लूप्रिंट आहे. जिच्याद्वारे क्राँलरला आपल्या वेबसाइटच्या संपूर्ण रचने विषयी माहीती प्राप्त होत असते. तसेच साइटमॅप सर्च इंजिन ला आपल्या वेबसाईट ची सर्व पेजेस, व्हिडिओ, इमेजेस आणि इतर सर्च प्रकारच्या सामग्री विषयी माहिती सबमिट करत असते.  

तसेच साइटमॅप च्या साहाय्याने आपल्या वेबसाइट मधील सामग्री, पोस्ट किंवा पेजेस सर्च इंजिन मध्ये लवकर इंडेक्स व्हायला आणि अधिक कार्यक्षमरीत्या प्रभावीपणे क्राँल आणि अनुक्रमित करण्यात मदत होते. 

साईट मँप चे प्रकार | Types of Sitemap in Marathi)

 1. XML Sitemap म्हणजे काय? (Extensible Markup Language)

XML Sitemap एक प्रकारची फाईल असते. या फाईल चा मदतीने आपण वेबसाईट मधील सर्व pages, post, categories आणि इतर महत्वाची माहिती सर्च इंजिन परंत पोहचवण्याचे काम करते. तसेच XML Sitemap मुख्यत्वे Crawler/Google Botsआपल्या वेबसाईटचे Structure समजण्यासाठी तयार करत असतो. 

 1. HTML Sitemap म्हणजे काय? (Hypertext Markup Language)

HTML Sitemap चा वापर पण आपल्या वेबसाईटला भेट देत असलेल्या Users ला Particular Category किंवा pages कुठे आहे हे समजण्यासाठी तयार करत असतो.

Sitemap तयार करण्याचे फायदे कोणकोणते असतात? | Benefit of Creating Sitemap in Marathi)

 • Sitemap मुळे सर्च इंजिनला आपली वेबसाइट Crawl आणि इंडेक्स करायला मदत होते 
 • XML Sitemap हे आपल्या वेबसाईटवरील पेजेसची Crawling करणे क्राँलरला अधिक सहज आणि सोपे करते.
 • HTML Sitemap मुळे आपल्या वेबसाईटला भेट देत असलेल्या Users ला वेबसाईट Structure समजण्यास सोपे जाते.

WordPress मध्ये Sitemap कसा बनवायचा?

ब्लाँग वेबसाइटसाठी साईटमँप तयार करण्यासाठी वर्डप्रेस मध्ये आज असे अनेक plugins इन दिलेले आहेत ज्यांचा वापर आपण साईटमँप तयार करण्यासाठी करू शकतो.

आपण उदाहरणासाठी RankMath ह्या प्लग इनचा वापर करून साईटमँप तयार करण्याची प्रक्रिया जाणुन घेऊया.

 • सगळयात पहिले आपण  Rank Math Plugin install करून घ्यायचे मग त्याला अँक्टीव्हेट करून घ्यायचे.
sitemap
 • मग डाव्या बाजुला आपल्याला  Rank Math Plugin नावाचा एक मेन्यु दिसुन येईल त्या आँप्शनवर क्लीक करावे.
rankmath plugins
 • त्यांनतर साइटमॅप सेटिंग या ऑपशन्स वर क्लिक करावे
rankmath sitemap step
 • वरील दिलेल्या तीन टँबमध्ये आपण फिचर्स ह्या टँबवर क्लीक करावे. खाली दिलेल्या सेव्ह चेंजेस या बटणावर ओके करावे.
 • आपल्या ब्लाँगचा साईटमँप पुढील प्रमाणे आपणास दिसुन येईल – Marathispirit.com/sitemap_index.xml
marathispirit sitemap
 • वरील साईट URL काँपी करून घ्यायचा.
 • उदा, /sitemap_index.xml फक्त हा युआर एल काँपी करून घ्यायचा.
 • आपल्या सर्च कंसोलमध्ये (Google Search Console) जाऊन पेस्ट करून तो सबमीट करून द्यायचा.
submit sitemap in search console

ब्लाँगर मध्ये साईटमँप कसा बनवायचा? 

 • सर्वप्रथम आपण साईटमँप जनरेटर टुल ओपन करून घ्यायचा आणि तिथे आपल्या ब्लाँगचा युआर एल इंटर करायचा.जनरेट साईटमँप बटणावर ओके करावे.
 • मग आपल्यासमोर आपल्या वेबसाईटचा पुढीलप्रमाणे युआर एल येईल 

उदा, http://marathispirit.blogspot.com/

 • वरील दिलेल्या युआर एलमध्ये आपणास फक्त /पासुनचा यूआर एल काँपी करून सर्च कंसोलमध्ये सबमीट करायचा असतो.

निष्कर्ष | Sitemap Information in Marathi

अश्या प्रकारे तुम्हाला वरील माहिती वरून साइटमॅप आपल्या ब्लॉग वेबसाईट साठी किती महत्वाचा आहे हे कळलेच असेल. तसेच साइटमॅप म्हणजे काय? आणि साइटमॅप चे प्रकार तसेच या साइटमॅप फाईल ला कसे तयार केले जाते याबद्दल संपूर्ण माहिती बघितलीच आहे. 

तरी या पोस्ट बद्दल तुमच्या काही सूचना किंवा प्रश्न असतील तर नक्की कळवा आम्ही तुमच्या सूचनेनुसार पोस्ट ला अपडेट करू. आणि तुम्हाला हा लेख कसा वाटला याबद्दल नक्कीच कंमेंट करा. जर तुमचा अमूल्य प्रतिसाद मिळाला तर आमचा सुद्धा उत्साह वाढेल आणि आम्ही तुम्हाला अश्याच प्रकारची डिजिटल मार्केटिंग, इंटरनेट आणि नवनवीन तंत्रज्ञान याबद्दल मराठी माहिती प्रदान करू.

धन्यवाद !!   

Leave a Reply

This Post Has 3 Comments

 1. Sagar

  उत्कृष्ट लेख आणि भन्नाट कथन! खूप चांगला उपक्रम आहे!
  मराठी स्पिरीट, जिंदाबाद!

 2. Deepak

  Thanks